प्रियांका - निक ख्रिश्चन पद्धतीने विवाहबद्ध

प्रियांका - निक ख्रिश्चन पद्धतीने विवाहबद्ध

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले प्रियांका निक आज ख्रिश्चन पद्धतीने विवाहबद्ध झाले असल्याचं म्हटलं जात आहे. अजूनही अधिकृतरित्या कोणतीही घोषणा झाली नसली तरीही प्रियांका आणि निकचे कपडे डिझाईन केलेल्या राल्फ लॉरेनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दोघांनाही शुभेच्छा दिल्या असल्यामुळे ते दोघे आज विवाहबद्ध झाले असल्याचा अंदाज बांधला जात आहे. प्रियांका आणि निक दोघांनीही अधिकृतरित्या आपल्या लग्नाची तारीख घोषित न केल्यामुळे आतापर्यंत २ आणि ३ डिसेंबर अशा तारखा असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र आता आज ख्रिश्चन पद्धतीने विवाह झाल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. दरम्यान उद्या अर्थात २ डिसेंबरला हिंदू पद्धतीने दोघे विवाहबद्ध होतील असंही म्हटलं जात आहे. प्रियांकाच्या लग्नासाठी तिच्या जवळचे सर्व नातेवाईक आणि मित्रपरिवार अगदी आज दुपारपर्यंत जोधपूरपर्यंत येत होता. त्यामध्ये आज आकाश अंबानी, आनंद पिरामल यांचाही समावेश आहे.

Priyanka Chopra Nick Jonas 1
काय म्हटलं आहे राल्फ लॉरेननं?


प्रियांका आणि निक हे राल्फ लॉरेनच्या ५० व्या वर्षाच्या खास कार्यक्रमाला उपस्थित होते. तर राल्फ लॉरेनने आजपर्यंत कोणत्याही अभिनेत्रीकरिता वेडिंग गाऊन डिझाईन केलेला नाही. त्याने केवळ आपल्या भाचीसाठीच वेडिंग गाऊन डिझाईन केला होता. प्रियांका अशी पहिली अभिनेत्री आहे जिला हा मान मिळाला आहे. इतकंच नाही तर निकचा वेडिंग ड्रेस आणि निकच्या सर्व कुटुंबीयांसाठीही राल्फ लॉरेननेच लग्नाचे कपडे डिझाईन केले आहेत. प्रियांका आणि निक हे राल्फच्या जवळचे असून राल्फने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने यामध्ये ‘या विकेंडला भारतातील जोधपूरमध्ये होणाऱ्या प्रियांका आणि निक तुमच्या लग्नासाठी शुभेच्छा’ असा संदेश दिला असून प्रियांकाने कस्टम राल्फ लॉरेन वेडिंग गाऊन घातला असून निकने लग्नासाठी परपल लेबल टक्सेडो घातलं असल्याचंही म्हटलं आहे. इतकंच नाही तर दोघांसाठी कपडे डिझाईन करून आपल्याला आनंद असल्याचंही त्याने यामध्ये म्हटलं असून त्याच्या कुटुबीयांसाठीही आपण कपडे डिझाईन केल्याचंही त्यानं म्हटलं आहे. मात्र त्याच्या कार्यक्रमामध्ये दोघे गेले असता, त्यावेळचा फोटो राल्फने यावेळी पोस्ट केला आहे.


ralph
लवकरच फोटो पोस्ट करण्याची आशा


दीपिका आणि रणवीरने आपल्या दोन दिवसांच्या लग्नानंतर दुसऱ्या दिवशी फोटो पोस्ट केले होते. येणाऱ्या पाहुण्यांनाही फोटो पोस्ट न करण्याची विनंती करण्यात आली होती. त्याचप्रमाणे प्रियांका - निकच्या लग्नातही फोटो पोस्ट न करण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाचे फोटो आज पोस्ट होणार की उद्या हे आता पाहावं लागेल. दरम्यान पहिल्यांदाच व्होग युएस मॅगझिनने प्रियांका आणि निकने फोटो पोस्ट केले आहेत. प्रियांका आणि निकने आपल्या लग्नाच्या फोटोचे हक्क व्होग या मॅगझिनला दिल्याचं आता समोर आलं असून नुकतेच व्होगने सोशल मीडियावर दोन व्हिडिओ पोस्टे केले आहेत. यामध्ये प्रियांका आणि निक एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असल्याचं दिसून येत आहे.