‘सिम्बा’च्या ‘आँख मारे’ गाण्यातून ‘गोलमाल 5’ हिंट

‘सिम्बा’च्या ‘आँख मारे’ गाण्यातून ‘गोलमाल 5’ हिंट

सध्या चलती आहे ती म्हणजे रणवीर सिंगची. रोहित शेट्टी, करण जोहर आणि रणवीर सिंग हे त्रिकूट पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. रोहित शेट्टीचा चित्रपट म्हणजे ‘हिट फॅक्टरी’ आणि चित्रपटच नाही तर त्याच्या चित्रपटातील गाणीही अतिशय हिट असतात. ‘सिम्बा’चं पहिलं गाणं ‘आँख मारे’ प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळत असून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गाण्यामध्ये ‘गोलमाल’ चित्रपट सिरीजमधील कलाकार आहेत आणि त्यामुळे गाण्याला अजूनच वेगळा लुक आला आहे आणि गाणं अधिक मजेशीर झालं आहे. या गाण्यातून लक्ष वेधलं जात आहे ते ‘गोलमाल’ स्टारकास्टकडे. गाण्याच्या शेवटी ‘गोलमाल’ची पूर्ण टीम हाताने 5 असा आकडा दाखवत आहे. त्यामुळे आता रोहित शेट्टीचा सुपरहिट मसाला असणारा ‘गोलमाल 5’ ची हिंट तर नाही ना? असा प्रश्न नक्कीच चाहत्यांना पडू शकतो. रोहित शेट्टीचा प्रत्येक गोलमाल आतापर्यंत हिट ठरला आहे त्यामुळे ‘गोलमाल 5’ आला तर त्यात नक्की काय वेगळं असणार आणि प्रेक्षक त्यावर काय प्रतिक्रिया देणार हेदेखील महत्त्वाचं आहे.


golmal
‘आँख मारे’ गाणं कमाल


‘आँख मारे’ हे ‘सिम्बा’ मधील पहिलं गाणं प्रदर्शित झालं असून त्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सारा अली खानचा ‘केदारनाथ’ हा पहिला चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. मात्र सारा अजिबात नवखी वाटत नाही. या गाण्यातही तिने अगदी चांगलेच लटके झटके दाखवत रणवीरच्या एनर्जीला मॅच केल्याचं पाहायला मिळत आहे. त्याशिवाय जुन्या गाण्याला नवा तडका दिल्यावर गाणं बऱ्याच जणांना आवडत नाही. मात्र ‘आँख मारे’च्या बाबतीत तसं नाही. त्याचे बीट्स तसेच ठेवण्यात आले असून अर्शद वारसीच्या जुन्या गाण्याची अर्थातच आठवण येते मात्र या गाण्यावरही पाय नक्कीच थिरकायला लागतात. रिमिक्स असूनही या गाण्याचा रिदम तुम्हाला नक्कीच ठेका धरायला लावणारा आहे.

Subscribe to POPxoTV

रणवीर आणि रोहित शेट्टीने याआधी एका जाहिरातीसाठी काम केलं होतं. तेव्हापासूनच रणवीरला रोहितबरोबर चित्रपट करण्याची मनापासून इच्छा होती. त्याची ही इच्छा ‘सिम्बा’च्या निमित्ताने पूर्ण झाली. वास्तविक रणवीर आणि रोहितची केमिस्ट्री या ट्रेलरमधून स्पष्ट दिसून येत आहे. तर साराही अजिबात नवखी वाटत नाही. शिवाय रोहितचा चित्रपट म्हणजे अर्थातच मराठी कलाकार नाहीत असं होणार नाही. सिद्धार्थ जाधवही या ट्रेलरमध्ये झळकला असून त्याचीही या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका असल्याचं म्हटलं जात आहे. सिद्धार्थने यापूर्वी रोहितबरोबर ‘गोलमाल’मध्ये काम केलं असून पुन्हा एकदा सिद्धार्थ कोणत्या स्वरुपाची भूमिका करतो याकडेही आता त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान या गाण्यातून देण्यात आलेली हिंट प्रत्यक्षात कधी येणार आणि त्यामध्ये रणवीरदेखील असेल का? हे पाहणं आणि जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे.


3-Simmba-trailer-Rohit-and-ranveer


फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम, युट्यूब