लिपस्टिक शेड्सचा स्टॉक तर प्रत्येकीच्या मेकअप किटमध्ये असतोच असतो. कधीतरी मार्केटमध्ये लिपस्टिक खरेदीसाठी गेल्यावर सेल्सगर्लने ब्रेनवॉश करुन तुमच्या गळ्यात अनवॉन्टेड शेडस् घातल्या असतीलच आणि आता त्या शेडस् तुमच्या मेकअप किटमध्ये धूळ खात पडल्या असतील. त्यातल्या काहींची एक्सपायरी डेटही निघून गेली असेल किंवा काही शेड तुम्ही कोणाला तरी गिफ्ट देण्याच्या विचारात असाल. हे सगळं का होतं? तर तुम्ही लिपस्टिक विकत घेताना योग्य ती शेड निवडत नाही म्हणून. अशी वेळ कधी येऊ नये, म्हणून लिपस्टिक घेताना विचारपूर्वक आणि शांतपणे शेडस् निवडाव्या. मैत्रिणींनो…म्हणूनच आम्ही तुम्हाला अशा लिपस्टिक शेड सुचवणार आहोत, ज्या तुमच्या मेकअप किटमध्ये असायलाच हव्यात आणि त्या शेड्स तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमानुसार वापरु शकता.
लाइट पिंक लिपस्टिक
कल्पना करा की, कॉलेजच्या पहिल्याच दिवशी तुम्ही लाल भडक लिपस्टिक लावून गेलात तर? तर लोकं तुम्हाला हसतीलच. नुकतीच तुमची शाळा संपली आहे आणि आता कॉलेजचे गुलाबी दिवस सुरु होत असतील तर अशावेळी तुमची एन्ट्री एकदम जोरदार असायलाच हवी ना… मग त्यासाठी पिंक कलर लिपस्टिक बेस्ट आहे. कारण ही शेड तुम्हाला गर्लीश लुक तर देईलच आणि त्याचबरोबर तुमच्या ओठांचा नैसर्गिक रंगही शाबूत ठेवेल.
आम्ही सुचवू का? हे प्रोडक्ट तुम्ही इथून घ्या.
मॅट लिपस्टिक
उन्हाळ्यात मॅट लिपस्टिक वापरणं कधीही चांगलं. त्याशिवाय ऑफिसच्या मीटिंगला जाणार असाल तर ग्लॉसी लिपस्टिकपेक्षा मॅट लिपस्टिकचा पर्याय कधीही चांगला ठरेल. कारण मॅट लिपस्टिकमुळे तुम्हाला एलिगंट आणि प्रोफेशनल लूक मिळतो. जर तुम्ही ग्लॉसी लिपस्टिक लाऊन कोणत्याही मीटिंगला गेलात तर समोरच्याचं लक्ष तुमच्या प्रेझेंटेशनऐवजी तुमच्या ओठांकडे जाईल. हे तुमच्या कामासाठी नक्कीच चांगलं ठरणार नाही. ऑफिससाठी तुम्ही ब्राऊन किंवा रेड कलर शेडची मॅट लिपस्टिक वापरु शकता. तुमच्याकडे या शेडस् नसतील तर तुमच्या कलेक्शनमध्ये त्या नक्कीच सामील करा.
आम्ही सुचवू का? हे प्रोडक्ट तुम्ही इथून घ्या.
वाचा : आपल्या ओठांची काळजी कशी घ्यावी
चेरी लिपस्टिक
चेरी कलरच्या लिपस्टिकशिवाय तुमचं लिपस्टिक किट पूर्णच होऊ शकत नाही. जर तुम्ही हा कलर कधीच ट्राय केला नसेल, तर हीच संधी आहे. तुमच्या मेकअप किटमध्ये ही शेड सामील करा. कोणतीही पार्टी असो वा फंक्शन चेरी कलरची लिपस्टिक त्यासाठी उत्तम पर्याय असते. गंमत म्हणजे कुठल्याही कलर कॉम्प्लेक्शनवर ती उठून दिसते. जर तुम्ही गोऱ्या असाल तरीही शेड तुम्हाला छान दिसेलच आणि सावळ्या असाल तरीसुद्धा ही शेड तुम्हाला आकर्षक दिसायला मदत करेल.
आम्ही सुचवू का? हे प्रोडक्ट तुम्ही इथून घ्या.
न्यूड लिपस्टिक
जर तुम्हाला बोल्ड लिपस्टिक कलर्स आवडत नसतील, तर तुमच्या कलेक्शनमध्ये एक न्यूड शेड असायलाच हवी. कुठलाही लहानसहान कार्यक्रम असो वा कॉलेजची किंवा ऑफिसची पार्टी न्यूड शेड सगळ्यात चांगला पर्याय आहे. या शेडमुळे तुम्हाला साधा आणि एलिगेंट लुक मिळतो. बॉलीवूडच्या दिवा असलेल्या सगळ्यां अभिनेत्रीमध्ये आजकाल न्यूड शेड्सची चलती आहे.
आम्ही सुचवू का? हे प्रोडक्ट तुम्ही इथून घ्या.
हॉट पिंक लिपस्टिक
गर्ल्स नाईटआउट पार्टी असो वा मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जाणं. हॉट पिंक लिपस्टिक शेडला तोडच नाही? थोडी मजा, थोडी मस्ती आणि थोडं फ्लर्ट करायचं असेल तर गर्ल्स.. तुमच्याकडे हॉट पिंक शेड तर असायलाच हवी. हा शेड पूर्ण दिवस तुमचा पार्टी मूड नक्कीच ऑन ठेवेल.
आम्ही सुचवू का? हे प्रोडक्ट तुम्ही इथून घ्या.