ADVERTISEMENT
home / Natural Care
उटणं हे आयुर्वेदाकडून मिळालेलं उत्कृष्ट मिश्रण

उटणं हे आयुर्वेदाकडून मिळालेलं उत्कृष्ट मिश्रण

आत्तापर्यंत जर तुम्हाला उटण्याच्या उपयुक्ततेबद्दल माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला उटण्याबाबतची सगळी इत्यंभूत माहीती देणारे आहोत. पारंपारिकरित्या, उटणं हे सर्वात जुनं आणि उत्कृष्ट दर्ज्याचं सौदर्यप्रसाधन आहे. जे अतिशय साध्या आणि प्रभावी घटकांनी बनवलं जातं. उटणं हा एक जादुई फेसमास्क आहे, जो तुमच्या चेहऱ्याला लावल्यानंतर तुमची त्वचा तजेलदार होते. हे एवढं परिणामकारक आहे की, लग्नातील एक पूर्ण विधी उटणं लावण्यासाठी करण्यात आला आहे. पण हे वापरण्यासाठी तुम्हाला लग्न केलंच पाहिजे असं काही नाही. चला तर मग जाणून घेऊया हे नैसर्गिक मिश्रण कसं बनतं ते.

Story Outline

जाणून घ्या उटण्याबद्दल (Know About Ubtan)

जाणून घ्या वात, पित्त आणि कफबद्दल (Know About Vatta, Pitta, and Kapha)

ADVERTISEMENT

उटण्याचं फायदे (Benefits Of Ubtan)

उटण्याची कृती (Ubtan Recipes)

रोजच्या वापरासाठी उटणं (Ubtan For Daily Use)

फेशिअल स्क्रब म्हणून उटणं (Ubtan For Facial Scrub)

ADVERTISEMENT

मॉईश्चरायजर म्हणून उटणं (Moisturising With Ubtan)

उटणं मास्क रोजच्या वापरासाठी (Ubtan Mask For Regular Use)

उटणं टॅन आणि काळ्या डागांसाठी (Ubtan For Tan Removal And Dark Patches)

उटणं विविध त्वचा प्रकारांसाठी (Ubtan For Various Skin Types)

ADVERTISEMENT

तेलकट त्वचेसाठी उटणं (Ubtan For Oily Skin)

कोरड्या त्वचेसाठी उटणं (Ubtan For Dry Skin)

साधारण त्वचेसाठी उटणं (Ubtan For Normal Skin)

उटण्याचे काही दुष्परिणाम (Side Effects Of Ubtan)

ADVERTISEMENT

5 रेडी टू युज उटण्यांची POPxo करतं शिफारस (POPxo Recommends Top 5 Ready-to-Use Ubtans)

उटणं म्हणजे काय?

कित्येक शतकांपासून, अगदी आज ही उटणं हे आयुर्वेदीक सौंदर्यप्रसाधनांपैकी मुख्य घटक म्हणून ओळखला जातो. ज्यामध्ये उपचार करणारे गुणधर्म आहेत. औषधी वनस्पती आणि आवश्यक तेल यांचं मिश्रण करून तयार केलेले उटणं हे एकेकाळी शेंगासारख्या वनस्पतीपासूनही बनवले जात असे. वर्षानुवर्षे उटणं हे एक त्वचा परिपूर्णपणे साफ करणारा घटक मानले जाते. आयुर्वेदानुसार, आपल्या शरीरातील दोष किंवा आपल्या शरीरातील असंतुलन जे त्वचेचे नुकसान किंवा समस्या यांना अनुसरून उटणं बनवावं. आर्युवेदातील सर्व औषध ही दोष म्हणजेच शरीरातील दोषांवर आधारित आहेत. ज्याचं वर्गीकरण वात, पित्त आणि कफ असं करण्यात आलं आहे.

