साइज झिरो लूक, बिकिनी बॉडी आणि सेक्सी हिरोइन हे समीकरण बॉलीवूड सिनेमांमध्ये नवं नाही. पण मराठी फिल्म्समध्ये साइज झिरो आणि सेक्सी अंदाज जरा क्वचितच आढळतो. पण आता मराठी सिनेसृष्टीतही हा ट्रेंड हळूहळू रूजतोय. मराठी सिनेसृष्टीत हा ट्रेंड नवा असला तरी मराठीतील अनेक अभिनेत्री फोटोसेशन आणि इतर कार्यक्रमांमुळे सोशल मीडियावर आपल्याला अनेकदा हॉट आणि बोल्ड (Hot and Bold) अंदाजात पाहायला मिळतात.
दीप्ती सती (Deepti Sati)
दीप्ती सती ही नवोदित अभिनेत्री आपल्या पहिल्याच मराठी चित्रपटात हॉट बिकीनी लूकमध्ये दिसणार आहे. संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटातून ती मराठी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवत आहे आणि आपल्या डेब्यू सिनेमातच दिप्ती हॉट बिकिनी लूकमध्ये दिसणार आहे. पाहा तिचा हा बिकीनी लूक
‘लकी’ सिनेमाव्दारे मराठी सिनेसृष्टीलाही आता साइज झिरो हिरोइन मिळाली आहे, असं म्हणायला हरकत नाही.
View this post on Instagram
दिग्दर्शक संजय जाधव यांच्या सिनेमांमध्ये आजपर्यंत तुम्ही सुंदर आणि सेक्सी अभिनेत्री पाहिल्या असतील पण त्यांच्या सिनेमात हिरोइनने बिकीनी घालण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘लकी’ सिनेमाच्या आधी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकलेल्या दिप्तीची बिकिनी घालण्याची ही पहिलीच वेळ आहे. या आधी तिने कधीच बिकिनी घातली नव्हती.
सई ताम्हणकर (Sai Tamhankar)
खरंतर मराठीमध्ये बिकीनीचा ट्रेंड रूजवला तो सईनेच. ग्लॅमर आणि सई ताम्हणकर हे समीकरण मराठी चित्रपटसृष्टीत रूजलेलं आहे. आपल्या पहिल्या चित्रपटापासूनच सईने नेहमीच बोल्ड आणि चौकटीबाहेरच्या भूमिका केल्या आहेत.
तसंच ‘हंटर’या हिंदी चित्रपटात सईने अनेक बोल्ड सीन्सही दिले होते. सईला जेवढं तिच्या हॉट अवतारासाठी ओळखलं जातं तेवढीच मेहनत ती वेगळ्या भूमिकांवर घेतानाही दिसते. नुकत्याच आलेल्या ‘लव यू सोनिया’ या चित्रपटासाठी तिने तब्बल 10 किलो वजन वाढवलं होतं.
राधिका आपटे (Radhika Apte)
View this post on Instagram
राधिका आपटे ही नेहमीच तिच्या बोल्डनेस आणि उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते. 2019 वर्षाच्या सुरूवातीलाच राधिकाने एका फॅशन मॅगझिनसाठी बोल्ड आणि ब्युटीफूल फोटोसेशन केलं.
मध्यंतरी राधिकाच्या एका शॉर्टफिल्ममधल्या न्यूड सीनचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. पण राधिकाने बोल्डनेसबरोबरच आपलं अभिनयाचं नाणं ही खणखणीत असल्याचं तिच्या विविध भूमिकांमधून दाखवून दिलंय.
नेहा पेंडसे (Neha Pendse)
बिग बॉसच्या 12 व्या सिझनमध्ये झळकल्यानंतर नेहा पुन्हा एकदा तिच्या हॉट फोटोजमुळे चर्चेत आहे.
नुकतेच तिने 12 किलो वजन घटवल्यानंतरचे फोटो इन्स्टावर शेअर केले. या फोटोजमध्ये नेहाने स्विमिंग कॉश्च्युममधले फोटोज एका पॉझिटीव्ह पोस्टसकट शेअर केले.
स्मिता गोंदकर (Smita Gondkar)
‘पप्पी दे पारूला’ या गाण्यातून आपल्या हॉट अदांनी सगळ्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता गोंदकर. मराठी बिग बॉसमध्ये झळकल्यानंतर काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या हॉट लुकमधले फोटोज शेअर केले होते.
तिने स्वीमसूट घालून शेअर केलेल्या फोटोजवर तर हजारो लाईक्स आले होते.
अभिनयात आपलं नशीब आजमवण्याआधी ती मॉडेलिंग करायची. तसंच ती एक उत्तम डान्सरसुद्धा आहे.
श्रुती मराठे (Shruti Marathe)
‘राधा बावरी’ या मालिकेमुळे घराघरात पोचलेली अभिनेत्री श्रुती मराठे. श्रुतीही हॉट आणि पारंपारिक अशा दोन्ही लुक्समध्ये छान दिसते, ही तिची खासियत आहे.
सुंदर हास्य आणि गोड चेहऱ्याची श्रुती, अभिनेता गौरव घाटणेकर याच्याशी विवाहबद्ध झाल्यावर श्रुती सध्या ब्रेकवर आहे. या ब्रेकआधी श्रुती ‘जागो मोहन प्यारे’ या सीरियलमध्ये दिसली होती.
तेजस्विनी पंडीत (Tejaswini Pandit)
View this post on Instagram
तेजस्विनीला मराठीतील ग्लॅम-दिवा म्हणून ओळखलं जातं. आपल्या फॅशन स्टेंटमेंटने ती नेहमीच फॅन्सचं लक्ष वेधते. मग ती साडी असो, बिकीनी असो वा कॅज्युअल वेअर.
View this post on Instagram
तेजस्विनी प्रत्येक अटायर ग्रेसफुली कॅरी करते. तेजस्विनीचा प्रत्येक फोटोमध्ये तिचा स्वॅग दिसतो.
सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni)
‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीच्या अदा आणि नजाकत तर सगळ्यांना माहीतच आहे. नुकत्याच तिने केलेल्या एका हॉट फोटोशूटमुळे तिला तब्बल 50 हजार लाईक्स मिळाले होते.
View this post on InstagramThis. Is the beginning of loving yourself. Welcome home💚... #selflove #selftalk #loveyourself
या फोटोशूटसाठी तिने खास ड्रेस डिझाईन करून घेतला होता. अशा प्रकारे सोनाली अनेकदा आपल्या सोशल इन्स्टाग्रामवर हॉट अवतारातले फोटोज शेअर करत असते. तिने आत्तापर्यंत 20 पेक्षा जास्त मराठी आणि काही हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे.
पल्लवी सुभाष (Pallavi Subhash)
मराठी सीरियल, मराठी चित्रपट, हिंदी सीरियल आणि दाक्षिणात्य चित्रपट या सर्व ठिकाणी झळकलेली मराठी अभिनेत्री म्हणजे पल्लवी सुभाष. पल्लवीला कॅडबरी गर्ल म्हणूनही ओळखलं जातं.
हॉट लुक आणि अदाबरोबरच पल्लवीने तिच्या अभिनयानेही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
मानसी नाईक (Manasi Naik)
मराठीतील डान्सिंग क्वीन आणि हॉट लुक्समुळे नेहमी चर्चेत असणारी ‘जबरदस्त’ अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. मानसी नेहमीच तिच्या इन्स्टावर हॉट लुक्समधले फोटोज शेअर करते. त्यामुळे तिचे तब्बल इन्स्टावर तब्बल 6 लाख 53 हजार फोलोअर्स आहेत.
मानसी तिच्या डान्स नंबर्समुळे सतत चर्चेत असते. मग ते ‘रिक्षावाला’ गाणं असो वा ‘बाई वाड्यावर’ या हे गाणं असो.
स्पृहा जोशी (Spruha Joshi)
View this post on Instagram
स्पृहा जोशी या मराठी अभिनेत्रीला आपण नेहमीच सौज्वळ भूमिकांमध्ये पाहिलं आहे. पण मध्यंतरी तिने केलेल्या इन्स्टावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे बरीच चर्चा झाली होती.
स्पृहाने हॉल्टर नेक बिकीनीमधला पाठमोरा फोटो शेअर केला होता, मात्र त्यावरून बराच वादंग झाला होता.
फोटो सौजन्य : Instagaram