नवरीसाठी खास ‘बजेट’मधील ५० भारतीय दागिन्यांचे डिझाईन्स (Indian Jewellery Designs In Marathi)

नवरीसाठी खास ‘बजेट’मधील ५० भारतीय दागिन्यांचे डिझाईन्स (Indian Jewellery Designs In Marathi)

नव्या नवरीसाठी पहिल्या वर्षात इतके कार्यक्रम असतात की प्रत्येक कार्यक्रमाला नक्की काय घालायचं हा प्रश्न नक्की पडतो. अगदी मुखदर्शनापासून ते कुटुंबातील वाढदिवस, ठिकठिकाणी जेवायला जाणं हे कार्यक्रमही एखाद्या सणापेक्षा कमी नसतात. त्यामुळे प्रत्येक नवरीला वर्षभर पुरेल असे भरजरी कपडे, साड्या आणि डिझाईनर दागिने या सगळ्याची गरज भासतेच. हे सर्व ऐकल्यानंतर सगळं कसं करणार अगदी खूप काम असल्यासारखं वाटतंय ना? पण लेटेस्ट ट्रेंड्स जाणून घेणं तसं बऱ्यापैकी सोपं आहे. असंही नाही की, घेतलेले हे दागिने आणि कपडे हे केवळ एका वेळेपुरतेच वापरायचे आहेत. वास्तविक ही एका वेळची गुंतवणूक आहे जे तुम्हाला प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी उपयोगी पडेल आणि इतर ठिकाणीही तुम्हाला या गोष्टी सहजरित्या वापरता येतील.


नुकतीच दिवाळी आणि ख्रिसमस दोन्ही गेले असले तरीही आता लग्नाचा हंगामच सुरु झाला आहे. त्यामुळे आता 50 वेगवेगळ्या भारतीय दागिन्यांची डिझाईन्स बघण्याची वेळ आली आहे. विश्वास ठेवा, तुम्हाला आवडतील असेच दागिने आम्ही घेऊन आलो असून याची किंमतही तुमच्या खिशाला परवडणारी आहे आणि शिवाय लेटेस्ट ट्रेंडमधील हे दागिने असल्यामुळे तुमच्या भरजरी कपड्यांना मॅचही होतील.


ऑनलाईन उत्कृष्ट डिझाईनर कानातले


ऑनलाईन उत्कृष्ट नेकलेस डिझाईन्स


ऑनलाईन उत्कृष्ट नथ आणि चमकी


ऑनलाईन उत्कृष्ट डिझाईनर बांगड्या आणि ब्रेसलेट्स


50 विविध भारतीय दागिने डिझाईन (Indian Jewellery Designs)


तुमच्या कपड्यांना मॅच होतील असे 50 भारतीय दागिने आम्ही निवडले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे याची स्टाईल ही लेटेस्ट आहे. कानातल्यांपासून ते गळ्यातल्यापर्यंत आणि बांगड्यांपासून ते मंगळसूत्रांपर्यंत प्रत्येकाच्या खिशाला परवडतील असे हे दागिने आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत. या सुपर ट्रेंडी, खिशाला परवडणाऱ्या आणि अप्रतिम दिसणाऱ्या दागिन्यांसाठी तुमच्या वॉर्डरोबमध्ये लगेच जागा बनवण्याच्या तयारीला लागा.


बद्दल अधिक वाचा मोत्याचा प्रकार


ऑनलाईन उत्कृष्ट कानातले डिझाईन (Best Designer Earrings Online)


सर्वात पहिल्यांदा कपड्यांवर घालण्यासाठी जर आपल्या लक्षात येत असेल तर ते म्हणजे कानातले. मग ते पारंपरिक झुमके असो वा क्लासिक हूप्स असोत वा डिझाईनर डँगलर्स. या लग्नाच्या हंगामात आणि सणांसाठी खास 20 प्रकारचे कानातले.


1. पतंगाच्या आकारातील कानातले


1-Jewellery-design-GOLD-PLATED-KITE-SHAPED-EARRINGS


दिवाळीसारख्या सणांमध्ये काजू कतली खूपच मोठ्या प्रमाणात विकली जाते आणि बऱ्याच जणांना आवडतेही. तुमचं जर कातू कतलीवर प्रेम असेल तर अशा प्रकारचे कानातले तुम्ही नक्की वापरू शकता. पारंपरिक साडीवर अथवा कोणत्याही फ्युजन आऊटफिटवर तुम्ही हे कानातले घालू शकता आणि इतकंच नाही तर अगदी वेस्टर्न कपड्यांवरही हे कानातले चांगले दिसतात.


किंमत: रु. 1,150. खरेदी करा इथे


2. पर्ल ड्रॉप इअरिंग्ज


2-jewellery-design-GOLD-PLATED-FILIGREE-MOTHER-OF-PEARL-DROP-EARRINGS


यावेळी तुम्हाला पारंपरिक झुमके घालायचे नाहीत का? तसं असेल तर मोत्यांचे हे गोल्ड प्लेटेड फिलीग्री कानातले तुम्ही नक्की वापरून बघा. यावर केलेले मेटल कटवर्क अतिशय सुंदर दिसतं. कुरता घातल्यानंतर हे कानातले तुमची शोभा वाढवतात.


किंमत: रु. 3,089. खरेदी करा इथे


वाचा - मराठी मध्ये ज्वेलरी ट्रेंड (Jewellery Trends In Marathi)


3. डॅझलिंग डँगलर्स


3-jewellery-design-GOLD-PLATED-TEXTURED-ROUND-EARRINGS
तुमच्या ज्वेलरी बॉक्समध्ये नक्की हे गोल्ड प्लेटेड कानातले अॅड करा. इन्डो - वेस्टर्न कपड्यांवर हे कानातले खूपच छान दिसतात. विशेषतः जेव्हा तुम्ही एखाद्या कार्यक्रमात जाणार असता पण तुम्हाला खूप नटायचं नसतं. तेव्हा हे कानातले खूप चांगला लुक देतात.


किंमत: रू 1,150. खरेदी करा इथे


Also Read Indian Jewellery Designs In Marathi


4. पिकॉक फॉर सम गुड लक


4-jewellery-design-Gold-Toned-Contemporary-Drop-Earrings
तुम्हाला हवा असणारा अगदी एजी लुक या कानातल्यांमुळे येऊ शकतो. एखाद्या पांढऱ्य स्कर्ट अथवा एथनिक स्कर्टबरोबर अथवा पूर्ण लेहंगा असल्यासही अशा स्वरुपाचे कानातले वापरता येतात. तुमच्या लुकला एक वेगळाच साज या कानातल्यांमुळे येतो.


किंमत: रू. 899. खरेदी करा इथे


5. चांदबाली


5-jewellery-design-Gold-Plated-Crescent-Shaped-Stone-Studded-Chandbalis
क्रिसेंट आकाराच्या चांदबाली कोणत्याही सलवार सूटवर चांगल्या दिसतात. साधारणतः सणाला सलवार सूट घातला जातो त्यामुळे आर्टिफिशियल स्टोन्स लावलेल्या चांदबाली कधीही लगेच घालून कोणत्याही कार्यक्रमाला जाता येतं.


किंमत: रू. 399. खरेदी करा इथे


6. बोहो


6-jewellery-design-Folklore-Silver-Plated-Drop-Earrings
एखाद्या मुलीला जर अतिशय साधं राहायची आवड असेल तर तिच्यासाठी सिल्व्हर टोन्ड बोहो कानातले अगदी योग्य आहेत. तुमच्या रोजच्या आयुष्यातही कोणत्याही पांढऱ्या रंगाच्या कपड्यांवर हे कानातले मॅच होतील.


किंमत: रू. 449,खरेदी करा इथे


7. इमराल्ड विथ एन्व्ही 


7-jewellery-design-Multicoloured-100 Zinc-Danglers-Drop
तुमच्या हिरव्या आणि पांढऱ्या आऊटफिट्ससाठी ड्रॉप डँगलर्सची कानात्यांची जोडी मस्तच दिसेल. रस्टिक गॉड टोनमधील हिरवे खडे लावलेले आणि त्यावर मोत्यांची सुबक कलाकृती असणारे कानातले तुमच्या कपड्यांची शोभा वाढवतात आणि याची किंमतही अगदी कमी असते.


किंमत: रू. 352, खरेदी करा इथे


8. हलके कानातले


8-jewellery-design-Beaded-Metal-Dangler-Earrings
ज्या मुलींना अगदी साधंसुधं राहायला आवडतं त्यांच्यासाठी अगदी हलके भारतीय कानातले असून ते दिसायलाही स्टायलिश दिसतात.


किंमत: रू. 539. खरेदी करा इथे


9. हेसल फ्री टॅसल


9-jewellery-design-Drop-Earrings-with-Tassels
मस्टर्ड रंगाच्या टॅसलची जोडी कसली मस्त दिसते ना? पारंपरिक कुरता अथवा कुरतीसह तुमचे केस वर बांधून अशा प्रकारचे कानातले घातल्यास खूप सुंदर दिसतात.


किंमत: रू. 599. खरेदी करा इथे


10. मॅड अथवा नोमॅड


10-Jewellery-design-Sahaj-Beaded-Metal-Dangler-Earrings


केशरी, सोनेरी रंगाचं एकदम सुंदर मिक्स्चर या कानातल्यांमध्ये करण्यात आलेलं आहे. या सणांमध्ये रंगबेरंगी दोऱ्यांमध्ये गुंफलेले हे मेटल डँगलर्स खूपच सुंदर वाटतात. तुम्ही हे कानातले साडीवर घातलेत तर नक्कीच तुम्हाला ते वाईट दिसणार नाहीत याची आम्ही तुम्हाला खात्री देतो.


किंमत: रू. 239. खरेदी करा इथे


11. प्रिटी इन पिंक


11-jewellery-design-Metal-Hoop-Earrings-Tassels


राणी पिंक (गुलाबी) आणि सोनेरी रंगांचं कॉम्बिनेशन हे नेहमीच मनाला भावतं. हे कानातले थोड्या हेव्ही व्हाईट कुडत्यावर घातल्यास अगदीच उठावदार दिसतात. अखेर पांढरा आणि गुलाबी हे नक्कीच सर्वात चांगलं कॉम्बिनेशन आहे.


किंमत: रू. 359. खरेदी करा इथे


12. टाऊन पॉम पॉम


12-jewellery-design-Beaded-Dangler-Earrings-Pom-Poms
तुमचा मूड तुमच्या कपड्यांमध्येही दिसून येऊ दे. या लग्नाच्या हंगामात हे रंगीत पॉम - पॉम कानातले घाला. हे कानातले घालणं म्हणजे एक मजाच आहे आणि कोणत्याही कपड्यांवर हे कानातले मॅच होतात. सॉलिड कॉटन साडीवर हे कानातले घालून तुम्ही एक वेगळे स्टाईल स्टेटमेंट दाखवून देऊ शकता.


किंमत: रू. 175. खरेदी करा इथे


13. पॅसली पॅराडाईज


13-jewellery-design-GOLD-CUTWORK-PAISLEY-FILIGREE-STUDS


भारतीय कानातल्यांमधील पैसली हा खूपच सुंदर प्रकार आहे. तुम्हालादेखील पॅसली आवडत असेल तर असे कानातले नक्कीच तुम्हाला भावतील. अगदी साध्या आणि सुंदर लुकसाठी हे कानातले उत्तम आहेत.


किंमत: रू.  718. खरेदी करा इथे


14. जॉईन करा कॉईन क्लब


14-jewellery-design-BEAUTIFUL-PEARL-COIN-EARRINGS


मोती आणि नाण्यांचं कॉम्बिनेशनही सुंदर दिसू शकेल असा विचार कधीतरी तुमच्या मनात आला होता का? अशा स्वरुपाचं कॉम्बिनेशन तुम्हाला आवडत असेल तर हे कानातले लगेचच तुमच्या कार्टमध्ये दिसायला हवेत.


किंमत: रू. 495. खरेदी करा इथे


15. सुप्रभात, सनशाईन इज हिअर!


15-Jewellery-design-ORANGE-DESIGNER-EAR-CUFFS-EARRINGS-JEWELLERY-FOR-WOMEN-ORNIZA
फॅशनबद्दल सांगायचं झाल्यास, अशा प्रकारचे कानातले अर्थात कफ्स हे जरासे मजेशीरच असतात. तुमच्या रोजच्या फॅशनव्यतिरिक्त काही वेगळं घालायचं असल्यास, या सोनेरी आणि लाल अशा आकर्षक इअर कफ्सचा नक्की वापर करा.


किंमत: रू. 1099. खरेदी करा इथे


16. अगदी मुलींसारखं राहायला आवडणाऱ्या मुलींसाठी


16-Jewellery-design-GHUNGROO-PEARLS-HOOPS-BAALI


अगदी भारतीय पेहराव आवडणाऱ्या मुलींसाठी हे थोडे वेगळे पण मस्त कानातले आहेत. मी कधीही कानातल्यांना घुंगरू घालता येतील असा विचार केला नव्हता. पण हे कानातले घुंगरू लावलेले असून स्टायलिशही आहेत आणि कानात घालण्यासाठी अगदी सोपेही आहेत.


किंमत: रू. 391. खरेदी करा इथे


17. क्रोशेट टच


17-jewellery-design-COLORBLAST-CROCHET-HOOPS


फ्रॅब्रिक्स इअर रिंग्ज हे एक वेगळंच समीकरण आहे आणि सर्वांनाच अशा प्रकारचे कानातले घालायला आवडतात. भारतीय कपड्यांवर असे क्वर्की क्रोशेट नीट हूप इअर रिंग्ज खूपच आकर्षक दिसतात. तुम्ही हे कानातले घालून कधीच वाईट दिसणार नाही.


किंमत: रू. 208. खरेदी करा इथे


18. आरसा असणारे कानातले


18-jewellery-design-SILVER-PLATED-MIRROR-WORK-EARRING
मध्यभागी आरसा असणारे सुंदर सिल्व्हर प्लेटेड इअर रिंग्ज खूपच आकर्षक आणि सुंदर दिसतात. तुम्हाला माहीत आहे का? प्रिस्टन व्हाईट कपडे आणि त्यावर सिल्व्हर दागिने म्हणजे सोने पे सुहागा...


किंमत: रू. 558. खरेदी करा इथे


19. चेरी ऑन द आयसिंग


19-Jewellery-design-ANETRA-RED-STUDS


केकवर चेरी असेल तर त्याची मजा काही वेगळीच. अर्थात असेच चेरीची जोडी असलेले कानातले. स्टोन स्टड चेरी स्वरुपातील कानातले दिसायला खूप सुंदर दिसतात आणि तुमच्या कपड्यांनाही चांगले मॅच करतात.


किंमत: रू 349. खरेदी करा इथे


20. बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स


20-jewellery-design-OXIDISED-TWO-TONE-GOLD-SILVER-PLATED-MULTICOLOR-EARRINGS
जेव्हा एखाद्या कानातल्यांमध्ये सोनेरी आणि चंदेरी असं दोन्ही कॉम्बिनेशन असेल तेव्हा एकदाही विचार न करता लगेच तुम्ही ते कानातले विकत घ्यायला हवेत. दोन्ही प्रकारचं मेटल यामध्ये असल्यामुळे कोणत्याही कार्यक्रमाला हे असे कानातले तुम्हाला वापरता येतात.


किंमत: रू. 306. खरेदी करा इथे


ऑनलाईन उत्कृष्ट नेकलेस डिझाईन्स (Best Necklace Designs Online)


आपण घातलेल्या आऊटफिट्सचा लुक तेव्हा पूर्ण होतो जेव्हा तुम्ही गळ्यामध्ये त्याला साजेसे दागिने घालत असता. तुमच्या कपड्यांवर तुम्हाला एखादा आकर्षक नेकलेस नक्कीच चांगला दिसतो. तुमचा गळा आणि कपडे अधिक आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी आम्ही तुम्हाला 10 अप्रतिम नेकलेसबद्दल सांगत आहोत


21. पॉप ऑफ कलर


21-jewellery-design-Turquoise Blue   Oxidised Silver-Toned Beaded Layered Necklace
सुंदर आणि आकर्षक नेकलेसने तुम्ही तुमच्या दिसण्यात अधिक स्टायलिश ट्विस्ट आणि अगदी फेमिनाईन लुक आणू शकता. त्यामुळे यावर्षी तुमच्या कार्यक्रमांमध्ये अशा प्रकारचा एजी नेकलेस वापरून तुमचे कपडे अधिक आकर्षक बनवा आणि स्वतःला पार्टीचं आकर्षण बनवा.


किंमत: रू. 434. खरेदी करा इथे


22. स्टेटमेंट मेकिंग चोकर


22-jewellery-design-Gold-Toned-Metal-Choker-Necklace


हा गोल्ड मेटल चोकर आपल्याला एक क्लासी आणि सॅसी लुक देतो. त्यासाठी एखादा राऊंडनेक अथवा ऑफशोल्डर ब्लाऊज घातला तर हा चोकर अजून उठावदार दिसेल.


किंमत: रू. 798. खरेदी करा इथे


23. लाल रंग कधीच चुकीचा ठरत नाही


23-jewellery-design-Oxidised-Silver-Toned-Red-Textured-Choker-Necklace
जेव्हा ऑक्सिडाईज्ड ज्वेलरीची बाब येते तेव्हा दुसरं काही योग्य असूच शकत नाही. हा दागिना केवळ पॉकेट फ्रेंडलीच नाही तर तुमचं स्टाईल स्टेटमेंटही यामुळे खास होतं. तुमच्या लुकला अधिक आकर्षकता देण्यासाठी तुम्ही असा रेड टेक्स्चर्ड चोकर नेकलेस नक्कीच मागवा.


किंमत: रू. 499. खरेदी करा इथे


24. सोनं ते सोनं


24-jewellery-design-Gold-Toned-Alloy-Oxidised-Necklace
एकदम चंकी चैन स्टाईलमधील हा नेकलेस तुमच्या सगळ्या सणांसाठी योग्य आहे. एखादा सॉलिड ब्लाऊज अथवा कुरता तुम्हाला घालायचा असल्यास, तुम्हाला अशा तऱ्हेचा नेकलेस नक्कीच चांगला दिसेल.


किंमत: रू. 655. खरेदी करा इथे


25. लेअर इट, स्लेअर


25-jewellery-design-Gold-Toned-Brass-Handcrafted-Necklace
ऑनलाईन अशा काही फॅशन अॅक्सेसरीज असतात, ज्या आपण विकत नाही घेतल्या तर स्वप्नातही आपला पिच्छा सोडत नाहीत. तसाच हा गोल्ड - टोन्ड लेअर्स नेकलेस हा त्यापैकीच एक आहे. हा नेकलेस तुम्ही योग्य मॅचिंग कपड्यांवर तुमच्या गळ्यात घालून अगदी आकर्षक दिसू शकता.


किंमत: रू. 549, खरेदी करा इथे


26. सी ग्रीन रंग आवडतो का?


26-jewellery-design-SEAGREEN-BOLD-NECKPIECE
हा वेगळ्या आकाराचा सी ग्रीन नेकलेस तुमच्या सर्व आऊटफिट्ससाठी तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही जिथे जाणार असेल तिथे थोडं बोल्ड स्टेटमेंटने जा आणि आम्हाला विश्वास आहे की, तुम्ही नक्कीच या नेकलेससह आकर्षक दिसाल.


किंमत: रू. 353. खरेदी करा इथे


27. थोडंसं स्वार्थी बना


27-jewellery-design-GOLDEN-SHELL-STATEMENT-NECKLACE-WITH-PEARL-STUDS
मोती असलेला गोल्ड टोन्ड नेकलेस किती सुंदर दिसत आहे ना? या सणांसाठी अथवा लग्नसमारंभासाठी तुम्ही कोणताही ड्रेस घातलात तरीही हा नेकलेस त्यावर नक्कीच सुंदर दिसेल.


किंमत: रू. 262. खरेदी करा इथे


28. स्ट्रीट स्टाईल लाईक अ प्रो


28-jewellery-design-FASHION-STICK-NECKPIECE
रस्त्यावर खरेदी करत असताना तुम्ही अशा स्वरुपाचे स्टीक नेकलेस नेहमीच पाहिले असतील. त्याच किमतीमध्ये तुम्हाला हे स्टीक ब्रँडेड गोल्ड टोन्ड नेकलेस इथे मिळू शकतात आणि तुमच्या ऑफ - शोल्डर ब्लाऊजवर किंवा टॉपवर हा नेकलेस तुम्ही वापरू शकता.


किंमत: Rs 334. खरेदी करा इथे


29. साधेपणासाठी आकर्षक नेकलेस


29-jewellery-design-EXCLUSIVE-SIMPLE-PRETTY-NECKLACE
तुम्हाला जर अगदी साधं राहायला आवडत असेल तर तुमच्यासाठी हा नेकलेस अगदी योग्य आहे. अतिशय साधा आणि तितकाच हलका आणि आकर्षक असा हा नेकलेस आहे. अगदी नाजूक चैन आणि त्यामध्ये चार गुंफलेल्या मोत्यांचा हा नेकलेस तुमच्या हाय-नेकलाईन्स अथवा कोणत्याही भारतीय आणि वेस्टर्न कपड्यांवरही शोभून दिसेल.


किंमत: रू 445. खरेदी करा इथे


30. मल्टीटास्कर मल्टीलेअर्ड नेकलेस


30-jewellery-design-GOLDEN-MULTILAYERED-CHAIN-NECKPIECE
मल्टीलेअर्ड चैन नेकलेसच्या या आकर्षक लुकसह यावर्षी सणांमध्ये सजायला तयार व्हा. या आधुनिक गोल्डटोन नेकलेसमुळे तुमच्या कपड्यांची शोभा वाढेल.


किंमत: रू. 246. खरेदी करा इथे


ऑनलाईन उत्कृष्ट नथ आणि चमकी (Nose Pins And Naths Online)


एखाद्या नवरीच्या चेहऱ्यावरील चमक दाखवण्यासाठी नथ अथवा चमकी हा सर्वात सुंदर दागिना आहे. तुमच्यासाठी खास डिझाईनर नोज रिंगचे 10 प्रकार


31. कुंदन नोज रिंग


31-jewellery-design-GOLD-PLATED-KUNDAN-NOSE-RING
तुम्हाला जर अगदीच साधी नथ घालायची असेल तर ही आकर्षक कुंदन नथ तुमच्यासाठी योग्य आहे. शिवाय ही गोल्ड प्लेटेड असल्यामुळे याच्या लुकचीही तुम्हाला काही चिंता नसेल.


किंमत: रू. 3,500. खरेदी करा इथे


32. खड्यांनी मढलेली नोज रिंग


32-Jewellery-design-Gold-Toned-Stone-Studded-Nose-Ring
ही सुंदर गोल्ड टोन्ड नोज रिंग केवळ खड्यांनी मढलेली असली तरीही अतिशय स्टायलिश आहे. आपल्या पारंपरिक वेशभूषेसाठी ही नथ अगदी उठावदार आहे. त्यामुळे लग्नकार्यामध्ये अशी नथ नक्कीच घालू शकता.


किंमत: रू. 4,320. खरेदी करा इथे


33. बेबी पर्ल्स


NOSE-RING
कुंदन, लाल खडे आणि लहान मोत्यांनी सजलेली ही डिझाईन्ड मोत्याची नथ तुम्हाला एम्ब्रॉईड अनाकरली वा लेहंग्यावर अतिशय चांगली दिसते.


किंमत: रू. 7,500. खरेदी करा इथे


34. मुघल नथ


34-Jewellery-design-GOLD-PLATED-HANDCRAFTED-KUNDAN-EMBELLISHED-PEARL-STRING-MUGHAL-NATH
कुंदन आणि मोत्यांनी सजलेली ही २२ कॅरेटची सोन्याची मुघल नथ एखाद्या नवरीसाठी अगदी योग्य पर्याय आहे. यावर करण्यात आलेले फ्लोरल मोती डिझाईन या नथीची शोभा अधिकच वाढवत असून अगदी मुघल काळातील आठवण करून देत आहेत.


किंमत: रू. 3,250. खरेदी करा इथे


35. तुमच्या नाकावरील चमकीवर फुलांची सजावट


35-Jewellery-design-Gold-Polished-Nose-Pin-with-CZ-Stones


पहिल्यांदाच नथ घालत आहात का? तर हे तुमच्यासाठीच आहे. ही आकर्षक चमकी अथवा नथ वापरून तुम्ही तुमच्या घरातील कार्यक्रमांची शोभा वाढवू शकता. कोणत्याही एथनिक कपड्यांवर ही नथ घातल्यास तुम्ही अतिशय सुंदर दिसाल.


किंमत: रू. 3,600. खरेदी करा इथे


36. पांढऱ्या खड्यांची नथ


36-Jewellery-design-Gold-Toned-White-Stone-Studded-Nose0Ring
जसं आम्ही आधीही म्हटलं होतं की, पांढरे खडे आणि सोनं हे कॉम्बिनेशन कधीही चुकीचं नाही ठरत. ही अतिशय आकर्षकरित्या तयार करण्यात आलेली पांढऱ्या खड्यांची नथ अगदी हलकी असून साडीवर शोभून दिसते.


किंमत: रू 5,440. खरेदी करा इथे


37. क्रिस्टल क्लिअर


37-Jewellery-design-Gold-plated-crystal-pearl-nath
प्रसिद्ध ज्वेलरी डिझाईनर राहुल पोपलीने बनवलेली ही गोल्ड प्लेटेड क्रिस्टल स्टन्ड सर्वांचंच लक्ष वेधून घेते. यामध्ये चैनमध्ये गुंफलेले लहान मोती त्याची शोभा अजूनच वाढवत आहेत.


किंमत: रू. 5,099. खरेदी करा इथे


38. अगदी मूलभूत अर्थात साधी नथ


38-Jewellery-design-Gold-plated-kundan-studded-flower-motif-nose-ring
नथ ही आपल्या प्रत्येकाच्या यादीमध्ये सर्वात जवळचा दागिना असतो. अशा प्रकारची गोल्ड प्लेटेड रिंग जी फुलांच्या मोत्यानी बनली असून त्यावर लहान लहान मोतीही चिकटवलेले असतात आणि त्याच्या चैनमध्ये कुंदन गुंफण्यात आलेला असतो. अशी नथ कोणाला आवडणार नाही?


किंमत: रू. 2,500. खरेदी करा इथे


39. फ्लोरल ग्लोरी


39-Jewellery-design-Silver-Floral-Pearl-Drop-Nose-Pin
दिसायला मस्त आणि तितकाच साधं डिझाईन पाहिलं आहे का? आम्हाला तरी वाटत नाही. यामधील मोत्यांचं डिझाईन असंच काहीसं आहे आणि तुमच्या दागिन्यांमध्ये हा ठेवा नक्कीच असायला हवा.


किंमत: रू. 2,380. खरेदी करा इथे


40. लिटिल रेड रायडिंग हूड


40-jewellery-design-Silver-Plated-Red-Glass-Rawa-Nose-Clip
प्रत्येक नथ सोनेरी रंगाची असावीच असं नाही. दुसरा कोणताही रंग निवडल्यास अर्थातच त्यात काही वावगं नाही. एखादा लेहंगा अथवा रंगबेरंगी साडीवर अशा प्रकारची चमकी नक्की चांगली दिसेल.


किंमत: रू. 300. खरेदी करा इथे


ऑनलाईन उत्कृष्ट डिझाईनर बांगड्या आणि ब्रेसलेट्स (Designer Bangles & Bracelets Online)


कोणत्याही नवविहाविहित वधूसाठी बांगड्या हा महत्त्वाचा दागिना असतो. नवविवाहितेचा लुक बांगड्यांशिवाय पूर्ण होतच नाही. अगदी कमी बांगड्याही तुम्हाला उत्तम लुक देऊ शकतो जो लुक तुम्हाला मेकअपदेखील देणार नाही. तुमच्यासाठी 10 डिझाईनर बांगड्या आणि ब्रेसलेट्स आम्ही घेऊन आलो आहोत.


41. बेडेड ब्रेसलेट


41-jewellery-design-Sahaj-Adjustable-Beaded-Bracelet


तुम्ही तुमच्या लुकमध्ये काही एक्स्ट्रा आणि वेगळ्या गोष्टींचा समावेश नाही केलात तर तुम्ही केलेल्या पेहरावाला काय अर्थ राहणार आहे? सांगा बरं. त्यातही जर मल्टी-कलर्ड ब्रेसलेट असेल तर मग काही बोलायची सोयच नाही.


किंमत: रू 319. खरेदी करा इथे


42. मूनस्टोन ब्रेसलेट


42-jewellery-design-Gold-plated-Cubic-Zircon-Studded-Moonstone-Bracelet
कोणतंही नाटकी अथवा अगदी भारदस्त असं ब्रेसलेट नकोय ना? तर तुम्ही नक्की हे मूनस्टोन आणि ग्लिटरिंग क्यूबिक झिरकॉनसह असलेलं गोल्ड - टोन्ड ब्रेसलेट वापरून पाहा. तुमच्या लुकमध्ये हे ब्रेसलेट अजून शोभा वाढवतं.


किंमत: रू 180. खरेदी करा इथे


43. ऑल अबाऊट ब्रास


43-jewellery-design-Dual-Toned-Brass-Bangle
ब्रासचे दागिने हे नेहमीच हिट असतात. लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी असे दागिने मिळणे म्हणजे बोनसच. ही विंटेज ट्रायबल एथनिक ब्रास बांगडी कोणत्याही कार्यक्रमात असो वा रोजच्या वापरासाठीही मस्त आहे. त्यामुळे अशी एक आपल्याकडे नक्कीच असायला हवी.


किंमत: रू. 779. खरेदी करा इथे


44. झील ऑफ जरदौसी


44-jewellery-design-Pure-Silk-Hand-Embroidered-Zardosi-Bangle-Set
फ्लोरल सजावट, इक्कत डिझाईन आणि हाती कलाकुसर केलेले जरदौसी जेव्हा एकत्र येते तेव्हा बांगड्यांचा अप्रतिम सेट तयार होतो आणि असं कॉम्बिनेशन असल्यानंतर इतर कोणत्याही दागिन्याची गरज तरी काय?


किंमत: रू. 349. खरेदी करा इथे


45. कमी ते अधिक सुंदर


45-jewellery-design-Get-Narrow-Bangle


ही बांगडी इतकी वेगळी आहे की, तुम्ही तुमच्या कामाची ठिकाणी आणि घरात काही खास कार्यक्रम असेल तिथेही घालू शकता. ही बांगडी तुम्हाला अतिशय सुंदर दिसेल आणि तुमचं अस्तित्वही जाणवून देईल.


किंमत: रू. 3,396. खरेदी करा इथे


46. कॉईन्ड बँगल्स


46-jewellery-design-Set-of-2-Maroon-Green-Gold-Plated-Bangles
मरून आणि हिरव्या अशा या बांगड्या तुमच्या घरातील सणांमध्ये घालण्यासाठी योग्य आहेत. यावर सजवण्यात आलेले कॉईन्स हे वेगळ्या स्वरुपाचे आहेत.


किंमत: रू. 438. खरेदी करा इथे


47. पारंपरिक ठसा


47-jewellery-design-Set-of-2-Gold-Toned-Handcrafted-Bangles
या पारंपरिक बांगड्या आपल्याकडील कोणत्याही सणाला आणि कार्यक्रमासाठी वापरता येऊ शकतात. कोणताही विचार न करता तुम्ही तुमच्या सणांसाठी या बांगड्या विकत घ्यायला हव्यात.


किंमत: रू. 400. खरेदी करा इथे


48. थोड्या मोठ्या आकाराची बांगडी


48-jewellery-design-Set-Of-2-Gold-Toned-Pearl-Bangles
तुम्हाला जर फॅन्सी मोती आवडत असतील, तर गोल्ड - टोन्ड मोत्याच्या या बांगड्या तुम्हाला नक्की आवडतील. सिल्क साडीवर अशा बांगड्या अगदी शोभून दिसतील.


किंमत: रू. 992. खरेदी करा इथे


49. तुमच्यासाठी खास चांदीच्या बांगड्या


49-jewellery-design-Women-Set-of-20-Antique-Silver-Toned-Bangles


जेव्हा सर्व प्रकार तुम्ही करून बघता पण तुम्हाला आवडत नाही तेव्हा नेहमीच तुमच्या मदतीला सिल्व्हर अर्थात चांदी धाऊन येते. या वेगळ्या सिल्व्हर डिझाईन्ड बांगड्या तुमच्या लुकला वेगळीच शोभा देतात. एखाद्या पारंपरिक साडीवर, वेगळ्या आणि थोड्या सजलेल्या सँडलसह या बांगड्या अधिक उठावदार दिसतील.


किंमत: रू. 359. खरेदी करा इथे


50. सप्तरंगी बांगड्या


50-jewellery-design-Set-of-12-Multicoloured-Textured-Bangles
रंगाची आवड असलेल्या व्यक्तींकडे रंगबेरंगी बांगड्यांचं कलेक्शन नाही असं होणारच नाही. तुमच्या आऊटफिटला त्या मॅचिंग होत असतातच. पण तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे घातल्यास, अशा बांगड्यांनी अधिक शोभा वाढते.


किंमत: रू. 299. खरेदी करा इथे


हेदेखील वाचा - 


ट्रॅडिशनल लूकसाठी खास ड्रेस आयडियाज हव्या असतील तर ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रींना नक्की फॉलो करा