Ubtan tulsi %285%29

ADVERTISEMENT

वात दोषातील उटणं हे त्वचेला मॉईश्चराइज करणं आणि सामान्य शरीराएवढे तापमान असताना वापरणं आवश्यक आहे. पित्त दोषात चेहऱ्यावरील त्वचेला थंडावा मिळावा याकरता उटण्याचा वापर केला जातो. ज्यामुळे त्वचेतील उष्णता आणि इतर उष्मा-संबंधित घटक आपल्या त्वचेतून बाहेर पडतात. शेवटी, कफ दोषामध्ये चेहऱ्यासाठी बनवलेले उटणं हे उबदार द्रव्यपदार्थांनी बनवलेले असल्यास फायदेकारक असते. ज्यामुळे शरीरातील द्रवपदार्थांचा नैसर्गिक प्रवाह उत्तेजित होण्यास मदत होते.

उटणं ही एक हर्बल पेस्ट आहे. जी दूध किंवा दुध पावडर, बेसन, बदाम पावडर, हळद, दूध मलई, लिंबाचा रस आणि गुलाब पाणी वापरुन बनवले जाते. मुख्यतः घरात सहजपणे उपलब्ध सर्व साहित्य आणि खर्च न करता आपल्याला उटणं बनवता येऊ शकते.

वात, पित्त आणि कफ म्हणजे काय?

वात, पित्त आणि कफ हे आर्युवेदात ३ दोष म्हणून ओळखले जातात. आयुर्वेदानुसार वात, पित्त आणि कफ या तिन्ही मूलत्तवांचे संतुलन साधल्यास तुम्हाला कोणताही रोग होत नाही. पण जेव्हा ह्यांचं संतुलन बिघडतं, तेव्हा आपल्याला एखादा आजार होतो. म्हणूनच आयुर्वेदात ह्या तिन्ही तत्त्वांचं संतुलन राखलं जातं. वात दोषामध्ये वायू आणि आकाश तत्व प्रबळ असतात. पित्त दोषामध्ये अग्नी दोष प्रबळ असतो. कफ दोषामध्ये पृथ्वी आणि जलतत्वाचे प्राबल्य असते.

ADVERTISEMENT

उटण्याचे फायदे (Benefits Of Ubtan)

मिळवा चमकदार त्वचा (Get That Glow)
उटणं हा एक नैसर्गिक फेसमास्क आहे. ज्यामध्ये अत्यंत गुणकारी घटक आहेत. ह्याचा नियमितपणे वापर केल्यास तुमची त्वचा नेहमी तजेलदार आणि हायड्रेटेड राहते. उटण्यात साधारणतः वापरले जाणारे बेसन, चंदनाची पावडर किंवा चंदन हे त्वचेला मऊ बनवतात. दुधामुळे त्वचेचा रंग उजळतो आणि त्वचेवरील काळे डाग कमी होऊन त्वचा गोरी, डागविरहीत आणि चमकदार होते.  

नितळ त्वचेसाठी (Gives Clear Skin)
आपल्यापैकी बऱ्याच जणांना असंतुलित त्वचा, पिगमेंटेशन किंवा पिंपलचे व्रण अशा त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. ह्या सगळ्यांवरील एकमेव उपाय म्हणजे उटणं. जे तुम्हाला डागविरहीत त्वचा देतं. खरंतर नियमितपणे उटण्याचा वापर केल्यास त्वचेचे सूर्याच्या किरणांपासूनही संरक्षण होते.  

तारूण्यपूर्ण दिसण्यासाठी (Makes You Look Younger)
हळद हे कोणत्याही जखमेवर अत्यंत गुणकारी घटक असून, उटण्यात ही मुख्यतः याचा वापर होतो. ह्या अत्यंत गुणकारी घटकामध्ये ज्वलनशामक, अॅंटी एजिंग आणि अॅंटी ऑक्सिडेटीव्ह गुणधर्मांमुळे त्वचा जास्त तारुण्यमय वाटते.

