Forbes List: दीपिका पदूकोण भारतातील सर्वात 'श्रीमंत' महिला सेलिब्रेटी

Forbes List: दीपिका पदूकोण भारतातील सर्वात 'श्रीमंत' महिला सेलिब्रेटी

नवविवाहीत जोडपं दीपिका पादूकोण व रणविर सिंगसाठी आणखी एक खूषखबर आहे. दीपिका पदूकोण नुकतीच भारतातील सर्वात श्रीमंत महिला सेलिब्रेटी ठरली आहे. फोर्ब्स इंडियाने 2018 मध्ये भारतातील सर्वाधिक कमाई करण्याऱ्या पहिल्या शंभर सेलिब्रेटीजची यादी जाहीर केली आहे. या यादीतील पहिल्या पाच जणांमध्ये सलमानखान, विराट कोहली,अक्षयकुमारसह बॉलीवूड अभिनेत्री दीपिकाचादेखील समावेश आहे. दीपिका पदूकोणने फोर्ब्सच्या या यादीत चक्क चौथे स्थान पटकावले आहे. त्यामुळे आता दीपिका बॉलीवूडमधील सर्वाधिक कमाई करणारी श्रीमंत अभिनेत्री ठरली आहे. दीपिकाने या वर्षी चक्क 112.8 कोटी कमावले आहेत. सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या पाच सेलिब्रेटींमध्ये दीपिका एकटीच महिला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे...दीपिकाचा पती रणवीर देखील या यादीमध्ये आठव्या क्रमांकावर आहे.


36160218 465888880502828 5082563946175528960 n


दीपिकाने 2012 साली देखील श्रीमंत सेलिब्रेटीच्या यादीमध्ये स्थान पटकावलं होतं. 2017 मध्ये या यादीत जवळजवळ 21 महिला सेलिब्रेटीजचा समावेश होता.यंदा यामध्ये फक्त 18 जणींचा समावेश आहे. दीपिकासाठी मात्र हे वर्ष नक्कीच 'लकी' ठरलंय कारण आता ती पहिल्या पाच श्रीमंत सेलिब्रेटीजमध्ये गणली जाणार आहे.


35480863 1378404868927580 3810004199098286080 nदीपिका व रणवीर नुकतेच विवाहबंधनामध्ये अडकले आहेत.दीपवीर हे सर्वांचंच एक आवडतं सेलिब्रेटी कपल आहे.मागील 12 नोव्हेंबरपासून जवळजवळ 1 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या लग्नसराईची धमाल सुरू होती. नुकतेच हे नवदाम्पत्य त्यांच्या सहजीवनात रुळत आहे. त्यामुळे या गोड बातमीने दीपिका अधिकच सुखावली असेल.


फोटोसौजन्य-इन्स्टाग्राम