विरुष्काच्या लग्नाचा पहिला वाढदिवस… जाणून घेऊया त्यांची लवस्टोरी

विरुष्काच्या लग्नाचा पहिला वाढदिवस… जाणून घेऊया त्यांची लवस्टोरी

बॉलीवुडची हॉट दिवा अनुष्का आणि क्रिकेट किंग विराट कोहली यांच्या लग्नाला वर्ष झालं. हो खरंच आज विरुष्काच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. इस्टावर अनुष्कानं आठवण म्हणून व्हीडिओ अपलोड केला आणि विरुष्काच्या फॅन्सने छानसा व्हीडिओ शेअर करत आहेत.
 

 

 


View this post on Instagram 


On occasion of their 1st wedding anniversary, @virat.kohli and @anushkasharma shared this video from their wedding.. This one is so beautiful, we bet you will also have tears by the end Happy #anniversary #virushka . . . Follow 👉 @bollywoodchronicle Follow 👉 @bollywoodchronicle . Follow 👉 @bollywoodchronicle . Follow 👉@bollywoodchronicle . Follow 👉@ bollywoodchronicle #bollywood #instagram #actor #model #StyleFile #Fashion #Style #Glam #IndianFashion #CelebStyle #CelebFashion #Bollywoodchronicle #BollywoodFashion #InstaCeleb #InstaFashion #InstaFollow #InstaDaily #InstaLike #photooftheday #love #instagood #cute #tbt #instamood #bollywood #tbt #instadaily #anushkasharma #viratkohli


A post shared by Bollywood Chronicle (@bollywoodchronicle) on
 आपल्या विरुष्काचं लग्न इटलीला झालं. तेव्हा जगभरातून त्यांच्या फॅन्सने त्यांना शुभेच्छा दिल्या. खरंतर 2015 साली विराट वाईट पध्दतीत मॅच हरला होता... त्याचा परफॉर्मन्स खालावला असा आरोप करत विराटचे फॅन्स अनुष्कावर चिडले होते आणि त्याचं खापर त्यांनी अनुष्कावर फोडलं होतं. पण याचा परिणाम त्या दोघांच्या नात्यावर कधीच झाला नाही.


विरुष्काची लवस्टोरी


पण तुम्हाला माहितेय का त्यांची लवस्टोरी कधी सुरु झाली?  हो आता आम्ही तुम्हाला त्यांच्या लवस्टोरी बद्दल सगळं सांगणार आहोत. हे रोमॅंटिक कपल एकमेकांच्या प्रेमात कधी पडलं याबाबत फार कमी जणांना माहिती आहे. लव लाईफ म्हटल्यावर त्यात चढ उतार आलेच, आम्ही सगळंच तुम्हाला सांगणार आहोत. सुरुवात करु ते कशी सुरु झाली त्यांची लवस्टोरी?


शॅम्पुच्या जाहिरातीत जुळलं सूत


ही शॅम्पुची अॅड आठवतेयं का? 2013 ला ही जाहिरात आली होती, या जाहिरातीच्या शुटींग दरम्यान विराट आणि अनुष्का मध्ये सूत जुळलं. असं ऐकीवात आहे की विराट आणि अनुष्का लहानपणापासून एकमेकांना ओळखायचे. पण हीच जाहिरातीच्या शुटींग दरम्यान त्यांनी एकमेकांना प्रेमाच्या आणाभाका घातल्या.


अनुष्काला भेटायला विराट पोहचला सेटवर


2014 साली अनुष्का बॉम्बे वेलवेट आणि पीकेच्या शुटिंगमध्ये बिझी होती तेव्हा विराट तिला भेटायला सेटवर यायचा, अर्थातच मिडियाच्या नजरेतून हे कसं सुटेल?


