दीपिका - रणवीरला शुभेच्छा द्यायला आलं अवघं बॉलीवूड

दीपिका - रणवीरला शुभेच्छा द्यायला आलं अवघं बॉलीवूड

नोव्हेंबरच्या १२ तारखेपासून ते डिसेंबरच्या १ तारखेपर्यंत सगळीकडे चर्चा आहे ती दीपिका आणि रणवीरच्या लग्नापासून ते अगदी त्यांच्या आजच्या रिसेप्शनपर्यंतची. आपल्या कुटुंबीय आणि मित्रपरिवारासाठी सर्व रिसेप्शन देऊन झाल्यानंतर आता सर्वात शेवटी आपल्या क्षेत्रातील मित्रमैत्रिणींसाठी दीपिका रणवीरने मुंबईमध्ये रिसेप्शन आयोजित केलं आणि या रिसेप्शनला अवघं बॉलीवूड लोटलं नसतं तर नवलच. दीपिका आणि रणवीर हे सर्वांच्या आवडत्या जोडीपैकी एक आहेत. गेले महिनाभर बॉलीवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. एका बाजूला दीपिका - रणवीर तर दुसऱ्या बाजूला प्रियांका - निक अशी दोन्ही लग्नं सध्या चर्चेत आहेत. मात्र प्रियांका लग्न होतंय तर आज संपूर्ण बॉलीवूड दीपिका आणि रणवीरला शुभेच्छा द्यायला लोटलं आहे.


1
कोण - कोण आलं रिसेप्शनला


दीपिकानं आपल्या करिअरला ओम शांती ओमपासून सुरुवात केली आणि रणवीरने यशराज फिल्म्सच्या बँड बाजा बारातपासून सुरुवात केली. सर्वात पहिल्यांदा शबाना आझमी आणि जावेद अख्तर या रिसेप्शनला हजर राहिले. तर अब्बास मस्तानच्या रेसमध्ये दीपिकाने महत्त्वाची भूमिका साकारली होती. अब्बास मस्तानही रिसेप्शनही हजर राहिले. शिवाय ‘ये जवानी है दीवानी’मधील दीपिकाची खास मैत्रीण कलकीदेखील रिसेप्शनला आली. याशिवाय मुकेश भट, प्रसून जोशी आपल्या पत्नीसह दिसले. तसंच रसूलही हजर राहिला.


kalki kochlien %281%29


abbas mastan


याशिवाय सध्या सर्व तरूणींच्या गळ्यातील ताईत असलेला विकी कौशलही यावेळी आला. तसंच कुणाल रॉय कपूर त्याच्या पत्नीसह आला होता. त्याचबरोबर विधू विनोद चोप्राही त्याच्या पत्नीसह उपस्थित होता. 


%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80 %E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%B6%E0%A4%B2


%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2 %E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AF %E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0


तसंच बॉलीवूडची उमराव जान रेखानेही दीपिका रणवीरच्या लग्नाला येऊन चारचांद लावले. त्याशिवाय बॉलीवूडमध्ये अँकर म्हणून प्रसिद्ध असणारा मनिष पॉलही रिसेप्शनला हजर होता. 


%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B7 %E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B2


%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE %E0%A5%A7


%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A4 %E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%B0


रणवीर - दीपिकाच्या रिसेप्शनला सचिन तेंडुलकरही आपल्या कुटुंबासह उपस्थित होता. तर पद्मावतमध्ये असलेला सहकलाकर जिम सरभही दोघांना शुभेच्छा द्यायला आला होता. 


%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8 %E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0 %E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B9


%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AE %E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%AD


बॉलीवूडमधील अजून एक चर्चित जोडी टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीदेखील या रिसेप्शमध्ये स्टनिंग लुकमध्ये दिसले. दोघेही एकमेकांना सुटेबल दिसत होते. 


disha-patani-tiger-shroff-deepver-bollywood-reception-guest-looks


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


करण जोहरने नेहमीप्रमाणे आपला फॅशन सेन्स दाखवत दीपिका आणि रणवीरच्या रिसेप्शनला हजेरी लावली तर शाहरूख खानही रिसेप्शनला हजर होता. मात्र शाहरूख रात्री १ नंतर या रिसेप्शनला हजर झाला. इतकंच नाही तर अवघं बॉलीवूड लोटलं होतं. यामध्ये शिल्पा शेट्टी - राज कुंद्रा, करिश्मा कपूर, अमिताभ बच्चन आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसह हजर होते. त्याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावेळी फरहान अख्तरही आपली गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरबरोबर पहिल्यांदाच खुलेआम दीपिका - रणवीरच्या रिसेप्शनमध्ये दिसून आले आणि अगदी हातात हात घेऊन दोघांनीही मीडियाला फोटोसाठी पोझही दिली. इतकंच नाही तर कोणे एके काळी कतरिना आणि दीपिका साधं संभाषणही करत नव्हत्या. मात्र यावेळी कतरिनाही उपस्थित राहिली होती आणि तिनेही दोघांना शुभेच्छा दिल्या. karan-johar-deepveer-third-reception-guestlist %281%29


Shweta-jaya-aishwarya-amitabh-bachchan-deepveer-third-reception-guestlist %281%29


Bollywood celebs at deepveer reception - katrina kaif %281%29


फोटोग्राफर - सचिन (POPxo)