ADVERTISEMENT

Ubtan benefits of ubtan

चेहऱ्यावरील केसांपासून मुक्तता (Removing Facial Hair)

नियमित आणि कोमल फेशिअल स्क्रबचा उटण्यासकट वापर केल्यास चेहऱ्यावरील नको असलेले केस जाऊ शकतात. चेहऱ्यावरील नकोश्या केसापासून सुटका करून घेण्याचा हा अत्यंत कमी खर्चात आणि गुणकारी उपाय आहे. जुन्या काळात आणि काही ठिकाणी अाजही बाळांना विशेष उटण्याने मालीश करण्यात येते, ज्यामुळे त्यांच्या शरीरावरील नकोसे केस किंवा लव कायमचे निघून जाते.  

पिंपल्सपासून मुक्ती (Prevents Acne)

ADVERTISEMENT

उटणं फक्त तुमच्या त्वचेला मऊ आणि मुलायमच बनवत नाही तर यातील औषधी घटकांमुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपलसुध्दा कमी होतात. हळद आणि चंदनामध्ये असलेले जंतूविरोधी आणि बुरशीविरोधी घटकांमुळे तुमच्या चेहऱ्यावरील मुरूम कमी होत जातात आणि कोणताही रोगसंसर्गसुद्धा टळतो.

त्वचा सैल पडू देत नाही (Gives You Toned Skin)

चंदनाची पावडर किंवा चंदन हे नैसर्गिक अॅस्ट्रीजंट म्हणून ओळखले जातात. नियमितरित्या वापर केल्यास तुमच्या त्वचेवरील पोर्स कमी होऊन त्वचेला तजेलदार आणि तारुण्यपूर्ण लुक मिळतो.  

उटण्याच्या काही कृती (Ubtan Recipes) :

ADVERTISEMENT

उटण्याला तुमच्या रोजच्या स्कीन रेजिमचा भाग बनवा. ज्यामुळे तुमच्या त्वचेशी निगडीत समस्यांचे निराकारण होईल. तसंच तुमची त्वचा चमकदार आणि मऊसुद्धा होईल. तुमच्या त्वचेला अनुकूल असे चांगल्या दर्जाचं उटणं वापरा. जे त्वचेवरील काळे डाग, व्हाईट हेड्स, पिगमेंटेशन, कोरडेपणा आणि त्वचेला हानीकारक ठरणाऱ्या सूर्याच्या किरणांपासून तुमचे रक्षण करेल.  

उटणं कसं बनवायचं, हे जाणून घेण्याआधी आपण जाणून घ्यायला हवं की, त्वचेचे विविध प्रकार आहेत. त्यामुळे आपल्या त्वचेवर नवीन काहीही लावण्याआधी ते मनगटाच्या त्वचेवर लावून तपासून घ्या. तुमच्या त्वचेला योग्यरित्या सूट होणारे उत्पादन वापरल्यास त्वचा सदैव समस्याविरहीत राहील.  

रोज वापरण्यासाठी उटणं (Ubtan For Daily Use)

रोजच्या वापरातील उटणं बनवण्यासाठी तुम्हाला लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे –

ADVERTISEMENT

1 चमचा चंदन पावडर (chandan), 2 चमचे बेसन पावडर (besan), ½ चमचा हळद पावडर (haldi), 2 चमचे कच्चं दूध, मिश्रणाकरिता बाऊल, आणि अॅप्लिकेटर.

हे उटणं कसं बनवाल ? (How To Make This Ubtan)

बाऊल घ्या, त्यात सर्व पावडर घ्या आणि मिक्स करा. त्यानंतर त्या दूध घाला. अॅप्लिकेटरच्या साहाय्याने सर्व घटकांची पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्या.ही पेस्ट जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नसावी. तसंच त्यात गुठळ्या होऊ नयेत. हे मिश्रण चेहऱ्यावर नीट पसरून लावता आले पाहिजे. हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर 15-20 मिनिटं ठेवा किंवा ते सुकेपर्यंत ठेवा. एकदा हा मास्क सुकल्यावर कोमट पाण्याने धुवून टाका. जर तुम्ही रोज उटणं लावलंत तर तुम्हाला चेहऱ्याला साबण किंवा फेसवॉश लावायची गरजच पडणार नाही. जर उटणं तुम्हाला रोज वापरायचं नसेल तर आठवड्यातून तीन वेळा वापरून पाहा. तुम्हाला लगेच फरक जाणवेल.

या उटण्याचे फायदे (Benefits Of This Ubtan)

ADVERTISEMENT

कच्चा दूध हे त्वचेच्या अनेक तक्रारींवर गुणकारी आहे. खासकरून पिगमेंटेशन आणि काळ्या डागांवर. तसंच हे त्वचेच्या हायड्रेशनसाठी आणि त्वचेवरील तेल कमी करण्यासाठी ही उपयोगी आहे. दुसरीकडे चंदन तुमची त्वचा मऊ आणि कोमल बनवतं. तर बेसनामुळे तुमच्या चेहऱ्यावरील मृत त्वचा दूर करते. तर हळद अॅंटीसेप्टीकचं काम करते.

फेशिअल स्क्रब म्हणून उटणं (Ubtan For Facial Scrub)

यासाठी तुम्हाला 1 चमचा ओटमील, 3 चमचे बेसन, 2 चमचे चंदनाची पावडर (chandan), ½ चमचा हळद (haldi), 2 चमचे किसलेली काकडी आणि मिश्रणासाठी बाऊल लागेल.

कसं बनवाल हे उटणं (How To Make This Ubtan)

ADVERTISEMENT

ही पेस्ट बनवण्यासाठी सर्व घटक घेऊन त्यात काकडीची पेस्ट मिक्स करा. 5 मिनिटं हे मिश्रण तसंच ठेवा. हे उटणं लावताना थोडंसं मिश्रण हातावर घेऊन ते चेहऱ्यावर लावा आणि सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा. निदान 5 ते 10 मिनिटं ते चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. यानंतर चेहऱ्याला कोणताही साबण किंवा फेसवॉश लावू नका. स्क्रबमुळे तुमच्या चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते आणि तसंच चेहऱ्यावर साठलेली धूळही स्वच्छ होते. कोणताही चांगला स्क्रब आठवड्यातून एकदा किंवा दहा दिवसातून एकदा तरी चेहऱ्यासाठी वापरा. ज्यामुळे तुमची त्वचा ताजी आणि टवटवीत दिसते. पण लश्रात ठेवा की, स्क्रबिंग झाल्यावर चेहऱ्याला टोनर किंवा फेसमास्क लावणं गरजेचं आहे. कारण स्क्रब केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील पोर्स मोकळे होतात. फेसमास्क आणि टोनरमुळे ते बंद होण्यास मदत होते.

या उटण्याचे फायदे (Benefits Of This Ubtan)

खरंतर काकडी ही सगळ्यात उत्तम अशी भाजी आहे, जी तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करते. पण अनेकांना हे माहीतच नाही. चांगली अॅंटीऑक्सीडंट असल्याने काकडीमुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा, सनबर्न आणि सूर्यकिरणांमुळे त्वचेला झालेले अपाय दूर होतात. तर दुसरीकडे ओटमील हे उत्तम आणि स्वस्त असं एक्सफॉलियंट आहे. ह्या मास्कमुळे तुमच्या त्वचेवरील दोष दूर होऊन एजिंगची समस्या दूर होईल आणि त्वचा जास्त तजेलदार दिसेल.  

उटण्यापासून मॉईश्चराईजर (Moisturising with Ubtan)

ADVERTISEMENT

हे उत्कृष्ट उटणं बनवण्यासाठी तुम्हाला लागतील 6-7 बदाम, ताजं दूध किंवा दूध क्रीम, 1 चमचा सेसमे ऑईल, 1 चमचा तुळस पावडर, 3 चमचे बेसन पावडर, 2 चमचे चंदन पावडर आणि हळद पावडर.

Ubtan tulsi almonds pack

या उटण्याची कृती (How To Make This Ubtan)

हे उटणं बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये ताजं दूध किंवा क्रीम घ्या. त्यात रात्रभर बदाम भिजत ठेवा. लक्षात ठेवा, बाऊलमध्ये बदाम भिजतील एवढंच दूध किंवा क्रीम असावं. सकाळी रात्रभर भिजवलेले बदाम सोला आणि त्यात सेसमे ऑईल, तुळस पावडर मिक्स करा आणि ते जाडसर वाटून घ्या. हे उटणं मास्कसारखं तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि 10 ते 15 मिनिटं ठेवा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. तुम्ही हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा तरी लावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील त्वचा नक्कीच चांगली होईल. तसंच मॉईश्चर लेव्हलसुद्धा वाढेल. बनवताना ही पेस्ट जास्त बनवल्यास आठवड्याभरासाठी वापरता येईल.

ADVERTISEMENT

महत्त्वाची सूचना (Important Tip)

सेसमे ऑईल आणि तुळस पावडर हे घटक चांगले असले तरी ते तुमच्या स्कीनला सूट होतीलच असं नाही. त्यामुळे हे उटणं चेहऱ्याला लावण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा. पॅच टेस्ट करण्यासाठी थोडंसं उटणं तुमच्या कोपराच्या आतल्या भागाला लावून 5 मिनिटं वाट बघा. जर तुम्हाला जळजळ किंवा खाजल्यासारखं जाणवल्यास लगेच ते पुसून टाका आणि थोडा बर्फ लावा. जर असं जाणवलं नाही तर तुम्ही हे उटणं वापरू शकता. ही पॅच टेस्ट तुम्ही कोणत्याही फेसपॅक किंवा एखादं नवं प्रोडक्ट लावण्याआधी करू शकता. ज्यामुळे ते तुमच्या स्कीनला सूटेबल आहे की नाही ते कळेल.

या उटण्याचे फायदे (Benefits of this Ubtan)

बदाम आणि दूध हे त्वचेला झालेल्या अपायावर लावण्यासाठी उत्तम मिश्रण आहे. अ जीवसत्त्वयुक्त बदाम कोणत्याही प्रकारच्या त्वचा समस्येवर गुणकारी आहे तर तुळस ही जंतूनाशक असून पिंपल्स आणि संसर्गावर गुणकारी आहे. सेसमे ऑईल हे जंतूनाशक आणि ज्वलनशामक आहे. कारण यात भरपूर प्रमाणात अॅंटीअॉक्सीडंट्स आहेत. जे तुमच्या त्वचेत सहज शोषलं जातं.

ADVERTISEMENT

उपयोगी सूचना :  हे उटणं तेलकट त्वचेसाठी फारच गुणकारी आहे.   

रोजच्या वापरासाठी उटण्याचा मास्क (Ubtan Mask For Regular Use)

हे मिश्रण बनवण्यासाठी तुम्हाला लागेल, 1 चमचा गव्हाचं पीठ, 1 चमचा बेसन, 1 चमचा चंदन पावडर (chandan), ½  चमचा हळद पावडर, 2 चमचे गुलाबाचं पाणी आणि एक बाऊल.

कसं बनवाल हे उटणं (How To Make This Ubtan)

ADVERTISEMENT

एक वाडगं घ्या, त्यात हे सर्व कोरडे घटक घ्या आणि गुलाबाचं पाणी याेग्य प्रमाणात मिसळा. योग्य प्रमाणात उटणं तयार झाल्यावर ते तुमच्या चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटं ठेवा किंवा जोपर्यंत हा मास्क सुकत नाही. आता तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवा आणि मॉईश्चराईज करा. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर गुलाब पाण्याऐवजी दूधाचा किंवा दूध क्रीमचा वापर करा. याने बराच फरक पडेल. हा मास्क दररोज किंवा 10 ते 15 अंतराने लावल्यास फरक जाणवेल. तसंच हे उटणं लावण्याची योग्य वेळ म्हणजे झोपण्याआधी कारण या घटकांचा फायदा तुम्ही विश्रांती घेतल्यावर जास्त दिसून येईल.

या उटण्याचे फायदे (Benefits Of The Ubtan)

गव्हाचं पीठ हे चांगलं एक्सफॉलिएंट असून ते तुमच्या स्कीन सेल्सच्या पुननिर्मितीत मदत करतं. तसंच चेहऱ्याचा रंगही उजळतो. गुलाब पाणी हे टोनरसारखे तुमच्या चेहऱ्यावरील पोर्स बंद करतं. ज्यामुळे तुमच्या लुकमध्ये बराच फरक पडतो.  

टॅन किंवा काळ्या डागांसाठी उटणं (Ubtan For Tan Removal And Dark Patches)

ADVERTISEMENT

काळे डाग आणि टॅन हे तुमच्या चेहऱ्याचे वाईट शत्रू आहेत, जे तुमची त्वचा कूरूप बनवतात. जर तुम्हालाही याचा त्रास असेल तर हे उटणं तुमच्यासाठी चांगलं आहे. हे उटणं बनवण्यासाठी तुम्हाला लागेल, 1 चमचा बेसन , 1 चमचा दूध पावडर, 1 चंदनाची पावडर, ½ चमचा हळद पावडर, 2 चमचे मध, 1 चमचा लिंबू, आणि मिक्सिंग बाऊल.

हे उटणं कसं बनवाल? (How To Make This Ubtan)

हे उटणं बनवण्यासाठी सर्व कोरडे घटक बाऊलमध्ये घ्या आणि मिक्स करा. त्यानंतर त्या मध, लिंबाचा रस आणि दूध मिक्स करून घट्ट पेस्ट बनवा. काळजी घ्या की पेस्टमध्ये गुठळ्या होणार नाहीत. पेस्ट मिनिटं तशीच ठेवा. त्यानंतर 15 ते 20 मिनिटं लावा आणि कोमट पाण्याने धूवून टाका. हे उटणं आठवड्यातून दोनदा लावल्यास फरक जाणवेल.

या उटण्याचे फायदे (Benefits Of this Ubtan)

ADVERTISEMENT

लिंबू आणि मध हे टॅन आणि पिंगमेंटेशनवर मात करण्यासाठी उत्कृष्ट मिश्रण आहे. तसंच मध हा त्वचेसाठी खूप चांगला हायड्रेटींग घटक आहे.

विविध त्वचा प्रकारांसाठी उटणं (Ubtan for various skin types)

तेलकट त्वचा (Oily Skin)

ज्यांची त्वचा तेलकट असते. त्यांनी असं उटणं वापरावं जे तुमच्या चेहऱ्यावरील तेल कमी करेल आणि अॅक्ने वाढू देणार नाही. त्यासाठी उटण्यामध्ये दही, बेसन, हळद, लिंबू असे घटक वापरा. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील तेल कमी होईल.

ADVERTISEMENT

कोरडी त्वचा (Dry Skin)

जर तुमची त्वचा कोरडी असेल तर उटण्यामध्ये मध, दूध किंवा दूध क्रीम, दही असे घटक वापरा. ज्यामुळे तुमची त्वचेतील मॉईश्चर कायम राहील.

सामान्य त्वचा (Normal Skin)

जर तुमची त्वचा सामान्य असेल तर याचा अर्थ तुमच्या त्वचेतील पीएच बॅलन्स चांगला आहे. ज्यामुळे त्वचेला जास्त समस्यांचा सामना करावा लागत नाही. सामान्य त्वचेसाठी उटणं बनवताना तुम्ही त्यात केळ, लिंबू, हळद, बेसन, मध, योगर्ट इ. घटक वापरू शकता. ज्यामुळे तुमची त्वचा मऊ होईल.

ADVERTISEMENT

दुष्परिणाम (Side Effects)

खरतंर उटण्याचे दुष्परिणाम म्हणावे असं काही नाही. पण उटणं हे नेहमीच विविध घटकांच्या मिश्रणाने बनवलं जातं. त्यातील घटक तुमच्या त्वचेला सूट होतीलच असं नाही. त्यामुळे उटणं बनवताना तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार घटक वापरा. जसं वर म्हंटल्याप्रमाणे तेलकट त्वचा असणाऱ्यांनी क्रीम किंवा मध असलेले उटणे टाळून त्याऐवजी गुलाब पाण्याचा वापर करावा.

या 5 रेडी टू युज उटण्यांची POPxo करतं शिफारस (Top 5 Ready-to-Use Ubtans)

फेशियल उटणं मुलतानी मिट्टी (Facial Ubtan Multani Mitti 85G, Mritika Ubtan)

ADVERTISEMENT

Ubtan Forrest Essential

हे कोमल उटणं तुमची त्वचा स्वच्छ आणि खोलवर जाऊन क्लीन्ज करतं. या उटण्यामध्ये चांगल्या हर्ब्सच मिश्रण आहे, ज्यामध्ये तुळस, हळद, मेथी आणि मुलतानी माती. जे तुमच्या त्वचेेचे मुरूमांपासून रक्षण करते. Buy it here

कामा आयुर्वेद उटणं (Kama Ayurveda Ubtan Soap-Free Body Cleanser)

Ubtan Kama2

ADVERTISEMENT

हा बॉडीवॉश महत्त्वपूर्ण हर्ब्स आणि मिनरल्सयुक्त आहे. ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी आणि तजेलदार राहते. हे प्रोडक्ट तेलकट त्वचेसाठी उत्तम आहे. हे हर्बल मिश्रण लावल्यामुळे तुम्हाला वाटेल ताजंतवान. याचा नियमित वापर केल्यास तुमची तेलकट त्वचा व्यवस्थित राहते. Buy it here

प्लम स्कीन आणि हेअर फूड ब्रायडल उटणं (Plump Skin And Hair Food Bridal Ubtan -Red, Standard)

Ubtan Plump3

हे ब्रायडल उटणं तुमच्या त्वचेला देतं योग्य नववधूचं तेज. यामध्ये आहेत अॅंटीऑक्सीडंट्स आणि तुमच्या त्वचेला सूर्यकिरणांमुळे झालेला अपाय ही दूर करते. Buy it here

ADVERTISEMENT

रूट्स आणि हर्ब्स आयुर्वेदीक नॅचरल ट्रीटमेंट (Roots & Herbs Ayurvedic Natural Treatment)

Ubtan roots4

हे 100% शाकाहारी अश्वगंधा स्कीन इल्युमिनेटींग फेस उटणं तुमच्या त्वचेला कोमलता आणि तेज देतं. हे इल्युमिनेटींग फेस उटणं खास अनोख्या नैसर्गिक मॉईश्चरायजरसोबतच निवडक हर्ब्सपासून बनवण्यात आलं आहे. Buy it here

अॅलो वेदा टर्मरिक फेशिअल उटणं पॅक (Aloe Veda Turmeric Facial Ubtan Pack Clarifying and Deep Pore Cleansing)

ADVERTISEMENT

UBtan Aloeveda5

संत्र्याच्या सालाची पावडर, गुलाब पावडर, अनंतमूळ, जौ पावडर, मूलतेही, मंजिष्ठा, कडूनिंब पावडर, रोजिप ऑईल, संत्र ऑईल, मॅन्डरिन पील ऑईल आणि मुलतानी मिट्टी यासारख्या हर्ब्सने बनवलेले हे उटणे सर्व प्रकारच्या त्वचा प्रकारांसाठी सूटेबल असून पॅराबेन फ्री आहे. Buy it here

आम्ही आधी म्हंटल्याप्रमाणे हे खूपच नैसर्गिक असल्यामुळे तुम्हाला नुकसान नाही पण फायदा नक्कीच होईल.

Pictures: Shutterstock

ADVERTISEMENT

तुम्हाला कदाचित ही गोष्ट आवडेल:

How To Reduce Pimple & Pimples Marks In Marathi

 

21 Dec 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT