ADVERTISEMENT
home / सौंदर्य
प्रसिध्द ब्युटी एक्स्पर्ट शहनाज हुसैन ह्यांच्या खास  ’11’ टीप्स, हिवाळ्यात तुमचे ओठ मऊ राहण्यासाठी – Tips for Soft Lips

प्रसिध्द ब्युटी एक्स्पर्ट शहनाज हुसैन ह्यांच्या खास ’11’ टीप्स, हिवाळ्यात तुमचे ओठ मऊ राहण्यासाठी – Tips for Soft Lips

 

असं म्हणतात की, ओठ आणि डोळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतात. तुमच्या चेहऱ्याकडे कोणी पाहिल्यास पहिल्यांदा नजर जाते ती डोळे आणि ओठांकडे. खासकरुन आपण कोणाशीही बोलत असतो तेव्हा समोरच्याचं लक्ष जास्तीत जास्त आपल्या ओठांकडे जातं. तुमचे ओठच तुमच्या चेहऱ्याचं इतर फिचर्स बॅलन्स करतात आणि सौंदर्याबद्दल सांगायचं झालं, तर ओठांवर केलेला योग्य मेकअप तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य खुलवतो.  मात्र हिवाळ्यात आर्द्रता कमी असल्याने तुमचे ओठ सुकू किंवा फाटू लागतात. या दिवसात ओठ मऊ ठेवायचे म्हणजे जणू एक आव्हानच असतं. त्यामुळेच या दिवसांत तुमचे ओठ सुकलेले आणि पापुद्रे निघालेले दिसतात. कधी कधी तर जास्त काळजी वाटते. कारण ओठ अक्षरशः फाटतात आणि मग त्याचा त्रास होऊ लागतो.

Shahnaz Husain  winter lip care

सौंदर्य जगतातील प्रसिध्द व्यक्तिमत्त्व शहनाज हुसैन सांगतात की, ओठांची त्वचा खूप पातळ आणि नाजूक असते. ओठांमध्ये तेल ग्रंथी नसतात. त्यामुळेच हिवाळ्यात ते लवकर सुके पडतात आणि त्याचे पापुद्रे निघू लागतात. हिवाळ्यात नेमकी ओठांची कशी काळजी घ्यावी आणि त्यांना मऊ कसं ठेवायचं याबद्दल खुद्द शहनाज हुसैन टीप्स देत आहेत.

ADVERTISEMENT

तसेच चॅपड ओठांपासून मुक्त कसे करावे याबद्दल वाचा

1. आहारात व्हिटॅमिन सामील करा.

Winter lipcare 1

हिवाळ्यात हेल्दी आणि सुंदर ओठ हवे असतील तर आहारात व्हिटॅमिन ए, सी आणि बी-2चा समावेश असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही या ऋतूमध्ये लिंबूवर्गीय फळे, पिकलेली पपई, टॉमॅटो, गाजर, हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा, मोड आलेली कडधान्ये, ओट्स आणि दूधाचे पदार्थ तुमच्या आहारात समाविष्ट करायला हवेत. पण जर तुमची कुठली मेडीकल ट्रीटमेंट सुरु असेल तर डाएटमध्ये बदल करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.  

ADVERTISEMENT

2. सॉफ्ट टॉवेलने अलगद चोळा

ओठ स्वच्छ करण्यासाठी ते धुतल्यावर एक सॉफ्ट टॉवेल घ्या, हलक्या हाताने तो ओठांवर चोळा. यामुळे ओठांवरची डेड स्कीन निघून जाईल.  

गडद ओठांसाठी घरगुती उपचार

3. ओठांना रोज साय लावा

ADVERTISEMENT

ओठांना मऊ ठेवायचं असेल तर दररोज त्यावर दुधावर साठलेली साय लावा आणि किमान एक तास तरी ती ओठांवर तशीच ठेवा. तासाभरानंतर कोमट पाण्याने ओठ धुवा.

4. सायीबरोबर लिंबाचा रस

तुमचे ओठ काळपट झाले असतील तर ते गुलाबी होण्यासाठी सायीमध्ये काही थेंब लिंबाचा रस टाका आणि ओठांना लावा.

5. सनस्क्रीनयुक्त लिपबाम वापरा

ADVERTISEMENT

हिवाळ्यातही तुम्ही भले रोज लिपस्टिक लावत असाल तरी त्याआधी लिपबाम लावणंही तितकंच गरजेचं आहे, हे विसरु नका. लक्षात ठेवा, तुमच्या लिपबाममध्ये सनस्क्रीनचे गुणधर्म असायलाच हवे. जर तसा लिपबाम तुमच्याकडे नसेल तर सनस्क्रीन लोशनसुध्दा ओठांवर लावू शकता. तुम्हाला परफेक्ट लिप बाम हवायं. आम्ही सुचवू का? तुम्ही Nivea Lip Care Fruity Shine Strawberry घ्या. याची किंमत आहे फक्त 138 रुपये.

Also Read Lip Care Tips In Marathi

6. ग्लॉसी लिपस्टिक वापरा.

Winter lipcare 2

ADVERTISEMENT

हिवाळ्यात मॅट लिपस्टिक टाळा व त्या जागी ग्लॉसी लिपस्टीक वापरा. जर तुम्ही लिपस्टीक लावतच नसाल तर एखादा लिप बाम नेहमीच तुमच्यासोबत ठेवा. म्हणजे गरजेनुसार तो तुम्ही लावाल आणि तुमचे ओठ सॉफ्ट ठेवाल. ग्लॉसी लिपस्टिक घ्यायचीए? तर  Lakme Enrich Satins Lip Color घेऊ शकता. याची किंमत फक्त 194 रुपये आहे.

7. ओठांवर साबण किंवा पावडर अजिबात नको.

थंडीच्या दिवसात ओठांना साबण किंवा पावडर अजिबात लावू नका. तुम्हाला लिपस्टिक काढायची असल्यास तुम्ही साबणाऐवजी क्लिन्जींग क्रीम किंवा क्लिन्जींग जेल वापरा.

8. ओठांसाठी बदामाचं तेल

ADVERTISEMENT

13 hair secrets - oil your hair

बदामाचं तेल खूप पोषक असतं. हे तुमच्या ओठांना मऊ करुन त्यांचं सौंदर्य वाढवतं. त्याचबरोबर जर तुम्ही ते दीर्घ काळ वापरलंत तर तुमच्या त्वचेचा रंगही उजळेल. बदामाचं तेल रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर लावा व रात्रभर ते तसंच राहू द्या. बदामाचं तेल तुम्ही लिपस्टिक काढण्यासाठीही वापरु शकता. या तेलात अनेक पोषणतत्त्व असतात, जसं की व्हिटॅमिन, मिनरल, पोटॅशियम आणि झिंक. ही तत्त्व तुमच्या त्वचेसाठी लाभदायक असतात. बदामाच्या तेलाऐवजी तुम्ही बदामाचं क्रिमही वापरु शकता.  तुम्ही Hamdard Roghan Badam Shirin Sweet Almond Oil घेऊ शकता. याची किंमत फक्त 366 रुपये आहे.

9. आर्गन ऑईलदेखील चांगले आहे.

हिवाळ्यात आर्गन ऑइल त्वचेसाठी खासकरुन ओठांसाठी खूप चांगलं असतं. मोरक्कोत मिळणारं हे आर्गन ऑइल क्रीम आणि मॉइश्चरायजरसारख्या अनेक कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये वापरलं जातं. यामध्ये अनसॅचुरेटेड फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं आणि ते त्वचेत लगेच जिरतं. त्याचमुळे हे ऑईल ओठांसाठी योग्य असून ते ओठांच्या कातडीमध्ये सुधारणा करतं. परिणामी ओठांवर पापुद्रेही पडत नाही. तुम्ही इथून  Rouh Essentials 100% Pure & Organic Moroccan Argan Oil घेऊ शकता. याची किंमत आहे फक्त 299 रुपये.

ADVERTISEMENT

10.खोबरेल तेलाचं पोषण

आपलं रोजच्या वापरातलं खोबरेल तेल (Coconut Oil) मुख्यतः ओळखलं जातं ते त्याच्या पोषक आणि मॉयश्चराइजिंग गुणांमुळेच. जर तुम्ही हे तेल ओठांना लावलंत, तर ते तुमच्या ओठांच्या त्वचेचं अल्ट्राव्हॉयलेट रेडिएशनपासून बचाव करतं. यामुळे ओठांवर पापुद्रेही येत नाहीत. तुम्ही हे तेल मेकअप काढण्यासाठीही वापरु शकता. तुम्ही ओठांना हे तेल लावून रात्रभर तसंच ठेवा किंवा किमान 15 मिनिटं ओठांवर लावून ठेवा व नंतर ओल्या कापसाच्या बोळ्याने पुसा आणि पहा तुमचे ओठ किती मऊ होतात ते. यासाठी तुम्ही Nature’s Absolutes Virgin Coconut Oil घेऊ शकता. याची किंमत आहे फक्त 210 रुपये.

11. मधाची कमाल

shutterstock 764193367

ADVERTISEMENT

ओठ मऊ होण्यासाठी मध (Honey) चा वापर फायदेशीर ठरतो. कारण मधात हवेतून आर्द्रता शोषण्याचे गुणधर्म असतात. म्हणून मध फक्त 15 मिनिटांसाठी ओठांवर लावून ठेवा आणि नंतर पाण्याने धुवा. जर तुमचे ओठ जास्तच कोरडे पडले असतील, तर मधात समप्रमाणात साय मिसळा आणि हे मिश्रण रोज लावत जा. तुम्हाला कमालीचा फरक जाणवेल तुमचे ओठ मऊ आणि मुलायम तर होतीलच शिवाय प्रत्येकाचं लक्ष ही वेधून घेतील.

26 Nov 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT