आपल्या आवडत्या व्यक्तीला किस करणं ही एक अगदी सहजभावना आहे आणि सर्वात सुंदरदेखील. अर्थात यामध्ये नक्कीच कोणी वाद घालणार नाही. तुमचं ज्याच्यावर खूप प्रेम आहे त्या माणसाला जेव्हा तुम्ही पहिल्यांदा किस करता तेव्हा तुमच्या हृदयाची धडधड साहजिकच वाढलेली असते, जेव्हा कोणी बघत नसतं तेव्हा तुम्ही हळूच किस घेता किंवा एकांतात असताना अगदी भावनेत गुंतून जाऊन प्रेमाने किस करत असता जे तुमच्या आयुष्यातील अगदी विशेष क्षण असतात आणि जे तुमचं नातं नव्याने घडवत असतात.
तुम्ही अगदी नवखे असून तुम्हाला किससाठी काही टीप्स हव्या असतील अथवा तुमच्या बेडरूममध्ये तुम्हाला अगदी नव्याने काही किस ट्राय करायचे असतील. तर त्यासाठी आम्ही तुम्हाला काही किस सांगणार आहोत अर्थात काही किसची शिफारस करणार आहोत असं म्हटलं तर जास्त योग्य असेल. तुम्ही हे किस एकदा तरी तुमच्या आयुष्यामध्ये नक्की घेऊन पाहा. तसंच तुमच्या जोडीदाराचं लक्ष तुमच्याकडे वळवण्यासाठी आणि त्यांनी तुमच्यामध्ये गुंतून राहण्यासाठी काय करावं आणि काय करू नये यासाठीदेखील आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. हे सर्व समजून घेतल्यानंतर नक्कीच ‘जीव रंगला, गुंगला, दंगला असा’ हे गाणं गुणगुणल्याशिवाय तुम्ही राहणार नाही.
किस हीच तरी नात्याची सुरुवात असते. खरं तर किस हा आपलं प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. समोरचा माणूस आपल्याला किती आवडतो आणि आपलं त्याच्यावर किती प्रेम आहे हे सर्वात पहिल्यांदा आपण किस घेऊन त्याला जाणवून देऊ शकतो. केवळ भावना आणि उत्कटता यापेक्षाही अधिक गोष्टी किसमध्ये असतात. वास्तविक तुमची मानसिक आणि शारीरिक स्थिती व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि तुमचं नातं अधिक दृढ करण्यासाठी किस ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचं वैज्ञानिकदृष्ट्यादेखील स्पष्ट झालं आहे. कसं ते जाणून घ्या -
खूप चांगलं केल्यास, पुढे नक्की काय हे कळतं. तसंच किस केल्यामुळे सेक्ससाठी प्रवृत्त करणारे सर्व हार्मोन्स मोकळे होतात. त्यामुळे सेक्स करण्यासाठी किस हे सर्वात महत्त्वाचं आहे.
पुरुषांना नीट किस करता येतं का? या एका गोष्टीवर सेक्स करायचा की नाही, हे बहुतेक महिला ठरवतात याची तुम्हाला कल्पना आहे का? दोन जोडीदारांमध्ये योग्य सुसंगती होऊ शकते का? हे तपासण्यासाठी किस हे योग्य साधन आहे. तुम्ही एकमेकांजवळ आल्यानंतर जर तुमचा जोडीदार योग्य तऱ्हेने किस घेऊ शकत नसेल, तर गोष्टी पुढे नेण्यात काहीच अर्थ नाही.
बऱ्याचदा कोणत्याही शब्दांपेक्षा स्पर्श जास्त चांगलं काम करत असतो. त्यामुळे किस घेतल्यास त्यामधून नक्की आपल्याला काय भावना व्यक्त करायच्या आहेत हे स्पष्ट होतं. तुमच्या जोडीदाराकडे भावना व्यक्त करायच्या आहेत का? नक्की किस करा. भांडण झाल्यानंतर गोष्टी नीट सावरायच्या आहेत? किस करा. माफी मागायची आहे? किस करा. वास्तविक किस केल्याने सर्वच भांडणं लगेच मिटून जातात. कारण त्यात शब्दांची वाढ होत नाही आणि प्रेमाची देवाणघेवाण होते.
ऑक्सीटॉसिन, डोपामाईन, सेरोटिन यासारख्या सर्व हार्मोन्सना किस आनंद मिळवून देते. त्यामुळे नेहमी किस घेतल्यानंतर तुम्हाला खूप बरं वाटतं आणि आनंदी वाटतं.
जसं आम्ही वर म्हटलं आहे की, किसमुळे ऑक्सीटॉसिन मोकळे होतात. एकमेकांविषयी आकर्षण आणि भावना यासाठी हे हार्मोन कारणीभूत असतं. त्यामुळे तुमच्या जोडीदाराला किस केल्यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होतं आणि तुमच्या नात्यामध्ये अधिक समाधान आणतं.
माणसाच्या शरीरामध्ये तणावाचं कॉर्टिसोल नावाचं हार्मोन असतं. तुमच्या शरीरातील सर्व चांगल्या आणि वाईट भावना या खरंतर याचं हार्मोनवर अवलंबून असतात. पण जेव्हा तुम्ही किस करता, तेव्हा तुमचे आनंदी हार्मोन्स असतात ते कॉर्टिसोल हार्मोन्सची पातळी कमी करायला मदत करतात. त्यामुळे तुमचा तणाव आपोआप कमी होतो. जेव्हा जेव्हा तुम्ही मिठी मारता किंवा किस करता त्या प्रत्येक वेळी तुमचा तणाव कमी होतो. आताच्या ताणतणावात तणावमुक्त राहण्यासाठी नक्कीच हा उपाय चांगला आहे, नाही का?
कॉर्टिसल पातळी कमी होण्याबद्दल आपण बोलत होतो, तर अभ्यासातून असं स्पष्ट झालं आहे की, स्वतःशीच आनंदी नसणाऱ्या लोकांमध्ये जास्त कॉर्टिसल आढळते. तर तुम्ही एखाद्याशी जवळीक साधत असाल, तर किस तुमचा स्वतःवरील आत्मविश्वास आणि आदर वाढवण्यासदेखील मदत करते.
आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा फायदा. किस करताना आपल्या हृदयाचे ठोके वाढतात हे प्रत्येकालाच माहीत आहे मात्र तुमच्या शरीरातील नसा मोकळ्या करण्यासाठी याचा फायदा होतो हे सत्य आहे. तसंच, तुमच्या नसा मोकळ्या होतात, तेव्हा तुमचा रक्तप्रवाह वाढतो, त्यामुळेच तुमचा रक्तदाब कमी करण्यास याची मदत होते. त्यामुळे तुमच्या हृदयासाठी किस करणे अत्यंत महत्त्वाचं आहे.
जेव्हा तुम्ही खूप वर्ष नात्यात असता, तेव्हा आपल्या जोडीदाराबरोबर काही महत्त्वाचे क्षण घालवायला विसरता. तुम्हाला किस करणं कदाचित वेळ घालवणं किंवा काहीच कामाचं नाही असं वाटत असेल. पण दिवसभरातून थोडासा वेळ काढून तुम्ही जर तुमच्या जोडीदाराला रोज किस केलंत तर तुम्हाला तुमच्या आयुष्याशी दोन हात करणं थोडं सोपं जाईल.
किसिंगमुळे शरीराला असंख्य फायदे होतात. वाढलेल्या रक्तप्रवाहामुळे शरीरात येणारा वात कमी होतो. शिवाय हार्मोन्स मोकळे झाल्यामुळे तणाव कमी होऊन डोकेदुखीदेखील थांबते. त्यामुळे तुम्ही तुमची मासिक पाळी असतानाही तुमच्या जोडीदाराला किस करू शकता. त्यामुळे तणावापासून नक्कीच मुक्तता मिळते.
हे थोडंसं वाचायला अति वाटू शकतं मात्र खरं आहे. तुमच्या शरीरातील बॅक्टेरिया किसमुळे मरून जाऊन तुमच्यातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी किस करणं उपयुक्त ठरतं.
तुम्हाला जर अधिक चांगली जॉलाईन आणि अधिक चांगली आपल्या गालांची हाडं व्हायला हवी असतील तर तुमच्या जोडीदाराला किस करा. किस केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील २ ते ३४ स्नायू मोकळे होत असतात. तुमच्या चेहऱ्याच्या स्नायूंसाठी हा योग्य आणि सोपा व्यायाम आहे.
