home / लाईफस्टाईल
हॅपी न्यू ईयर – नवीन वर्ष साजरं करा जरा हटके  (How to Celebrate New Year in Marathi)

हॅपी न्यू ईयर – नवीन वर्ष साजरं करा जरा हटके (How to Celebrate New Year in Marathi)

1 जानेवारी म्हणजे नवं वर्ष, नव्या अपेक्षा आणि नवा जोशाने भरलेलं नवं वर्ष. असं म्हटंल्यावर नव्या वर्षाचं स्वागत करताना द्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाच्या या आनंदाच्या क्षणी तुमचे कुटुंबिय असो वा मित्र असो, सेलिब्रेशन हे खास झालंच पाहिजे. गेल्या वर्षी जे राहून गेलं, जे झालं ते विसरून नव्या उत्साहाने नव्या वर्षाचा आनंद घ्या. कटू आठवणी आणि कटू क्षणांना विसरून या निमित्ताने नवीन वर्षाच्या आनंदात सामील व्हा, म्हणजे तुम्हीही मनापासून सगळ्यांना म्हणू शकाल ‘हॅपी न्यू ईयर’ 2021 (Happy New Year 2021)

न्यू ईयर साजर करा असं (Ways to Celebrate New Year)
नवीन वर्ष नवे संकल्प
दुसऱ्यांचं न्यू ईयरसुद्धा आनंदी करा

न्यू ईयर साजर करा असं (Ways to Celebrate New Year)

1 जानेवारी सेलिब्रेशनसाठी आयतं कारण (Reason Of Celebration)

खरंतर भारतात जवळजवळ सर्वच धर्माचं नवीन वर्ष (new year) हे 1 जानेवारीऐवजी वेगवेगळ्या दिवशी साजरं केलं जातं. महाराष्ट्रात मार्च-एप्रिलमध्ये गुढीपाढव्याच्या दिवशी नवीन वर्ष साजरं केलं जातं. गुजरातमध्ये दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी नवीन वर्ष म्हणून साजरं केलं जातं. पंजाबमध्ये नवीवन वर्ष बैसाखीच्या दिवशी साजरं होतं. तर पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशमध्येही याचवेळी नवीन वर्ष साजरं केलं जातं. पण तरीही आपण 1 जानेवारीला नवीन वर्ष म्हणजे नवीन कॅलेंडर ईयर ही तेवढ्याच उत्साहाने साजरं करतो. अनेक सोसायटीजमध्येही या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. सेलिब्रेशनसाठी आयतं कारण अजून काय हवं? मग गुढीपाडव्याप्रमाणेच 1 जानेवारीलाही करूया जल्लोष.

घरच्या घरी सेलिब्रेट करा नवीन वर्ष (How to Celebrate New Year at Home)

जर तुम्हाला पार्टीज वगैरे आवडत नसतील तर अगदी साधेपणाने घरच्या घरीसूद्धा कुटुंबियांबरोबर किंवा मित्रपरिवाराबरोबर सेलिब्रेट करायला काहीच हरकत नाही. घरच्या घरी एन्जॉय करा हाऊस पार्टी (party). मस्त सगळ्यांची भेटही होईल आणि वेळही चांगला जाईल.  

Also Read New Year Wishes In Marathi

गेम्स (Games)

सगळे भेटल्यावर गप्पागोष्टी तर करतातच पण या गेट टू गेदरला अजून मजेशीर बनवा. सगळ्या येणाऱ्या मेंबर्सची लिस्ट तयार करा आणि मग त्याप्रमाणे गेम्स प्लान करा. जर खूप जण असतील तर पत्ते, अंताक्षरी, कराओके, ट्रूथ एंड डेअर असे गेम्स ठेवा.

कॅम्पिंग (Camping)

जर तुम्ही सगळेजण एकत्र बाहेर जायचं प्लान करत असाल आणि काही कारणास्तव ते बारगळलं तर घरच्याघरी ही कॅम्पिंगची मजा घेऊ शकता. तुमच्या बाल्कनी, गच्ची किंवा गार्डनमध्ये टेंट हाऊस बनवा आणि एन्जॉय करा.

1. How to Celebrate New Year in Marathi

खाना-खजाना (Good Food)

जर तुम्हाला खाण्यापिण्याची आवड असेल तर तेही घरच्याघरी करू शकता. बार्बेक्यू करून पाहा. मस्त थंडीच्या मौसमात बार्बेक्यूची मजाच न्यारी आहे किंवा पॉट डीनर ठेवा. ज्यामध्ये प्रत्येक जण घरून एक एक स्पेशल डीश बनवून आणेल. ज्यामुळे मेन्यू चांगला होईल आणि व्हरायटीही. तसंच एकाच व्यक्तीवर सगळ्या कामाचा दबाव येणार नाही.

वाचा – ख्रिसमसच्या हॉलिडे सीझनसाठी खास कोट्स (Christmas Quotes In Marathi)

2. How to Celebrate New Year in Marathi

आजा नच ले (Dance Party)

मस्त म्युजिक सिस्टीम असेल तर तुम्ही घरच्या घरी डिस्कोसारखा फीलसुद्धा घेऊ शकता. पण असा आनंद घेताना आपल्या शेजारच्यांना त्रास होणार नाही याची काळजी नक्की घ्या.

3. How to Celebrate New Year in Marathi

थीम पार्टीने करा नव्या वर्षाचं स्वागत (Celebrate New Year With Theme Party)

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी थीम पार्टीचं आयोजनही करू शकता.यामुळे तुमच्या मूडही चेंज होईल आणि प्रत्येकाच्या क्रिएटीव्हीटीला वाव मिळेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे यासाठी जास्त मेहनतही लागत नाही. घरी किंवा फार्म हाऊसवर थीम पार्टी प्लान करत असाल तर कॉकटेल थीम, रेट्रो थीम, बॉलीवूड थीम, हॉलीवूड थीम, बीच थीम, बोनफायर पार्टी,  कलर कोऑर्डिनेटेड पार्टी, नियॉन थीम अशा थीम पार्टीज प्लान करू शकता.

Also Read About Dahi Chura In Marathi

4. How to Celebrate New Year in Marathi

आऊटडोर ट्रीपचं प्लानिंग असल्यास (Celebrate New Year With Outdoor Trip)

5. How to Celebrate New Year in Marathi

आजकाल जास्तकरून लोकं न्यू ईयरला मुंबईबाहेर सेलिब्रेट करणं पसंत करतात खासकरून यंगस्टर्स. जर तुम्हीही असंच काही प्लान करत असाल तर मुंबईजवळच्या किंवा महाराष्ट्रातील इतर प्रसिद्ध ठिकाणी जाऊ शकता. या ट्रीपला जाताना घर आणि ऑफिसच्या सगळ्या चिंता मागे ठेवा आणि नव्या वर्षाचं स्वागत करा.

जर घरापासून लांब असाल (If You Are Away From Home)

आजकल यंगस्टर्सना करियर आणि जॉबसाठी घर आणि स्वतःच्या शहरापासून लांब राहावं लागतं. जर घरी जायला मिळणार नसेल तर अशा परिस्थितीत उदास न होता आपल्यापरीने हा दिवस खास बनवा. मित्र किंवा कलीग्ज्सबरोबर पार्टी प्लान करा, मूव्हीला जा, आउटींग करा आणि धम्माल करा.

नवीन वर्ष नवे संकल्प (New Year’s Resolution)

नवीन वर्ष नवीन सूरूवातीचं सूचक असतं. नवीन वर्षाचा पहिला दिवस आनंदात साजरा केल्यास येणाऱ्या वर्षाचा प्रत्येक दिवस ही तितकाच आनंदात जातो. यासाठी स्वतःच्या मनाशी संकल्प करा की, वर्षभर मी असंच पॉजिटीव्ह राहून एन्जॉय करेन.

निरोगी मन आणि निरोगी आरोग्य (Healthy Mind And Healthy Body)

6. How to Celebrate New Year in Marathi
नवीन सुरूवात आणि पॉजिटीव्हीटीसाठी आपलं मन आणि विचारसुद्धा सकारात्मक असले पाहिजेत. जर तुमच्या मनात द्वेष किंवा वाईट भावना असतील तर त्याचा परिणाम तुमच्या लाइफस्टाइलवर ही दिसू लागतो. तुमच्या प्रत्येक वाईट सवयीला दूर ठेवा, ज्या सवयीचा तुमच्यावर वाईट परिणाम होईल.

– अशा गोष्टी वाचण्याची किंवा पाहण्याची सवय लावा, ज्यामुळे तुमच्या मनात पॉझिटीव्ह विचार येतील.

– कोणी टेन्शनमध्ये दिसल्यास त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा. भलेही त्यांचा प्रॉब्लेम सुटणार नाही पण त्यांची चौकशी केल्यास त्यांना बरं वाटेल.

– जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल किंवा नाराज असाल तर त्यांच्यासमोर ते सांगा. मनात ठेऊ नका.  

– तुमच्या आतमधील राग दूर केल्यास मन शांत राहील आणि मन शांत राहिल्यास तुमचे आरोग्यसुद्धा चांगले राहील.

तुमचं वर्तन बदला एटिकेट्स (Change Your Attitude)

या नवीन वर्षात तुमच्या वाईट सवयी सोडा, ज्यामुळे दुसऱ्यांना ही त्रास होत असेल. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी बोलताना आपण विशेषतः काळजी घ्यायला हवी. सोशल मीडीयाच्या काळात आपण याबाबतीत जबाबदारीने वागायला हवं.

ऑफलाइन जगून पाहा (Live Offline)

आजच्या डिजीटल युगात आपल्याला एकमेकांबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातूनच कळतं. त्यामुळे ऑफलाइन होणं फार कठीण आहे. जर पूर्णपणे तुम्हाला ऑफलाइन होणं जमत नसेल तर ऑनलाइन रूटीनमध्ये थोडा बदल करा. इंटरनेटच्या माहितीच्या खजान्याचा वापर चांगल्या कारणासाठी करा, फक्त वेळ वाया घालवू नका. ऑनलाईन फ्रॉडपासून सावध राहा. कोणताही फॉर्वर्ड मेसेज पुढे फॉर्वर्ड करण्याआधी दोनवेळा विचार करा.  

फिटनेसची जादू (Magic Of Fitness)

नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेकजण जीम लावतात आणि फीट राहण्याचा संकल्प करतात. पण काही दिवसातच त्यांचा हा संकल्प बारगळतो. पण यंदा असं करू नका. वर्षभर फीट राहा आणि बॅलन्स्ड डाएटचं घ्या. स्वतः खुश राहा आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवा.

दुसऱ्यांचं न्यू ईयरसुद्धा आनंदी करा (Make Other’s New Year Special Too)

मित्र आणि नातेवाईकासोबत न्यू ईयर सेलिब्रेट केल्यानंतर या सेलिब्रेशनमध्ये अशा लोकांनाही सामील करा, ज्यांना हवं असूनसुद्धा नववर्ष सेलिब्रेट करता येत नाही. अनाथालय, वृद्धाश्रम अशा ठिकाणी जाऊन आपल्या नववर्षाचा शुभारंभ करा. तुमच्यासोबतच त्यांनाही आनंद मिळेल आणि याचा चांगला परिणाम तुमच्या पूर्ण वर्षावरही नक्कीच दिसून येईल. तुमच्या घरात जर छोटी मुलं असतील तर त्यांनाही अशा चांगल्या कामात सामील करा.

मागच्या वर्षीच्या चुकांमधून बोध घेत नवीन वर्षाची चांगली सुरूवात करा. छोटे-छोटे संकल्प करा, जे पूर्ण करता येतील. हॅप्पी न्यू ईयर 2021

29 Dec 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this