जाणून घ्या 20 डिसेंबर 2018 चं राशीफळ

जाणून घ्या 20 डिसेंबर 2018 चं राशीफळ

मेष- घरातील प्रमुख अथवा तुमच्या जोडीदाराकडून ताण येण्याची शक्यता आहे. इतरांच्या सांगण्यावरुन तुमच्या घरातील शांती भंग करू नका. नातेवाईक आणि मित्रांकडून गरजेच्या क्षणी सहकार्य मिळणार नाही. रागावर नियत्रंण ठेवा. आरोग्य-स्वास्थ लाभेल. नोकरीमध्ये प्रमोशन होईल. नव्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल.


कुंभ- आज तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कदाचित तुमचं पाकीट चोरीला जाण्याची शक्यता आहे. मेहनत करुन देखील यश न मिळाल्याने दुःख होण्याची शक्यता आहे. बिझनेसमध्ये नुकसान होऊ शकते. कौटुंबिक जीवनात सुख आणि शांती मिळेल. लहान-सहान आजारपणे मागे लागतील. जमीन खरेदी करताना सावध रहा.


मीन- आज तणावापासून मुक्ती मिळेल. आरोग्य-स्वास्थ लाभेल. उत्साह वाढल्याने नवीन कामांना सुरुवात कराल. मुलांकडून आनंदवार्ता समजतील. जोडीदारासोबत वेळ घालवा. आई-वडील आणि भावंडांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.


वृषभ- आज तणावापासून मुक्ती मिळेल.आरोग्य-स्वास्थ लाभेल. उत्साह वाढल्याने नवीन कामांना सुरुवात कराल .मुलांकडून आनंदवार्ता समजतील. जोडीदारासोबत वेळ घालवा. आई-वडील आणि भावंडांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.


मिथुन- डोळ्यांच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.आरोग्याची काळजी घ्या.जोडीदाराच्या आरोग्याचीदेखील काळजी घ्या. अडकलेली कामे मार्गी लागतील. वरिष्ठांकडून कौतुक होईल. नोकरीमध्ये चांगले संबंध निर्माण होतील.


कर्क- प्रेमसंबंधांमध्ये सुख आणि शांती लाभेल. नातेसंबंध दृढ होतील. कौटुंबिक जीवनात देखील नातेसंबंध सुधारतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. पैसे खरेच करताना सावध रहा.


सिंह- आज तुमचा काही कारणांमुळे आत्मविश्वास कमी होईल. आळसामुळे अभ्यासामध्ये लक्ष लागणार नाही. अभ्यास करताना त्रास होण्याची  शक्यता आहे. प्रेम व संयमाने काम करा. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. नवीन प्रेमसंबंधांमध्ये ताण-तणाव वाढण्याची शक्यता आहे.


कन्या- उत्पन्नामध्ये वाढ होण्याची अथवा अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मित्राकडून अमुल्य भेट मिळण्याची शक्यता आहे.मेहनत आणि कौशल्यामुळे प्रमोशन होण्याची शक्यता आहे. अडकलेली कामे मार्गी लागतील. नवीन प्रोजेक्टवर काम केल्याने फायदा होईल. मुलांच्या तब्येतीची काळजी घ्या.


तुळ- विद्यार्थ्यांना अपयश येण्याची शक्यता आहे. नियमित अभ्यास करा. अज्ञात व्यक्तीकडून धोका होण्याची शक्यता आहे. सावध रहा. कामाच्या ठिकाणी दूर्लक्ष केल्यामुळे नुकसान होईल. कौटुंबिक आनंद मिळेल.


वृश्चिक- उत्पन्नामध्ये वाढ झाल्याने समस्या दूर होतील. आई-वडीलांचा सहवास आणि प्रेम मिळेल. प्रेमसंबंधात रोमॅन्टिक क्षण येतील. सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल. नोकरी आणि बिझनेसमध्ये यश आणि उन्नती चे संकेत आहेत.


धनु- आरोग्य बिघडल्याने मन निराश होईल. जोडीदाराचे देखील स्वास्थ बिघडेल. बिझनेस आणि नोकरीमधील निर्णय घेताना सावध रहा. कौशल्याने अर्धवट राहिलेली कामे पूर्ण कराल. सामाजिक मानसन्मान मिळेल. आत्मविश्वासाने वाढेल,


मकर- शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश प्राप्त कराल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. नवीन कामाच्या योजना आखाल ज्या पूर्ण करण्यातदेखील यशस्वी व्हाल. हरवलेला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त होईल. नवीन प्रेमसंबंध निर्माण होतील.