सण असो वा कोणत्याही पार्टीला जाणं असो, आपली पारंपारिक साडी ही असा एक पेहराव आहे, जो कधीही घातला तरी तुम्ही ट्रेंडी आणि स्टायलिश (Stylish) दिसाल. साडीच्या लुकला अजून सुंदर बनवतो, तो त्यावरील हटके ब्लाऊज. पार्टीमध्ये जाताना ब्लाऊजचं डिझाईन खास असलं पाहीजे आणि जेव्हा ब्लाऊज डिझाईनची गोष्ट येते तेव्हा समोर येते टीव्ही सीरियल अभिनेत्री अनिता हसनंदानी. जी नेहमीच विविध डिझाईन्सचे ब्लाऊज घालत असते. कारण आत्तापर्यंत एवढे ब्लाऊज डिझाईन्स कोणी घातले नसतील, जेवढे अनिताने तिच्या सीरियल्समध्ये घातले आहेत. फक्त टीव्ही सीरियल्समध्येच नाहीतर अनिता हसनंदानीला इतर वेळीही साडी नेसायला फार आवडतं. आम्हाला वाटतं की, अनिता हसनंदानीला साड्या नेसण्याची फारच हौस आहे आणि त्यावर ती नेहमीच वेगवेगळ्या डिझाईन्सचे ब्लाऊज घालत असते. म्हणूनच आम्ही तुम्हाला अनिता हसनंदानीने घातलेले ब्लाऊज डिझाईन्स (Blouse Designs) दाखवणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की, तुम्हालाही यातील कोणतं ना कोणतं ब्लाऊज डिझाईन नक्कीच आवडेल.
तुम्हाला अनिता हसनंदानीचा हा पार्टी लुक नक्की आवडला असेलच. या लुकमध्ये अनिता फार सुंदरही दिसत्येय. तुम्हीही लग्नात किंवा एखाद्या पार्टीत जाताना असा ब्लाऊज घालू शकता. या ब्लाऊजसाठी फॉलो करा ऑफ शोल्डर स्टाईल.
जर तुम्ही दिवसा एखाद्या कामासाठी बाहेर जाणार असाल आणि असा ड्रेस घालायचा असेल जो ट्रेंडी वाटेल पण हेवी लुकचा नसेल तर प्लेन साडीवर असा लेस्ड ब्लाऊज घालू शकता. आहे ना परफेक्ट चॉईस?
डिझाइन ब्लॉज फोटो बद्दलही वाचा
अनिता हसनंदानीच्या स्टाईलचं कौतूक करावं तेवढं थोडं आहे. एक से एक डिझाईनचे ब्लाऊज ती कशी निवडते. हा ब्लाऊजही ट्रेंडी आणि स्टाईलिश आहे. ब्लाऊजचा गळा फारच सुंदर आहे आणि कट स्लीव्हजमुळे तो अजूनच आकर्षक दिसतोय. खरंतर अशा डिझाईनचा ब्लाऊज तुम्हाला थंडीत नाही घालता येणार पण उन्हाळ्यात घालण्यासाठी परफेक्ट आहे.
अनिताचा हा लुक पाहून मानावं लागेल की सिंपल ब्लाऊजसुद्धा स्टाईलिश दिसू शकतो. फक्त यासाठी तुम्हाला गोल्डन टीश्यू खरेदी करून टेलरला सांगावं लागेल की, छोट्या गळ्याचा हाफ स्लीव्जचा सिंपल ब्लाऊज शिवून दे, ज्याच्या बॅकला असेल बटन पट्टी.
नेटची कमाल पाहिलीत का? आता असा ब्लाऊज कोणीही घातला तरी चांगलाच दिसेला ना. तुम्हीही असा ब्लाऊज शिवून घेऊ शकता. याची खासियत म्हणजे हा ब्लाऊज कोणत्याही साडीवर चांगला दिसेल. फक्त साडी प्लेन असली पाहिजे आणि बारीक बॉर्डर असावी.
अनिता हसनंदानीच्या ब्लाऊज पाहिल्यावर एकच म्हणावं वाटतं, सुंदर. खरंच ब्लाऊज असं डिझाईन आपण नक्कीच पाहिलं नसेल. याची खासियत म्हणजे या ब्लाऊजचा नेक फारच स्टाईलिश आहे. तुम्हीही असा ब्लाऊज शिवून घेऊ शकता. हा ब्लाऊज व्हाईटशिवाय इतरही फिकट रंगांमध्ये चांगला दिसेल.
खरंतर हे डिझाईन फारच साधं आहे पण याचं मटेरीयल आणि एम्ब्रॉयडरीमुळे साडीला खूपच एलिगंट लुक येतोय. अशाप्राकारे एम्ब्रॉयडरी असलेलं सुंदर फॅब्रिक असेल तर सिंपल डिझाईन ब्लाऊज शिवावा. तसं तर कट स्लीव्ज ब्लाऊज छानच दिसतो.
ब्लाऊजचं हे डिझाईन सगळीकडेच प्रसिद्ध आहे. हे ब्लाऊज डिझाईन सिंपल आहे, पण यावरील मोटीफमुळे स्पेशल लुक येतोय आणि याची खासियत म्हणजे गोल्डन बॉर्डरमुळे कोणत्याही साडीवर हा ब्लाऊज घालता येईल.
अनिताच्या या ब्लाऊजचा लुक खूपच प्रिटी आहे. कोल्ड शोल्डर्स आणि लेसमुळे हा ब्लाऊज तुम्हाला सहज शिवून मिळेल. यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या आवडीची साडीवर लावलेली लेस तुमच्या टेलरला द्यावी लागेल.
अनिताचं हे ब्लाऊज डिझाईन तर एकदमच खास आहे. ग्रे कलरचा हा ब्लाऊज फारच सुंदर दिसतोय, खासकरून या ट्रान्सपरंट साडीवर. तुम्हीही अनिता हसनंदानीसारखा हा ब्लाऊज जर तुम्ही एखाद्या पार्टीला घातलात तर सगळ्यांच्या नजरा तुमच्याकडे वळतीलच.
सिल्क फॅब्रिकमध्ये असलेला हा अनिता ब्लाऊज एकदम खास आहे. शोल्डर कटमध्ये कॉलरसोबत हा ब्लाऊज खूपच एलिगंट आहे. जो तुमच्या लुक्सना नक्कीच एनहान्स करेल. असा ब्लाऊज कोणत्याही कॉट्रांस्ट कलरच्या सिल्क साडीसोबत चांगला दिसेल.
या ब्लाऊज डिझाईनमुळे अनिताच्या कल्पकतेचा अंदाज तुम्हाला आला असेलच. खरंच हे ब्लाऊज फारच क्रिएटीव्ह आहे आणि घातल्यावर तर हा ब्लाऊजच नक्कीच स्टाईलिश दिसेल.तुम्हीही ब्लाऊज फॅशन नक्की ट्राय करा.
लग्न असो वा पार्टी असो वा कोणता सण ब्लाऊजवर जोपर्यंत काही चमचमतं नसेल तोपर्यंत ते उठावदार दिसत नाही. अशावेळी तुम्ही सीक्वेन्स वर्क केलेला कट स्लीव्ह ब्लाऊज शिवून घेऊ शकता. या ब्लाऊजचा फायदा असा की, हा कोणत्याही लग्नात, पार्टीमध्ये कोणत्याही साडीवर वापरता येईल.
अनिताच्या या ब्लाऊजची खासियत म्हणजे याचं फॅब्रिक म्हणजेच डेनिम आणि त्यावर केलेलं नाजूक मिरर वर्क. या स्मार्ट ब्लाऊज डिझाईनमुळे तुम्ही नक्कीच स्मार्ट दिसाल. कट स्लीव्ज आणि छोटासा गोल गळा आणि बटन्स असा हा ब्लाऊज आहे.
अनिता हसनंदानीचा हा ब्लाऊज स्लीव्जमुळे खूपच स्टाईलिश दिसत आहे. हा ऑफ व्हाईट ब्लाऊज ऑफ शोल्डर नेक आणि याच्या फॅब्रिकवर गोल्डन डॉट्स आहेत. साडी ब्लाऊजची नेसल्यावर जी बाजू दिसते, त्या स्लीव्हजवर जॉर्जेटसारख्या हलक्या फॅब्रिकचं फ्लेयर देण्यात आलं आहे.ज्यामुळे याचा लुक एकदम स्टाईलिश झाला आहे.
जर तुम्हाला पार्टीसाठी जाताना एकदम हटके आणि ट्रेंडी दिसायचं असेल तर अनिता हसनंदानीचा हे ब्लाऊज डिझाईन नक्की पाहा. नेक आणि कट्समुळे ब्लाऊज खास दिसतोय. तसं तर हा ब्लाऊज कोणत्याही फॅब्रिकमध्ये किंवा रंगामध्ये शिवता येईल. पण ब्लॅक कलरमुळे हा ब्लाऊज उठून दिसतोय.
ब्लाऊजचं हे डिझाईन वेगळं आहे. खासकरून थंडीच्या दिवसात वापरण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. स्टाईलचंं स्टाईल आणि त्याबरोबरच फुल स्लीव्ज. या ब्लाऊजच्या नेक आणि स्लीव्जसाठी नेटचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे हे अजूनच खास दिसतंय.
अनिता हसनंदानीचे सगळे ब्लाऊज एकापेक्षा एक आहेत. या सर्व ब्लाऊजमध्ये एक फारच स्टाईलिश ब्लाऊज हाही आहे. ज्यामध्ये कोल्ड शोल्डर्सची स्टाईल वापरण्यात आली आहे. तसंच ब्लाऊजवर हलकं सीकवेन्स वर्कसुद्धा करण्यात आलं आहे. जर दिवसा तुम्हाला एखाद्या पार्टीला जायचं असल्यास हा ब्लाऊज परफेक्ट आहे.
हा लुक अनिता हसनंदानीचा फेस्टीव्हल लुक आहे. याचं कारण म्हणजे तिची साडी आणि ब्लाऊजच्या स्टाईलसोबतच त्याचा खास कलरसुद्धा आहे. बॉर्डर असलेल्या कोणत्याही साडीवर असा ब्लाऊज शिवता येईल. ज्याची बॉर्डरचा छोटासा तुकडा ब्लाऊजच्या नेकवर ही लावण्यात आलाय. बाकी तुम्ही कट स्लीव्ज किंवा स्लीव्जसकटही हा ब्लाऊज शिवू शकता.
अनिताचा हा ब्लाऊज फारच स्टाईलिश आहे. खरंतर तुम्हाला या ब्लाऊजचं डिझाईन आवडणार नाही. पण हा ब्लाऊज घातल्यावर मात्र तुमचा लुक नक्कीच वेगळा दिसेल. या हा ब्लाऊजची खासियत आहे याचे स्लीव्ज, ज्या बेल स्लीव्जपैकी एक स्टाईल आहे. असा हा ब्लाऊज शिवायचा झाल्यास तुम्हाला टेलरला हा फोटोही दाखवावा लागेल.
कोणत्याही पार्टीसाठी जाताना घालण्यासाठी अनिता हसनंदानीचा हे हा ब्लाऊज डिझाईन एकदम परफेक्ट आहे. हे हा ब्लाऊज घालून तुम्ही पार्टीला गेल्यास, पार्टीमध्ये सेम डिझाईन असलेला ब्लाऊज तुम्हाला दिसणार नाही.
खरंतर हे डिझाईन उन्हाळ्यात घालण्यासाठी परफेक्ट आहे. पार्टीसाठी आणि फेस्टीव्हलसाठी हा कटवर्कचा हा ब्लाऊज शिवता येईल. कोणत्याही साडीवर हा हा ब्लाऊज स्टाईलिश दिसेल.
ऑफ शोल्डर स्टाईलमध्ये रिवर्स बेल स्लीव्जमुळे हा हा ब्लाऊज छान दिसत आहे. हा ब्लाऊजच्या बॅकचा अंदाज ही एकदम खास आहे. बघितल्यावर कोणीही फिदा होईल असा.
अनिता हसनंदानीचा हा ब्लाऊज कौतुकास्पद आहे. खरंतर या ब्लाऊजचं डिझाईन सिंपल कोल्ड शोल्डर फुल स्लीव्ज स्टाईल आहे, पण तरीही याच्या स्टाईलमुळे खूप वेगळा लुक येतो आहे. तुम्ही ही स्टाईल कोणत्याही पार्टीमध्ये घालण्यासाठी फॉलो करु शकता.
सिंपल असा हा ब्लाऊज यावरील कटवर्कमुळे विशेष दिसतोय. कट स्लीव्जमुळे हा ब्लाऊज कोणत्याही साडीवर कॅरी करता येईल आणि चांगलाही वाटेल.
हा ब्लाऊज तुमच्या पार्टी लुकला चारचांद लावेल. साधारणतः या स्टाईलला स्ट्रॅपलेस स्टाईल म्हंटल जातं. पण या ब्लाऊजमध्ये क्रॉस स्ट्रॅप दिसत आहे, ज्याला साडीची बॉर्डर क्रॉस होत आहे. यामुळे हा ब्लाऊज डबल क्रॉस स्टाईल साडीवर जास्त छान दिसेल. तुम्ही कोणत्याही पार्टीत ही फॅशन फॉलो करू शकता.
ब्लाऊजचं हे डिझाईन फारच खास आहे. ब्लाऊज खूपच सिंपल असला तरी नेकला बंद गळ्यासारखा स्टाईलिश स्ट्रॅप देण्यात आलं आहे. बाकी कट स्लीव्जमुळे यामध्ये अजून स्टाईल अॅड होत आहे.
अनिताचा हा ब्लाऊज तुमच्या एखाद्या जवळच्या नातेवाईकांच्या लग्नात घालण्यासाठी परफेक्ट चॉईस आहे. गोल्डन ब्लाऊज आणि गोल्डन साडी अनितावर फारच छान दिसत आहे. शिमरी फॅब्रिकमध्ये शिवलेला या ऑफ शोल्डर ब्लाऊजच्या स्लीव्जवर केलेल्या कामाने एकदम स्टाईलिश दिसत आहे. तुम्ही तुमच्या भावाच्या किंवा बहीणीच्या लग्नात किंवा रिसेप्शनसाठी असा ब्लाऊज ट्राय करून पाहा.
अनिताच्या या फोटोमध्ये दिसत असलेला ब्लाऊज सिंपल दिसत आहे कारण तो सिंपल साडीवर कॅरी करण्यात आला आहे. जर तुम्ही पार्टीमध्ये असा वन साईड ऑफ शोल्डर ब्लाऊज घातला तर तो नक्कीच स्टाईलिश दिसेल. यामध्ये बॅकसाईडला बटन्स असतात.
अनिता हसनंदानीचा प्रत्येक ब्लाऊजप्रमाणे हाही ब्लाऊज स्टाईलिश आहे. ज्यामध्ये बॅक डिझाईनवर जास्त भर देण्यात आला आहे आणि बंद गळ्याच्या नेकला पुढे छोटासा कट देण्यात आला आहे. फुल स्लीव्जचा असा ब्लाऊज थंडीमध्ये पार्टीत घालण्यासाठी एकदम योग्य आहे.
आजकाल बंदगळ्याची फॅशन ट्रेंडमध्ये आहे आणि याच वैशिष्ट्यं म्हणजे थंडीच्या दिवसात घालण्यासाठी एकदम योग्य आहे. तुम्ही रोजच्या वापरातील साड्यांवर तुम्ही असा ब्लाऊज कॅरी करू शकता. तुम्ही बघत आहातच अनिता यात किती आकर्षक दिसत आहे.
जर तुम्हाला कोणत्या लग्नात किंवा रिसेप्शनला जायचं असेल तर आणि साडीवर थोडंसं गोटापट्टी वर्क असेल तर तुम्ही ब्लाऊजवरही असंच गोटा पट्टी वर्क करून घ्या. तुम्ही पाहू शकता की सिंपल ब्लाऊज असूनही हा ब्लाऊज किती स्टाईलिश दिसत आहे. या ब्लाऊजवर गळ्याला गोटा पट्टी लावण्यासोबतच फ्रंटलाही खूप आकर्षकरीतीने गोटा पट्टी लावण्यात आली आहे.
प्लेन ब्लाऊजही छान दिसू शकतो. हो..असा वन साईड स्ट्रॅपलेस ब्लाऊज तुम्हाला एकदम स्टाईलिश लुक देईल. कोणत्याही ट्रान्सपरंट साडीवर तुम्ही हा ब्लाऊज कॅरी करू शकता.
हा ब्लाऊज जितका दिसायला स्टाईलिश आहे, तेवढाच घातल्यावरही छान दिसेल. कट स्लीव्जचा हा ब्लाऊज शिवणं सोप्पं नाही तरी जर तुमचा टेलर तयार झालाच तर नक्की शिवून पाहा. लक्षात ठेवा की, हा ब्लाऊज नेटच्या साडीवरच छान दिसेल.
अनिता हसनंदानीचा हा ब्लाऊज फारच छान, पण जर तुम्ही ब्राइट कलरच्या फॅब्रिकने हा ब्लाऊज शिवला तर अजूनच सुंदर दिसेल. ब्लाऊजच्या गळ्याभोवती नेटचं फ्रिल्स आहे आणि याच्या फॅब्रिकसाठी नेटऐवजी कॉटन सिल्क किंवा रॉ सिल्कसुद्धा वापरता येईल.
सिंपल ब्लाऊज असूनही हे डिझाईन छान दिसतंय. अनिताच्या या ब्लाऊजमध्ये नेट स्लीव्जशिवाय खास असं काहीच नाही.पण असा ब्लाऊज तुमच्यावरही छान दिसेल.
साडीसोबतच ब्लाऊजलाही तेवढंच महत्त्व आहे. कारण ब्लाऊजचा बराचसा भाग साडीमुळे कव्हर होत असला तरी कोणतीही साडी नेसल्यावर ब्लाऊजचा गळा नक्कीच दिसतो. अशावेळी रोजच्या वापराचे ब्लाऊज शिवताना नेक ब्रॉड ठेवल्यास ब्लाऊज छान दिसतं.
या ब्लाऊजचं डिझाईन इतर ब्लाऊजपेक्षा नक्कीच हटके आणि स्टाईलिश आहे. ब्लाऊजमध्ये जिथे कॉलर आहे, तिथे सोबतच वन साईड स्ट्रॅपलेसही आहे. बाकी तुम्ही हा फोटो पाहतच आहात त्यामुळे याची स्टाईल किती हटके आहे ते.
हा स्टाईलिश ब्लाऊज पाहा आहे ना मस्त. एकीकडे गोल गळा तर सोबतच कोल्ड शोल्डर्सचं डिझाईन करण्यात आलं आहे. दुसरीकडे स्लीव्जसुद्धा एकदम स्टाईलिश शिवण्यात आलं आहे. शिफॉन किंवा जॉर्जेटच्या साडीवर अशा फ्रॅबिकचा ब्लाऊज शिवल्यास चांगला दिसेल.
या ब्लाऊजचं डिझाईन ट्रेंडी असण्याबरोबरच क्यूटही आहे. पण या ब्लाऊजवरील सिंपल कटवर्कशिवाय यात खास असं काही नाही.
नेटच्या ब्लाऊजवर डिझाईन करायचं असेल तर अनिता हसनंदानीचे ब्लाऊज पाहिलेच पाहिजेत. आम्ही तुम्हाला आधीही नेट ब्लाऊजचे डिझाईन्स दाखवले आहे आणि त्यापैकीच हेही एक डिझाईन आहे.
जर स्ट्रॅपलेस ड्रेस छान दिसतो तर स्ट्रॅपलेस ब्लाऊज ही नक्कीच छान दिसेल. जर तुम्हाला बोल्ड आणि ब्युटीफूल दिसायचं असेल तर तुम्ही पुढच्या वेळी पार्टीला जाताना स्ट्रॅपलेस ब्लाऊज नक्की ट्राय करा.
तुम्हाला या फोटोत ब्लाऊजचा पुढचा भाग दिसत नाहीये कारण या ब्लाऊजचं बॅक डिझाईनचं खास आहे. पुढच्या बाजूला तुम्ही गोल किंवा चौकोनी गळा तुमच्या आवडीनुसार शिवू शकता. पण बॅक साईडची ही स्टाईल खरंच कमाल आहे आणि त्यासोबत याच्या मेगा स्लीव्जसुद्धा नेटच्या सुंदर डिझाईनर फॅब्रिकने बनवण्यात आल्या आहेत. मग तुम्हीही ब्लाऊजच्या बॅकला या डिझाईनची खास जोड देऊन हटके लुक करू शकता.
हा ब्लाऊज खास नववधूच्या लग्नाच्या लेहंग्यावर घालण्यासाठी आहे. साधारणपणे नववधू लग्नाला घालण्यासाठी पारंपारिक स्टाईलचे ब्लाऊज शिवते. पण या ब्लाऊजचं फॅब्रिक खास आहे आणि बॉर्डरसुद्धा सुंदर आहे.
या प्रकारचा कट स्लीव्ज हाय नेक ब्लाउज फारच स्टाईलिश आणि स्मार्ट दिसतो. खरंतर हा सिंपल ब्लाऊज आहे जो तुम्ही डेली रूटीनसाठी वापरू शकता.
हा लेस्ड डीप व्ही नेक ब्लाऊज तुम्ही कोणत्याही पार्टीत घालण्यासाठी परफेक्ट चॉईस आहे. जर तुम्ही साध्या राहणीवर विश्वास ठेवत असाल तर पार्टीला जाताना हा ब्लाऊज घातल्यास छान दिसेल. या ब्लाऊजची खासियत म्हणजे याचा व्ही नेक, सुंदर फॅब्रिक आणि नेक व स्लीव्जवर लावलेली सुंदर लेस आहे. यासाठी सुंदर सी लेस शोधा किंवा बनवून घ्या असाच ब्लाऊज.
अनिता हसनंदानीचे जास्तकरून सगळे ब्लाऊज कटवर्कचे आहेत. याचाच अर्थ असा की, कटवर्क हे जास्तकरून ब्लॅक कलरवर छान दिसतं. मग तुम्हीही असा ब्लाऊज शिवून घ्या.
अनिता हसनंदानीचा हा लुक पाहून कोणीही सांगेल की, हा तिच्या नागिन सीरियलमधला ब्लाऊज असेल. जर तुम्ही अनिताचा नागिनमधील व्हॅम्प लुक विसरून पाहिलंत तर हा ब्लाऊज खूपच सेक्सी दिसत आहे. याचं शिमरी फॅब्रिक आणि स्लीव्जवर असलेली झालर यामुळे ब्लाऊज लुक सुंदर दिसत आहे.
अनिताचा हा ब्लाऊज कमालीचा स्टाईलिश आहे. वन साइड स्ट्रॅपलेस असूनही हा ब्लाऊज कॉलर्ड असल्यामुळे खास दिसतोय. जर तुमची ईच्छा आहे पण स्ट्रॅपलेस ब्लाऊज कसा घालायचा हा प्रश्न पडत असेल तर तुम्ही हा ब्लाऊज शिवून पाहा. कारण ब्लाऊजच्या स्ट्रॅपलेस बाजूला साडीचा पदर येईल.
असं वाटतंय की अनिताला अशा प्रकारचे डीप व्ही नेकचे ब्लाऊज फारच आवडतात. तरीच तिच्या ब्लाऊज लिस्टमध्ये अशाप्रकारचे बरेच ब्लाऊज आहेत. पण या ब्लाऊजची खासियत म्हणजे याच्या स्लीव्जवर लोंबणारी झालर आणि नेकला लावलेली गोल्डन लेस, जी या ब्लाऊजला वेगळं बनवते.
मस्टर्ड कलरचा हा कटवर्क केलेला ब्लाऊज फारच क्यूट दिसत आहे. या ब्लाऊजवरील कटवर्क फारच सुंदर आहे आणि तुम्हीही असं कटवर्क करून घेऊ शकता.
या फोटोमध्ये अनिता हसनंदानी एकीकडे पंजाबी ड्रेस तर दुसरीकडे साडी-ब्लाऊजमध्ये दिसत आहे. जर अनिताच्या ब्लू ब्लाऊजबाबत बोलायचं झालं तर हा कॉलरवाला ब्लाऊज आहे. कट स्लीव्जच्या या ब्लाऊजचा कट फारच मोठा आहे आणि खूप स्मार्टही आहे.
सीक्वेंसची खासियत म्हणजे हे प्रत्येक आऊटफिटला खास बनवतं. असंच काहीसं या ब्लाऊजच्या बाबतीतही हेच झालं आहे. खरंतर हा सिंपल कट स्लीव्ज ब्लाऊज आहे पण फॅब्रिक सीक्वेन्सने भरलेलं असल्याने याला पार्टी लुक आाला आहे.
अनिताचा हा ब्लाऊजसुद्धा छान दिसतोय, ज्याच्या स्लीव्ज बंगाली स्टाईलच्या बेल स्लीव्ज आहेत. हा ब्लाऊज घालताना साडीही तितकीच ट्रॅडीशनल असली पाहिजे, म्हणजे पूर्ण लुकच ट्रेडीशनल होईल.
अनिता हसनंदानीच्या या ब्लाऊजच्या स्ट्रॅपवर सीक्वेंस वर्क करण्यात आलं आहे. बाकी हा ब्लाऊज चोलीकट आहे ज्याचं फिटींग परफेक्ट असल्यामुळे तो छान दिसतोय. साडीसोबतच मॅचिंग ब्लाऊज असेल तर तुम्हीही असा ब्लाऊज ट्राय करू शकता.
हा ब्लाऊज खरंच क्यूट लुकींग आहे आणि स्मार्टसुद्धा. छोटा राऊंड नेक आणि मोठे कट स्लीव्हज असलेला हा ब्लाऊज अगदी आरामात शिवून घेता येईल.
अनिताचा हा फोटो ब्लॅक अँड व्हाइट आहे.त्यामुळे हा ब्लाऊज गोल्डन आहे की सिल्व्हर हे सांगणं कठीण आहे. पण ब्लाऊजची खासियत फक्त यांचं फॅब्रिक नसून सुंदर एम्ब्रॉयडरी आहे जी गोल्डन किंवा सिल्वर दोन्हींवर छान दिसेल.
हा सिंपल ब्लाऊज ऑफिस वेअर साडीवर घालण्यासाठी चांगली चॉईस आहे. कट स्लीव्जचा हा ब्लाउज शिवायला फारच सोपा आहे आणि याच्या फॅब्रिकवर केलेल्या एम्ब्रॉयडरीमुळे स्टाईलिश लुक येतोय.
या ब्लाऊजची खासियत म्हणजे याचं ट्रेंडी आणि सुंदर नेट फॅब्रिक आहे. पण बाकी हा ब्लाऊज सिंपल आहे.
कोणत्याही ब्लाऊजवर या प्रकारची सुंदर लेस लावल्यास ती सुंदरच दिसेल. अनिताचा हा ब्लाऊज फारच सिंपल आहे पण तरीही यावरील लेस कमाल दिसतेय आणि त्यामुळे या ब्लाऊजला गेटअप आलाय.
अनिता हसनंदानीचा हा ब्लाऊज बऱ्यापैकी स्टाईलिश आहे आणि याची खासियत म्हणजे गोल्डन टीश्यू फॅब्रिक जे खास विणून बनवण्यात आलं आहे. जर तुम्हाला बाजारात असं फॅब्रिक दिसलं तर तुम्हीही असा स्टाईलिश ब्लाऊज शिवून घेऊ शकता.
हेही वाचा -
- लग्नात साडीला देऊया डिफरंट लुक, हटके स्टाईल
- पाहा साडी किंवा पार्टी ड्रेससाठी टॉप 10 ट्रेंडी स्टायलिश ब्लाऊज बॅक डिझाईन्स