लग्नात जोडप्याला देण्यासाठी '10' गिफ्ट्स आयडियाज, ज्या आहेत स्वस्त आणि मस्त (Gift Ideas For Couple In Marathi)

लग्नात जोडप्याला देण्यासाठी '10' गिफ्ट्स आयडियाज, ज्या आहेत स्वस्त आणि मस्त (Gift Ideas For Couple In Marathi)

लग्न म्हंटल्यावर नवरा-नवरीबरोबरच दोघांच्या घरच्यांसाठी, नातेवाईकांसाठी आणि मित्रमैत्रिंणीसाठी खूपच खास असतं. प्रत्येकजण आपल्या लग्नाच्या तयारीमध्ये कमीतकमी 6 महिन्यांआधीपासून गुंतलेले असतात. तर दुसरीकडे लग्नाचं आमंत्रण आल्यावर आपल्याला पहिला प्रश्न पडतो तो गिफ्ट काय द्यायचं याचा? जर तुम्ही होणाऱ्या नवरानवरीचे नातेवाईक असाल तर त्यांना विचारून आवडीनुसार गिफ्ट्स देता येतात. पण जेव्हा एखाद्या लांबच्या नातेवाईकाचं किंवा मित्रमैत्रीणीचं लग्न असतं. तेव्हा हा ऑप्शन नसेल तेव्हा काय द्यायचं हा गहन प्रश्न असतो. आजकाल लग्नामध्ये महागड्या वस्तूंपासून ते अगदी दागिने देण्यापर्यंत अनेक प्रकारचे गिफ्ट ऑप्शन्स आहेत. पण दरवेळी महागडं गिफ्ट देणं शक्य नसतं. तरीही प्रत्येकाचीच इच्छा असते की, नवरा-नवरीला द्यायचं गिफ्ट मस्त आणि स्वस्त असावं. मग अशावेळी काय द्यावं हा गहन प्रश्न असतो. यासाठी वाचा खालील टीप्स 


हमखास उपयोगी पडणारी होम अप्लायंसेस


कस्टमाइज्ड गिफ्ट्स


पुस्तकं


स्पा सेशन


गिफ्ट देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा (What To Say While Giving A Gift) 


- प्रत्येक व्यक्तीची आवड-निवड असते. जर तुम्ही अगदी आवडीने एखादं गिफ्ट दिलंत आणि ते समोरच्याला आवडलं नाहीतर काय उपयोग? त्यामुळे जर शक्य असेल तर समोरच्याची आवड-निवड लक्षात घेऊन गिफ्ट द्या.
- गिफ्ट देताना त्यांच्या जवळच्या व्यक्तींची मदत घ्या. जर तुम्ही लग्न होणाऱ्या जोडप्याला व्यक्तिगतरित्या ओळखत नसाल तर त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची किंवा मित्रमैत्रीणींची मदत घेऊन तुम्ही गिफ्ट देऊ शकता.
- जर तुम्ही समोरच्याला तुमच्या हाताने बनवलेलं एखादं कार्ड किंवा वस्तू दिल्यास ते अधिकच खास ठरतं. त्यामुळे तुमच्याकडे एखादी कला असल्यास तिचा वापर करून बनवलेलं एखादं छानसं गिफ्ट देता येईल.


हेही वाचा : लग्न वाढदिवसासाठी (Wedding Anniversary)चे शुभेच्छा संदेश


पुढील गिफ्ट्स आयडियाज फॉलो करा आणि लग्नातील जोडप्याला द्या 'ही' स्वस्त आणि मस्त गिफ्ट्स (Gift Ideas For Couple)


हमखास उपयोगी पडणारी होम अप्लायंसेस (Home Appliances)


Gifts ideas for couple 3


प्रत्येक जोडप्याला नव्या संसाराची सुरूवात करताना किचनशी निगडीत अनेक वस्तूंची गरज असते आणि आजकाल होम अप्लायंसेसमध्ये अनेक स्वस्त आणि मस्त पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामध्ये जास्तकरून किचनसंबंधी गोष्टींचा समावेश होतो. बार्बैक्यू सेट, रोटी मेकर, मिक्सर ग्राइंडर, टोस्टर, सँडविच मेकर, व्हेजिटेबल कटर, इलेक्ट्रीक राइस कुकर अशी बजेट होम अप्लांयसेस तुम्ही देऊ शकता. याशिवाय रोज घरी वापरण्यासाठी ईस्त्री, वॉटर प्युरीफायर, स्टीमर असे ही ऑप्शन्स आहेत. या वस्तू गिफ्ट म्हणून दिल्यास फक्त नवविवाहीत जोडप्याच्याच नाहीतर त्यांच्या घरच्यांनाही वापरता येतात.


क्रॉकरी (Crockery)


लग्नात शक्यतो जोडप्याला शकुनाची किंवा टीपिकल स्टीलची भांडी गिफ्ट दिली जातात. पण यापेक्षा हटके तुम्ही जोडप्याला छानसा क्रॉकरी सेटही गिफ्ट करू शकता. आजकाल अनेक मॉल्स आणि ऑनलाईन शॉपिंगमुळे क्रॉकरीमध्ये फारच व्हरायटी पाहायला मिळते. जी तुमच्या बजेटमध्ये तर असेलच पण नवविवाहीत जोडप्याला ही नक्कीच उपयोगी पडेल.


ख्रिसमस भेट कल्पना मराठी


कस्टमाइज्ड गिफ्ट्स (Customized Gifts)


Gifts Ideas For Couples 18
कस्टमाइज्ड गिफ्टबाबत तर तुम्ही ऐकलं असेलच. यामध्ये ही बरेच ऑप्शन्स उपलब्ध आहेत. जसं- कुशन, कुशन कव्हर्स, मग, फोटो फ्रेम,घड्याळ, बेडशीट्स, टीशर्ट्स, स्लीप वेअर सेट्स इ. याचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही या गोष्टींवर जोडप्याचे सुंदर फोटोज किंवा नाम छापून गिफ्ट्स कस्टमाईज करू शकता. फक्त हे गिफ्ट द्यायचं असल्यास थोडा आधीपासून विचार करून त्या गोष्टी बनवून घ्यावा लागतील एवढंच.  


बहिणीला काय द्याल भेटवस्तू (Raksha Bandhan Gift Ideas For Sisiter)


फोटो फ्रेम्स (Photo Frames)


Gifts Ideas For Couples -14
फोटो फ्रेम्समुळे घराच्या भिंती नेहमीच सुंदर दिसतात. आजकाल तर फोटोफ्रेम्स वेगवेगळ्या डिझाईन्स आणि प्रकारात उपलब्ध आहेत. जसं वॉल डेकोरेशन फोटो फ्रेम्स, मॅग्नेटीक फोटो फ्रेम्स, डिजीटल फोटो फ्रेम्स इ. ही अशी गोष्ट आहे, ज्याची मागणी कधीच कमी होत नाही. तुम्ही त्या जोडप्याच्या फोटोची फ्रेम करून देऊ शकता किंवा नुसती फ्रेमही गिफ्ट म्हणून देता येऊ शकते. जर तुमची थोडं बजेट वाढवायची तयारी असल्यास डिजीटल फोटो फ्रेमही जोडप्याला देऊ शकता. ज्यामध्ये अनेक फोटो आणि व्हीडीओ स्टोर करून ते पाहता येतात.


पुस्तकं (Books)


Gifts Ideas For Couples 12
जर नवविवाहीत जोडप्याला वाचनाची आवड असेल तर पुस्तकांसारखं चांगलं गिफ्ट नाही. पुस्तकं हे नेहमीच त्या जोडप्याच्या संग्रहात राहील आणि तुमची आठवणही करून देईल. तुम्ही जोडप्याला उपयोगी किंवा आवडत्या लेखकाचा संच देऊ शकता. जर आवड माहीत नसल्यास बुक व्हाऊचरसुद्धा देऊ शकता.


मराठी मध्ये वेडिंग गिफ्ट बॅगही वाचा


परफ्यूम सेट्स (Perfume Set)


Gifts Ideas For Couples 13
परफ्यूम सेट हा लग्नात जोडप्याला देण्यासाठी चांगला पर्याय आहे. नवविवाहीत जोडप्याला तुम्ही लग्नात गिफ्ट म्हणून कपल परफ्यूम सेट देऊ शकता. आजकाल यामध्ये भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे. 


स्पा सेशन (Spa Session)


Gifts Ideas For Couples 10
लग्नाच्या धावपळीनंतर रिलॅक्स होण्यासाठी स्पा सेशन कधीही चांगलंच वाटतं. तुम्ही नवविवाहीत जोडप्याला मस्तपैकी स्पा सेशनचं गिफ्ट व्हाऊचर द्या. हे गिफ्ट जोडप्याला दिलंत तरी ते नक्कीच तुम्हाला मनापासून धन्यवाद देतील.


गिफ्ट करा डेट (Plan A Date)


लग्नाच्या धावपळीत आणि नंतरही बरेच दिवस जोडप्याला एकमेकांना वेळ देता येत नाही. अशावेळी तुम्ही त्या जोडप्याला एखाद्या छान ठिकाणी टेबल बुक करून किंवा हॉटेल व्हाऊचर गिफ्ट करू शकता. ज्यामुळे त्या जोडप्याला एकमेकांबरोबर डीनर डेट एन्जॉय करून छान वेळ घालवता येईल.  


गिफ्ट कार्ड (Gift Card)


Gifts Ideas For Couples 16
गिफ्ट कार्ड, शॉपिंग कार्ड किंवा कॅश कार्ड यापैकी कोणतंही कार्ड तुम्ही जोडप्याला गिफ्ट करू शकता. हे फक्त लग्नावेळीच नाहीतर नंतरही वापरता येतं आणि जोडप्याला त्यांच्या आवडीने ही गोष्टी विकत घेता येतात. तुमच्या बजेटप्रमाणे गिफ्ट कार्ड देऊन वरचे पैसे हवे तसे जोडप्याला भरता येत असल्याने तुमच्या बजेटसाठी उत्तम आहे.


कॅश (Cash)


Gifts Ideas For Couples 0
कॅश म्हणजे रोख रूपये गिफ्ट म्हणून देणे हे सर्वात जुनं आणि चांगलं गिफ्ट आहे. जेव्हा नवराबायकोचा नवीन संसार सुरू होतो, तेव्हा त्यांना अनेक गरजेच्या गोष्टी घेण्यासाठी पैश्यांची गरज असते. तसंच सासरी गेलेल्या नवविवाहीत मुलीला ही सासरकडच्यांकडे पैसे कसे मागावे हा प्रश्न असतोच. अशावेळी गिफ्ट म्हणून दिलेले पैसेच त्यांच्या उपयोगी पडतात. तसंच जोडप्याची आवडनिवड माहीत नसल्यास कॅश दिल्याने त्यांना स्वतःच्या आवडीनुसार वस्तू घेता येतात. तुम्हीही आपल्या बजेटनुसार नवविवाहीत जोडप्याला कॅश देऊ शकता.  


फॅशन - लग्न आणि रितीरिवाजांसाठी बेस्ट 41 वेडिंग ड्रेसेस (Best Wedding Dresses in Marathi)


‘ही’ गिफ्ट्स देणं टाळा (Gifts To Avoid)


देवाचे फोटोज किंवा मूर्ती (God Idols Or Frames)


गणपती किंवा देवाच्या मूर्ती देणं हे कितीही चांगलं असलं तरी लग्नात जोडप्याला गिफ्ट म्हणून देणं टाळावं. कारण अशावेळी जर अनेक मूर्ती गिफ्ट म्हणून आल्या तर त्यांचं काय करायचं हा मोठा प्रश्न असतो किंवा बहुतेकदा त्या दुसऱ्या कोणाला तरी गिफ्ट म्हणून पास केल्या जातात. जर तुम्हाला तुम्ही दिलेल्या गिफ्टबाबत असं होऊ द्यायचं नसल्यास लग्नात हे गिफ्ट देणं टाळा.


टी सेट किंवा लेमन सेट (Tea Set/Lemon Set)


लग्न झाल्यावर जोडप्याला स्वतःच्या घरात त्यांच्या आवडीने वस्तू घेण्याची हौस असते. तसंच आपल्याकडे बरेचदा चहा पिताना किंवा अगदी एखादं सरबत सर्व्ह करताना कितीवेळा टी सेट किंवा लेमन सेटचा वापर होतो. जवळजवळ नाहीच. हे सेटही बरेचदा नाजूक असल्याने ते तुटण्याचीही शक्यता असते. त्यामुळे शक्यतो लग्नात हे सेट्स देऊ नका.


चांदीची नाणी (Silver Coin)


दुसरी बरेचदा गिफ्ट म्हणून दिली जाणारी गोष्ट म्हणजे चांदीची नाणी. काही वेळा गिफ्ट म्हणून काय द्यायचं न सुचल्याने आपण लग्नात चांदीची नाणी देऊन मोकळे होतो. पण ही नाणी जवळजवळ वर्षभर कपाटाचं धन बनून राहतात आणि फारच कमी वेळा उपयोगी पडतात. म्हणूनच लग्नात चांदीची नाणी गिफ्ट देणं टाळा.


टॉवेल सेट (Towel Set)


आता तुम्ही म्हणाल ही तर उपयोगी पडणारी गोष्ट आहे. पण ही गोष्ट कितीही उपयोगी असली तरी लग्नात गिफ्ट देण्यासाठी योग्य नाही. कोणाला लग्नात गिफ्ट म्हणून टॉवेल सेट मिळाल्यास आवडेल.


हेही वाचा : लग्नात साडीला देऊया डिफरंट लुक, हटके स्टाईल


पुढच्या वेळी लग्नात जोडप्याला गिफ्ट देताना वरील गोष्टींचा नक्की विचार करा आणि मग गिफ्ट द्या.


फोटो सौजन्य : Shutter Stock