‘भाई व्यक्ती की वल्ली’ दुसरा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

‘भाई व्यक्ती की वल्ली’ दुसरा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

पु.ल...अर्थात आपल्या सर्वांचे लाडके भाई. ‘पु.ल.देशपांडे’ म्हणजे मराठी साहित्यातील एक दैवतच. पुलंच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्वीच्या पिढीतील सर्वजण त्यांच्या लिखाणाचे चाहते आहेतच पण आत्ताची तरुणपिढी देखील पुलंच्या तितक्याच प्रेमात आहे. मराठी साहित्य, नाटक, अभिनय अशा सर्वच बाबतीतील पु.लंचं योगदान फार महत्वाचं आहे.


43985908 1419881501475080 5927467645614947545 n


‘भाई व्यक्ती की वल्ली’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला...


पु.ल.चं हे जन्मशताब्दी वर्ष आहे.याचं औचित्य साधत महेश मांजरेकर पु.ल.देशपांडेंच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा निर्मिती करीत आहेत. ‘भाई व्यक्ती की वल्ली’ चा पहिला टीझर नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित करण्यात आला होता. नुकताच या चित्रपटाचा दुसरा टीझर देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘भाई व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट 4 जानेवारीला प्रदर्शित होतो आहे. महेश मांजरेकर यांची ‘फाळकेज फॅक्टरी’ ही संस्था या चित्रपटांची निर्मिती करत आहे.

Subscribe to POPxoTV

किशोरवयीन ‘पुल’ साकारणार सक्षम कुलकर्णी


या चित्रपटामध्ये सागर देशमुख ‘पुलं’ च्या भूमिकेत दिसणार आहे. सागरने यापूर्वी ‘हंंटर’ या हिंदी सिनेमामधून तर ‘वाय झेड’ या मराठी सिनेमामधून आपल्या अभिनयाची झलक दाखविली होती. तर किशोर वयातील ‘पुलं’ सक्षम कुलकर्णी साकारणार आहे. सक्षम कुलकर्णीने ‘पकपकपकाक’, ‘दे धक्का’,’काकस्पर्श’ सिनेमामध्ये काम केलंय.तसंच सध्या अनेक मराठी मालिकांमधून तो प्रेक्षकांसमोर येत आहे. या दोघांनाही भाईंच्या भूमिकेत पाहणं नक्कीच उत्सूकतेचं ठरणार आहे. अभिनेता अभिजीत चव्हाण या सिनेमामध्ये ‘प्र.के अत्रें’च्या भुमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. या सिनेमाचा दुसरा टीझर देखील नुकताच प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्सूकता आता नक्कीच शिगेला पोहचली आहे.


14727495 686645368165742 1649320390020825088 n


फोटोसौजन्य-इन्स्टाग्राम