दीपिका रणवीरच्या रिसेप्शनला 'हे' सेलिब्सज् होते गैरहजर... का ते जाणून घ्या...

दीपिका रणवीरच्या रिसेप्शनला 'हे' सेलिब्सज् होते गैरहजर... का ते जाणून घ्या...

दीपिका आणि रणवीच्या लग्नाचा बार नोव्हेंबरच्या 13 तारखेला उडाला आणि त्याचं सेलिब्रेशन अगदी डिसेंबरच्या 1 तारखेपर्यंत चाललंय. दिपवीरच्या रिसेप्शनची पार्टी मुंबईच्या ग्रॅंड हयातमध्ये देण्यात आली होती. तमाम बॉलिवूडकर ते बिझनेसमन या साऱ्यांनी झाडून रिसेप्शनला हजेरी लावली आणि नवविवाहितांना शुभेच्छा दिल्या. सगळ्यात आधी दीपिकाच्या गावी बंगळूरुला तिने आपल्या कुटुंबीयांसाठी रिसेप्शन ठेवलं होतं. त्यानंतर रणवीरच्या बहिणीने आप्तेष्टांसाठी खास रिसेप्शनचं आयोजन केलं. सगळ्या कुटुंबीयांसाठी आणि मित्रपरिवारासाठी रिसेप्शन देऊन झाल्यानंतर आता सरते शेवटी आपल्या क्षेत्रातील खास मित्रमैत्रिणींसाठी दीपिका रणवीरने मुंबईमध्ये रिसेप्शन आयोजित केलं होतं आणि या रिसेप्शनला अवघं बॉलीवूड लोटलं. मात्र काही जणं रिसेप्शनला आलेच नाहीत. ते का आले नाहीत याची कारणं आम्ही जाणतोच...तर चला तर मग पाहू कोण कोण गैरहजर राहिलं व का?


 


रणबीर कपूर


दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर रिसेप्शनला आला नव्हता. हो त्याला बोलावलं होतं पण तो सध्या त्याच्या ‘ब्रम्हास्त्र’ या आगामी चित्रपटाच्या शुटींगमध्ये बीझी आहे. पण त्याची कमी भरुन काढण्यासाठी त्याच्या बहिणींनी म्हणजेच करिना आणि करिष्माने रिसेप्शनला हजेरी लावली होती. ते सगळं जाऊ द्या करिनाचा ड्रेस पाहिलात का?


44769469 290801234881913 3401863614557061120 n


आलिया भट


रणबीर कपूर हा कॉमन फॅक्टर असूनही आलिया आणि दीपिकाच्या मैत्रीमध्ये काही फरक पडला नाहीए. पण तरिही आलिया तिच्या रिसेप्शनला न आल्यानं लगेच इतरांच्या भुवया उंचावल्या गेल्या. पण तुम्हाला म्हणून सांगतो, असं काहीच नाही. आलियाही सध्या रणबीरसोबत ब्रम्हास्त्र चित्रपटाचं शुंटीग करण्यात बिझी आहे. त्यामुळे ती बिचारी तिच्या मैत्रिणीच्या रिसेप्शनला येऊ शकली नाही. परंतू तिच्या आईने सोनी राजदानने रिसेप्शनला येऊन दीपवीरला आशिर्वाद दिले बरं.


maxresdefault


विराट कोहली


आपल्या सगळ्यांनाच विरुष्काला एकत्र पाहिला आवडतं. पण विराटची ऑस्ट्रेलियात मॅच असल्याकारणाने तो रिसेप्शनला येऊ शकला नाही. ते जोडीने आले असते तर भारीच दिसले असते. पण आपली अनुष्काचा हा फोटो पहा...एकदम स्टनिंग दिसतेए.  


 46527747 515889835559164 4321658889952034816 n


सलमान खान


दीपिकासोबतचं वैर विसरुन दीपवीरच्या रिसेप्शनला कतरिना कैफ, सलमान सोबत येणार अशी अफवा पसरली होती. पण सलमान काही फिरकला नाही. कतरिना त्या रिसेप्शनला एकटीनेच भेट दिली. तिने नेसलेल्या सोनेरी साडीवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या.


45522993 360024414758459 6589840495789581678 n


अभिषेक बच्चन


कुठल्याही सेलिब्सचं लग्न असो वा रिसेप्शन, जो पर्यंत बच्चन कुटुंब हजेरी लावत नाही तोपर्यंत त्याला शोभा येत नाही. पण यावेळी त्यांच्या फॅमिली फोटोमध्ये ज्युनिअर बच्चन  मिसिंग होता. तो सध्या एका चित्रपटाचं शुटींग करतोय आणि त्यानिमित्ताने तो मुंबईच्या बाहेर गेला होता.


 45341819 204168223846500 402730097121294284 n


शाहीद कपूर


शाहिद सध्या शुटींगमध्ये बिझीच असतो त्यामुळे तो फारसा कुठेच दिसत नाही. तो येऊ शकला नाही म्हणून काय झालं? त्याच्या बायकोने रिसेप्शनला हजेरी लावली आणि खरंच ती ब्लॅकब्युटी दिसतं होती.


46153485 294601764494938 7345371164039970816 n


सोनम कपूर-आहुजा आणि आनंद आहुजा


कपूर फॅमिलीतले जान्हवी, रिया, खुशी आणि इतर मेमंर्स दीपवीरच्या रिसेप्शनला उपस्थित होते मात्र त्यांची लाडकी बहिण सोनम आणि तिचा नवरा आनंद आहुजा यांची कमी जाणवत होती. ते दोघेही लंडनमध्ये आपल्या ब्रॅडच्या इव्हेंटसाठी गेले असून सोनम तर एका वेगळ्या कार्यक्रमासाठी पॅनलिस्ट म्हणून उपस्थित राहणार आहे.


45774915 652288771835175 5057241566311037060 n


 फोटो सौजन्यः Instagram