तुमच्या जोडीदाराला किस करण्यासाठी अधिक कारणांची गरज आहे का? तर कॅलरी जाळण्यासाठी काय करावं असं तुम्हाला वाटतं? तुम्ही जितक्या वेगाने किस कराल तितक्या वेगाने तुमच्या चेहऱ्याचे स्नायू मोकळे होऊन साधारण २ ते २६ कॅलरी एका वेळी बर्न होतात. हे नक्कीच इंटरेस्टिंग आहे ना?
किस केल्यामुळे लसिका ग्रंथी उत्तेजित होतात, त्यामुळे अर्थातच सालिव्हाची निर्मिती जास्त प्रमाणात होते. सालिव्हामुळे तुमच्या तोंडाला नेहमी वंगण मिळत राहातं आणि तुमच्या दाताला चिकटलेल्या कणांपासून प्रतिबंधित करायला मदत करतं आणि त्यामुळे कॅव्हिटीज कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी किस करत राहायला हवं मैत्रिणींनो, हे लक्षात ठेवा.
किस करण्याच्या खूप पद्धती आहेत. काही आपल्याला माहीत आहेत, तर काही आपल्याला माहीत नाहीत. पण तुम्ही जे किस करता त्याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? आम्ही तुम्हाला इथे २१ वेगवेगळ्या पद्धतीच्या किसचे अर्थ सांगणार आहोत.
म्हणजे काय: हे किस मूलतः एस्किमो लोकांचं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पाठीवर अतिशय प्रेमाने नाक घासता तेव्हा हे किस घेतलं जातं.
याचा अर्थ काय: जेव्हा तुम्हाला अगदी उत्तेजित होऊन किस करायचं असतं त्यावेळी तुमच्यासाठी ही पद्धत योग्य नाही. पण जर तुम्हाला खरंच सेक्सची सुरुवात करायची असेल तर किस घेण्यापूर्वी ही पद्धत नक्कीच चांगली आहे.
म्हणजे काय: जोडीदाराची जीभ जेव्हा तुमच्या जीभेला स्पर्श करते आणि जी भावना निर्माण होते त्यालाच ‘French Kiss’ असं म्हणतात. याला टंग किसिंग असंही म्हटलं जातं.
याचा अर्थ काय: एकमेकांच्या जिभेला स्पर्श होणं याचा अर्थ तुम्ही नात्यामध्ये नक्कीच खूप पुढे पाऊल टाकलं आहे आणि तुमच्या सेक्स लाईफमध्येदेखील तुम्ही पुढचं पाऊल टाकत आहात.
म्हणजे काय: तुमच्या जोडीदाराच्या मानेवर अतिशय भावनाप्रधान होऊन घेतलेलं किस. यामध्ये मानेवर हलक्या स्वरुपात चावा आणि किस करताना मानेवर चोखण्याची प्रक्रिया असते.
याचा अर्थ काय : कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात मान हा अतिशय संवेदनाक्षम भाग असतो आणि व्हॅम्पायर किस हा तुमच्या जोडीदाराला आपलंसं करण्याचा आणि तुम्ही तुमच्या जोडीदारामध्ये गुंतण्याचा एक योग्य प्रयत्न आहे.
म्हणजे काय: तुमच्या ओठांनी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या कानाच्या पाळीवर अतिशय हळूवारपणे किस करून त्याला तुमचं प्रेम जाणवून देणं.
याचा अर्थ काय: तुमचा जोडीदार जर ईअरलोब किस अगदी सहज पद्धतीने घते असेल तर त्याला किसिंग चांगल्या प्रकारे येत आहे असं समजा. त्यामुळे त्याला माहीत असलेल्या गोष्टीचा वापर करून घ्या आणि त्याला तुमच्यातील भावना जागृत करू द्या. तसंच यामधून तुमच्या जोडीदाराच्या शरीराजवळ यायची किती गरज आहे हेदेखील समजतं.
म्हणजे काय: सिंगल लिप किसमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदाराचे ओठ चावता. वरचा ओठ असो वा खालचा ओठ असो किस घेताना ओठ चावण्याला सिंगल - लिप किस म्हणतात.
