ADVERTISEMENT
home / Perfumes
भारतीय मुलींना आवडतील असे उत्कृष्ट परफ्युम्स

भारतीय मुलींना आवडतील असे उत्कृष्ट परफ्युम्स

आपल्या अंगाला सुगंध येत राहावा असं कोणाला वाटत नाही? आपल्याला सगळ्यांना कुठेतरी आपल्या अंगाला नेहमी सुगंध येत राहावा असं वाटत असतं आणि का वाटू नये? अंगाला चांगला सुगंध येत राहिल्यास, दिवसाची सुरुवातही चांगली होते आणि दिवसभर अतिशय ताजंतवानं वाटत राहतं. सध्या बाजारामध्ये अनेक पर्याय यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्याला हवं तसं परफ्युम आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होऊ शकतं. वास्तविक त्यापेक्षाही जास्त पर्याय उपलब्ध आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. स्वतःसाठी जेव्हा तुम्हाला योग्य परफ्युम निवडायचं असतं, तेव्हा तुम्ही नक्की कुठे आणि कोणत्या कार्यक्रमाला जात आहात हे नक्की लक्षात ठेवा. तुमच्यासाठी आम्ही काही खास परफ्युम्सचे पर्याय घेऊन आलो आहोत जे खाली लेखामध्ये आहेत. नक्की कोणतं परफ्युम वापरायचं आणि कोणत्या कार्यक्रमामध्ये कोणतं परफ्युम वापरायला हवं याबद्दल तुम्हाला जर काही शंका असतील अथवा काही कळत नसेल तर हे वाचून तुम्ही नक्कीच आपलं परफ्युम स्वतः निवडू शकता.

बजेट

आपल्याला सगळ्यांनाच अगदी उच्च दर्जाचे महाग परफ्युम्स वापरण्याची इच्छा असते. वास्तविक तुमचा आवडता अभिनेता वा अभिनेत्री कोणतं परफ्युम लावते याकडेही तुमचं अगदी खास लक्ष असतं आणि कधीतरी ते वापरावं अशी सुप्त इच्छाही असते. पण खरा प्रश्न पडतो की, खरंच एका परफ्युममागे इतके पैसे घालवणं योग्य आहे का? किंवा त्यासाठी काही दुसरे पर्यायही उपलब्ध आहेत का? अर्थात अशा ब्रँडना बाजारामध्ये काही पर्याय आहेत का याचाही आपण विचार करतो. खरं तर हे तुम्हाला या ब्रँड्सवर इतके पैसे गुंतवायचे आहेत का किंवा तुम्हाला त्यापेक्षा स्वस्त परफ्युम्सवर पैसे खर्च करायचे आहेत हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. पण तुम्ही तुमचं बजेट ठरवून त्याप्रमाणे योग्य परफ्युम निवडू शकता आणि तुमच्या आवश्यकेप्रमाणे त्याची खरेदी करू शकता.

budget

ADVERTISEMENT

यामधून निवडा तुमचा आवडता सुगंध

तुम्ही कोणत्या दिवशी कोणत्या कार्यक्रमाला जाणार आहात किंवा कोणती महत्त्वाची मीटिंग आहे किंवा तुम्ही एखाद्या स्पेशल डेटवर जाणार असाल तर तुम्हाला त्यासाठी कोणतं परफ्युम विकत घ्यायचं आहे ते त्यानुसार ठरवा. प्रत्येक वेळेसाठी एक वेगळा सुगंध ठरलेला असतो. तुम्हाला फुलांचा सुगंध आवडतो की, तुम्हाला मस्की अर्थातच स्ट्राँग परफ्युम्स निवडयाचे आहेत  हे अर्थातच तुम्ही स्वतः ठरवणार आहात. पण रोजच्या वापरासाठी तुम्हाला फ्लोरल अर्थात फुलांच्या सुगंधापेक्षा थोडे स्ट्राँग सुगंध असणारे परफ्युम्सच जास्त उपयुक्त आहेत. अर्थात या हलक्याफुलक्या सुगंधानेही तुमचा दिवस चांगलाच जाणार असतो, पण तरीही चांगल्या परिणामासाठी अर्थात दिवसभर सुगंध टिकण्यासाठी तुम्ही मस्की अर्थात स्ट्राँग परफ्युम्सचा वापर करणंच अधिक योग्य आहे.

अर्थात परफ्युम्सची निवडही ऋतूप्रमाणेदेखील बदलली गेली पाहिजे. उष्णतेच्या हंगामात तुम्ही फुलांच्या सुगंधाचा वापर केल्यास योग्य होईल तर, पावसाळ्यात तुम्हाला मस्की आणि वूडी अर्थात थोडी स्ट्राँग परफ्युम्स वापरणं अधिक योग्य असेल. तसंच तुम्ही कोणत्या लोकांमध्ये वावरणार आहात याचादेखील तुम्ही अंदाज घेणं गरजेचं आहे. काही लोकांना स्ट्राँग परफ्युमचा सुगंध सहन होत नाही आणि त्यामुळे अशा लोकांच्या जवळ जाताना किंवा त्यांच्यामध्ये वावरत असताना काळजी घेतलेली बरी.

opt for
निवडताना काय लक्षात घ्यायला हवं

ADVERTISEMENT

साधारणतः सुगंध हा तीन पातळ्यांमध्ये अर्थात लेअरपर्यंत विभागता येतो. टॉप, मिडल आणि बेस. ही अशी रासायनिक प्रक्रिया आहे जी या लेअर्सभोवती सुगंध पसरवण्याचं काम करते आणि आपल्याला येणारा सुगंध हा अधिक सुखदायी करते. गुलाब, जुई, मोगरा, लिली, केवडा इत्यादी फुलांचा पर्याय आपल्याला फ्लोरल परफ्युम्समध्ये मिळतो तर, सायट्रस अर्थात थोडासा आंबटपणा असलेला सुगंध आपल्याला लिंबू, द्राक्षांचा वेल इत्यादीमधून मिळतो.  तर काही परफ्युम्समधून आपल्या सफरचंद, पेर, स्ट्रॉबेरी, पीचेस आणि रासबेरी यांच्याही सुगंधाचा पर्याय निवडता येतो. तसंच तुम्ही दालचिनी अथवा स्टार अनिससारख्या मसाल्याच्या वासाचा पर्यायही निवडू शकता.

ज्यांना अधिक स्ट्राँगर आणि मस्की सुगंधाची आवड असते, त्यांनी चंदन, बर्च यासारख्या सुगंधाचे पर्याय निवडणं योग्य आहे.

taster

सुगंधासाठी परीक्षण

ADVERTISEMENT

एखादं परफ्युम खरेदी करण्यापूर्वी तुम्ही त्याचा सुगंध तपासून अर्थात त्याची पडताळणी करून पाहणं महत्त्वाचं आहे. तसंच तुम्ही योग्य कार्यक्रमासाठी योग्य सुगंध, योग्य परफ्युम विकत घेत आहात की नाही याची खात्री करून घेणंही गरजेचं आहे. आपण निवडत असलेल्या परफ्युम्सच्या मूळ गोष्टी जरी आपल्याला आवडत नसल्या तरीही एका साध्या स्निफ टेस्टमुळे परफ्युम कसं आहे हे जाणून घेणं सोपं होईल. तसंच तुम्हाला परफ्युम किती काळ टिकू शकतं याची परीक्षा घ्यायची असल्यास, तुम्ही तुमच्या मनगटावर त्याचा वापर करून जाणून घेऊ शकता. बऱ्याच लोकांना ऑनलाईन शॉपिंग करायला आवडतं, पण जेव्हा परफ्युम खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही तुमच्या जवळच्या दुकानातूनच खरेदी करण्याचा प्रयत्न करावा कारण त्या दुकानांमध्ये टेस्टर उपलब्ध असल्यामुळे तुम्हाला परफ्युम खरेदी करणं जास्त सोपं आणि सहज होतं. अथवा आपण दुकानांमध्ये टेस्ट केल्यामुळे आपल्याला हवं असलेलं परफ्युम ऑनलाईन खरेदी करण्यासाठीदेखील मदत होते.

taster1

आपल्या परफ्युम्सचे स्टोरेज

सर्वात पहिल्यांदा, हे लक्षात घ्यायला हवं की, तुमच्या परफ्युमची एक्सपायरी डेट जवळ येत नाही तोपर्यंत एकदा परफ्युम मारूनही त्याचा सुगंध दरवळत राहतो. तुम्ही जेव्हा तुमची परफ्युमची बाटली उघडता तेव्हा किंवा पहिल्यांदा परफ्युम अंगावर उडवता तेव्हा त्यांचा सुगंध दरवळण्यास सुरुवात होते. वास्तविक आपल्या रूमचं जे तापमान असेल त्याच तापमानामध्ये परफ्युम ठेवणं योग्य असतं. बाहेरचं वातारवण खूपच गरम अर्थात उष्णता वाढल्यास, तुमचं परफ्युम तुम्ही फ्रिजमध्येही ठेऊ शकता. उष्णतेपासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही रेफ्रीजरेटरचा वापर करू शकता. तसंच तुमच्या परफ्युमचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी आणि नैसर्गिक तेलाचा सुगंध टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही कधीही ओलसर जागी अर्थात बाथरूम अथवा अन्य ठिकाणी ठेऊ नका.

ADVERTISEMENT

उत्कृष्ट परिणामांसाठी, तुम्ही तुमचे परफ्युम्स त्याच्या बॉक्समध्येच नेहमी ठेवणं उत्तम आहे.  कालांतराने उष्णता आणि सूर्यप्रकाशामुळे परफ्युम्समधील सुगंध कमी होत असतो. तसंच तुम्ही परफ्युम्स बंद कपाटात अथवा ड्रॉव्हर्समध्ये ठेऊ शकता. तसंच तुम्ही परफ्युम वापरण्यापूर्वी कधीही बाटली हलवून घेऊ नका. तसं केल्यामुळे तुमच्या परफ्युम्समधील रसायनांची रिअॅक्शन तुमच्या अंगावर उठण्याचीही शक्यता असते. त्यामुळे या गोष्टींची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे.

परफ्युममधील सुगंध कसा दिवसभर टिकून ठेवता येईल?
तुमच्या मनगटावर परफ्युम लाऊन बघण्यापेक्षा तुम्ही थोडासा परफ्युमचा फवारा मारून घ्यावा आणि अगदी थोडंसं थांबावं. तुमचं परफ्युम जास्त काळ टिकू शकतं की नाही हे जाणून घेण्यासाठी उत्कृष्ट टीप म्हणजे, तुम्ही तुमच्या मनगटावर अथवा शरीराच्या कोणत्याही भागावर परफ्युम लावण्यापूर्वी वॅसलिन अथवा पेट्रोलियम जेलीचा वापर करावा. पूर्ण दिवस तुमच्या शरीराचा सुगंध येण्यासाठी तुम्ही परफ्युम कानाच्या मागे, तुमच्या मनगटावर, तुमच्या गुडघ्याच्या मागे, त्याच्या मानेच्या बाजूला, तुमच्या हाताच्या कोपराखाली आणि तुमच्या काखेत मारणं जास्त गरजेचं आहे. तसंच तुम्ही आंघोळ केल्यानंतर आणि तुम्ही कपडे घालण्याच्या आधी परफ्युम उडवणं जास्त योग्य आहे, असं केल्यास, दिवसभर परफ्युमचा सुगंध टिकून राहतो.

taster2

टेस्टर्सची उपलब्धता

ADVERTISEMENT

तुम्ही जे परफ्युम घेत आहात त्याबद्दल तुम्हाला कोणतीही शंका असल्यास, टेस्टर्सची उपलब्धता आहे की नाही हे नक्की पाहावे. तसंच, तुम्ही एखादं नवं परफ्युम पहिल्यांदाच विकत घेत असाल, तर त्या परफ्युमची छोटी बाटली त्याचा सुगंध घेण्याकरिता आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. तुम्हाला एखादा सुगंध आवडेपर्यंत तुम्ही दुसऱ्या सुगंधाचाही विचार करू शकता. परफ्युम्स हे साधारणतः अगदी लगेचच्या वापरासाठी असतात. तुम्ही जितका त्याचा वापर कराल, तितकं ते तुम्हालाही परफ्युम निवडणं सहज सोपं होईल. जास्त मोठ्या परफ्युम्सच्या बाटल्या घेण्यापेक्षा नेहमी लहान बाटल्यांमध्ये असलेल्या परफ्युम्सना प्राधान्य द्या किंवा तुम्ही टेस्टिंग केलेल्या परफ्युम्सना प्राधान्य द्या.

perfume

सूचना आणि परफ्युम्सचं वर्णन

प्रत्येक परफ्युम वेगळं असतं आणि ते कसं वापरायचं याच्या सूचना आणि प्रत्येक परफ्युमचं वर्णनही अगदी वेगळं असतं. त्यामुळे परफ्युम विकत घेण्यापूर्वी ते परफ्युम आपल्या पर्सनॅलिटीला शोभतं आहे की नाही अथवा आपल्या शरीराला त्याचा काही त्रास तर होणार नाही ना याचा पूर्ण विचार करून घ्यावं. तसंच तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही तुम्ही लावलेल्या परफ्युम्सच्या सुगंधाचा त्रास होत नाही ना याचाही विचार करायला हवा. सायट्रस, फ्लोरल अथवा स्ट्राँग परफ्युम्स असल्यास, तुमच्या शोभतं आहे की नाही यापेक्षाही आजूबाजूंच्याना त्रास होत नाही ना याचा विचार पहिल्यांदा करणं जास्त आवश्यक आहे.

ADVERTISEMENT

भारतामध्ये उपलब्ध असणाऱ्या 10 उत्कृष्ट परफ्युम्सची यादी आम्ही तुम्हाला खाली देत आहोत, वरील सगळ्या बाबी लक्षात घेता हे पर्याय तुमच्यासाठी चांगले पर्याय ठरू शकतात.

10 उत्कृष्ट परफ्युम्स:
1.Yves Saint Laurent Black Opium Eau De Parfum
जेव्हा तुमच्या खिशातून चौदा हजारापेक्षा जास्त रूपये खर्च होतात, तेव्हा तुम्ही नक्कीच एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नसता. तुम्ही मारलेले परफ्युम हे नक्कीच सेलिब्रिटी वापरत असतील. या परफ्युममध्ये जास्त प्रमाणात पिंक पेपर, ऑरेंज ब्लॉसम आणि पेअरचा सुगंध असतो तर त्यानंतर मध्यम प्रमाणात यामध्ये कॉफी आणि जुईच्या सुगंधाचा वापर करण्यात येत असून कमी प्रमाणामध्ये वॅनिला, देवदार वृक्षाचा सुगंध असतो. यामध्ये दर्जाप्रमाणे दोन प्रकारचे परफ्युम्स उपलब्ध असतात, त्यापैकी तुम्हाला कोणतं योग्य आहे हे तुम्ही ठरवून निवडू शकता.

black opium

POPxo recommends: Black Opium by Yves Saint Laurent, Rs 14,220

ADVERTISEMENT

2.Tom Ford Vanille Fatale

क्रिमी वॅनिला, केशर आणि मसालेदार अशा साहित्याने बनलेले गोड पण त्याच वेळी मसालेदार सेंट असले तर? असं हे वॅनिलाचा सुगंध असलेलं स्मोकी सेंट बराच काळ टिकणारं आहे. तुम्हाला फक्त याचा एकदाच उडवलेला स्प्रे पुरेसा होतो. बऱ्याच वेळेसाठी सुगंध हवा असल्यास, हा चांगला पर्याय आहे.

tom ford

POPxo recommends : Vanille Fatale by Tom Ford, Rs. 16,896

ADVERTISEMENT

3.Beautiful By Estee Lauder For Women
गेल्या तीन दशकांपासून असणारा असा हा सुगंधी परफ्युम आहे. पण अजूनही सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या परफ्युम्सपैकी हा ब्रँड आहे. गुलाब, जाई आणि लिंबू, कलिंगड, पीच अशा फुलं आणि फळांच्या सुगंधाचं मिश्रण या परफ्युममध्ये तुम्हाला मिळतं.

beautiful

POPxo recommends: Beautiful by Estee Lauder; Rs.5,455 for 30 ml

4.Lancôme La Vie Est Belle L’Eau de Parfum

ADVERTISEMENT

Lancôme’s La Vie Est Belle हा फळांच्या वासांचा परफ्युम दिवसभर तुम्हाला गंध देत राहतो. यामध्ये वॅनिला, पचौली, प्रालईन आणि ब्लॅक करंट यांचं संत्र आणि जाईच्या सुगंधासह मिश्रण असतं. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर वा एखाद्या स्पेशल डेटसाठी जात असल्यास, हा परफ्युम अगदी योग्य आहे.

lancome

POPxo recommends: La vie est belle by Lancome, Rs.12,239 for 73.93 ml

5. Victoria’s Secret Bombshell Eau De Parfum Spray

ADVERTISEMENT

Victoria’s Secret Bombshell या परफ्युमचा वापर तुम्हा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये करू शकता. यामध्ये फळांचा सुगंध असतो. फुलांचा सुगंध त्यामध्ये नीट मेन्टेन करून सायट्रसचा ताजेपणाही मिसळलेला असतो.

victoria secret bombshel

POPxo recommends : Bombshell by Victoria’s Secret, Rs. 6,525 for 1.7 Oz

6. L’Occitane Crisp Citrus Verbena Eau de Toilette Spray
जेव्हा तुम्हाला खूपच कंटाळा आलेला असून तेव्हा उन्हाळ्यात Crisp Citrus spray from L’Occitane चा नक्की वापर करा. फ्रान्समधून ऑर्गेनिक ग्राऊनद्वारे हा लिंबाचा सुगंध तुम्हाला उन्हाळ्यात ताजेपणा देतो. कोणत्याही घामाचा त्रास न होता दिवसभर तुम्हाला हा लिंबाचा ताजेपणा फ्रेश राहायला मदत करतो.

ADVERTISEMENT

verceine
POPxo recommends: L’Occitane by Verbena, Rs. 3,950 for 100 ml

7.Hugo Boss FEMME Eau de Parfum, Rs. 4,399 for 75 ml

फुलांच्या सुगंधाबरोबरच कस्तुरीचा अथवा थोडा स्ट्राँग सुगंध असं मिश्रण FEMME Eau de Parfum from Hugo Boss मध्ये आहे. बऱ्याच तासांकरिता हा सुगंध तुमच्या शरीरावर राहतो आणि अतिशय ताजेपणा देतो. संपूर्ण दिवसभर याचा सुगंध तुम्हाला येत राहतो.

hugo boss
POPxo recommends : Femme by Hugo Boss

ADVERTISEMENT

8.CLEAN Original Eau de Parfum Spray, Rs. 5,613 for 60 ml

तुम्हाला जर अगदी लाईट आणि फुलांचा सुगंध हवा असेल तर तुम्ही हे फ्रेगरन्स नक्की वापरू शकता. कोणत्याही ड्युप्लिकेट परफ्युमचा आधार घेऊ नका. हे परफ्युम अतिशय मंद सुवास देणारं असून ताजेपणा राखून ठेवणारं आहे.

clean

POPxo recommends : CLEAN original perfume

ADVERTISEMENT

9.Coach New York The Fragrance Eau de Parfum Spray, Rs. 5,265 for 90 ml

न्यूयॉर्क शहरापासून प्रेरणा घेत, एकाच वेळी दर्जा आणि लक्झरी या दोन्हीचं मिश्रण यामध्ये दिसून येतं. अधिक कालावधीपर्यंत सुगंध टिकून राहण्यासाठी यामध्ये स्ट्राँग वॅनिलासह गुलाबाचा सुगंध आणि रासबेरी या फळाचा सुगंध एकत्र करण्यात आलेला आहे. त्यामुळे फुल आणि फळ असा दोन्ही मिश्रित सुगंध या परफ्युममध्ये तुम्हाला मिळतो.

coach
POPxo recommends : Coach New York

10.Calvin Klein Euphoria Eau de Parfum, Rs. 4,631 for 100 ml

ADVERTISEMENT

जेव्हा तुम्हाला एखाद्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घ्यायचं असेल तेव्हा नक्की Euphoria from Calvin Klein चा वापर करा. अंबर आणि महोगनी यांचं मिश्रण असलेला हा सुगंध फळांपासून तयार झाला असून याचा सुगंध दिवसभर दरवळत राहतो.

calvien
POPxo recommends : Euphoria by Calvin Klein

चांगला सुगंध मिळवण्यासाठी नेहमीच तुमच्या खिशाला चाट पाडण्याची गरज नाही. तुम्हाला कमी किमतीतील परफ्युम्सदेखील बाजारामध्ये मिळतात, जी दिवसभर तुम्हाला ताजी आणि सुगंधी ठेऊ शकतात.

भारतातील उत्कृष्ट परवडण्याजोगी परफ्युम्स :

ADVERTISEMENT

1. Revlon Charlie Red

रोजच्या धावपळीच्या आयुष्यात अथवा कॉलेजमध्ये जाण्यासाठी चार्ली रेड हे फुलांच्या सुगंधाचं तरीही स्ट्राँग असं सेंट आहे. हे नेहमीचं कॉम्बिनेशन नसल्यामुळे तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

charlie
किंमत: रू. 489. खरेदी करा इथे

2. Trendy from Nike

ADVERTISEMENT

आधुनिक काळातील मुलींसाठी हे खास परफ्युम बनवण्यात आलं असून एकाच वेळी स्पोर्टी आणि फेमिनाईन असं याचं कॉम्बिनेशन आहे. दिवसाची सुरुवात हे परफ्युम लावून केल्यास अगदी ताजंतवानं वाटतं. भारतातील महिलांसाठी ट्रेंडी हे उत्तम परफ्युम्सपैकी एक आहे.

nike
किंमत: रू. 598. खरेदी करा इथे

3. Fruity Rhythm by Adidas

एखाद्याला फ्लोरल आणि फ्रुटी सेंट आवडत असल्यास, हे सेंट अतिशय योग्य आहे. जेव्हा तुम्हाला अतिशय तणावाचा दिवस घालवायचा असतो तेव्हा हे परफ्युम नक्कीच तुमच्या कामी येतं.

ADVERTISEMENT

adidas
किंमत: रू. 560. खरेदी करा इथे

4. Diesel Plus Plus Feminine

लिली आणि थोड्याशा कडवट संत्र्याच्या सुगंधाचं हे परफ्युम नक्कीच गोड सुगंधाचं सेंट नाही. मात्र स्ट्राँग सुगंध आवडणाऱ्यांसाठी हा चांगला पर्याय आहे.

diesel
किंमत: रू. 995. खरेदी करा इथे

ADVERTISEMENT

5. Amazonian Wild Lily Perfume Oil from The Body Shop

या बॉटलचा आकार पाहता तुम्हाला कदाचित किंमत जास्त वाटू शकते. पण त्याचा उपयोगही तसाच आहे. तुम्हाला केवळ मनगटावर आणि कानामागे याचा एक एक थेंब लावायचा आहे. याचा सुगंध दिवसभर दरवळत राहतो. बऱ्याच वेळेसाठी हे परफ्युम सुगंध देत राहते आणि शिवाय ही बाटली तुमच्या बॅगेतून नेणंही तुम्हाला अतिशय सोपं आहे.

perfume 1

किंमत: रू. 895. खरेदी करा इथे 

ADVERTISEMENT

6. Benetton Hot EDT For Women

हे स्ट्राँग असलं तरी अतिशय ताजंतवानं करणारं परफ्युम आहे. याचा सुगंधही तुम्हाला खूपच चांगला वाटतो. तसंच याचा सुगंध बराच काळ टिकून राहतो. तुम्ही घातलेले पैसे पूर्ण वसूल होतात.

hot

किंमत: रू. 615. खरेदी करा इथे 

ADVERTISEMENT

7. Playboy Play It Spicy

प्रत्येकालाच आपल्याकडे प्लेबॉय असावं असं वाटतं आणि तसं करणं शक्यही आहे. जेव्हा तुम्हाला तुमची वाईल्ड बाजू दाखवायची आहे तेव्हा या परफ्युमचा वापर करणं योग्य आहे.

playboys
किंमत: रू. 675. खरेदी करा इथे

8. Oriflame Queen Of The Night

ADVERTISEMENT

कोणत्याही कामाच्या ठिकाणापेक्षा एखाद्या खास डिनर डेटसाठी किंवा विशेष कार्यक्रमांसाठी हे परफ्युम वापरता येतं. शिवाय अशी सुंदर बॉटल कोणाला आपल्याकडे असू नये असं वाटेल?

oriflame
किंमत: रू. 800. खरेदी करा इथे

9. Sunscent by Police

तुम्ही हे परफ्युम रोज वापरलंत तरीही तुम्ही सुट्टीवर आहात असंच तुम्हाला वाटेल. अर्थात याची किंमत नक्कीच जास्त नाही त्यामुळे काळजी करू नका. सकाळपासून ते अगदी संध्याकाळपर्यंत याचा सुगंध दरवळत राहतो आणि विशेषतः घामच्या दिवसांमध्ये याचा जास्त उपयोग होतो.

ADVERTISEMENT

police
किंमत: रू. 999. खरेदी करा इथे 

10. Victoria’s Secret Garden Pure Seduction

जेव्हा तुम्हाला एकाच वेळी थोडा गोड सुगंध पण तरीही त्यामधून सेक्सीपणा जाणवायला हवा असतो, तेव्हा या परफ्युमचा वापर करा. तुम्हाला एखाद्या दिवशी आळस आला असेल तर हे परफ्युम नक्की तुम्हाला फ्रेश ठेवण्यासाठी मदत करेल.

victoria secret garden
किंमत: रू. 722. खरेदी करा इथे

ADVERTISEMENT

11. Fabindia Cypress Perfume Oil

तुम्हाला जेव्हा अगदी बागबगिचाप्रमाणे सुगंधांचा कंटाळा आलेला असतो, तेव्हा अशा अगदी मंद दरवळणाऱ्या सुगंधाचा नक्की विचार करा. इतकंच नाही तर हे परफ्युम रोल अॅप्लीकेटरमध्येही उपलब्ध आहे. तुमच्या मनगटावर वा कानामागे याचा वापर करा आणि तुमचा दिवस सुगंधी घालवा.

fabindia
किंमत: रू. 290. खरेदी करा इथे 

12. Skinn Nude By Titan

ADVERTISEMENT

इची आणि गुलाबाचा एकत्र सुगंध तुम्हाला या स्किन न्यूडमध्ये सापडतो. याचा सुगंध थोडा जास्त सेन्सुअल आहे. कदाचित हेच जास्त चांगलं आहे. त्यामुळे दिवसभर हा सुगंध दरवळत राहतो.

skinn
किंमत: रू. 949. खरेदी करा इथे

वर दिलेल्या अगदी हव्याहव्याशा वाटणाऱ्या या परफ्युम्सशी यादी तुम्ही नक्की वाचली असेल. आता त्याचा योग्य उपयोग करा आणि अनुभवदेखील घ्या. तुमच्या अॅक्सेसरीजमध्ये ताजंतवानं वाटण्यासाठी आणि तुमचा आत्मविश्वास टिकून राहण्यासाठी या परफ्युम्सचा नक्की वापर करा. कोणतंही कारण असो, कधीही अंगाला दुर्गंध येऊ देऊ नका. तसंच परफ्युमची बाटली ही नेहमी थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवायचं विसरू नका. तसंच याचा सुगंध टिकवून ठेवण्यासाठी याच्या बाटलीचं झाकण कधीही उघडं ठेऊ नका. या सर्व परफ्युम्सपैकी तुमचं नक्की आवडतं कोणतं परफ्युम आहे हे आम्हाला नक्की खाली कमेंट लिहून कळवा.

04 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT