ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
#DIY: लांब केसांसाठी हे उपाय नक्कीच गुणकारी ठरतील, जाणून घ्या हे टॉप 10 घरगुती उपाय – How to Grow Hair Faster in Marathi

#DIY: लांब केसांसाठी हे उपाय नक्कीच गुणकारी ठरतील, जाणून घ्या हे टॉप 10 घरगुती उपाय – How to Grow Hair Faster in Marathi

आपल्यापैकी कोण असं आहे, ज्यांना लांब, दाट आणि चमकदार केस असावेत असं वाटत नाही. लांब केसांसाठी आपण बरेच उपाय करत असतो. कधी केसांना तेल लावणे तर कधी वेणी बांधणे किंवा पार्लरमधील महागड्या ट्रीटमेंट्सवर पैसे खर्च करणे. पण एवढं करूनही केस वाढतील याची हमी नाही. जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, तुम्ही हे सगळं न करता ही स्वतः घरी केस वाढवण्यासाठी उपाय करून तुमचे केस लांब वाढवू शकता, तेही काही महिन्यात तर तुमचा विश्वास बसेल का? हो..खरंच. तुम्ही घरच्या घरी असे काही उपाय करू शकता. ज्याच्या मदतीने महिन्याभरात तुमच्या केसांची लांबी वाढेल. यासाठी तुम्हाला फक्त खालील काही घरगुती उपाय करायचे आहेत.

सगळ्यात आधी पाहूया की, केस न वाढण्याचे किंवा केस गळण्याची कारण काय आहेत ते…

1. आपल्या रोजच्या आयुष्यात वाढत्या तणावामुळे केस न वाढणे आणि गळणे ही मुख्य कारण असतात.

2. औषधांचं जास्त सेवन हेही केस न वाढण्याच्या कारणांपैकी एक आहे. औषधांचे दुष्परिणाम सर्वात आधी तुमच्या केसांवर दिसतात, अशा परिस्थितीत केस गळणं साहजिक आहे.

ADVERTISEMENT

3. आपलं जे रोजचं डाएट आहे तेही आपल्या केसांच्या वाढीसाठी मदत करत असतं. खाण्यामध्ये फास्टफूड आणि आरोग्याला हानीकारक असलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास केस गळू लागतात. त्यामुळे जास्तकरून जेवणात पौष्टीक आहारावर भर द्यावा.

4. केसांवर अति केमिकल्सचा वापर केल्यामुळे ही केस गळू लागतात. आपल्या केसांची स्टाईल करण्यासाठी कधी जेल किंवा कधी हेअर कलरचा वापर आपण वापर करतो. हेही केस गळण्याचं मोठं कारण आहे.

लवकरात लवकर लांब केस वाढवण्यासाठी करून पाहा हे 10 घरगुती उपाय (Home Remedies to Grow Hair Faster)

1. एका वाडग्यात 1 चमचा नारळाचं तेल, 1 चमचा ऑलिव्ह तेल, 1 चमचा मध आणि एक अंड टाकून चांगल मिश्रण करून घ्या. मग हे मिश्रण केसांच्या मूळांना 1 तासभर लावून ठेवा. त्यानंतर केसांना कोमट किंवा थंड पाण्याने शॅम्पू करा. लक्षात ठेवा की, हा मास्क लावल्यानंतर कधीही केस गरम पाण्याने धूवू नका. त्यामुळे तुमच्या केसांचे नुकसान होऊ शकते. या उपायांमुळे तुमचे केस लवकर वाढतील आणि चमकदार होतील. पण परिणाम दिसण्यासाठी हा उपाय तुम्हाला आठवड्यांमध्ये दोन-तीन वेळा करावा लागेल. एका महिन्यातच तुम्हाला केसांच्या लांबीवर सकारात्मक परिणाम दिसू लागेल.

2. एक अंड, दोन ते तीन चमचे ऑलिव्ह तेल, एक व्हिटॅमीन ई कॅप्सूल, एक चमचा अॅपल साईडर व्हिनेगर आणि दोन थेंब इसेंशिअल तेल घालून चांगलं मिक्स करून पेस्ट बनवा. इसेंशिअल तेल तुम्ही पर्याय म्हणून वापरू शकता कारण हे घातल्याने अंड आणि अॅपल सायडर व्हिनेगरचा वास कमी होतो. ही पेस्ट केसांच्या मुळांना लावा आणि एक तासाने केस शॅम्पूने धुवा. तुम्हाला हवं असल्यास यानंतर कंडीशनरचा वापर ही करू शकता. हा उपाय 15 दिवसांतून एकदाच करावा.

ADVERTISEMENT

Baal-Lamba-karne-ke-tareeke
3. मध्यम आकाराचे अवकॅडो आणि एक छोटं केळ कुस्करून घ्या. नंतर यामध्ये एक चमचा ऑलिव तेल आणि व्हीट जर्म तेल मिक्स करा. आता केसांच्या मुळांना या मिश्रणाने हळूवार मसाज करा आणि 30 मिनिटं तसंच ठेवा. नंतर केस शॅम्पू आणि थंड पाण्याने धुवा. हा उपाय आठवड्यातून 2 वेळा करा.

4. एका वाडग्यात 1 चमचा आवळ्याचा रस, 1 चमचा शिकेकाई पावडर, 2 चमचे नारळाचं तेल मिक्स करून उकळून घ्या. थंड झाल्यावर केसांच्या मुळांना लावून मसाज करा. हे तुम्ही रात्री झोपताना लावू शकता आणि सकाळी उठल्यावर शॅम्पूने केस धुवा. हा उपाय आठवड्यातून एकदा करून पाहा.

5. जर तुम्ही केस कोरडे आणि डॅमेज झाल्यामुळे त्रासले असाल तर एका केळ्यात 4 चमचे तेल, 1 चमचा ग्लिसरीन आणि 2 चमचे मध घालून मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्या. आता हे मिश्रण केसांना लावा आणि शॉवर कॅपच्या साहाय्याने केस कव्हर करा. अर्ध्या तासानंतर केस शॅम्पूने धुवा. काही आठवड्यातच तुमचे केस चमकदार होतील.

Baal-Lamba-karne-ke-tareeke-1

ADVERTISEMENT

Also Read Some Effective Hair Care Tips For Healthy Hair In Marathi

6. एका वाडग्यात अर्धा कप मध घ्या आणि त्यात 4 चमचे ऑलिव्ह ऑईल घालून मिश्रण तयार करा. आता हे कंडीशनर केसांना लावा आणि 30 ते 40 मिनिटं शॉवर कॅप लावून ठेवा. यानंतर केस चांगले धुवून घ्या.

7. एक नासपती फळ वाटून त्याची पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये 2 चमचे पाणी, 3 चमचे ऑलिव्ह ऑईल आणि 2 चमचे साय घालून घट्ट मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण 20 ते 30 मिनिटं केसांना लावून ठेवा आणि शॉवर कॅपच्या मदतीने केस कव्हर करा. नंतर केस साध्या पाण्याने धुवा. नासपतीतील गुणांमुळे तुमचे केस छान आणि चमकदार होतात.

8. कडूनिंबाची काही पान 4 कप पाण्यात घालून उकळून घ्या. मग थंड करून यातील पान गाळून घ्या. आता जे पाणी आहे त्याने केस धूवून घ्या. केस लवकर वाढतील.

ADVERTISEMENT

9. 15 ते 20 कडीपत्त्याची पानं आणि एक लिंबाचं साल घ्या. यामध्ये सोप नट पावडर, हिरवे चणे आणि मेथीच्या बिया घालून चांगलं कुटून घ्या. आता हे मिश्रण केसांना लावून काही वेळाने शॅम्पू लावून केस धुवा.

Baal-Lamba-karne-ke-tareeke-2

10. 3 चमचे वाटलेल्या कांद्याच्या बिया आणि 3 चमचे वाटलेले मेथीचे दाणे मिक्स करून घ्या. आता यात थोडं पाणी घालून पेस्ट तयार करा. त्यानंतर या मिश्रणात 1 चमचा कोरफड जेल आणि दोन व्हिटॅमीन ई कॅप्सूल किंवा नंतर कॅस्टर ऑईल घालून मिश्रण तयार करा. जर तुम्हाला कोंड्याचा त्रासाची समस्या असेल तर यामध्ये  2 चमचे नारळाचं तेल पण घालू शकता. आता हे मिश्रण केसांच्या मुळांशी लावून केस बांधा. आता एक तासानंतर केस शॅम्पूने चांगले धूवून घ्या.

केसांच्या वाढीसाठी शॅम्पू (Shampoo for Hair Growth)

अरोमा मॅजिक त्रिफळा शॅम्पू (Aroma Magic Triphla Shampoo)

Aroma-Magic
अरोमा मॅजिक त्रिफळा शॅम्पू हा तीन औषधी वनस्पती पोषणयुक्त आहे. याचा उपयोग बहुतेक घरगुती उपचारामध्ये केला जातो. हा तुमचे केस मुळापासून स्वच्छ करतो आणि केसांची मुळं मजबूत करतो. जर तुमचे केस तेलकट असतील तर ते धुतल्यानंतर दोन दिवसांतच खराब होतात. त्यामुळे हा शॅम्पू जरूर वापरला पाहिजे. तेलकट केसांसाठी हा शॅम्पू खूपच उपयुक्त आहे. जर तुमचे केस डाय केलेले असतील तर हा शॅम्पू वापरू नका. तसंच ज्यांचे केस कोरडे असतील त्यांनीही हा शँपू टाळावा कारण शिकेकाईमुळे केस कोरडे होतात.