याचा अर्थ काय: सिंगल लिप किस तुमच्यातील उत्तेजितता दर्शवतं. दोन्ही ओठांना योग्य संधी द्या आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्यातील भावना जाणवायला मदत मिळेल.
म्हणजे काय: स्पायरडमॅन लक्षात आहे का? त्यालाच अपसाईड डाऊन किस म्हणतात. जेव्हा तुमच्या जोडीदाराचं डोकं तुमच्या विरुद्ध दिशेला असतं आणि तुम्ही किस करता तेव्हा अपसाईड डाऊन किस असतं.
याचा अर्थ काय: हे किस अतिशय रोमँटिक असून पावसाळ्यात हे किस करण्याची मजाच काही और!
म्हणजे काय: सर्व किसमध्ये अप्रतिम असणारं किस. तुमच्या जोडीदाराच्या डोळ्याजवळ तुम्ही तुमच्या ओठांनी अतिशय नाजूक किस करता.
याचा अर्थ काय: नावाप्रमाणेच तुमच्यातील प्रेम आणि आकर्षण या किसमध्ये दर्शवलं जातं. एखाद्याला गुडबाय करताना हे किस देण्यात येतं.
म्हणजे काय: तुमच्या जोडीदाराच्या मानेच्या मागच्या बाजूला अथवा त्याच्या केसांच्या खाली वा मागे किस करणे.
याचा अर्थ काय: बऱ्याच लोकांसाठी मन आणि मानेचा मागचा भाग हा खूपच संवेदनशील असतो. त्यामुळे मानेच्या मागच्या भागावर किस करणं हे त्यांच्यासाठी सेक्स करण्याचा एक महत्त्वाचा भाग ठरू शकतं. त्यामुळे सेक्स करण्यासाठी पटकन प्रवृत्त करता येतं.
म्हणजे काय: हे किस कपाळावर घेण्यापासून चालू होतं, नंतर ओठापर्यंत येतं, मग खांद्यावर आणि मग पुन्हा मानेच्या मागच्या बाजूला.
याचा अर्थ काय: तुम्ही आणि तुमचा जोडीदार दोघांनाही या टीझर किस करायचं असेल तर पुढचं पाऊल टाकण्यासाठी हा नक्कीच चांगला पर्याय आहे.
म्हणजे काय: जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराचा हात हातात घेऊन अलगद प्रेमाने किस करता.
याचा अर्थ काय: याचा अर्थ तुम्ही तुमच्या जोडीदाराचा आदर करता. शिवाय तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या जवळ येऊ इच्छिता हे सांगण्याचा अतिशय सुंदर आणि भावनात्मक प्रकार आहे.
म्हणजे काय: हे अतिशय साधं किस आहे. फक्त तुमच्या नियमित किसमध्ये एक छोटासा चावा अथवा धसमुसळेपणा आणावा लागतो.
याचा अर्थ काय: तुमच्या नियमित मेकआऊटमध्ये थोडंसं स्पाईस अप करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे योग्य तऱ्हेने जोडीदाराला जवळ घेऊन किस करा.
म्हणजे काय: तुमच्या जोडीदाराच्या तोंडातून तुमची जिभ अगदी सहजरित्या फिरवण्याला लिझार्ड किस असं म्हणतात.
याचा अर्थ काय: कदाचित हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं, पण या किसमुळे तुमच्या नात्यात एक वेगळा अनुभव आणि साहस करायला मिळतं.
म्हणजे काय: तुमच्या जोडीदाराच्या जॉलाईनच्या आसपास किस घेणं
याचा अर्थ काय: तुमच्या जोडीदाराबरोबर सेक्स करताना, जॉलाईन किस घेणं हे अत्यंत सेक्सी आणि संवेदनाक्षम आहे. सेक्सचा अंतिम टप्पा असताना फायनल किस म्हणून तुम्ही हे घेऊ शकता. जे जोडीदार एकमेकांच्या अगदी जवळ असतात, ते साधारणतः जॉलाईन किस करूनच सेक्स संपवतात.
म्हणजे काय: नावाप्रमाणे अर्थात गालावर किस.
याचा अर्थ काय: आकर्षण वाटतंय या भावना व्यक्त करण्याचा उत्कृष्ट पर्याय. व्यक्तीनुसार याचा अर्थ बदलतो. हे रोमॅंटिक असू शकतं किंवा प्लॅटोनिकही.
