जेव्हा मोलकरीण झाली स्टँडअप कॉमेडीअन (Standup Comedian), दीपिका म्हात्रेंची खरी कहाणी

जेव्हा मोलकरीण झाली स्टँडअप कॉमेडीअन (Standup Comedian), दीपिका म्हात्रेंची खरी कहाणी

साधारणतः घरी कामाला येणाऱ्या मोलकरणी आणि मालकीणींचं नातं नेहमीचं थोडंफार कटकटीचं असतं. घरकाम करणाऱ्या त्यांच्या मॅडमबद्दल तर मॅडमला आपल्या घरकामाच्या बाईंबद्दल काही ना काही तक्रार असतेच. पण ह्याचंच रूपांतर जर कॉमेडीमध्ये झालं तर…हो, एकेकाळी घरोघरी मोलकरणीचं काम करणाऱ्या दीपिका म्हात्रे यांनी आज एक स्टँडअप कॉमेडीअनच्या रूपात नाव कमवलंय. दीपिका म्हात्रे काही महिन्यांपूर्वी पहाटे 4 ची मुंबई लोकल पकडून त्यात आर्टीफिशिअल दागिने विकून आपल्या दिवसाची सुरूवात करायच्या. त्यानंतर काही ठिकाणी मोलकरणीचं काम आणि संध्याकाळी मुलांना सांभाळणं असा त्यांचा दिनक्रम होता. पण त्यांच्या विनोदी स्वभावामुळे त्यांच्या साधारण आयुष्याला कलाटणी मिळाली आणि आज त्या स्टँडअप कॉमेडी शो करत एका सेलिब्रिटीचं लाईफ जगत आहेत.  


रिअल लाईफ प्रॉब्लेम्सची झलक
दीपिका म्हात्रे या त्यांच्या कॉमेडी शोजमध्ये घरोघरी जाऊन मोलकरणींना किती गोष्टी सहन कराव्या लागतात, कशी बोलणी खावी लागतात, अशा खऱ्या आयुष्यातल्या गोष्टींची झलक दिसते. आपल्या रियल लाईफमधल्या हाय क्लास साहेब आणि मॅडमबद्दलच्या गमतीदार गोष्टी सांगून दीपिका म्हात्रे लोकांना हसवून हसवून बेजार करतात.जवळजवळ सात वर्ष घरोघरी मोलकरीणचं काम करणाऱ्या दीपिका म्हात्रे सांगतात की, मी जिथे-जिथे काम करायचे, तिथली प्रत्येक छोटी-छोटी गोष्ट मी नोट केली. ज्या गोष्टी माझ्या मॅडम करायच्या आणि बोलायच्या. जसं भांडी वेगवेगळी ठेवणे, जिन्यावर बसलं तर लगेच ही बाईची बसायची जागा नाही. खऱ्या आयुष्यातल्या प्रसंगांचं त्या अगदी सहजपणे विनोदात रुपांतर करतात. अगदी साधा रेल्वेतला चेन विकण्याचा किस्सा असो वा शोच्या सुरूवातीलाच हसतहसत स्टँडअप कॉमेडीअन्सवर भाष्य करणं असो. पहा तुम्हीच दीपिका म्हात्रे यांच्या कॉमेडीची एक छान झलक -

Subscribe to POPxoTV

मोलकरणींचा टॅलेंट शो


दीपिका म्हात्रे सांगतात की, एक दिवस एका मॅडमनी सोसायटीतल्या मोलकरणींचा टॅलेंट शो आयोजित केला आणि सांगितलं की, ज्यांच्यामध्ये काही चांगली कला असेल त्यांनी ती या शोमध्ये सादर करा. या कार्यक्रमाला एक पत्रकार आला होता, ज्याला हा शो फारच आवडला आणि त्यांनी दीपिकाला सुचवलं की, तुम्ही लोकप्रिय स्टँडअप कॉमेडिअन अदिती मित्तलची भेट घ्यावी. यानंतर लवकरच त्यांना भेटायला अदिती मित्तल आली आणि तिने दीपिका यांच्या पहिल्या स्टँडअपल कॉमेडी शोसाठी तयारी करून घेतली. 


पहिला स्टँडअप कॉमेडी परफॉर्मन्स


Deepika Mhatre 2
या भेटीनंतर काही महिन्यातच दीपिका म्हात्रे यांचा पहिला स्टँडअप कॉमेडी परफॉर्मन्स झाला, ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांनी त्यांच्या शो चं खूप कौतुक केलं आणि त्यांचं ही अभिनंदन केलं. एवढंच नाहीतर काही लोकांनी मोलकरणींबाबत करण्यात येणाऱ्या भेदभावांबद्दल त्यांची माफीही मागितली. दीपिका म्हात्रे यांनी सांगितलं की, त्यांच्या प्रेक्षकांमध्ये जास्तकरून अशी लोक असतात, ज्यांची त्या आपल्या शोमध्ये खिल्ली उडवतात. त्यांनी हसत हसत म्हणाल्या की, त्यांनी आपल्या मॅडमनाही सांगितलं की, मी तुमच्यावरही विनोद करणार आहे.   


माझी कॉमेडी न्यायासाठी उठवलेला माझा आवाज
 

 

 


View this post on Instagram


 

 

#Repost @thebrownbreadcollective (@get_repost) ・・・ Deepika Mhatre is up next at Comedians Telling Stories


A post shared by Deepika Mhatre (@deepikamhatre25) on
दीपिक म्हात्रे यांचं म्हणणं आहे की, घरोघरी काम करणाऱ्या बहुतेक मोलकरणी या त्यांच्याप्रती होणाऱ्या भेदभावाबद्दल कधीच तक्रार किंवा विरोध करत नाहीत, कारण त्यांना वाटतं की त्यांचं काम हातातून निसटेल. पण मला कोणाची भीती वाटत नाही. याच कारण म्हणजे आमच्यापेक्षा जास्त गरजही आम्हाला कामावर ठेवणाऱ्यांना आहे. जर आम्ही काम करायचं सोडलं तर त्यांना जास्त नुकसान होईल. आम्हाला तर नवीन काम मिळेल. मी करत असलेली कॉमेडी ही न्यायासाठी मी उठवलेला आवाज आहे.


स्टँडअप कॉमेडीमुळे महिलांच्या आत्मविश्वासात वाढ
पुरुषांचं प्रभुत्व असलेल्या स्टँडअप कॉमेडीच्या क्षेत्रात दीपिका म्हात्रे यांनी महिलांसाठी एक वेगळी जागा बनवली आहे, ज्या वेगवेगळ्या क्षेत्रांतून येतात. याबाबत त्या सांगतात की, प्रत्येक महिलेने प्रगती करायला हवी आणि कोणत्याही परिस्थितीत मागे न वळता किंवा न झुकता प्रत्येक गोष्टींचा सामना केला पाहिजे. या संदर्भात स्टँडअप कॉमेडी महिलांचं आत्मविश्वास वाढवणारं क्षेत्र आहे, जिथे स्टेजवर उभं राहून तुम्ही लोकांशी मोकळेपणाने बोलू शकता.   


कॉमेडी बाईचे व्हायरल व्हीडिओ

आता दीपिका म्हात्रे यांचे कॉमेडी व्हीडीओज चांगलेच व्हायरल झाले आहेत आणि त्यांना अनेक टीव्ही शोजच्या ऑफरसुद्धा आल्या आहेत. त्यांच्या दोन मुली ज्या आधी त्यांना कॉमेडी शोज करण्यापासून थांबवत होत्या, आज त्यांना दीपिका म्हात्रे यांचा अभिमान वाटतो.