‘आम्ही बेफिकिर’मधून दिसणार फ्रेश जोडी मिताली आणि सुयोग

‘आम्ही बेफिकिर’मधून दिसणार फ्रेश जोडी मिताली आणि सुयोग

मराठी चित्रपटांमध्ये सध्या नवे विषय आणि नव्या जोड्या हे अगदी रिफ्रेशिंग आहे. अशीच एक फ्रेश जोडी आता ‘आम्ही बेफिकिर’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. मिताली मयेकर आणि सुयोग गोऱ्हे हे दोघे प्रमुख भूमिकेत या चित्रपटात दिसणार आहेत. ही तरूण जोडी या चित्रपटात दिसणार असून या युवा कलाकारांची केमिस्ट्री प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. सध्या मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. असाच वेगळा तरूणाईचा विषय या चित्रपटामध्ये मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


तरूणांशी संवाद साधण्याचा प्रयत्न


खूप काही मिळवण्याच्या प्रयत्नात हल्लीची युवा पिढी खूप काही गमावत आहे आणि त्याच गमावलेल्या अनुभवामधून पुन्हा रंगवलेल्या स्वप्नांवर आधारित हा चित्रपट आहे. आजच्या पिढीतील तरूणांशी संवाद साधून त्यांच्या मनातील विचार मोठया पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटामध्ये करण्यात आला आहे. हरिहर फिल्म्सच्या नागेश मिश्रा, अंतरिक्ष चौधरी, कविश्वर मराठे आणि रोहीत चव्हाण या चौघांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून रोहीत पाटील चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन कविश्वर मराठेंनी केलं आहे.


mitali


मितालीने साकारल्या वेगळ्या भूमिका


सुयोग आणि मितालीने आतापर्यंत वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपटांमधून काम केलं आहे. दोघांनाही आपल्या कामाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. त्यामुळे हा वेगळा विषय आणि तरूणाईचे हे प्रश्न नक्कीच चांगल्या तऱ्हेने या चित्रपटातून हे दोन्ही कलाकार व्यक्त करतील. ‘आम्ही बेफिकिर’ या चित्रपटाच्या निमित्ताने दोघेही पहिल्यांदाच एकत्र काम करत असून ही प्रेक्षकांसाठी अगदीच फ्रेश जोडी आहे. आतापर्यंत मराठी चित्रपटांमधून त्याच त्याच जोडी पाहिल्यामुळे प्रेक्षकांनाही एक वेगळा अनुभव मिळेल. सर्वांनाच या चित्रपटाची सध्या उत्सुकता असून लवकरच हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दिसेल. त्यावेळी या चित्रपटाला मराठी प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.


suyog


मिताली आणि सुयोग मराठीतील प्रसिद्ध चेहरे


सुयोग आणि मितालीला मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांनी पाहिलं आहे. मितालीने आतापर्यंत बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं असून तिचं फॅन फॉलोईंगदेखील खूपच चांगलं आहे. तर सुयोग मुळात डॉक्टर असला तरीही त्याने अभिनयक्षेत्र करिअर म्हणून निवडलं असून त्यालाही चांगलंच फॅन फॉलोईंग आहे. सुयोगनेही आतापर्यंत बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमधून काम केलं आहे. त्यामुळे नक्कीच ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसाठी नेहमीपेक्षा वेगळी आणि रिफ्रेशिंग ठरेल.