44300661 330425347774831 6812672638916227204 n


2014 मध्ये दोघं फुटबॉल मॅच पाहायला गेले होते. नंतर अनुष्का, विरुला चिअर करण्यासाठी मॅच पहायला जाऊ लागली तेव्हा तमाम भारताची ती वहिनी झाली. एकदा तर चक्क विरुने अनुला फ्लाईंग किसही दिला होता.


download


विराटचं ट्विट


2015 साली विराटने अनुष्काची पहिली प्रोडक्शन फिल्म एनएच 10 बाबत ट्विट केलं आणि परत एकदा त्यांच्यातल्या नात्याच्या चर्चेला उधाण आलं.  


Virat-Kohli-0024


युवराजच्या लग्नात केला डान्स


2016  ला युवराज सिंगच्या आणि हेजलच्या लग्नाला विराट आणि अनुष्का जोडीने गेले होते आणि त्यांनी दणक्यात डांन्सही केला होता.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Couple goals! ❤😍 #VirushkaDance


A post shared by Virat Kohli (@viratkohli.s) on
झालं होतं ब्रेक अप


प्रत्येक लवस्टोरीत चढ-उतार तर असतातच ना? मग हे दोघं त्यातून कसे सुटतील. असं म्हणतात त्यांच्या रिलेशनशिपमध्येही बॅड पॅच आला होता. विराटला लवकर लग्न करायचं होतं तर अनुष्काला वेळ हवा होता. तिला तिच्या करिअरकडे लक्ष द्यायचं होतं. अनुष्काने नुकताच सलमानसोबत सुल्तान साईन केला होता. त्यावेळेस विराटला वाटतं होतं तिने कुठलाही पिक्चर साईन करु नये. त्यामुळे दोघांचं जवळजवळ ब्रेकअप झालं होतं. पण सल्लू भाई मध्ये पडला आणि त्याने काय जादू केली माहित नाही, पण दोघंही परत एकत्र आले. यावेळी त्यांचं नातं अधिकच दृढ झालं होतं.


salman-khan-and-virushka-couple b 2812171145


 लग्नाचा पहिला वाढदिवस


त्यानंतर काय बरोबर 11 डिसेंबरला या दोघांनी लग्न केलं आणि जन्मोजन्मी साथ निभवणार असं वचनही दिलं.


24839114 1986400394962403 6613529236680474624 n


आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस… आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी हे दोघंही जाणार आहेत ऑस्टेलियाला. ऑस्ट्रेलिया निवडायचं कारण म्हणजे विराट कोहली हा टीम इंडीयाच्या ऑस्ट्रेलिया सीरीजमुळे सध्या तिकडेच आहे.तर अनुष्काही आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून तिकडे जाणार आहे आणि मग हे लव्हबर्डस आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करतील. अनुष्का ही सध्या तिच्या शाहरूख खान आणि कतरिना कैफ बरोबरच्या आगामी झिरो चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण प्रमोशनमधून थोडे दिवस वेळ काढून ती ऑस्टेलियाला जाणार आहे.


34174685 178124716155194 1658121396485619712 n


सूत्रानुसार, अनुष्काने काही महिनेआधीच ही सुट्टी प्लॅन केली होती. झिरो (Zero) च्या टीमलाही माहीत होतं की, डिसेंबरमध्ये अनुष्का लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सुट्टीवर जाऊ शकते. टीम इंडिया जेव्हा अॉस्ट्रेलियामध्ये टेस्ट मॅच खेळेल तेव्हा अनुष्का विराटला चीअर करण्यासाठी तिथे असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पहिली टेस्ट 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर चालणार आहे. त्यानंतर पुढची मॅच 14 डिसेंबरला असेल. त्यामुळे विराटकडे ही वेळ असेल. तेव्हा दोघंही 11 डिसेंबरला ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करतील.  अनुष्का लवकरच ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे. लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करून झाल्यावर अनुष्का परत येऊन झिरो चित्रपटाचं प्रमोशन करेल.


 


फोटो आणि व्हिडीओ सौजन्यः Instagram