ADVERTISEMENT

व्हीएलसीसी नॅचरल सायन्स सोया प्रोटीन कंडीशनिंग शॅम्पू (VLCC Natural Sciences Soya Protein Conditioning Shampoo)

VLCC
केसांच्या चांगल्या वाढीसाठी तुमच्या केसांना प्रोटीन आणि व्हिटामीन्सची सर्वाधिक आवश्यकता असते. प्रोटीन आणि व्हिटामीनयुक्त हा शॅम्पू तुमच्या केसांची वाढ जलदगतीने करतो. सोया प्रोटीनचा अर्क आणि बदाम तेलाने समृद्ध असल्यामुळे हा शॅम्पू मुळांपर्यंत जाऊन स्वच्छता करतो. यात हळद असल्यामुळे हा अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टीक असा दोन्हीप्रकारे काम करतो. हा शॅम्पू केसांना हळूवार साफ करतो, ज्यामुळे केसांमध्ये कोंडा होत नाही आणि केसांची मुळं ही मजबूत होतात. या शॅम्पूची विशेष बाब म्हणजे व्हीएलसीसीचा हा शॅम्पू तेलकट आणि कोरड्या दोन्ही प्रकारच्या केसांसाठी उपयुक्त आहे.

बायोटीक बायो कॅल्प फ्रेश ग्रोथ प्रोटीन शॅम्पू (Biotique Bio Kelp Fresh Growth Protein Shampoo)

Biotique
तुमचे केस गळण्याची अनेक कारण असू शकतात, जसं स्कॅल्प इन्फेक्शन, कोरडेपणा, कोंडा इ. जर तुम्हाला या समस्या जाणवत असतील तर बायोटीकचा हा प्रोटीन शॅम्पू नक्की वापरून पाहा. हा कडूनिंब आणि आवळ्याच्या गुणांनी युक्त आहे. हा शॅम्पू तुमचे केस स्वच्छ करतो. ज्यामुळे केसांचा विकास चांगला होतो. बायोटीकची सर्व उत्पादन प्राकृतिक आणि केमिकल मुक्त असतात. ज्यामुळे त्वचा आणि केस दोघांची काळजी घेतली जाते. त्यामुळे या ब्रँडच्या विश्वसनीयतेची काळजी करण्याची गरज नाही. हा तेलकट आणि कोरडे अशा दोन्ही प्रकारच्या केसांसाठी उपयुक्त आहे.

केसांची काळजी अशी घ्या (Ways to Take Care of your Hair)

1. तुमचे केस जर 5 ते 6 आठवड्यानंतर ट्रीम केले तर केसांची कोरडी आणि निर्जीव टोक ट्रीम होऊन जातात आणि केस वाढण्यास मदत होते. वेळोवेळी केस ट्रीम केल्याने केस दाट ही होतात.

2. आठवड्यातून फक्त 2 ते 3 वेळा शॅम्पू करा आणि शॅम्पू करण्याआधी केसांना तेलाने मालिश करायला विसरू नका. असं केल्यामुळे तुमचे केस रूक्ष होणार नाहीत.

ADVERTISEMENT

3. आठवड्यातून दोनदा केसांना अंड लावून 5 मिनिट मसाज करा. मसाजनंतर केस शॅम्पूने धुवा. यामुळे तुमचे केस जास्त मऊ आणि चमकदार होतील.

4. केस कधीही गरम पाण्याने धुवू नका. कारण यामुळे तुमच्या केसांची मुळं कोरडी होतील. केसांची मूळं कोरडी झाल्यास कोंडा आणि खाज येण्याची समस्या वाढते.

5. कधी कुरळे तर कधी स्ट्रेटनिंग करण्यासाठी वारंवार केसांवर स्टाइलिंग टूल्सचा वापर करू नका. यामुळे तुमच्या केसांचे नुकसान होते.

6. केस धुतल्यावर ते कधीही टॉवेलने जोरात पूसू नका. असं केल्याने केस पटकन तुटतात. त्या ऐवजी केस कॉटनच्या कपड्याने हळूवार पुसून वाळवा. यामुळे तुमच्या केसाचा मऊपणा ही कायम राहतो.

ADVERTISEMENT

7. जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून एकच शॅम्पू वापरत असाल तर तुमच्या केसांना त्याची सवय होते. ज्यामुळे शॅम्पूचा तुमच्या केसावर परिणाम होत नाही आणि केसांमधील नैसर्गिक तेल संपू लागतं. विशेषज्ञांचा सल्ला आहे की, शॅम्पू बदलत राहिलं पाहीजे. ज्यामुळे तुमचे केस चांगले राहतील आणि केसांना एकाच शॅम्पूची सवयसुद्धा होणार नाही.

8. शॅम्पू आणि कंडीशनर लावल्यानंतर केसांना अॅपल सायडर व्हिनेगर लावा आणि केस धुवा. केस मऊ होतील आणि चमकतील. तेही कोणत्याही दुर्गंधीशिवाय.

9. फ्रिजी केस कोरडे, गुंतलेले आणि निर्जीव वाटतात. म्हणून कंडिशनिंग केल्यावर डोक्यावर पुन्हा एकदा थंड पाणी घ्या. यामुळे केसांचे क्युटीकल्स बंद होतील आणि फ्रिजी केसांपासून सुटका होते.

hair-remedies

ADVERTISEMENT

केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहार (Food for Hair Growth)

1. ओमेगा 3 फॅटी अॅसिड केस आणि त्वचा दोन्हींसाठी पोषक असते. हे घेतल्याने केसांच्या वाढीवर परिणाम होतो. अशा गोष्टींचे सेवन करा, ज्यामध्ये ओमेगा 3 हा घटक जास्त प्रमाणात असेल. तुमच्या डाएटमध्ये मासे, अक्रोड आणि भोपळ्याच्या बिया यांचा समावेश करा. ज्यामुळे ओमेगा 3 ची गरज पूर्ण होईल.

2. प्रोटीनमुळे फक्त केसांचाच विकासच नाहीतर पोषणसुद्धा होते. लांबसडक दाट केसांसाठी आजपासूनच अंडी, चिकन, मासे, डाळी, दूध आणि यापासून बनवलेल्या उत्पादनांचे सेवन सुरू करा. या सर्व गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आढळते. ज्यामुळे तुमच्या केसांची वाढ जलद होते.

वाचा – केसांच्या वाढीसाठी अजून कोणते पदार्थ मदत करतात

3. लांबसडक केसांसाठी तुमच्या आहारातील व्हिटामिन सी चं प्रमाण वाढवा. तुमच्या डाएटमध्ये संत्र, ब्रोकोली, आवळा आणि दुसऱ्या फळांचा समावेश करून ही गरज पूर्ण करा.

ADVERTISEMENT

4. शरीरामधील आर्यनची मात्रा कमी असल्यास केस गळतात. ही कमतरता पूर्ण करण्यासाठी हिरव्या भाज्या खा.

5. रोज गाजराचा ज्यूस प्यायल्यास केसांची वाढ लवकर होते. गाजरामुळे केसांची त्वचेतील  प्राकृतिक तेल बनण्यास मदत होते. ज्यामुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि जलद वाढतात.

6. अवकॅडो हा व्हिटामिन ई चा चांगला स्त्रोत आहे. तुम्ही नाश्त्यांमध्ये सॅलड म्हणूनही याचा वापर करू शकता.

केसांची वाढीशी निगडीत प्रश्न-उत्तर / FAQ’s

केसांच्या वाढीकरता कोणत्या व्हिटामिनची आवश्यकता असते?

केसांचे आरोग्य आणि सुंदरता कायम राहण्यासाठी व्हिटामिन ए, बी, सी, डी, ई, बी कॉम्प्लेक्स यांसारख्या व्हिटॅमीन्सची आवश्यकता असते.

ADVERTISEMENT

आयोडीनची केसांच्या वाढीसाठी कशी मदत होते?

आयोडीनचे नाव ऐकताच आपल्या मनात विचार येतो की, याचा वापर मीठातील पोषक तत्त्व म्हणून केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का, की हे केसांसाठीही फायदेशीर आहे. हो, आयोडीनमध्ये झिंक, आर्यन आणि मॅग्नेशियमसारखी तत्त्व असतात. ही ना फक्त तुमच्या केसांच्या वाढीसाठी तर केसांना मजबूत बनवण्यासही उपयोगी पडतात. आयोडीनमध्ये अँटी-बॅक्टेरिया, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुण असतात. जे कोणत्याही इन्फेक्शनशी लढू शकतात. यामुळे तुमच्या केसांचा विकास चांगला होतो. आयोडीन केसांचा कोरडेपणा, केस गळणे आणि वेळेआधी केस पांढरे होणे अशा समस्यांवर मात करतं.

फोटो सौजन्य : Shutterstock

तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:

Hair Care Tips & Food For Hair Growth In Marathi

ADVERTISEMENT

How To Get Rid Of White Hair & Side Effects Of Hair Dye In Marathi

Diet For Hair Growth & Home Remedies In Marathi

27 Dec 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT