मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती & ती’ १ मार्चला होणार प्रदर्शित

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती & ती’ १ मार्चला होणार प्रदर्शित

सध्या आगामी चित्रपटांचे प्रमोशन करण्याचे वेगवेगळे फंडे वापरले जातात. असाच एक फंडा वापरत दोन मुलींच्या मधोमध दिसणारा म्हणजेच ‘ती’ आणि ‘ती’च्या मध्ये अडकलेल्या पुष्कर जोगचा एक फोटो काही दिवसांअगोदर सोशल मिडीयावर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत होता. आता त्या दोन मुली नेमक्या कोण आहेत याचा प्रेक्षकांना अंदाज बांधायला लावणारे पोस्टर हे पहिले पोस्टर होते. पुष्कर जोगच्या ‘ती & ती’ या आगामी मराठी चित्रपटाचे पहिले टीझर पोस्टर आल्यानंतर आता हा खुलासा करण्यात आला असून ‘वेट इज ओव्हर’ असे म्हणत पुष्कर जोगच्या ‘ती & ती’ या चित्रपटाचे आणखी एक नवे कोरे पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटात पुष्कर जोगसोबत सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे या दोघी ‘ती’ आणि ‘ती’ ची भूमिका साकारणार आहेत हे आपण पोस्टरमधून कळते.


TI   TI


मृणाल कुलकर्णीचं दिग्दर्शन


या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी यांनी केले असून अभिनयासोबत पुष्करने या चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे. पुष्करसह, आनंद पंडीत, मोहन नादर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर मोहित छाब्रा हे सहनिर्माते आहेत. अर्बन रोमँटिक कॉमेडी असलेल्या ‘ती & ती’ चे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. त्यामुळे पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे यांच्या ‘ती & ती’ मधून एका आगळ्या-वेगळ्या आणि मनोरंजक कथेसोबत प्रेक्षकांची लंडनची सफारीदेखील प्रेक्षकांना घडेल.


pushkar jog


प्रेमाचा गोंधळ


प्रेमाचा जेव्हा ट्रँगल बनतो तेव्हा सगळ्याच गोष्टीचे कन्फ्युजन वाढते. अशीच प्रेमात गोंधळ उडालेल्या तरुणाची कथा आणि भन्नाट लव्हस्टोरी असणारा ‘ती & ती’ चित्रपट १ मार्च २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. पुष्करने याआधीही मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र ‘बिग बॉस’नंतर पुष्करचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. मृणाल कुलकर्णीने आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. मात्र आता दिग्दर्शनात मृणाल या चित्रपटातून काय कमाल दाखवणार आहे ते लवकरच कळेल.


फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम