30 डिसेंबर 2018 चं राशीफळ

30 डिसेंबर 2018 चं राशीफळ

मेष- आज अचानक डोळे दुखण्याचा त्रास जाणवेल.लहान-सहान दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका.उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल साधा. मनाची शक्ती वाढेल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांच्याकडून त्रास होण्याची शक्यता आहे.महत्वाच्या कामांचा कंटाळा करू नका.


कुंभ- एखाद्या नातेवाईकाकडून त्रास होण्याची शक्यता आहे.प्रेमाच्या नात्यात गैरसमज झाल्याने ताटातुट होण्याची शक्यता आहे.खाजगी कामे टाळणे महागात पडेल. अध्यात्मिक मार्गाने मन शांत ठेवा.कौशल्याने काम केल्यामुळे प्रमोशन मिळेल. व्यवसायासाठी केलेला प्रवास सत्कारणी लागेल. नवीन वाहन खरेदी कराल.


मीन- व्यवसायातील चांगल्या संधींमुळे मन प्रसन्न राहिल. नवीन योजना आखाल. आर्थिक क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक समस्या डोकं वर काढतील. जोडीदाराची साथ उत्तम लाभेल.


वृषभ- एखाद्या खास व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. एखाद्या अपरिचित मित्रांच्या मदतीमुळे व्यवसायामध्ये यश मिळेल. नोकरीत प्रमोशन होईल. आहाराकडे दुर्लक्ष करू नका. वैवाहिक जीवन सुखाचे असेल. सामाजिक मानसन्मान वाढेल.


मिथुन- व्यवसायामध्ये अचानक एखादी अडचण समोर येईल.कदाचित थोडे आर्थिक नुकसान देखील होण्याची शक्यता आहे.खर्च वाढल्याने त्रस्त व्हाल. वातावरणातील बदलांमुळे आजारपण मागे लागेल.मित्रांसोबत प्रवासाचा बेत आखाल.कौटुंबिक संबंध सुधारतील.


कर्क- नोकरी करणाऱ्या महिलांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. व्यवसायातील योजनांमधून लाभ मिळेल. आर्थिक बाजू मजबूत होईल. नात्यातील कडवटपणा दूर होईल. नवीन संबंध निर्माण होतील. घरात आधुनिक सुखसाधने वाढतील.आरोग्याची काळजी घ्या.विरोधकांपासून सावध रहा.


सिंह- शिक्षण आणि नोकरीत समस्यांचा सामना करावा लागेल. व्यवसायामध्ये नवीन संबंध निर्माण करताना सावधगिरी बाळगा. आर्थिक समस्या जाणवतील. रखडलेली कामे मित्रांच्या सहकार्यांने पूर्ण होतील. नातेवाईकांच्या बोलण्याने दुःखी होऊ नका.


कन्या- नातेवाईकांसोबत वेळ घालविण्याने प्रेम वाढेल. जुन्या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन प्रयत्न करीत रहा. मनाला सकारात्मक दिशा द्या. व्यवसायामध्ये नवीन योजनांसाठी प्रयत्नशील रहा. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे.सर्व काही ठिक असूनही मन निराश राहिल.


तुळ- आज कौटुंबिक ताणामुळे त्रस्त व्हाल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. भविष्याबाबत काळजी सतावेल. नोकरीत यश हवे असेल तर आळस टाळा. व्यवसायात वाढ होईल.संतानसुखाची प्राप्ती होण्याची शक्यता आहे.धार्मिक कार्यात मन रमवा.


वृश्चिक- उच्च शिक्षणातील अडचणी दूर होतील. वरिष्ठांची मर्जी राखल्याने प्रमोशन मिळेल. व्यवहार कौशल्याने लाभ होण्याची शक्यता आहे. महत्वाच्या कामांकडे दुर्लक्ष करू नका. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रियकराची भेट होईल.


धनु- आज विनाकारण तुमचा मौल्यवान वेळ आणि पैसेदेखील खर्च् होण्याची शक्यता आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक झाल्याने निराश व्हाल. नोकरीमधील ताणतणावामुळे त्रस्त व्हाल.बदली होण्याची शक्यता आहे. जुन्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा. रचनात्मक कामांमुळे सन्मान वाढेल.


मकर- शारीरिक दुखणी कमी झाल्याने आराम मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्वाने अनेक गोष्टी  प्राप्त कराल. सकारात्मक विचारसरणीमुळे लाभ होणार. कुंटुंबासोबत केलेल्या प्रवासात त्रास होईल. विरोधकांपासून सावध रहा.नोकरीत समस्या येण्याची शक्यता आहे. राजकीय सहकार्य मिळण्याची शक्यता आहे.