ADVERTISEMENT
home / Make Up Trends and Ideas
मेकअप न करता सुंदर दिसण्यासाठी सोप्या टिप्स

मेकअप न करता सुंदर दिसण्यासाठी सोप्या टिप्स

प्रत्येकीला आपण सुंदर व आकर्षक दिसावं असं मनापासून वाटत असतं. सुंदर दिसण्यासाठी मग काहीजणी निरनिराळे उपाय करतात. तासनतास आरश्यात स्वत:ला न्याहाळत बसण्यापासून ते अगदी पार्लरमध्ये विनाकारण पैसे खर्च करण्यापर्यंत सर्व काही त्या करतात. पण एवढं सगळं करुन काहीच फायदा होत नाही. खरंतर सुंदर दिसण्यासाठी हे सर्व करण्याची मुळीच गरज नाही. उलट कोणताही खर्च न करता तुम्ही सहज सुंदर व आकर्षक दिसू शकता.

कदाचित हे वाचून तुमच्यापैकी अनेकजणींच्या भुवया उंच झाल्या असतील. पण खरंच…कोणताही मेकअप न करता तुम्ही नक्कीच सुंदर दिसू शकता. वास्तविक सुंदर दिसण्यासाठी बाह्यरुपापेक्षा आंतरिक सुंदरतेचीच अधिक गरज असते. जर तुमचे शरीर निरोगी असेल आणि तुमचं मन प्रसन्न असेल तर तुम्ही बिना मेक-अप देखील सुंदर दिसू शकता. यासाठीच आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही मेकअपशिवाय देखील तितक्याच सुंदर व आकर्षक दिसू शकाल.

मेकअप न करता सुंदर दिसण्यासाठी सोप्या टिप्स

नियमित संतुलित आहार घ्या

ADVERTISEMENT

जर तुम्हाला नितळ व चमकदार त्वचा हवी असेल तर फॅट्स असलेले पदार्थ मुळीच खाऊ नका. तळलेले पदार्थ,जंक फूड, भरपूर फॅट्स असलेले डेअरी प्रॉडक्टस असे पदार्थ खाणे तुम्हाला कदाचित त्रासदायक ठरू शकते.जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग,सुरकुत्या, मुरमं असतील किंवा वयोमानानूसार तुमची त्वचा सैल झाली असेल तर तुमच्या शरीरामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असण्याची देखील शक्यता आहे. यासाठी नेहमीच्या आहारात केच-अप, साखर असलले फळांचे रस, स्पोर्ट्स ड्रिंक, चॉकलेट मिल्क, प्लेवर कुकीज सारखे पदार्थ देखील कमी प्रमाणात घ्या.

Without-Makeup-Beauty-food

त्वचेसाठी सौंदर्य उत्पादने निवडताना सावध रहा

कधी कधी आपण फक्त जाहिरात पाहून सौदर्य उत्पादने निवडतो.जाहिरातीमधील प्रत्येक आकर्षक उत्पादन तुमच्या त्वचेसाठी योग्य असेल असे मुळीच नाही. अगदी दररोज लागणारे मॉश्चराजर, बॉडी लोशन, फांऊडेशन, कंसीलर, ब्लशर हे सर्व प्रॉडक्टस तुमच्या त्वचेच्या प्रकारानूसारच निवडा. कारण जर तुम्ही यातील एक जरी चुकीच्या त्वचाप्रकारासाठी असलेलं उत्पादन वापरलं चतर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात.

ADVERTISEMENT

Without-Makeup-Beauty-Products

दररोज सनस्क्रीन वापरण्यास विसरु नका

घराबाहेर पडताना नियमित सनस्क्रीन लावा. सुर्यप्रकाशातील अतिनील किरणांमुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. सतत उन्हात फिरल्याने त्वचेतील नैसर्गिक चमक कमी होते. दुष्परिणाम टाळण्यासाठी वेळीच चांगल्या प्रतीचे सनस्क्रीन वापरा.

Without-Makeup-Beauty-Sunscreen

ADVERTISEMENT

पुरेशी झोप घ्या

आजकाल अनेकजणी रात्रभर सोशल मिडीयावर अॅक्टीव्ह असतात. ज्यामुळे त्या पुरेशी झोप घेत नाहीत. झोप आपल्या जीवनातील एक महत्वाची गोष्ट आहे. निरोगी आयुष्यासाठी डॉक्टर आठ तास पूर्ण झोप घेण्याचा सल्ला देतात. नियमित पुरेशी झोप घेतल्यास तुमची त्वचा तजेलदार होते.

Without-Makeup-Beauty-Sleeping

भरपूर पाणी प्या

ADVERTISEMENT

निरोगी जीवनशैलीसाठी दिवसभरात कमीत कमी आठ लीटर पाणी पिणे गरजेचे आहे. हे माहित असूनही काही जणी पुरेसं पाणी पिण्याचा कंटाळा करतात. पण लक्षात ठेवा पुरेसं पाणी न प्यायल्यास शरीरासोबत तुमच्या त्वचेचं देखील नुकसान होऊ शकतं. जर तुम्हाला पाणी पिण्याचा कंटाळा येत असेल तर असे पदार्थ आहारात ठेवा ज्यामध्ये पाण्याची मात्रा अधिक असेल. काकडी, कलिंगड, टरबूज अशा पदार्थांमध्ये पाणी अधिक प्रमाणात असतं. तसेच तुम्ही पाण्याऐवजी लिंबूपाणी अथवा नारळपाणी देखील सतत घेऊ शकता.

Without-Makeup-Beauty-Water

यह भी पढ़ें- यहां मिलेगा आपको कंडोम से जुड़े हर सवालों का जवाब

03 Dec 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT