19 जानेवारी 2019 चं राशीफळ

19 जानेवारी 2019 चं राशीफळ

मेष - नातेसंबंधांमध्ये दुरावा येईल


एखाद्या विषयी समज होणे आणि गैरसमज होणे यात खूप अंतर असतं. मात्र हे झाल्यानंतरच आपल्याला कळत असतं. आपला गैरसमज झालेला आहे हे आपल्याला नंतर समजतं. म्हणूनच कोणाविषयी समज किंवा गैरसमज करुन घेत असताना खूप सावधान राहावं. आज तुमचा जोडीदाराबद्दल गैरसमज निर्माण होऊ शकतो परिणामी संबंधांमध्ये दुरावाही येऊ शकतो. आज तुमचे शत्रूही पराभूत होऊ शकतात. आज आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याकडे दुर्लक्ष करु नका. आपल्या कुटुंबामध्ये जर संपत्तीचा वाद सुरु असेल तर आज तो मिटण्याची शक्यता आहे. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न करायला चुकू नका.


कुंभ - संधीचा लाभ घ्या


जीवनामध्ये वेळोवेळी मिळालेल्या संधीचं जो सोनं करतो, योग्य लाभ घेतो तोच व्यक्ती यशस्वी होऊ शकतो. आजचा दिवस तुमच्यासाठी नोकरी व व्यवसायामध्ये संधी निर्माण करणारा दिवस आहे. संधीला ओळखून तिचा योग्य तो लाभ घ्या. अनियंत्रीत आहारामुळे आज अपचनाचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे आज आहार व आपलं आरोग्य याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. ओळखीच्या व्यक्तींबरोबर सामंजस्य वाढविण्याचीही आज तुम्हाला संधी आहे. या संधीला सोडू नका. आज एखाद्या लहान फायद्यासाठी मोठं नुकसान होणार नाही याचीही काळजी घ्या.


मीन - व्यवसायात यश


जीवनात यश अपयश हे सुरुच राहतं. त्यामुळे अपयशात खचून जाऊ नये. यश मिळवून देणा-या संधीचा लाभ घ्यायला चुकू नये. आज व्यवसायामध्ये तुम्हाला संधी प्राप्त होणार आहे. व्यावसायिकांनी तिचा लाभ घ्यायला चुकू नये. सरकारी कर्मचा-यांना मात्र आज गोंधळात टाकणारा दिवस आहे. त्यांनी आज कोणताही निर्णय विचारपूर्वकच घ्यायला हवा. वरीष्ठांची नाराजी होणार नाही किंवा आपल्या हातून काही चुक होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. कल्पक व सर्जनशील कार्यामध्ये आज प्रगती होऊ शकते. तुमच्या कल्पकतेला आज वाव मिळू शकतो. आज तुमच्या नवीन ओळखीही होऊ शकतात.


वृषभ - प्रवासातून आनंद मिळेल


प्रवास हा जीवनासाठी आवश्यक असतो. प्रवास हा कोणत्याही कारणासाठी केला जात असला तरी त्यातून आनंद मिळतो. कारण त्यामुळे आपण रोजच्या दिनचर्येतून बाहेर पडत असतो. त्यात जर प्रवास जोडीदारासोबत केला जात असेल तर त्यापेक्षा दुसरा आनंद नसतो. परिणाम संपूर्ण घरात आनंदी आनंद भरलेला राहतो. आजचा दिवस व्यापार, व्यवसायासाठीही सुखद असा आहे. वेगवेगळ्या संधी आज आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे त्यांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सजग राहावं लागेल. आपल्या योग्यतेची उंची आज वाढणार आहे. त्यामुळे आपल्या मानसन्मानामध्येही वाढ होणार आहे.


मिथुन - सासरच्या मंडळींशी वाद होतील


वाद कुणाचाशी असला तरी तो वाईटच असतो. त्यातूनच कुणालाच लाभ नसतो. त्यात जर तो आपल्या घरच्यांशी किंवा सासरच्या मंडळींशी असेल तर त्याच्यासारखी वाईट बाब नाही. कारण त्यामुळे आपल्या घरात कलह निर्माण होतात. याचा अनुभव करुन देणारा दिवस आहे. कारण आज सासरकडच्या मंडळींशी तुमचा वाद होऊ शकतो. तो वाद कसा मिटवता येईल किंवा वाढणार कसा नाही यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. संधीवात असणा­-या रुग्णांसाठी आजचा दिवस त्रास वाढविणारा असेल. त्यामुळे आज त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. आधी परिश्रम नंतर भाग्य म्हणजे यश याचाही अनुभव आज तुम्हाला मिळू शकतो.


कर्क - वाहन सावकाश चालवा


कोणतीही दुर्घटना ही सांगून घडत नाही. त्यासाठी आपलाला सावध राहावेच लागते. विशेषत: वाहन चालवित असतांना याची विशेष काळजी घ्यावी. आज तुम्ही वाहन सावकाश चालवायचे आहे. कुठे तातडीने पोहचायचे असेल तर थोडं वेळच्या आधी निघा. म्हणजे घाई किंवा उशीर होणार नाही. आपली महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा. म्हणजे ती वेळेवर बरोबर सापडतील. सतत परिश्रम करुनही यश मिळत नसेल तर आपल्या कर्मामध्ये, करीत असलेल्या प्रयत्नांमध्ये बदल करुन पाहण्यास हरकत नाही. त्यामुळे तुमचं भाग्य बदलू शकतं. व्यावसायिकांनी आपल्या नफ्याकडे आज लक्ष देणं गरजेचं आहे.


सिंह - घरातील शितयुद्ध दूर ठेवावे


कधीकधी माणसं आपल्या कामामध्ये इतकी गुरफूटून जातात की त्याचं आपल्या घराकडे लक्षच नसतं. त्याला वाटतं घरात सगळं व्यवस्थित सुरु आहे. मात्र नेहमीच तसं नसतं. कधीकधी घरामध्ये एक शितयुद्ध सुरु असतं हे तुम्हाला शिकविणारा आजचा दिवस आहे. थोडं घराकडे लक्ष द्या. जर त्यात शितयुद्ध सुरु असेल तर ते वाढण्याआधीच हस्तक्षेप करा. कारण एकदा का घरात कलह आणि गैरसमज झालेत तर ते लवकर दूर होत नाहीत. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे त्यांना आज आपल्या आरोग्यावर लक्ष दे­ण्याची गरज आहे. एखाद्या गोष्टीवर तुम्हाला विनाकारण संताप येऊ शकतो. त्याला आवर घाला. शक्य तितके आशीर्वाद मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत.


कन्या - कल्पकतेला वाव मिळेल


आज तुमच्या कल्पक व सर्जनशील कार्याला यश मिळणार आहे. विशेषत: लेखक मंडळीच्या लेखन कार्याला आज यश मिळू शकतं. त्यामुळे त्यांच्या मानसन्मानातही वाढ होऊ शकतं. अधिकारी वर्गाच्या हातात जर एखादे काम अडकून पडलेले असेल आज प्रयत्न वाढवायला हवे. ते आज नक्कीच पूर्ण होऊ शकतं. चिकाटीने जर आपण प्रयत्न करीत राहिलो तर यश मिळतंच याचाही अनुभव आज तुम्ही घेऊ शकतात. आज तुम्हाला मित्रांकडूनही आनंद प्राप्त होऊ शकतो. मित्रांमध्ये आज तुम्ही रममाण होणार आहात. त्यांच्यासोबत एखाद्या गोष्टीचे नियोजन आज तुम्ही करणार आहात. त्यामुळे आज आनंदी आनंद असेल.


तूळ - आरोग्य सुदृढ राहिल


आज तुम्ही तनासह मनानेही सुदृढता अनुभवणार आहात. ही सुदृढता कायम टिकवून ठेवण्यासाठी वेळोवेळी व्यायाम करायला विसरु नका. कामामध्ये आज तुम्हाला उत्साह जाणवेल. मनशांती मिळविण्यासाठी प्रयत्न कराल. त्यामुळे घरात व घराबाहेरही आज तुमच्यासाठी आनंदी आनंद आहे. मात्र खर्चावर तेवढे नियंत्रण ठेवा. अवास्तव खर्च होणार असेल तर त्याला आवर घाला. आपलं उत्पन्न व खर्च यांचा योग्य ताळमेळ बसवा. ते भविष्यासाठीही तुम्हाला फार उपयोगी पडणार आहे. त्याची सवय लावून घ्या.


वृश्चिक - वैरभावनेचा त्याग करा


कोणतीही व्यक्ती हा पूर्णपणे कधीच चांगली अथवा वाईट नसते. त्यामुळे एखाद्याशी फक्त वैचारीक भेद असले तर चालतील मात्र वैरभावना मुळीच नको. तुमची कुणाविषयी वैर भावना असेल तर आज तिला संपवा. स्वत:मध्ये थोडी लवचिकता वाढवा. म्हणजे आज तडजोड करावी लागली तरी मागेपुढे पाहू नका. त्यात तुमचाच लाभ आहे. अमर्याद सहनशीलता व उत्साह या दोन्ही लाभ आज तुम्हाला मिळणार आहे. त्याचा योग तो वापर करुन घ्या.


धनु - मुलांची चिंता जाणवेल


आपण मुलांचे फक्त पालक असतो. त्याचें मालक आपण कधीही होऊ नये. तसा होण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आपल्यालाच अधिक त्रास होतो. याची अनुभूती आज तुम्हाला मिळू शकते. कारण आज मुलं तुमच्या इच्छेप्रमाणे वागणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला मुलांची चिंता जाणवू शकते. लहान भावडांचीही आज तुम्हाला काळजी घ्यायची आहे. मात्र काळजी घेणं म्हणजे त्यांनी तुमच्या मताप्रमाणे वागणं असा अर्थ होत नाही. मनासारखी गोष्ट झाली नाही तर उगाच चिंता करीत बसू नका. हाती घेतलेलं एखादं काम अपूर्ण असेल तर चिकाटी ठेवून प्रयत्न करीत राहा. आज तुम्हाला यश नक्कीच मिळेल.


मकर - संतती सुख मिळेल


आपल्या मुलांनी एखादी गोष्ट केली किंवा कुठल्या गोष्टीत यश मिळवलं तर आपल्याला त्यांचं कौतुक वाटतं. मनस्वी आनंद होत असतो. आज तुमची मुलं सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकतात. याचा तुम्हाला आनंद व अभिमान वाटेल. त्यामुळे घरात मानसिक सुख शांतीचे वातावरण तयार होईल. परिणामी आजचा तुमचा दिवस अगदी आनंदात जाईल. एखाद्या कामाला पूर्ण हो­ण्यामध्ये उशिर होत असेल तर निराश होऊ नका. प्रयत्न करीत राहात. भुतकाळात घडून गेलेल्या एखाद्या आनंददायी गोष्टीचा आज पुन्हा आनंद मिळू शकतो.


 लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद