आलिया-रणबीरच्या नात्यात ‘का रे दुरावा?’,पाहा पुरावा

आलिया-रणबीरच्या नात्यात ‘का रे दुरावा?’,पाहा पुरावा

बी टाऊनमधील अफेअर्स कधीच लपून राहात नाही आणि पर्यायाने त्यांच्या लव्ह अफेअर्स संदर्भातील कोणत्याही गॉसिप लपत नाहीत. तर तुम्हाला माहीत असेल सध्या रणबीर आणि आलियाच्या अफेअर्सच्या जोरदार चर्चा आहेत. चर्चा म्हणण्यापेक्षा आता हे दोघे रिलेशनशीपमध्ये आहेत हे सगळ्यांनाच माहीत झाले आहेत. पण या नात्याला नुकतेच वर्ष झाले असेल. पण या नात्यात आता दुरावा येऊ लागला आहे हे आम्ही नाही तर त्यांचे फिल्मी बीटने ही माहिती समोर आणली आहे आणि आता जर नात्यात का दुरावा आला ? हे कारण ऐकाल तर तुम्हालाही धक्का बसेल.


या कारणामुळे नात्यात आलाय दुरावा ?


आलियाला डेट करण्याआधी रणबीरने अनेकींना डेट केले आहे. अवंतिका मलिक, सोनम कपूर, कतरीना कैफ, दीपिका पादुकोण, माहिरा खान ही काही त्यातली नावे आहेत. सध्या तो वर्षभरापासून आलियाला डेट करत आहे. फिल्मी बीटने दिलेल्या माहितीनुसार आलिया सतत रणबीरला फोन करत राहते ते त्याला आवडत नाही.आलियाला हवा असलेला वेळ रणबीर दिला देत नाही. त्यामुळे या दोघांमधील दुरावा वाढत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे एक वर्षानंतर त्यांच्यात हा दुरावा आल्याचे पाहायला मिळत आहे.


फोटोतून स्पष्ट होतोय दुरावा


काहीच दिवसांपूर्वी बॉलीवूडमधील काही कलाकारांनी पंतप्रधानांची भेट घेतली. आलिया आणि रणबीर कपूर देखील एकत्र होते. पण ते एकत्र चालताना किंवा बोलताना फारसे दिसले नाहीत. पंतप्रधान भेटीचा जो फोटो त्यांनी शेअर केला त्यात ते दोघं एकमेकांपासून लांब उभे दिसले. दिल्ली विमानतळावरच त्याच्यांत काही आलबेल नसल्याचे पाहायला मिळत होते. कारण त्यांनी विमानाबाहेर उतरल्यानंतर फोटो शेअर केला त्यात आलियाच्या चेहऱ्यावर त्रस्त भाव दिसत आहेत. शिवाय जो व्हिडिओ आला त्यात सुद्धा आलिया- रणबीर वेगवेगळे चालताना दिसले. पुढे एकटी चालणारी आलिया रणबीरकडे मागे वळून पाहात होती. पण रणबीर पुढे येत नव्हता. पण अचानक रणवीर सिंहला काही तरी लक्षात आले आणि त्याने आलियाला कंपनी दिली. त्यामुळे या दोघांच्या नात्यात काहीतरी चुकत आहे असेच दिसत आहे.


aliaa-ranbir


pm meet
 

 

 


View this post on Instagram


 

 

First time so many bollywood stars came together as getting their free date is almost impossible. But they all came for #narendramodi


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on
कपूर खानदाला पसंत आहे आलिया


रणबीरच्या रिलेशनशीपमुळे त्याची आई नीतू सिंह आणि ऋषि कपूर यांनी कधीच  मत व्यक्त केले नाही. पण आलियाच्या बाबतीत तसे नाही. या दोघांनी आलिया आवडते हे स्पष्ट होते त्यांच्या फोटोजवरुन. कारण नीतू कपूरनेही आलियासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत.  इतकेच नाही तर दोघांचेही कुटुंब एकमेकांना कायम भेटत असतात आणि त्या क्षणाचे फोटोही शेअर करत असतात. सध्या ऋषि कपूर न्यूयॉर्कमध्ये इलाज घेत आहेत.त्यांना भेटायला बऱ्याचवेळा आलिया न्यूयॉर्कला जाते अशी माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे आलिया कपूर खानदानाची बहू बनण्यासाठी एकदम परफेक्ट असल्याचे नीतू कपूर यांना वाटते म्हणूनच कदाचित आलिया आणि तिची आई सोनी राजदान अनेकदा एकत्र असतात.


neetu singh aliaa-together


aliaa ranbir


aliaa ranbir 2


नव्या वर्षात करणार रणबीर- आलिया लग्न?


२०१८ हे वर्ष सेलिब्रिटींच्या लग्नाचे होते आता २०१९ मध्येही अनेक जोडया लग्न करणार आहेत. यात आलिया आणि रणबीरचे नाव देखील होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नीतू कपूर यांनी रणबीरला आलियासोबत या वर्षी साखरपुडा करण्याचा सल्ला दिला आहे. पण सध्या त्यांच्या नात्यातील दुरावा पाहता आता हे नाते तरी टिकेल का? अशी शंका येऊ लागली आहे.


आलिया-रणबीर चित्रपटात एकत्र 


साखरपुडाच्या चर्चेनंतर त्यांच्या लग्नाच्या गॉसिपही वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. पण सध्या हे दोघे 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहेत. त्यामुळे इतक्यात लग्न करणार नसल्याचे आलियाने आधीच स्पष्ट केले होते.पण आताच्या नव्या अपडेटनुसार त्यांच्या नात्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहिली आहे. 


(फोटो आणि व्हिडिओ सौजन्य- Instagram)