31 डिसेंबर 2018 चं राशीफळ

31 डिसेंबर 2018 चं राशीफळ

मेष - बिझनेसमध्ये आज सर्व बाबतीत यश मिळेल. नवीन रोजगाराच्या संधी मिळतील. सुखसाधने वाढतील. धार्मिक किंवा सामाजिक कार्यात मान मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात सक्रिय व्हाल.


कुंभ - जीवनशैलीत बदल करावे लागतील. जुन्या आजारपणातून मुक्त व्हाल. आरोग्याची काळजी घ्या.अचानक शुभ समाचार मिळण्याचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी वातावरण अनूकुल झाल्याने खुश व्हाल. उत्साह वाढेल. कुंटुबासोबत फिरायला जाण्याचा बेत आखाल.


मीन - घरातील समस्यांमुळे प्रेमसंबंधामध्ये तणाव वाढेल.व्यवसायातील योजना रखडतील. आर्थिक जोखिम घेणे टाळा. परदेश दौरा घडण्याची संकेत आहेत.


वृषभ - एखाद्या अज्ञात भितीने घाबरुन जाल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. योग्य  आहार घ्या. अध्यात्मिक कार्यातून सुख-शांती लाभेल. रचनात्मक कार्य करण्यात उत्साह वाढेल. व्यवसायातील नव्या योजना पूर्ण कराल.


मिथुन- मंगल कार्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण राहिल. जुन्या वादांकडे दुर्लक्ष करुन पुन्हा नव्याने जगण्यास सुरुवात कराल. कौटुंबिक गोडवा वाढेल. आई-वडीलांचे सहकार्य लाभेल. कुंटुंबात धार्मिक कार्य घडेल. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले असेल. प्रमोशन  मिळेल.


कर्क - विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण असेल. जुन्या अनुभवामुळे मन नाराज राहिल. रखडलेली कामे पूर्ण कराल. उत्पन्नामध्ये वाढ होईल. आर्थिक संकटामुळे निराश व्हाल. कुंटुबातील वातावरण आनंदी असेल. जोडीदारासोबत सामाजिक कार्यांत सहभागी व्हाल.


सिंह - व्यवयासामध्ये नवीन संबंध मजबूत होतील. नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल. कामामध्ये व्यस्त होण्याची शक्यता आहे.एखादी मोठी योजना सफळ होईल. जोडीदाराच्या आरोग्याबाबत सावध रहा.एखाद्या लहान गोष्टीचे वादात रुपांतर होण्याची शक्यता आहे.मित्रमंडळीच्या भेटीगाठी होतील.


कन्या- विद्यार्थांना अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे महागात पडेल. छोट्याश्या चुकीमुळे मेहनत वाया जाण्याची शक्यता आहे.नोकरीत सहकाऱ्यांशी वाद होतील. अविचाराने कोणताही निर्णय घेऊ नका.आर्थिक स्थिती मजबूत होईल.अचानक सुखद समाचार मिळण्याची शक्यता आहे.वातावरणातील बदलांमुळे आजारपण येण्याचे संकेत आहेत.


तुळ- एखाद्या जुन्या प्रिय मित्राची भेट होईल.पुन्हा नातेसंबध दृढ होण्याची शक्यता आहे.घरातील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पूर्ण कराल. संतान सुख मिळण्याचे योग आहेत.सामाजिक कार्यात रस घ्या.व्यवसायानिमित्त प्रवास कराल.आरोग्याची काळजी घ्या.धार्मिक कार्यात समाधान मिळेल.


वृश्चिक- नकारात्मक विचार आणि आरोग्य समस्यांमुळे त्रस्त व्हाल.नात्यातील एखाद्या व्यक्तीच्या वाईट बातमीमुळे चिंता वाढेल.मित्र आणि कुंटुंबाची साथ लाभेल. विरोधकांपासून सावध रहा. नोकरीत बदनामी होण्याची शक्यता आहे.व्यवसायातील योजना पूर्ण होतील.


धनु- विद्यार्थांना त्यांच्या प्रतिभाज्ञानामुळे चांगले यश मिळेल. करिअर मध्ये उन्नती होईल. व्यवसायात वृद्धी होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी लोकप्रिय व्हाल. अडचणी दूर होतील. जोडीदारासोबत एखाद्या दूरच्या प्रवासाला जाल. अचानक एखाद्या व्यक्तीला मदत करण्याचा योग येईल.


मकर- आळस टाळा अन्यथा आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. देण्या-घेण्याच्या व्यवहारात सावध रहा.व्यवहार करताना सावध न राहिल्यास अचानक खर्च वाढतील आणि बजेट घसरेल. कुंटुबाच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे.