सिनेमांपेक्षा अफेअर्समुळे मिळाली फरहानला प्रसिद्धी

सिनेमांपेक्षा अफेअर्समुळे मिळाली फरहानला प्रसिद्धी

मिल्खा सिंहच्या बायोपिकनंतर एका रात्रीत स्टार झालेला फरहान अख्तरचा आज वाढदिवस आहे. ९ जानेवारी १९७४ रोजी त्याचा जन्म मुंबईत झाला. सुप्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांचा फरहान मुलगा. फरहानचा एकूणच अभिनेता म्हणून करिअरग्राफ पाहिला तर तो फारसा चांगला नसला तरी फरहान कायम चर्चेत राहिला तो त्याच्या अफेयर्समुळे. सिनेसृष्टीत अभिनेत्रींची नावे अनेक अभिनेत्यांशी, खेळाडूंशी, बिझनेसमनशी जोडण्यात येतात. तशीच फरहानचे नाव देखील अनेक अभिनेत्रींशी आतापर्यंत जोडण्यात आली आहेत. कोणासोबत फरहानचे नाव जोडण्यात आले आणि सध्या तो काय करतोय याविषयीच सर्वकाही...'या 'अभिनेत्रीसोबत होते फरहानचे अफेअर्ससिनेसृष्टीत फरहानच्या अभिनयाची जशी चर्चा झाली. त्याहून कैक पटीने अधिक त्याच्या अफेअर्सची चर्चा करण्यात आली. फरहान या क्षेत्रात येण्यापूर्वीच विवाहबद्ध होता. त्याची बायको अधूना सोबत त्याचे संबंध बिघडले आणि त्यांचे लग्न तुटले. हे लग्न तुटण्यासाठी श्रद्धा कपूर कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. अर्थातच त्याचे नाव श्रद्धा कपूरशी जोडण्यात आले. अनेकांनी त्यांना एकत्र फिरताना देखील पाहिले. २०१८ या वर्षात त्यांच्या अफेयर्सची जोरदार चर्चा रंगली होती. प्रसारमाध्यमांनी देखील त्यांना भांडाऊन सोडले होते. अशी देखील चर्चा होती की, फरहानच्या घटस्फोटासाठी श्रद्धा कपूर जबाबदार होती. शिवाय श्रद्धा फरहान अख्तरच्या घरी राहिली हा राग मनात ठेवून शक्ती कपूर फरहानच्या घरी पोहोचले आणि तिला घेऊन आले. त्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला असे म्हटले जाते.


45379925 2333015293651553 4027638387614011867 n %281%29


 सध्या हिला करतोय डेट, लवकरच करणार लग्न?सध्या फरहान एका नवीन अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे कळत आहे. ही अभिनेत्री अन्य कोणी नाही तर ही पोळी साजूक तुपातली फेम शिबानी दांडेकर आहे. टाईमपास सिनेमातील आयटम साँगमधून ती मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेली. पण सध्या ही अभिनेत्री आणि फरहान अख्तर रिलेशनशीपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. या नुसत्या वायफळ चर्चा नसून त्याचे पुरावे नेटिझन्सच्या हाताला लागले आहेत. २०१९ या नव्या वर्षाचे स्वागत या दोघांनी एकत्र केले. फरहानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हे फोटो शेअर केले आहेत. हा आता या शेअर केलेल्या फोटोला काहीच कॅप्शन दिले नाही. पण लोकांनी आता हे त्याचं नव रिलेशनशीप अस गृहितच धरल आहे. शिवाय दीपिका आणि रणवीरच्या रिसेप्शनमध्ये ही दोघंजण हातात हात घालूनच आली होती. त्यामुळे आता यांच्या अफेअर्ससोबतच ते लवकर लग्न करणार असे देखील म्हटले जात आहे.


39628528 2278020385544804 7069375646476009472 n


47582167 441111359758408 7426841006565268595 n


44738322 207111446867949 4989263313347863744 n


अधुनासोबतची 'अधुरी कहानी'


अधुना ही फरहानची पहिली बायको, 'दिल चाहता है' या सिनेमाच्या सेटवर त्यांची ओळख झाली आणि तेथूनच त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. ३ वर्ष त्यांच प्रेमप्रकरण चाललं. त्यानंतर त्यांनी लग्न केले. १५ वर्ष त्यांच्यातील नाते टिकून होते. त्यांना 'स्टायलिश कपल'च्या नावाच्या नावाने देखील ते ओळखले जात होते. पण दुर्देवाने त्यांची ही प्रेमकहाणी १५ वर्षानंतर संपुष्टात आली.


32367730 190371284939672 5146349978662207488 n


मल्टी टॅलेंटेड फरहान


फरहान अख्तरची सुरुवात ही दिग्दर्शनापासून झाली. दिल चाहता हे या सिनेमाचे दिग्दर्शन त्याने केले आणि त्याच्या अभिनयाची पहिली झलक 'डॉन' या सिनेमाच्या रिमेकमध्ये पाहायला मिळाली. मग काय त्याने अभिनयाला सुरुवात केली. पण अभिनयाव्यतिरिक्त इतरक्षेत्रातही फरहान अगदी अव्वल आहे. दिग्दर्शर, निर्माता, लेखक आणि गायक अशा सगळ्या भूमिका त्याने लीलया पार पाडल्या आहेत त्यामुळे त्याला मल्टी टॅलेंटेड म्हटले जाते.


सौजन्य- इन्स्टाग्राम