काय आहे 21 डिसेंबर 2018 चं राशीफळ

काय आहे 21 डिसेंबर 2018 चं राशीफळ

मेष- आई-वडीलांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल. आहाराबाबत सावध रहा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. बाहेरगावी जाण्याचा बेत कराल. नोकरीत यश मिळेल. उद्योगामधील समस्या वाढू शकतात. कार्य सिद्धीस गेल्याने आत्मविश्वास वाढेल.


कुंभ- अभ्यासातील समस्या मार्गी लागतील. अभ्यासामध्ये रस घ्या. नोकरीमध्ये यश मिळेल. बिझनेसमध्ये नवीन ओळखी वाढवताना सावध रहा. जोडीदारासोबत एखाद्या सामाजिक कार्यक्रमासाठी जाण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांना वेळ द्याल.


मीन- बिझनेसमध्ये आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. घरात एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचं नियोजन कराल. रागावर नियंत्रण ठेवा.आरोग्याची काळजी घ्या. उधारी देताना देखील सावध रहा.


वृषभ- प्रेमप्रकरणात तणाव येण्याची शक्यता. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराला समजून घ्या आणि त्याला वेळदेखील द्या. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना विशेष मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक बाजू भक्कम होईल.


मिथुन- वडीलांकडून प्रॉपर्टीचा हक्क मिळण्याची शक्यता आहे. बिझनेसमध्ये नवीन कॉट्रॅक्ट मिळाल्याने फायदा होईल.नोकरीत प्रमोशन मिळेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. पैशांचे योग्य नियोजन करा. जोडीदारासोबत बाहेरगावी जाण्याचा बेत आखाल.


कर्क- विनाकारण दगदग करणे टाळा. आरोग्य समस्या निर्माण होतील. आहाराची योग्य काळजी घ्या. सामाजिक प्रतिष्ठा जपा. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल. जवळचे नातेसंबध सुधारतील. मित्रमंडळी अथवा नातेवाईकांसोबत बाहेरगावी जाण्याचा  बेत आखाल.


सिंह- वैवाहिक जीवनात सुख येईल. नातेसंबंध चांगले होतील. राजकीय सहकार्य लाभेल. कामाच्या ठिकाणी एखाद्या महिलेची विशेष मदत मिळेल. एखाद्या मंगल अथवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.


कन्या- विद्यार्थ्यांना यश मिळवणे कठीण जाईल. बिझनेस अथवा नोकरीमध्ये समस्या वाढतील. भरपूर काम करुनदेखील कमी यश मिळेल. विरोधकांकडून त्रास जाणवेल.अचानक खर्च वाढतील. आरोग्य-स्वास्थ लाभेल.


तुळ- आळसामुळे अनेक कामे अर्धवट राहतील. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळणार नाही. वैवाहिक जीवन सुखाचे असेल.आरोग्याची काळजी घ्या. एखादी भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. विनाकारण वाद घातल्याने नातेसंबंध बिघडू शकतात.  


वृश्चिक- वैवाहिक जीवनात प्रेम आणि संयम राखा. नातेसंबंध सुधारतील. नवीन प्रेमसंबंध निर्माण होण्याची शक्यता आहे. परीक्षेत यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याची स्तुती होईल. बिझनेसमध्ये उत्कर्ष आणि उन्नती होईल.


धनु- वैवाहिक जीवनात प्रेम आणि संयम राखा. नातेसंबंध सुधारतील. नवीन प्रेमसंबंध निर्माण होण्याची शक्यता आहे. परीक्षेत यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याची स्तुती होईल. बिझनेसमध्ये उत्कर्ष आणि  उन्नती होईल.


मकर- विनाकारण दगदग झाल्याने थकवा जाणवेल. सावध रहा दुखापत होऊ शकते. आरोग्य  उत्तम राहण्यासाठी आहाराबाबत सावध रहा. कौटुंबिक कलहापासून सावध रहा. मित्रांमुळे पैशांशिवाय तुमची कामे होतील. जवळच्या नातेसंबंधांमुळे लाभ होण्याची शक्यता.