ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
पायाच्या सौंदर्यासाठी पेडीक्युअरच्या  ‘8’ सोप्या स्टेप्स

पायाच्या सौंदर्यासाठी पेडीक्युअरच्या ‘8’ सोप्या स्टेप्स

आपल्या पायांकडे इतर अवयवांच्या तुलनेत आपण जरा दुर्लक्षच करतो. खरंतर चांगले, स्वच्छ आणि सुंदर दिसणारे पाय म्हणजे तुमचं शरीर निरोगी असल्याचं चिन्ह आहे. तुम्ही पायांची विशेष काळजी घेण्यासाठी पेडीक्युअर करायला पार्लरमध्ये जात असाल. पण आता तुम्ही घरच्या घरीसुध्दा पायांची काळजी घेऊ शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला फॉलो करायच्या आहेत पेडीक्युअरच्या या 8 सोप्या स्टेप्स:-

pedicure-tips

1. पेडीक्युअरसाठी लागणारं सामान

पेडीक्युअरसाठी लागणारं काही सामान तुमच्याकडे घरी असेलच, तर काही बाजारातून आणावं लागेल. पेडीक्युअरसाठी लागणारं सामान म्हणजे एक टब, कोमट पाणी, बाथ सॉल्ट, स्क्रब, नेल क्लिपर्स, क्यूटीकल पुशर, नेलफायलर, फूट फाइल, नेल स्क्रबर, नेल पॉलीश रिमूव्हर, अवकॅडो ऑईल, एक स्वच्छ टॉवेल, जोजोबा ऑईल, टी ट्री ऑईल, ऑलिव्ह ऑईल, लेमन इसेंशियल ऑईल आणि कॉटन पॅड्स.

ADVERTISEMENT

 Pedicure FB 9122566

2. नेल क्लीन्जिंग म्हणजेच नखांची स्वच्छता

पेडीक्युअरमध्ये सगळ्यात आधी कापसाच्या बोळ्याला नेलपेंट रिमूव्हर लावा आणि आधी लावलेलं नेलपेंट पुसून टाका. त्यानंतर नेलकटरने नखं कापा. लक्षात ठेवा नखांचे कोपरे जास्त खोलवर कापू नका. कारण त्यामुळे नखं दुखू शकतात. 

3. पाय गरम पाण्यात बुडवून ठेवा

ADVERTISEMENT

मनसोक्त पेडीक्युअरचा आनंद लुटायचा असेल तर गरम आणि सुगंधी पाण्यात पाय बुडवून ठेवा. खूप आरामदायक वाटेल आणि मनही शांत होईल. दिवसभराचा आलेला थकवा घालवून फ्रेश व्हावंसं वाटत असेल, तर यासारखा उपाय नाही. टबमध्ये गुढघ्यापर्यंत पाणी घ्या. त्यात तुमच्या आवडीचं बाथसॉल्ट टाका. त्यानंतर पाय पाण्यात बुडवून ठेवा आणि दीर्घ श्वास घेऊन रिलॅक्स व्हा. त्यानंतर २० मिनिटांनी पाय पाण्यातून बाहेर काढा आणि स्वच्छ, कोरड्या, मऊ टॉवेलने पाय पुसून घ्या.  

pedicure-1

4. पाय स्क्रब करा

गरम पाण्यात पाय भिजल्यामुळे पायांवरची डेड स्कीन मऊ पडते आणि डेड स्कीनचे पापुद्रे तयार होतात. ते पापुद्रे लुफा किंवा स्क्रबच्या सहाय्याने लगेच निघतात. म्हणून स्क्रब करताना टाचेपासून सुरुवात करावी, कारण टाच ही पायाच्या इतर भागांपेक्षा टणक आहे. त्यानंतर पायांच्या इतर भागांवर स्क्रब करत जा. लक्षात ठेवा, डेड स्कीन काढणं गरजेच आहे, नाहीतर त्वचा कडक होेते आणि भविष्यात तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो.

ADVERTISEMENT

घरच्या घरी पेडीक्युअर स्क्रब बनवण्यासाठी 2 चमचे ओटमील पावडर घ्या, त्यात 2 चमचे ब्राऊन शुगर, 1 चमचा मध, 1 चमचा लेमन इसेंशियल ऑईल आणि 1 चमचा ऑलिव्ह ऑईल मिसळा. त्यात काही थेंब टी ट्री ऑईलचेही टाका, कारण ते तुम्हाला फंगल इन्फेक्शनपासून सुरक्षित ठेवेल.  

5. नखांची काळजी घ्या

nail-care

जेव्हा स्क्रबिंगची प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा वाढलेली नखं कापा. तुम्हाला आवडेल त्या आकारात नखं कापा आणि त्याला कॉटन पॅडने किंवा कापसाच्या बोळ्याने स्वच्छ करा. चौकोनी आकार नखांना शोभतो, तसाच तो बुटांमध्ये त्रासदायक ठरत नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार नखांना वेगवेगळा आकार देऊ शकता. उदा. स्क्वेअर, पॉईंटेड, ओव्हल. आवडीचा आकार देण्यासाठी नेल फायलर वापरा.

ADVERTISEMENT

6. क्यूटीकल काढा

नखांच्या सुरुवातीची कातडी बऱ्याचदा टणक झालेली असते, ती होऊ नये आणि नखं सुंदर दिसावी म्हणून पायांच्या नखांवर क्यूटीकल क्रीम लावा. यामुळे नखांच्या तळाशी असलेल्या कातडीचा पापुद्रा निघून जातो, परिणामी नखांची चांगली वाढ होते.   

घरच्या घरी क्यूटीकल क्रीम बनवण्याची पध्दत पाहूया

3 चमचे ऑलिव्ह ऑईल, 1 चमचा खोबरेल तेल आणि 1 चमचा अवकॅडो ऑईल एकत्र मिसळा.

ADVERTISEMENT

7. पायांना मॉईश्चराईज करा

पायांवर इतक्या प्रक्रिया केल्यानंतर त्यांना जरा फ्रेश वाटू द्यावं. मॉईश्चरायजर घ्या आणि त्याच्या साहाय्याने 10 मिनिटं पायांवर वर्तुळाकार मसाज करा. तुम्हाला खरंच खूप आराम मिळेल. क्लीनिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जोजोबा ऑईल आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र करुन त्याचं मिश्रण पायांना मॉईश्चरायजर म्हणून लावू शकता. प्रत्येकी एक चमचा मिश्रणात जर टी-ट्री ऑईलचे काही थेंब टाकले, तर हे मिश्रण अॅन्टी फंगलच काम करेल. नियमित स्वरुपात या मिश्रणाने तुम्ही मसाज केलात, तर तुमच्या त्वचेला पोषण मिळेलच व त्याचबरोबर पायांच्या स्नायूंमध्ये बळकटी येईल.

सुंदर पायांसाठी नक्की करा हे ‘6’ घरगुती उपाय

8. नखांचे सौंदर्य वाढवा

ADVERTISEMENT

pedicure-tips2

हे सगळं झाल्यावर..तुमच्या आवडीनुसार एखादं चमचमणारं ग्लिटरी किंवा आवडत्या रंगाचं नेलपेंट लावू शकता. मूळ स्वरुपातही नखं ठेवली तरी चालेल. कारण पेडीक्युअरमुळे तुमची नखं आधीच स्वच्छ आणि चमकदार दिसणारेत. 

19 Dec 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT