16 जानेवारी 2019 चं राशीफळ

16 जानेवारी 2019 चं राशीफळ

मेष - आज बोलताना सावध रहा


तुमचा स्वभाव कसाही अस दू दे मात्र आज तुम्हाला सावधपणेच बोलावं लागणार आहे. आपल्या बोलण्याने कुणाचंही मन दुखवणार नाही, आपलं नुकसान होणार नाही याचीही काळजी घ्या. स्वत:मधील सहनशीलता आज तुम्हाला वाढवावी लागले. आज त़़डजोड करावी लागेल. स्पर्धा परिक्षेंचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज तुमचे शत्रू पराभूत होतील. जबाबदाऱ्या टाळण्याचा प्रयत्न कराल.


कुंभ - बाहेरील पदार्थ खाऊ नका


घरचे जेवण कधीही योग्य, हे कोणीही मान्य करेल. मात्र कधी कधी आपल्याकडे पर्याय नसतो. त्यामुळे बाहेरील पदार्थ खावेच लागतात. मात्र आज तुम्हाला बाहेरील पदार्थ टाळावेच लागतील. तशीच काही गरज असेल तर किंवा जंक फूड टाळावेच. आज जंक फूडचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. आज तुम्हाला मित्रांकडून आनंद प्राप्त होणार आहे. आज मित्रांमध्ये तुम्ही रममाण होणार आहात. मात्र आज तुमचा खर्चही अधिक होणार आहे. त्यामुळे खर्चाकडे आज तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागणार आहे. आज तुम्हाला मानसिक शांततेची अनुभूतीही मिळू शकते.


मीन - सासुरवाडीकडून लाभ होतील


घरात सुखशांती हवी असेल तर जोडीदाराची मर्जी व सासुरवाडीकडील मंडळींशी योग्य सुसंवाद राखला जाणे आवश्यक असते. आज तुम्हाला सासुरवाडीकडून एखाद्या गोष्टीमध्ये लाभ मिळू शकतो. त्यामुळे फक्त तुम्हालाच नाही तर संपूर्ण घरामध्ये आज आनंदाचे वातावरण राहिल. त्यामुळे घरी आज प्रसन्न वातावरण राहिल. एखाद्याविषयी मात्र वैरभावना तुमच्या मनात असेल तर त्याचा आज तुम्हाला त्याग करावा लागणार आहे. त्यात तुमचेच नुकसान आहे. म्हणून आजच्या आनंदी दिवसाचा योग्य लाभ करुन घेऊन संबंध सुधारण्यावर भर द्या.


वृषभ - वैवाहिक सुख मिळेल


तुमच्यासाठी आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे. कारण आज तुम्हाला वैवाहिक आयुष्यात विविध रंग अनुभवायला मिळणार आहेत. त्यामुळे परिपूर्ण वैवाहिक सुखही आज तुम्हाला अनुभवता येणार आहे. आज तुमच्यासह तुमची मुलंही सामाजिक कार्यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होतील. तसेच आज खर्च होणार असून यी खर्चातूनही तुम्ही आनंदाची प्राप्ती करुन घेणार आहात. थोडक्यात आज सर्वत्र आनंदी आनंद भरलेला असेल. आज जोडीदाराच्या इच्छेप्रामणे तुम्ही वागणार आहात. विद्यार्थी मात्र आज अभ्यास टाळण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे त्यांचा आज अभ्यासाच्या व्यतिरीक्त इतर गोष्टी करण्यावर त्यांचा भर असेल.


मिथुन - भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता आहे


कौटुंबिक कलह प्रगतीस मारक ठरतात त्यामुळे घरातील वाद शक्य तितक्या लवकर मिटवणे सर्वांच्याच हिताचे राहिल. आज तुमचे भावंडांशी मदभेद होऊ शकतात. वाद न वाढवता तो कसा मिटवता येईल किंवा वादच होणार नाही याची काळजी घ्या. जेणे करुन संबंध ताणले जाणार नाहीत. आज तुम्ही जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न कराल. संतती आज सामाजिक कार्यामध्ये रममाण होणार आहे. आज सरकारी कर्मचारी गोंधळात पडू शकतात. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी आज कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वकच घ्यावा. जेणे करुन चुकीचं काम किंवा वरिष्ठांची नाराजी उद्भवणार नाही.


कर्क - अगोदर परिश्रम घ्या मगच भाग्योदय होईल


यश मिळविण्यासाठी परिश्रम व प्रयत्नांमधील सातत्य या गोष्टी आवश्यक असतात. मात्र त्याला भाग्याचीही जोड असावी लागते. भाग्यानुसार यश केव्हा मिळेल हे ठरत असते. आज तुम्हाला यश लगेच मिळणार नाही. आज नियती तुमच्याकडून अगोदर परिश्रम करुन घेणार आहे. त्यानंतरच तुम्हाला भाग्याची साथ मिळणार आहे. तुमच्या  योग्यतेला आज योग्य उंची मिळून तुमच्या मानसन्मानात वाढ होणार आहे. व्यवसायात आज दैदिप्यमान यश तुम्ही प्राप्त करु शकता. लहान भावंडांची काळजी घ्यायला विसरु नका. त्यांना काही हवं असेल तर ते जाणून घ्यायचा प्रयत्न करा.


सिंह- तडजोड करा


आज स्वत:चे म्हणणे किंवा हेका बाजुला ठेवून तडजोडीचे धोरण स्विकारणे गरजेचे आहे. आज तुम्हाला हे स्विकारावे लागेल तरच तुमच्या पदरात आज काहीतरी पडू शकतं. त्यामुळे आज जिथे गरज असेल तिथे थोडं वाकायला, मागे हटायला अजिबात मागेपुढे पाहू नका. त्याने लाभ तुमचाच होणार आहे. आज रक्तदाबाचा त्रास असल्यांना आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे. आज इतरांची मदत करुन, मर्जी जिंकून, चांगलं बोलून जितके आशीर्वाद तुम्हाला मिळविता येतील तेवढे मिळविण्याचा प्रयत्न करावा. पारिवारीक संपत्तीचा वाद आज मिटणार आहे. त्यामुळे आनंदी आनंद असेल.


कन्या - अतिविचार घातक ठरतील


विचार करणे, चिंतन, मनन करणे ही चांगली बाब आहे. आयुष्यात या बाबींचा फायदाच होत असतो. मात्र सर्व सोडून फक्त विचारच करीत बसणे किंवा कुठल्यातरी एका गोष्टीवर जास्त विचार करणे, मनाला लावून घेणे हे घातक असते. हे तुम्हाला शिकविणारा आजचा दिवस आहे. त्यामुळे आज कोणत्याही गोष्टीवर जास्त विचार करु नका. आज स्त्री पक्षाकडून तुम्हाला सहयोग मिळणार आहे. त्यामुळे आनंदी वातावरण राहिल. हातात घेतलेले एखादे काम अपूर्ण असेल तर आज चिकाटी सोडू नका. प्रयत्न करीत राहा..


तूळ - शत्रू पराभूत होतील


जीवन जगत असताना जसे आपल्या विचारांचे समर्थन करणारे लोक आपोआप तयार होत असतात, तसेच आपल्या विचारांचे विरोधकही आपोआप तयार होत असतात. त्यात आपली काहीच चुक नसते. त्यामुळे त्यांचा जास्त विचार करु नये. तरीही त्यांनी निर्माण केलेले अडथळे आपल्यासाठी आज त्रासदायक ठरत असतात.नोकरीसह व्यवसायातही आज चांगल्या संधी आहेत. त्यामुळे त्यांचा चांगल्या पद्धतीने सदुपयोग करुन घ्या. आज एखाद्या कामाला जास्त वेळ लागू शकतो. म्हणून विचलित होऊ नका. प्रयत्न करीत राहा.


वृश्चिक - चिंता करू नका


चिंता चिता जाळते, अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. कोणत्याही गोष्टीची चिंता ही आपल्या प्रगतीसाठी मारक तर ठरतेच सोबतच आपले मानसिक खच्चीकरणही करीत असते. त्यामुळे आयुष्यात चिंतन हवे मात्र चिंता कुठल्याच गोष्टीची चिंता नको. हे शिकविणारा आज तुमचा दिवस आहे. आज एखाद्या गोष्टीवर चिंतन कराल. मात्र त्या चिंतनाचे रुपांतर चिंतेत होऊ देऊ नका. आपल्या शब्दांवर व भावनेवर नियंत्रण ठेवा. अनावश्यक कुठलीच शेरेबाजी आज नको. कल्पक व सर्जनशील कार्यामध्ये आज प्रगती होऊ शकते. तसेच आज एखाद्याबद्दल गैरसमजही होऊ शकतो. म्हणून सावध राहा.


धनु - धार्मिक कार्यात आनंद घ्या


नंद व मनशांती मिळविण्यासाठी आजच्या काळातील सोपी गोष्ट म्हणजे धार्मिक कार्यामध्ये, आध्यात्मिक गोष्टींमध्ये मन रमविणे होय. याची अनुभूती तुम्हाला करुन देणारा आजचा दिवस आहे. त्यामुळे आज मनशांती मिळविण्याला चुकू नका. आज तुम्हाला अन्नबाधाही होऊ शकते. म्हणून आज आपल्या आहारावर आज नियंत्रण ठेवून आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल. तसेच आज शक्य तितके व शक्य तेवढ्या मार्गाने जितके आशीर्वाद तुम्हाला मिळविता येतील तितके मिळविण्याचा प्रयत्न करावा. त्यात तुमचाच फायदा आहे.


मकर -सरकारी कर्मचारी सावधान रहा


सरकारी कर्मचारी आज गोंधळात पडू शकतात. म्हणून आज त्यांनी सावधान राहून कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावयाचा आहे. अशी कुठलीही गोष्ट आज नको त्यातून आपले नुकसान किंवा वरिष्ठांची नाराजी ओढवली जाईल. व्यावसायिकांनी आज नफ्याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. थोडीशीही बेशिस्त किंवा आळस आज नुकसान व मोठ्या नफ्यापासून तुम्हाला वंचित ठेऊ शकतं. शाररीक व मानसिक सुदृढतेसाठी वेळोवेळी व्यायाम करीत राहा. आपल्या कार्यात व्यस्त राहण्याचा आजचा दिवस आहे.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद