साडी नेसल्यावर या ‘20’ हटके आणि ट्रेडिंग हेअरस्टाईल्स तुमच्यावर नक्कीच शोभून दिसतील (Hairstyles For Saree In Marathi)

साडी नेसल्यावर या ‘20’ हटके आणि ट्रेडिंग हेअरस्टाईल्स तुमच्यावर नक्कीच शोभून दिसतील (Hairstyles For Saree In Marathi)

साडी हा प्रत्येकीच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. आजकाल तरुण मुलींमध्येही साडी नेसण्याची फार क्रेझ दिसून येते. अगदी पारंपरिक साडीपासून ते डिझायनर साड्यांपर्यंत साड्यांचे विविध प्रकार आणि डिझाईन्स उपलब्ध असतात. सहाजिकच प्रत्येक स्त्री तिच्या आवडीनिवडी आणि समारंभानुसार या साड्यांची निवड करते. साडी तुम्ही कशी ड्रेप करता आणि साडीवर कोणती हेअरस्टाईल कॅरी करता हे फार महत्त्वाचं आहे. साडी पारंपरिक असो अथवा डिझायनर तुम्ही जेव्हा त्या साडीनुसार हेअरस्टाईल करता तेव्हा एखाद्या कार्यक्रमाचं ‘सेंटर ऑफ अॅटरॅक्शन’ ठरता. आम्ही तुमच्यासोबत यासाठी काही ‘हटके आणि स्टाईलिश’ हेअरस्टाईल शेअर करत आहोत ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील शिवाय या सर्व हेअरस्टाईल सोप्या असल्याने तुम्ही त्या घरीच करू शकता.


कमी लांबीच्या केसांसाठी हेअरस्टाईल्स


मध्यम लांबीच्या केसांची हेअरस्टाईल


लांब केसांसाठी हेअरस्टाईल


हेअर स्टाईलिंग किट


साडीवर कोणती हेअरस्टाईल करावी हे कसे ठरवाल?


एखाद्या पेहरावासोबत कोणती हेअरस्टाईल करावी हे निवडणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. हेअरस्टाईल करताना तुम्ही काय कपडे घातले आहेत शिवाय बाहेर वातावरण कसं आहे या दोन गोष्टींचा विचार करणं फार गरजेचं आहे. कारण हिवाळ्यात तुम्ही ज्या साड्या नेसता त्या तुम्ही उन्हाळ्यात नेसत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही उन्हाळ्यात केस मोकळे न सोडता ते वर बांधण्यावर भर देता. त्यामुळे या आणि अशा अनेक गोष्टींचा लुमच्या लुकवर परिणाम होत असतो.  कधी कधी तुम्हाला मेकअपनुसार तर कधी कधी ट्रेडिंग फॅशननुसार तुम्हाला हेअरस्टाईल करावी लागते. शिवाय तुमचे केस लांब आहेत की कमी लांबीचे, साडी तुम्ही कोणत्या पद्धतीने ड्रेप केली आहे, तुमचा ब्लाऊज कोणत्या स्टाईलचा आहे अशा निरनिराळ्या गोष्टी तुम्हाला हेअरस्टाईल करण्याआधी पाहाव्या लागतात. आम्ही तुम्हाला अशा काही हेअरस्टाईल सूचवत आहोत ज्या तुम्ही निरनिराळ्या साडीवर ट्राय करू शकता.


कमी लांबीच्या केसांसाठी करा या हेअरस्टाईल्स (Hairstyle for Short Hair)


प्रत्येक देशात कपड्यांच्या फैशनसोबतच केसांच्या लांबीची फॅशनही बदलत राहते. भारतीय फॅशनमध्ये खांद्यांपर्यंत लांब केस शॉर्ट हेअरकटमध्ये गणले जातात. कमी लांबीच्या केसांसोबत अनेक हेअरस्टाईल केल्या जातात. आपण अशा काही  हेअरस्टाईल्स आता पाहणार आहोत.


1. लूज सॉफ्ट कर्ल्स (Loose Soft Curls)


या हेअर स्टाईलसाठी केसांचे छोटे छोटे सेक्शन घेऊन हेअर क्लिपने ते पिन अप करा. मग प्रत्येक सेक्शनचा खालचा भाग घेऊन तो कर्लिंग आयर्नच्या मदतीने कर्ल करा. लक्षात ठेवा केसांवर आयर्न सहा सेकंदाच्या वर ठेऊ नका. सर्व सेक्शन कर्ल करुन झाल्यावर त्यावर हेअर स्प्रे मारा. कर्ल्स व्यवस्थित दिसण्यासाठी हलक्या हाताने केस व्यवस्थित करा.


1-hairstyles-for-saree-soft-loose-curls in marathi


Also Read About नववधू साडी


2. स्ट्रेट हेअर (Straight Hair)


जर तुम्हाला केसांची लांबी लहान असूनही लांब केसांचा लुक हवा असेल तर सरळ केस स्ट्रेटनिंग करा. यासाठी केसांचे छोटे छोटे सेक्शन करुन ते पिन अप करुन ठेवा. त्यातील एक एक सेक्शन घेऊन स्ट्रेटनरच्या मदतीने केस स्ट्रेट करा. यासाठी स्ट्रेटनर केसांच्या मुळापासून केसांच्या पुढील टोकांपर्यत फिरवा. जोपर्यंत केस स्ट्रेट दिसत नाहीत तोपर्यंत केसांवरुन स्ट्रेटनर फिरवत रहा. स्ट्रेटनिंग केल्यावर केसांच्या सुरक्षेसाठी आणि फिनिशिंग लुकसाठी हेअर स्प्रे अथवा हेअर सिरम लावा.


2-hairstyles-for-saree-straight-hair in marathi


3. डीप साईड पार्टिंग (Deep Side Parting)


जर तुम्हाला तुमचे केस घनदाट दिसावे असं वाटत असेल तर मिडल पार्टिंगच्या ऐवजी साईड पार्टिंग करा. जर तुम्ही नेहमी केसांच्या मध्यभागी पार्टिंग करत असाल तर असं साईड पार्टिंग केल्याने तुमचा लुक नेहमीपेक्षा वेगळा दिसू लागेल. शिवाय कोणताही विशेष मेकओव्हर न करताही तुम्ही नेहमीपेक्षा वेगळ्या दिसू लागाल. तुम्ही केसांना कर्ल अथवा स्ट्रेटनिंग केल्यावरही साईड पार्टिंग करू शकता.


हेवी गाऊनबद्दलही वाचा


3-hairstyles-for-saree-deep-side-parting in marathi


4. सिंपल फ्रेंच ट्विस्ट (Simple French Twist)


सर्वात आधी कंगव्याने केसांचा गुंता व्यवस्थित सोडवून घ्या. बन स्टिकच्या मदतीने एका बाजूचे केस दुसऱ्या बाजूला फिरवून घ्या. केस ट्विस्ट करुन बॉबी पिनच्या मदतीने पिन अप करा. फ्रेंच ट्विस्ट करण्यासाठी तुम्ही बन स्टिकच्या ऐवजी डिझायनर क्लचरचा पण वापर करू शकता.


4-hairstyles-for-saree-simple-french-twist in marathi


5. फ्रेंच ब्रेड हाफ अप (French Braid Half Up)


फ्रेंच ब्रेड हाफ अप ही एक ट्रेंडिग हेअरस्टाईल आहे. कोणत्याही लांबीच्या केसांना ही हेअरस्टाईल सूट होऊ शकते. अगदी कमी लांबीच्या केसांवरही तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता. केसांचे दोन सेक्शन करून फ्रेंच स्टाईल वेणी घाला.


वाचा - वेणीचे प्रकार ज्यामध्ये तुम्ही दिसाल अधिक आकर्षक


5-hairstyle-for-saree-french-braid-half-up in marathi


6. लूप हाफ - अप (Loop Half- Up)


हेअरस्टाईलचा हा एक अगदी पटकन होणारा प्रकार आहे. त्यामुळे घाईच्या वेळीदेखील तुम्ही पटकन ही हेअरस्टाईल करू शकता. यासाठी केसांना मध्यभागी पार्टिंग करा. दोन्ही बाजून केसांच्या बटी घेऊन त्या कानांच्या मागे ट्विस्ट देऊन पिन अप करा. आता केसांच्या खालील भागाला बॉबी पिन्सच्या मदतीने पिन अप करा.


6-hairstyles-for-saree-looped-half-up in marathi


7. बीच वेव्ज (Beach Waves)


बीच वेव्जसाठी केसांना सी सॉल्ट स्प्रे लावणं खूप गरजेचं आहे. कारण यामुळे तुम्हाला नॅच्युरल लुक मिळु शकेल. या स्प्रेमुळे केसांचा टेक्चर आणि व्हॉल्युमदेखील छान होतो.या लुकसाठी तुम्ही स्ट्रेटनर आणि कर्लरचा वापर करू शकता.


7-hairstyles-for-saree-beach-waves in marathi


प्रत्येक कार्यक्रमासाठी स्वतःसाठी करा सोप्या पद्धतीने हेअर स्टाईल्स, ३१ सोप्या हेअरस्टाईल्स तुमच्यासाठी


8. सिंपल साईड ब्रेड  (Simple Side Braid)


केस व्यवस्थित विंचरुन डीप पार्टिंग करा. केसांच्या एका सेक्शनची वेणी घाला. फ्रेंच स्टाईल वेणीप्रमाणे या वेणीमध्ये बाजूच्या केसांच्या बटी मिसळत जा. कानापर्यंत आल्यावर वेणी कानामागे पिन अप करा.


8-hairstyles-for-saree-simple-side-braid in marathi


9. ट्रिपल ट्विस्टेड बन (Triple Twisted Bun)


केसांचे तीन सेक्शन करा. तिन्ही सेक्शनचा एक एक पोनीटेल बांधा. पोनीटेल मानेजवळ बांधा. तिन्ही पोनीटेल्स ट्विस्ट करुन त्याचा बन तयार करुन पिन अप करा. हेअर स्प्रे मारुन हेअर स्टाईल सेट करा.


10-hairstyles-for-saree-triple-twisted-bun in marathi


मध्यम लांबीच्या केसांची हेअरस्टाईल (Hairstyles for Middle Length Hair)


जर तुमचे केस तुमच्या खांद्यापेक्षा मोठे असतील तर या हेअरस्टाईल तुमच्यावर नककीच खुलून दिसतील.


1. ब्लो डाई (Blow Dry)


इंडीयन आणि वेस्टर्न ब्लो ड्राय हेअरस्टाईलवर कोणताही आऊटफिट नक्कीच सूट होतो. कमी खर्चात होणारी आणि अगदी सहज करता येण्यासारखी ही हेअरस्टाईल आहे. जर तुम्हाला केस अगदी स्ट्रेट अथवा अगदी कर्ल्स नको असतील तर तुमच्यासाठी ही हेअरस्टाईल अगदी बेस्ट आहे. शिवाय तुम्ही घरीच केसांना ब्लो ड्राय करू शकता. कोणत्याही समारंभाला जाण्यासाठी अथवा पार्टीसाठी ही हेअरस्टाईल परफेक्ट आहे. ब्लो ड्राय केल्यावर हेअर स्प्रे जरुर करा.


11-hairstyles-for-saree-blow-dry-hair in marathi


2. ओपन हेअर विथ पफ  (Open Hair with Puff)


अचानक एखाद्या कार्यक्रमाला जाण्याचा बेत ठरला तर कोणती हेअरस्टाईल करावी हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही हेअरस्टाईल अगदी बेस्ट आहे. केसांचे दोन सेक्शन करुन वरचा सेक्शन पिन अप करा आणि खालील सेक्शनला व्हॉल्युम वाढवण्यासाठी बॅककोंब करा. तुम्ही खालील सेक्शनला ब्लो ड्राय देखील करु शकता.


12-hairstyles-for-saree-open-hair-with-puff in marathi


3. लो ट्विस्टेड बन (Low Twisted Bun)


बन हेअरस्टाईलमध्ये लो ट्विस्टेड बन आजकाल जास्त लोकप्रिय आहे. कारण यामुळे तुम्हाला मेसी लुक मिळू  शकतो.केसांंना विंचरुन त्यावर टेक्चर स्प्रे मारा आणि सर्व केसांचा मानेवर एक पोनीटेल बांधा. आता या पोनीटेलला रोल करुन एक मेसी बन बनवा आणि बॉबी पिनने त्याला पिन  अप करा. जर केस न विंचरता त्यामध्ये लेअर्स ठेवले तर हा लुक जास्त चांगला दिसू शकेल.


13-hairstyles-for-saree-low-twisted-bun in marathi


4.पफ क्राऊन बन  (Puff Crown Bun)


या हेअरस्टाईलमध्ये तुम्ही बनसोबत दोन्ही बाजूने केसांच्या बटा बाहेर काढू शकता. यासाठी केसांवर एक बन बांधा आणि कंगव्याच्या मदतीने दोन्ही बाजूने कानांमागून केसांच्या बटा काढा.


14-hairstyles-for-saree-puff-crown-bun in marathi


5. स्लीक लो पोनीटेल (Sleek Low Ponytail)


तुम्हाला माहित आहे का कधी कधी साडीवर पोनीटेलदेखील अगदी शोभून दिसतो. यासाठी मानेवर एक पोनीटेल बांधा.


6. पफी पोनीटेल (Puffy ponytail)


आधीच सांगितल्याप्रमाणे साडीवर तुम्ही पोनीटेलदेखील कॅरी करू शकता. जर तुमच्या केसांमध्ये फ्लिक्स असतील तुम्ही असा पफी पोनीटेलदेखील बांधू शकता.


16-hairstyles-for-saree-ponytail-with-a-puff in marathi


लांब केसांसाठी हेअरस्टाईल (Hairstyles for Long Hair)


तुमचे केस कंबरेपर्यंत लांब असतील तर तुमच्यावर कोणतीही हेअरस्टाईल शोभून दिसेल.


1. साईड स्फेप्ट हेअर (Side Swept Hair)


लांब केसांवर करण्यासाठी ही एक सोपी हेअरस्टाईल आहे.तुमचे लांब केस विंचरुन एका खांद्यावर सोडून द्या. केस गुंतून फ्रिजी दिसू नयेत म्हणून केसांना लीव - इन- कंडिशनर  (leave- in conditioner) लावा. साडी नेसल्यावर तयारी करायला वेळ नसेल तर ही अगदी सोपी आणि मस्त हेअरस्टाईल आहे.


16-hairstyles-for-saree-side-swept-hair


2. स्ट्रेट हाई पोनीटेल  (Straight High Ponytail)


केसांना स्ट्रेट करा आणि त्यांचा एक हाय पोनीटेल बांधा. जर तुम्हाला कानाजवळ केसांमधून बटा काढायच्या असतील तर केस जास्त स्ट्रेट करू नका. नॅचरल बाऊंसी स्ट्रेट फ्लिक्स natural bouncy straight flicks मुळे हा पोनीटेल अगदी मस्त दिसेल.


17-hairstyles-for-saree-straight-high-ponytail


‘या’ लाईफ चेजिंग मेकअप टीप्स तुम्हाला माहित असायलाच हव्या


3. कर्ली पोनीटेल (Curly Ponytail)


जर तुम्हाला थोडा ग्लॅमरस लुक हवा असेल तर स्ट्रेटनिंग न करता केस कर्लर करा आणि पोनीटेल बांधा. लक्षात ठेवा अगदी मानेवर किंवा अगदी हाय पोनीटेल बांधू नका. मेली लुकसाठी तुमच्या फ्लिक्स थोड्या रोल करा.


18-hairstyles-for-saree-curly-ponytail


4. स्लीक लो बन  (Sleek Low Bun)


आजकाल साडीवर असा टाईड अॅंड टाईट बन खूपच ट्रेडिंग आहे. यासाठी आधी तुमचे केस स्ट्रेटनिंग करा. मिडल पार्टिंग करुन मानेवर एक बन बांधा. यासाठी तुम्ही बन ननेटचा वापर देखील करू शकता. जर तुम्हाला असा स्लीक आणि शायनी लुक हवा असेल तर हेअर जेल अथवा स्टॉंग होल्ड हेअर स्प्रे अवश्य लावा.


19-hairstyles-for-saree-low-sleek-bun


5. चायनीय टॉप नॉट (Chinese Top Knot)


केसांना अगदी मुळापासून स्ट्रेट करा. आता सर्व केसांचा हाय पोनीटेल बांधा. पोनीटेल बांधलेल्या केसांचा बन तयार करा आणि बॉबी पिन्सच्या मदतीने पिन अप करा. दोन्ही बाजूने केसांच्या काही बटा गालांवर सोडा.


21-hairstyles-for-saree-chinese-top-knot


Cotton and Handloom Blouse Designs: कॉटन आणि हॅंडलूम ब्लाऊजच्या हटके डिझाईन्स


तुमच्या हेअर स्टाईलिंग किटमध्ये या दहा गोष्टी अवश्य ठेवा (10 Must Have Things in Hair Styling Kit)


जर तुम्हाला सतत नवनवीन हेअरस्टाईल्स करायला आवडत असतील तर या 10 गोष्टी तुमच्या मेकअप किट अथवा  हेअर स्टाईलिंग किटमध्ये असायलाच हव्या. ज्यामुळे तुम्ही कधीही आणि कुठेही स्वतःची हेअरस्टाईल स्वतःच करू शकता.


1. ब्लो ड्रायर (Blow Dryer)


2. डीटॅंगलर (Detangler)


3. वाइड टूथ कॉम्ब (Wide Tooth Comb)


4. फाइन हेअरब्रश (Fine Hairbrush)


5. हेअर प्रोटेक्टंट (Hair Protectant)


6. राऊंड हेअरब्रश (Round Hairbrush)


7. सेक्शन क्लिप्स (Section Clips)


8. बॉबी पिन्स (Bobby Pins)


9. हेअर स्प्रे (Hair Spray)


10. ड्राय शैम्पू (Dry Shampoo)


आम्ही दिलेल्या या हेअरस्टाईल करून तुम्ही कोणत्याही कार्यक्रमामध्ये आकर्षक दिसू शकाल. शिवाय या सर्व होअरस्टाईल करायला अगदी सोप्या आहेत. सतत नवनवीन लुक करण्यासाठी आणि साडी नेसल्यावर अधिक सुंदर दिसण्यासाठी या हेअरस्टाईल तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील.


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम