पहा... देसी गर्ल प्रियांकाच्या मेंदी फंक्शनचा फोटो

पहा... देसी गर्ल प्रियांकाच्या मेंदी फंक्शनचा फोटो

अखेर आपल्या प्रियांका चोप्राच्या लग्नाचा बार उडाला आणि देसी गर्ल अमेरिकी निकशी लग्न करुन अमेरिकेची सून झाली. आज तिचं आणि निकचं लग्न खुद्द तिच्या सासऱ्यांनी म्हणजेच निकच्या बाबांनी ख्रिस्ती पध्दतीत लावलं. असं जरी असलं तरी प्रियांका उद्या हिंदू पध्दतीत अगदी सांग्रसंगीत लग्न करणार आहे. तिनं सगळ्या विधीही थाटामाटात साजऱ्या केल्या बरं का... अगदी हळद म्हणू नका की संगीत, सगळं कसं तिला शोभेल असं होतं. अगदी मेंदीसुध्दा... पण काही केल्या तिचे फोटोज् मात्र कुठे झळकत नव्हते. पण काळजी करु नका प्रियांकाने तिच्या मेंदी फंक्शनचा फोटो Instaवर शेअर केला आणि काही अवघ्या काही मिनिटांत साडे सात लाखांहून अधिक जणांनी तो पाहिला देखील.46153626 368550470618807 6193731808661895091 n


तसेच मेहंदी अधिक गडद कसे करावे याबद्दल देखील वाचा


प्रियांका आणि निक आपलं लग्न मनापासून एंजॉय करताएत. प्रियांकाचा गुलाबी-पिवळा लेहेंगा आणि त्यावरची ज्वेलरी तिच्यावर फारच सुंदर दिसतेय. तिची हेअर स्टाईल आणि माळलेली फुलं हा तिचा देसी अंदाज तिच्या चाहत्यांना खुप भावला आहे. निकचाही इंडिअन लुक छान दिसतोय. एकुणच काय तर जोडा एकमेकांना चांगलाच शोभून दिसतोय.या तिच्या Insta पोस्ट वर शुभेच्छांचा पाऊसच पडायला सुरुवात झाली. आता तिच्या चाहत्यांना प्रतिक्षा आहे ती तिच्या प्रत्येक फंक्शनच्या फोटोची... तसेच आज ख्रिस्ती पध्दतीने लग्न सोहळ्याच्या फोटोंची.


फोटो सौजन्यः #priyanka mehendi on instagram