ऑफिसमध्ये घालण्यासाठी परफेक्ट आऊटफिट्स

ऑफिसमध्ये घालण्यासाठी परफेक्ट आऊटफिट्स

प्रत्येक ठिकाणी जाताना घालायचे आऊटफिट्स हे वेगळे असतात. जसं एखाद्या सण समारंभाला जाताना तुम्ही शॉर्ट ड्रेस घालू शकत नाही आणि पूल पार्टीला जाताना साडी नेसू शकत नाही तसंच ऑफिसला जाताना तुमचे कॅज्युअल आऊटफिट्सही चालणार नाहीत. ऑफिसला घालायचे आऊटफिट्स हे नेहमी फॉर्मलच असले पाहिजेत. तुम्ही ऑफिसला जर फॉर्मल आऊटफिट्स घातले तर तुमचा लूकही प्रोफेशनल दिसतो आणि तसंच पर्सनॅलिटीही उठून दिसते. हेच कारण आहे की, आजकाल कॉर्पोरेट कल्चरमध्ये ऑफिसच्या आऊटफिट्सकडे विशेष लक्ष दिलं जातं. आम्हीही तुम्हाला असेच काही आऊटफिट्स दाखवणार आहोत जे तुम्ही ऑफिसला जाताना घातल्यास तुमची पर्सनॅलिटी चारचौघांत उठून दिसेल.36148303 262276581201704 5629347668464500736 n


सूट-बूट आहे बेस्ट
ऑफिसमध्ये मीटींग असो वा कोणतं प्रेजेटेंशन द्यायचं असो, सूटपेक्षा चांगलं ऑप्शन नाही. सूटमध्ये तुमची पर्सनॅलिटी तुमच्या कामाप्रती तुम्ही गंभीर असल्याचं दर्शवते आणि ऑफिस लूकही पूर्ण करते. जर तुम्हाला प्लेन सूट कंटाळवाणा वाटत असल्यास तुम्ही स्ट्राइप्स सूट्स ही घालू शकता.  


फ्लोरल प्रिंटेड ड्रेस
हो… फ्लोरल प्रिंट. हे फक्त कॅज्युअल वेअरिंगमध्ये नाहीतर ऑफिस आऊटफिट्समध्ये ही एकदम फिट बसतात.
फक्त याचा रंग जास्त भडक नसावा. हलक्या रंगाचे किंवा साध्या फ्लोरल डिझाईनचे ड्रेस ऑफिसमध्ये घातल्यास तुम्ही नक्कीच स्टाईलिश दिसाल. त्यासोबत जर तुम्ही ब्लॅक सँडल्स घातल्यास तेही छान दिसतात. मग ऑफिससाठी लवकरच एखादा फ्लोरल ड्रेस विकत घ्या.


36771116 1865422980426798 298810035947962368 n


टॉप अँड बॉटम
आम्ही इकडे टॉप टू बॉटम नाहीतर टॉप अँड बॉटमबद्दल बोलत आहोत. ऑफिसमध्ये जर तुम्हाला  कॅज्युअल लूक कॅरी करायचा असल्यास तुम्ही एखादा पानांच्या डिझाईनचा टॉप आणि त्यावर मॅच करणारी बॉटम घालून बघू शकता.  


38439617 224859951560490 2816644367375138816 n


Also Read About 12 Amazing Dresses You Can Make Using Old Saree In Marathi


स्कर्ट टॉप
लेडीजसाठी कॉर्पोरेट ऑफिसमध्ये स्कर्टची फॅशन सर्वात जूनी आहेत. फक्त यामध्ये कॅरी करण्याच्या पद्धतीत बदल येत असतो. जर तुमच्याकडे एखादा ब्लॅक पेन्सिल स्कर्ट असेल तर त्यावर तुम्ही कोणत्याही रंगाचा प्लेन टॉप मॅच करून घालू शकता. जर तुमची मीटींग असेल तर त्या दिवशी तुम्ही ब्लॅक स्कर्टवर पांढरा टॉप घालू शकता. ज्यामुळे तुमचा लूक एकदम प्रोफेशनल वाटेल.  


33732064 394750711009575 1442596338389745664 n


स्ट्राइप्स ड्रेस
आजकाला स्ट्राईप्स फारच ट्रेंडमध्ये आहेत. जर तुम्ही ऑफिसला जाताना एखादा स्ट्राईप्सचा ड्रेस घातल्यास तो जास्त रंगीबेरंगी नसेल याची काळजी घ्या. शक्य असल्यास स्ट्राईप्समध्ये सोबर रंगाची निवड करा.


ऑफिसचे कपडे निवडताना लक्षात घ्या 'या' गोष्टी


46682906 2224542657578914 7726362319705341952 n


- ऑफिसला जाताना एखादा ड्रेस आवडतो म्हणून वारंवार घालू नका. स्वच्छ धुतलेले आणि शक्यतो ईस्त्री केलेले कपडे ऑफिसला जाताना घालावेत. यामुळे तुमचे व्यक्तिमत्व चारचौघांमध्ये उठून दिसते.


- साधारण नोकरीला जाणाऱ्या महिला या त्यांच्या ऑफिस ड्रेसिंगबाबत सजग असतात पण कधीकधी फॅशनच्या नावाखाली त्या ऑफिसला काहीही घालून जातात. महिलांनी नेहमी ऑफिसचं वातावरण लक्षात घेऊन कपडे घातले पाहिजेत. जास्त घट्ट किंवा सैलसर कपडे घालू नयेत. आपल्या व्यक्तीमत्त्वानुसार योग्य फिटींगचे कपडे घालावेत, जे महाग कपड्यांच्या तुलनेत जास्त आकर्षक दिसतील.


40748262 1920436074690755 6513927995898462208 n


Also read 30 latest punjabi suit designs in marathi


- हवामानानुसार कपडे घाला.
बदलत्या हवामानानुसार कपडे आणि रंग वापरावेत. उन्हाळ्यात हलक्या रंगाचे तर हिवाळ्यात गडद रंगाचे कपडे घालावेत. कपड्यांच्या रंगानुसार अॅक्सेसरीज निवडाव्यात उदा. पर्स, चप्पल किंवा कानातले.


- लक्षात ठेवा ऑफिसला जाताना घातलेला टॉप, कुर्ता किंवा ब्लाऊजचा गळा हा जास्त मोठा नसावा. कारण यामुळे लोकांचं तुमच्या कामाऐवजी तुमच्या कपड्याकडे लक्ष जाईल.


office-wear-clothes-1
- ऑफिसमध्ये साडी नेसतानाही तिचा पदर नेहमी पिनअप करावा. त्यामुळे ऑफिसमध्ये फिरताना तुम्हाला वारंवार साडीचा पदर सांभाळावा लागणार नाही.     


- ऑफिसला जाताना शक्यतो पांढरा, निळा, ब्राऊन, काळा आणि हलका गुलाबी रंगांच्या कपड्यांचा वापर करू शकता.


40035897 247864305916000 6176746328164348377 n


- अॅक्सेसरीज निवडताना ही काही गोष्टी लक्षात घ्या. अॅक्सेसरीज जास्त भडक किंवा मोठ्या नसाव्यात. लांबट किंवा चमकदार रंगाचे शूज घालू नका.


46547131 510764936094165 6626511941849946196 n
 थोडक्यात पण महत्त्वाचं


ऑफिसला जाताना अशा कपड्यांची निवड करा, ज्यामध्ये तुम्हाला कंफर्टेबल वाटेल. फॅशनप्रमाणे कपडे वापरणं आवडत असल्यास नेहमी लेटेस्ट ट्रेंडची निवड करा. जास्त जुन्या फॅशनचे किंवा भडक कपडे वापरू नका. कारण ऑफिसचे कपडे हे आकर्षित करणारे किंवा विनोदी वाटता कामा नयेत. ऑफिसमध्ये वावरताना तुम्हाला कॉन्फिडंट वाटणं महत्त्वाचं आहे.


फोटो सौजन्य : Instagram


हेही वाचा 


तुमच्या वॉडरोबमध्ये असायलाच हव्यात या गोष्टी!


हटके डिझाईन्सच्या '6सौ4व्हिक्टोरियाबझार' टोट बॅग्ज


मालिकांमुळे प्रसिद्ध झाल्या मंगळसूत्रांच्या ‘या’ डिझाईन्स


प्रभावी व्यक्तीमत्वासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स