म्हणजे काय: अतिशय मृदू आणि हलकं असं कपाळावर किस
याचा अर्थ काय: किस जे वास्तविक प्रेम आणि आकर्षण दर्शवतं. यामध्ये कोणताही रोमॅंटिक अर्थ असेलच असं नाही.
म्हणजे काय: एखाद्या लिक्विडचा सिप घ्यायचा आणि जोडीदाराला किस करत त्याला तो सिप भरवायचा.
याचा अर्थ काय: नॉर्मल फ्रेंच किसमध्ये एक मजेशीर ट्टिस्ट असून तुमच्या नात्यात किस करताना एक वेगळी मजा आणतो. एकमेकांना किस करताना अशीच एखादी वाईन तुम्ही ट्राय करू शकता आणि तुम्ही करत असलेल्या सेक्समध्ये अजून मजा येईल.
म्हणजे काय: तुमच्या जोडीदाराच्या पायावरून किस घेत जाऊन तळव्यापर्यंत किस करणं.
याचा अर्थ काय: बऱ्याच जणांच्या पायांना सहज गुदगुल्या होतात आणि त्यामुळे त्यांना पायावर किस करणं हे खूपच उत्तेजितही ठरू शकतं. तसंच तुम्ही सुरुवात करताना त्यांच्याशी एकप्रकारे मजामस्करी करत सुरुवात करण्याचाही हा एक प्रकार आहे.
म्हणजे काय: जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला किस करत असता आणि तुम्ही खूप जवळ येता की, तुमच्या पापण्याही एकमेकांना स्पर्श करतात.
याचा अर्थ काय: इंटिमेट किसपैकी हे एक किस आहे आणि तुमचा जोडीदार तुमच्या प्रचंड प्रेमात असल्याचं हे चिन्ह आहे.
म्हणजे काय: मध्ये मध्ये न थांबता ओठांवर किस घेत राहणं.
याचा अर्थ काय: हे असं किस आहे ज्यामध्ये तुम्ही थांबत नाही. तुम्ही तुमच्या जोडीदाराला किस करत असताना इतके गुंतता की, तुम्हाला मध्ये श्वास घेण्यासाठी थांबायचंही कळत नाही.
म्हणजे काय: एखाद्या चित्रपटात तुम्ही हवेत एखाद्याला गालावर किस देताना पाहिलं आहे ना? त्यालाच एअर किस असं म्हणतात.
याचा अर्थ काय: एखाद्याला भेटण्याची ही पद्धत आहे. तुमच्या जोडीदाराबरोबर नक्कीच तुम्ही ही पद्धत अवलंबणार नाही कारण हे पूर्णतः प्लॅटॉनिक आणि अरसिक असं किस आहे.
म्हणजे काय: तुमच्या जोडीदाराच्या त्वचेवर तुम्ही घेतलेल्या किसची एखादी निशाणी सोडणं
याचा अर्थ काय: अतिशय उत्तेजित होऊन न समजता असा क्षण येतो की, तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मानेवर अथवा एखाद्या ठिकाणी चावल्यामुळे तुमच्या दातांचे व्रण राहतात. त्यामुळे तुम्ही दोघांनी अतिशय सुंदर रात्रीचे क्षण घालवले आहेत हे समजतं.
प्रत्येक गोष्टीप्रमाणे, किसिंग करण्यालाही काही नियम असतात. त्यामुळे तुमच्या जोडीदाराला किस करताना काय करावं आणि काय करू नये याची ही यादी.
1. परवानगी मागा
पुन्हा मी तुम्हाला सांगू का? - तर हो परवानगी मागा. किस करणं योग्य आहे की नाही हे कोणत्याही स्त्री वा पुरुषाला विचारणं यापेक्षा अधिक चांगलं काही असूच शकत नाही. तुम्ही न बोलता परवागनी दिली असेलही. तुमच्या ओठांवर त्याने ओठ ठेवण्यापूर्वी हळूवारपणे कानात विचारल्याची भावना काही औरच आहे. परवानगी ही नक्कीच गृहीत धरलेली नसावी.
2. तोंडाला खराब वास नसावा
तोंडाला घाण येणं ही सर्वात वाईट गोष्ट आहे. तुम्ही कोणाला तरी किस करणार आहात, हे तुम्हाला माहीत असतानाही अशा परिस्थितीमध्ये तुमच्या तोंडाला खराब वास येत असण्याइतकी वाईट गोष्ट नाही. तुमच्या जोडीदारासमोर कधीही अशा अवस्थेत जाऊ नका. तोंडाला चांगला वास येण्यासाठी व्यवस्थित ब्रश करा, पाणी प्या आणि जे करता येईल ते करा. तसंच अशा वेळेपूर्वी वाईट वास येणारे कोणतेही पदार्थ खाऊ नका.
3. च्युईंगम खाऊ नका
तोंडाला खराब वास येऊ नये यासाठी कदाचित तुम्ही च्युईंगम वा मिंट खात असाल तर, तुमच्या जोडीदाराला किस करण्यापूर्वी तुम्ही हे च्युईंगम वा मिंट न चघळता थुकून टाका. तुमच्या तोंडात च्युईंगम राहिल्यास, गोष्टी कधी बिघडतील याची जाणीवही तुम्हाला होणार नाही.
4. तुमच्या ओठांची काळजी घ्या
हे दोघांसाठीही आहे. तुमचे ओठ कोरडे वा कडक असतील, तर किस करताना दोघांनाही मजा येणार नाही. यासाठी लिप बाम नेहमीच तुमची मदत करतं. त्यामुळे स्वतःजवळ नेहमी लिप बाम असू द्यावा. तसंच ओठ मऊ ठेवण्यासाठी सकाळी ब्रशने हलक्या हाताने घासावं हीदेखील एक लहानशी सूचना आहे. त्यामुळे ओठ अतिशय मऊ राहतात. समोरच्याला जिंकून घेण्यासाठी हे जास्त चांगलं आहे.
5. हात कुठे असावेत?
हा खरं तर अगदी जुना प्रश्न आहे - जोडीदाराला किस करताना नक्की हात कुठे असावेत? खरं तर हे परिस्थितीवर अवलंबून आहे. पण हात नक्कीच तुमच्या बाजूला नसलेले चांगले. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी एकरूप होत असता, बरोबर ना? त्यामुळे थोडेसे तुमच्या जोडीदाराच्या जवळ जा आणि त्याच्या केसात हात घाला अथवा त्याच्या मानेभोवती हात ठेवा.
6. वातावरण हे सर्वात महत्त्वाचं
किस घेण्यासाठी योग्य वेळ निर्माण करणं आणि योग्य जागा निवडणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला ताप असेल तेव्हा जर तुमचा जोडीदार तुम्हाला भेटण्यासाठी आला असेल तर त्यावेळी पहिल्यांदा किस करणं ही योग्य वेळ नक्कीच नाही किंवा तुम्ही तुमच्या पालकांना भेटायला घेऊन आला आहात आणि बेडरूममध्ये घेऊन गेल्यास, किस करू नका. अर्थात तुम्ही असं करू नका असंही नाही पण वातावरण रोमँटिक असावं याची नक्की काळजी घ्या. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर असाल तेव्हा कोणीही मध्ये येणार नाही अथवा अशा स्थितीमध्ये तुम्ही पकडले जाणार नाही अशा ठिकाणीच किस करा.
7. तुमच्या जोडीदाराचं मन ओळखा
तुमच्या जोडीदाराच्या प्रतिक्रियेवरून काय नक्की हवंय आणि काय नकोय हे तुम्हाला नक्कीच कळतं. जर तुमचा जोडीदार तुमच्या अधिक जवळ येत असेल, तर तुम्ही नक्कीच योग्य गोष्टी करत आहात आणि जर ते तुमच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतील, तर तुम्ही तुमच्या पद्धती बदलणं गरजेचं आहे. त्यावेळी परिस्थिती समजून घेऊन वागणं जास्त महत्त्वाचं आहे.
8. दात रूतवू नका
बऱ्याचदा सेक्स करताना इतकं उत्तेजित होतात काही लोक की, त्यामुळे ओठांवर किस घेऊन ओठ काळेनिळे पडतात. मात्र समोरच्या व्यक्तीसाठी हे अतिशय क्लेषदायक असू शकतं. पण तुम्ही तुमच्या जोडादाराबरोबर नुकतीच सुरुवात केली असेल आणि तुमच्या जोडीदाराचं प्राधान्य नक्की काय आहे हे माहीत नसेल तर पहिल्यांदा काही वेळा किस करताना थोडं सांभाळूनच करावं. त्यानंतर सेक्सी गोष्टींना प्राधान्य द्यावं.
9. तुमच्या जोडीदारावर उड्यांचा प्रयोग करू नका
सेक्स अथवा किस ही प्रेमाची भावना आहे, यामध्ये एकमेकांवर अटॅक करू नका, हा काही कुस्तीचा आखाडा नाही. अगदी हळूवारपणे किस घ्यायला सुरुवात करा आणि मगच पुढचं पाऊल टाका. तुम्ही जितकं गुंतला आहात, तितकाच तुमचा जोडीदारही तुमच्यामध्ये गुंतला आहे की नाही हे पाहा. हळूवारपणे सुरुवात करून तुम्हाला नक्की कशा प्रकारे वागायचं आहे ठरवता येतं.
10. तुमच्या जोडीदाराच्या भावनेचा आदर करा
तुम्ही तुमच्या जोडीदाराला अगदी समर्पित व्हा असं अगदीच आम्ही तुम्हाला सांगत नाही. पण तुमच्या जोडीदाराने पहिलं पाऊल उचलावं, यासाठी त्याला थोडा वेळ द्या. इतकंच नाही, तुम्ही एकमेकांवर हुकूम गाजवण्यापेक्षा एकमेकांचा आदर करणं जास्त महत्त्वाचं आहे. ज्यामुळे तुमच्या जोडीदाराला समजून घेणं तुम्हाला सोपं जाईल.
11. ओठांपेक्षा अधिक काही
ओठांपासून सुरुवात करून नंतर जॉलाईन आणि मग त्यांच्या मानेवर किस घ्यावं. तसंच कानाजवळ हळूवारपणे बोलून अथवा मानेवर हळूवारपणे किस घेत तुम्ही एकमेकांच्या भावनांना जपता आणि तुमच्या जोडीदाराला तुमच्या किससंदर्भात अधिक व्यसनी बनवा अर्थातच त्यांना तुमची सवय लावा.
12. तुमची लाळ नियंत्रणात ठेवा
तुमची लाळ नियंत्रणात ठेवा. तुमचा जोडीदार जेव्हा तुम्हाला असं किस देतो तेव्हा ते खूपच वाईट असतं. ओले ओठ आणि थोडीशी लाळ असणं ठीक आहे. मात्र अतिप्रमाणात नक्कीच नको.
13. तुमच्या जोडीदाराला पाठिंबा द्या
हे अर्थातच खास पुरुषांसाठी आहे. अशा बऱ्याचशा मुली असतात, ज्यांना नीट किस करता येत नाही. त्यामुळे तुमच्या जोडीदाराला जवळ घ्या आणि त्याचं वजन नीट सांभाळून त्यांचं किस घ्या. तुम्ही त्यांना भिंतीजवळ अगदी प्रेमाने उचलून घेऊन जाऊन किस करू शकता, पण त्यांना यामध्ये कुठेही पडू देऊ नका, लागू देऊ नका.
14. जोडीदाराला कसं वाटत आहे ते जाणून घ्या
तुम्ही कसे किस करत आहात त्या टेक्निक्सबाबत जर तुमच्या जोडीदाराने तुम्हाला त्याच्या भावना सांगितल्या, तर कृपा करून वाईट वाटून घेऊ नका. स्वतःचा अपमान झाला आहे असंही वाटून घेऊ नका. तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे किस करावं यासाठीच तुम्हाला ते मदत करत असतात. म्हणतात ना, सेक्स आणि वाईन ही वेळेनुसार मुरत जातं. त्यामुळे अनुभवच तुमच्या कामी येईल.
15. एकटक पाहू नका
किस करत असतानाच तुम्ही मध्येच डोळे उघडलेत आणि तुम्हाला जाणवलं की, तुमचा जोडीदार तुमच्याकडे एकटक पाहात आहे. डोळे बंद करून किस घेण्यातच मजा आहे. मात्र, किस करताना काही सेकंदासाठी डोळे उघडून पुन्हा बंद करून किस करण्यातच मजा आहे.
GIFs: Giphy, Tumblr