23 जानेवारी 2019 चं राशीफळ

23 जानेवारी 2019 चं राशीफळ

मेष - शत्रू पराभूत होतील


कार्यरत असतांना आपल्या विचारांचे समर्थक व आपल्या विचारांचे विरोधक असे दोन्ही लोक आपोआप तयार होत असतात. समर्थक सहकार्य करतात तर विरोधक कार्यामध्ये अडथळे निर्माण करीत असतात. आपला अपमान करीत असतात. त्यामुळे एखादं यश मिळविल्यानंतर किंवा कार्य पूर्ण झाल्यानंतर त्याचा आनंद तर असतोच मात्र आपले शत्रु पराभूत झाल्याचाही आनंद होत असतो. हा मनुष्य स्वभाव आहे. हा आज तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे जे काम अपूर्ण असेल ते पूर्ण करण्यासाठी आज प्रयत्न वाढवायला हवेत. आज मित्रांकडूनही तुम्हाला आनंद प्राप्त होऊ शकतो. अमर्याद सहनशीलता व उत्साह या दोन्ही गोष्टींनी आज तुम्ही परिपूर्ण राहणार आहात. फक्त कार्यमधली लवचिकता थोडी वाढवा. एकंदरीत आजचा दिवस चांगला आहे, त्याचा योग्य तो लाभ घ्या.


कुंभ - लेखकांना यश मिळेल


लेखक हे सर्जनशील असतात. त्याच्या कलाकृतीवर, विचारांवर त्यांचे अतोनात प्रेम असते. त्यामुळे त्यांना त्यात यश प्राप्त झाले तर त्यांचा आनंद गगणात मावत नसतो. कुंभ राशीच्या लेखकांना हा आनंद आज प्राप्त होऊ शकतो. म्हणून त्यांनी दृष्टीने आज आपल्या प्रयत्नांमध्ये वाढ करायला हवी. आज आपल्या नवीन ओळखी होऊ शकतात. त्यामुळे सकारात्मकता अंगी बाणावून त्यांना आत्मवि·ाासाने सामोरे जा. एखाद्या गोष्टीवर आज विनाकारण संताप येऊ शकतो. म्हणून आज आपल्या रागावर आपल्याला नियंत्रण ठेवावे लागेल. अतिआत्मवि·ाास हा घातक असतो. उथळ पा­ण्याला खळखळात फार म्हणून जेही कराल ते विचारपूर्वकच करा. बेफिकीर राहू नका.


मीन - विचार करुन निर्णय घ्या


सर्वसाधरपणे कोणताही निर्णय घेतांना तो विचारपूर्वकच घेतला पाहिजे. मात्र काही वेळेस भावनांच्या आहारी जाऊन किंवा घाई घाई आपण एखादा निर्णय घेत असतो. त्यात ब-याच वेळा आपली चुक होऊन नंतर मग पश्चातापाची वेळ येते. तसे आपले आज होऊ नये म्हणून विशेषत: सरकारी कर्मचा-यांनी आज निर्णय घेतांना विचारपूर्वक घेतला पाहिजे. आज मानसिक सुख शांतीचे वातावरण राहिल. त्यामुळे घरात आनंदी आनंद असेल. आयुष्याबद्दल विचार करण्यासाठी आज तुम्हाला एकांताची गरज भासू शकते. एकांतात जाऊन चिंतन करा मात्र कठोर परिश्रमानंतरच यश प्राप्त होत हे लक्षात घ्या.


वृषभ - तोल मोल के बोल


माणसाला प्रत्येकवेळी आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवणे शक्य नसते. विशेषत: बोलक्या किंवा सरळ प्रवृत्तीच्या लोकांना ते अजिबात जमत नाही. मात्र आपली ही सवय कधी कधी एखाद्याला दुखवून आपलं नुकसान करु शकते. आज तुम्हाला तसा अनुभव येऊ शकतो. म्हणून आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवून तोलून मोलून आज तुम्हाला बोलावं लागणार आहे. आज ओळखीच्या लोकांबरोबर सामंज्यात वाढ होऊ शकते. परिणामी त्यांच्या सोबत असलेले संबंध अधिक दृढ होण्यास मदत मिळेल. आज आपल्या मानसन्मानतही वाढ होऊ शकते. त्यामुळे आपण जागरुक राहून ते स्विकारण्यासाठी तयार राहावं.


मिथुन - योग्यता उंची गाठेल


आपल्या योग्यतेनुसार आपल्याला कमी मिळतं असं प्रत्येक माणसाला नेहमीच वाटत असतं. मात्र कधी कधी आपली योग्यता वाढविणा-या घटना घडत असतात. त्याचा मनाला अतिव आनंद होत असतो. या आनंदाची तुम्ही आज अनुभूती घेणार आहात. भविष्यात एखादा मोठा फायदा होणार असेल मात्र त्यामुळे आज लहान नुकसान होणार असेल तर त्या नुकसानाला गुंतवणूक समजायला हवी. नाही तर भविष्यातील मोठा फायदाही होणार नाही. चार दिवस सासुचे आणि चार दिवस सुनेचेही असतात. ही सत्यता आपण लक्षात घेतली पाहिजे. क़ुणाविषयी वैरभाना आपल्या मनात असेल तर तिचा आज आपण त्याग केला पाहिजे. कलाकारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. त्यांच्या कलेला आज वाव मिळू शकतो. पाण्यातराहून माशांशी वैर पत्करु नये, ही गोष्ट लक्षात घ्यावी.


कर्क - परिश्रमानंतरच भाग्योदय


परिश्रमांच्या जोडीला भाग्य असेल तर यश प्राप्त होत असतं. भाग्य सोबत असेल यश प्राप्त करण्यासाठी जास्त परिश्रम करावे लागत नाही. मात्र भाग्य कधी कधी आपल्या धैर्याची, परिश्रमांची परिक्षा घेत असतं. म्हणून परिश्रम करण्यास चुकू नये. भाग्य लाभतचं म्हणजे यश प्राप्त होतच असतं. हे आपल्याला शिकविणारा आजचा दिवस असेल. म्हणून परिश्रम करीत राहा. तुम्हाला फळ नक्कीच मिळेल. आपल्या परिश्रमांवर विश्वास ठेवा. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण प्राप्तहोत नाही. म्हणून टिका, तक्रारी, समस्या यांनी हतबल होऊ नका. आपल्यावर परमेश्वराची कृपा असल्याची भावना मनात दाटू शकते. आज शब्दांवर नियंत्रण ठेवून एखाद्याविषयी तडका फडकी शेरेबाजी करायला नको.


सिंह - पश्चाताप करुन उपयोग नाही


अब पछताये क्या होत जब चिडिया चुन गई खेत या म्हणीनुसार एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर पश्चात करत बसण्याला काहीच अर्थ नसतो. हे आपल्याला शिकविणारा आजचा दिवस आहे. ही सत्यता आपण आज लक्षात घ्यावून आता पुढे काय करता येईल याचा विचार करायला हवा. भुतकाळात घडून गेलेल्या एखादी आनंददायी घटनेचा आनंद आज पुन्हा लाभू शकतो. त्यामुळे आनंदी आनंद राहिल. आज तुम्हाला आध्यात्मिक गोष्टीतूनही आनंद प्राप्त होऊ शकतो. मात्र सोबतच मनस्वास्थ्य बिघडवणारी एखादी घटना घडू शकते. कारण हा विरोधाभास आहे. आध्यात्मिक आनंदाने मनशांती लाभत असते. म्हणून त्यात मन गुंतवून ठेवा.


कन्या - प्रवासात नुकसान होण्याची शक्यता


कुठल्याही कारणाने केल्या जाणा-या प्रवासाचा आनंद घ्यायचा असतो. त्यात त्रास होणार असला तरी त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. कारण प्रवासामुळे आपल्या रोजच्या दिनचर्येतून बाहेर निघण्याची संधी आपल्याला मिळत असते. मात्र अशा प्रवासातून जर आपले नुकसान होणार असेल तर तो प्रवास टाळलेलाच बरा. आज तुम्ही प्रवास करणार आहात. मात्र शक्य तेवढा तो टाळ्याचा प्रयत्न करा. कारण त्यात तुमचे नुकसान होण्याची शक्यता. काम पूर्ण होण्यासाठी आज जास्त वेळ लागू शकतो. म्हणून विचलीत होत नका. प्रयत्न करीत राहा. आत्मविश्वास कमी होणार नाही, याकडे लक्ष ठेवा. एखादा आकस्मिक आनंद आज तुम्हाला प्राप्त होऊ शकतो.


तूळ - वाहन सावकाश चालवा


वाहनाला गती दिलेली असली तरी ते सावकाशच चालविले पाहिजे ही अत्यंत साधी गोष्ट आपल्या सर्वांनाच माहिती असते. मात्र गरजेनुसार आपण ती सोयिस्करपणे विसरत असतो किंवा त्याकडे दुर्लक्ष करीत असतो. आज मात्र ही गोष्ट तुम्हाला विसरुन चालणार नाही. आज वाहन सावकाशच चालवा. कुठे तातडीने पोहचायचे असेल तर वेळेच्या आधी निघा. ते तुमच्या फायद्याचे आहे. आज आपल्या एखाद्या कामात अडचणीही येऊ शकतात. म्हणून प्रयत्न सोडू नका. तुम्हाला यश नक्की मिळेल. आज तुम्ही कार्यात व्यस्त राहणार आहात. मात्र त्यात बेशिस्त नको. नाही तर तुमचेच नुकसान होऊ शकते.


वृश्चिक - कृतीत बदल करा


यश मिळविण्यासाठी भाग्याची साथ ­असणे आवश्यक असते. मात्र कधी कधी खूप प्रयत्न करुनही जर यश मिळत नसेल तर आपले प्रयत्न बरोबर आहेत का हेही बघणे गरजेचे असते. ते चुकीचे असेल त्या प्रयत्नांमध्ये म्हणजे कर्मातबदल करा, भाग्य आपोआप बदलत असल्याची अनुभूती आपल्याला मिळू शकते. म्हणून आज अपण करीत असलेले प्रयत्न आपण तपासून घेतले पाहिजे. मात्र ते जर बरोबर असतील तर चिकाटी कायम ठेवा. हातात घेतलेले कार्य पूर्ण करण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत राहा. भाग्याची साथ तुम्हाला नक्कीच मिळेल. आज तुम्हाला  अनोळखी लोकांचा विरोध सहन करावा लागू शकतो. त्यांना किती महत्त्व द्यायचं हे सर्वस्वी तुमच्यावरच अवलंबून आहे. धार्मिक कार्यातून आज तुम्ही आनंद व मनशांती प्राप्त करु शकता.


धनु - प्रवासातून संधी लाभतील


कुठल्याही कारणाने केल्या जाणा-या प्रवासाचा आनंद घ्यायचा असतो. त्यात त्रास होणार असला तरी त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. कारण प्रवासामुळे आपल्या रोजच्या दिनचर्येतून बाहेर निघण्याची संधी आपल्याला मिळत असते. अशा प्रवासातुन जर संधी लाभणार असतील तर तो आनंद द्विगुणीत होत असतो. या आनंदाची अनुभूती आज तुम्हाला प्राप्त होऊ शकते. त्यामुळे कसा वाढविता येईल यादृष्टीने तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. एखाद महत्त्वपूर्ण कार्य अपूर्ण असेल तर त्यासाठी प्रयत्न वाढवायला हवेत. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले काम अपूर्ण असेल तर आज प्रयत्न वाढवायला हरकत नाही. ते आज पूर्ण होऊ शकतं. धार्मिक कार्यातून आज तुम्ही आनंदासोबत मनशांतीही प्राप्त करु शकता.


मकर - सरकारी काम पूर्ण होईल


आपलं एखादं सरकारी काम अपूर्ण असेल तर आज प्रयत्न वाढवायला हवेत. कारण ते पूर्ण होऊन तुम्हाला अतिव आनंदाची प्राप्ती होऊ शकते. सोबतच एखादं महत्त्वपूर्ण कामही जर अपूर्ण असेल तर त्यासाठीही आज प्रयत्नांमध्ये वाढ करा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात एखादं काम अडकलेले असेल तर तेही पूर्ण होऊ शकतं. थोडक्यात आज दिवस तुमच्यासाठी अपूर्ण कार्याच्या पूर्णत्वाचा दिवस आहे. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न करुन त्याचा योग्य तो लाभ घ्या. एखाद्या धार्मिक कार्यामध्ये आज तुम्ही सहभागी होऊ शकता. त्यातून तुम्हाला मनशांतीचा अनुभव मिळेल.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद