कॅन्सरवर मात करत सोनाली परतली मायदेशी

कॅन्सरवर मात करत सोनाली परतली मायदेशी

सोनाली बेंद्रे पुन्हा भारतात परत आली आहे. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर तिने मात केली आहे.हायग्रेड कॅन्सरवर उपचार करण्यासाठी जुलै महिन्यात सोनाली न्यूयॉर्कला गेली होती. मात्र आता ती आपल्या मायदेशी पुन्हा परत आली आहे. सोमवारी सकाळी ती तिच्या पतीसह मुंबई एअरपोर्टवर पोहोचली. काळ्या रंगाचं जॅकेट आणि जीन्स परीधान केलेली सोनाली अगदी खूश असल्याचं यावेळी दिसत होतं. पती गोल्डी बहलच्या हातात हात घालत आनंद व्यक्त करत ती मायदेशी परतली आहे. याचाच अर्थ तिने तिच्या आजारापणावर नक्कीच मात केलेली असावी. शिवाय कॅन्सरवरील कठीण उपचारानंतर पुन्हा आपल्या देशात आल्यामुळे देखील कदाचित ती इतकी निवांत वाटत असावी.
 

 

 


View this post on Instagram


 

 

#sonalibendre welcome back 🙏🙏👍


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on
सोनाली होती कुटुंबापासून दूर


आपल्या कुटुंबापासून आणि मित्रमंडळींपासून दूर रहाणे फारच कठीण असते. एखाद्या कठीण प्रसंगी तर आपल्याला त्यांच्या आधाराची अधिक गरज असते. आजारपणात तर त्यांच्यासारखा दुसरा कोणताच आधार नाही असं वाटत असतं. काही दिवसांपूर्वी सोनालीनेदेखील सोशल मीडियावरुन काहीशा अशाच भावना व्यक्त केल्या  होत्या. “दुरावा आपल्याला बरंच काही शिकवतो.घरापासून दूर राहून मला अनेक गोष्टी समजल्या .प्रत्येकजण आपलं जीवन वेगवेगळ्या पद्धतीने जगत असतो. मात्र जीवनात यासाठी कधीकधी संघर्ष देखील करावा लागला तरी प्रयत्न करणे कधीच थांबवू नका” अशी भावना तिने व्यक्त केली होती. अमेरिकेत असताना सोनाली सतत आपल्या आजारपणाबाबत सोशल मीडियावरुन अपडेट देत होती. ती लवकरच भारतात परत येणार असंही तिने दोन दिवसांपूर्वीच तिच्या चाहत्यांसोबत शेअर केलं होतं. सहाजिकच या बातमीमुळे अनेकांना दिलासाच मिळाला होता. मात्र आता सोनाली चक्क भारतात परत आल्याने तिचे चाहते नक्कीच खूश झाले आहेत. सोनाली मायदेशी परतल्याचा आनंद असाच टिकून राहावा अशी सदिच्छा तिचे चाहते व्यक्त करत आहेत.


%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80 %E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80


जुलैमध्ये सोनाली झाली होती अॅडमिट


जुलै महिन्यात सोनालीला हायग्रेड कॅन्सर झाला असल्याची बातमी आली. खुद्द सोनालीनेच ही बातमी तिच्या ट्विटर अकांउटवरून तिच्या चाहत्यांना शेअर केली होती. या बातमीने तिच्या चाहत्यांसह बॉलीवूडमधील अनेकांच्या काळजात धस्स झालं होतं. त्यानंतर कॅन्सरवर उपचार करण्यासाठी सोनाली अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये गेली होती. दरम्यान अजूनही सोनालीने याबाबत काहीही सांगितलं नसून ती बरी झाली असल्यामुळेच भारतात परतली असावी असा अंदाज बांधला जात आहे.


इमेज सोर्स - इन्स्टाग्राम


https://www.instagram.com/viralbhayani/