अनिकेत आणि स्नेहाची लग्नगाठ

अनिकेत आणि स्नेहाची लग्नगाठ

सध्या सगळीकडेच लग्नसराई सुरु आहे आणि यावर्षी बऱ्याच सेलिब्रिटीजची लग्नही झाली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय अनिकेत विश्वासरावदेखील स्नेहा चव्हाण हिच्याबरोबर लग्नगाठ बांधली आहे. अनिकेत विश्वासराव हा गेले बरेच वर्ष मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आहे. त्याचा मोठा चाहतावर्गही आहे. काही महिन्यापूर्वीच अभिनेत्री स्नेहा चव्हाणबरोबर अनिकेतचा साखरपुडा झाला होता आणि आता 11 डिसेंबरला दोघेही विवाहबद्ध झाले आहेत. लग्न कोणाचंही  असो प्रत्येकासाठी हा क्षण खास असतो. अनिकेत आणि स्नेहाच्या लग्नाचे फोटो बघूनही याची जाणीव होते. दोघेही अतिशय सुंदर दिसत असून स्नेहाने आपल्या लग्नासाठी खास लेहंगा घातला आहे.


sneha aniket
अनिकेत आणि स्नेहाची केमिस्ट्री


अनिकेत आणि स्नेहा एका मराठी चित्रपटाच्या निमित्ताने भेटले असले तरीही त्यांचा विवाह हा अरेंज्ड मॅरेज असल्याचं एका मुलाखतीत स्नेहाने सांगितलं होतं. अनिकेतची मावशी आणि स्नेहाची आई मैत्रिणी असल्यामुळे हे स्थळ दोघांना योग्य वाटलं. अनिकेत आणि स्नेहाने एक चित्रपट एकत्र केला असला तरीही ते फक्त एकमेकांचे मित्र होते आणि एकमेकांना ओळखत होते. मात्र त्यांच्या कुटुंबीयांना त्यांची जोडी योग्य वाटली. अनोळखी व्यक्तीशी लग्न करण्यापेक्षा ओळखीच्या व्यक्तीशी लग्न केलेलं योग्य असा विचार करून दोघांनीही लग्नाला होकार दिला.


haldi
अनिकेत आणि स्नेहाचा विवाह निकटवर्तींयांमध्ये पडला पार


अनिकेत आणि स्नेहाचा विवाह सोहळा हा अगदी निकवर्तीय कुटुंबीय आणि त्यांच्या जवळच्या मित्र परिवारामध्ये पार पडला. याबाबत जास्त कोणताही गवगवा करण्यात आला नव्हता. मात्र लग्न झाल्यानंतर अनिकेतने स्वतः आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. शनिवारी आणि रविवारी दोघांचाही हळदीचा सोहळा पार पडला ज्याचे फोटो स्नेहाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. यामध्ये दोघेही अतिशय आनंदात दिसत आहेत.


mehandi
अनिकेत मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय


अनिकेतने आतापर्यंत अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमधून मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवलं आहे. इतकंच नाही तर त्याने अनेक मराठी नाटक आणि हिंदी चित्रपटांमधूनही काम केलं आहे. हिंदी चित्रपट ‘चमेली’मधून करिनाबरोबर अनिकेतने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. नुकताच अनिकेतचा ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी नेहमीच अनिकेतला भरभरून प्रेम दिलं आहे आणि अनिकेतनेही एका मुलाखतीमध्ये हे मान्य केलं आहे. मुलींच्या मनाचा आहे हा किंग कारण याच्या हृदयात आहे समथिंग असं म्हणत ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या अनिकेतच्या मनाची जागा मात्र आता स्नेहाने घेतली आहे.


फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम