25 जानेवारी 2019 चं राशीफळ

25 जानेवारी 2019 चं राशीफळ

मेष - आरोग्याकडे लक्ष द्या


जीवन जगत असतांना काही गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. आरोग्य त्यापैकी एक गोेष्ट आहे. मात्र आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये नेमके याकडेच दुर्लक्ष होत असतं. जेव्हा आपल्याला एखादा आजार जडतो तेव्हा लक्षात येतं की आपण आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हे आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून आज व येथून पुढे कायम आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. आज सासरच्या मंडळींशी वाद होऊ शकतो. त्यामुळे तो वाढणार नाही याची काळजी घ्यावी. आजतडजोडीचे धोरण स्विकारावे लागेल. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशीही स्थिती आज होऊ नये यासाठी काळजी घ्या. उत्पन्न व खर्च यांच्या नियंत्रण ठेवा. वाढणा-या खर्चाला आवर घाला.


कुंभ - विद्यार्थ्यांना  यश


आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगला दिवस आहे. विशेष करुन स्पर्धा परिक्षांचा अभ्यास जे विद्यार्थी करीत असतील त्यांनी आजच्या दिवसाचा पुरेपुर लाभ घ्यायला चुकू नका. लहान भावंडांची काळजी घ्या. ते बोलत नसतील मात्र कदाचित त्यांना तुमच्या मदतीची गरज असेल. त्यांची विचारपुस करा. ते तुमचं कर्तव्य आहे. आज जोडीदाराचा तुमच्यावर प्रभाव राहिल. जोडीदाराच्या म्हणण्याप्रमाणे आज तुम्ही वागणार आहात. आजचा दिवस तुमच्यासाठी आत्मवि·ाासाने भरलेला राहिल.


मीन - विद्यार्थी अभ्यास टाळतील


अभ्यास प्रगती हवी असेल तर विद्यार्थ्यांनी रोजचा अभ्यास त्याच दिवशी पूर्ण करणे गरजेचे आहे. विद्यार्थी मात्र असे करतांना दिसत नाहीत. काही दिवशी त्याचं अभ्यास लक्ष नसतं काही दिवस ते पूर्णपणे अभ्यासात गुंतलेले असतात. आजचा विद्यार्थ्यांसाठी अभ्यास टाळण्याचा आहे. मात्र याची सवय व्हायला नको याची पालकांनी काळजी घ्यायला हवी. कुटुंबात आज तुम्ही धैर्याने निर्णय घेणार आहात. त्याचे स्वागतही होऊ शकते. जोडीदाराचे आज तुम्हाला सहकार्य लाभेल. आज तुम्ही जोडीदाराच्या मर्जीप्रमाणे वागणार आहात. त्यामुळे खर्चही होण्याची शक्यता आहे.


वृषभ - आरोग्य चांगले राहिल


यशस्वी होण्यासाठी किंवा आपण करीत असलेले काम अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी तन व मन या दोघांचे आरोग्य सुदृढ राखणे आवश्यक आहे. या दोन्ही दृष्टीने आज तुम्ही सुदृढतेचा अनुभव कराल. त्यामुळे ते यापुढेही तसेच राखले जाईल यासाठी प्रयत्न करायला हवेत. आज आपला वडीलांशी संघर्ष होऊ शकतो. जी वाईट बाब आहे. म्हणून आज तडजोडीचे धोरण स्विकारुन प्रसंगी स्वत:हून नमते घेऊन वाद मिटविण्याचा प्रयत्न करावा. सोबतच खर्चाकडे लक्ष द्यावे.उत्पन्नापेक्षा खर्च जास्त व्हायला नको. अंथरुन पाहून हातपाय पसरावेत. कल्पक व सर्जनशील कार्यात आज प्रगती होऊ शकते. आपल्या कल्पनेला आज वाव मिळू शकतो. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. त्यामुळे तुम्हाला काही मिळवायचे असेल तर सोसावे लागेलच.


मिथुन - व्यायामासाठी वेळ द्या


जीवनामध्ये व्यायामाचं महत्त्व सर्वश्रृत आहे. तरीही त्याकडे आपण दुर्लक्ष करीत असतो. मात्र फक्त आजच नव्हे तर येथुन पुढे सदैव व्यायामासाठी पुरेसा वेळ देणे व वेळोवेळी व्यायाम करणे आपल्यासाठी अत्यावश्यक आहे. आपल्या राशीत चौथा असलेला चंद्र तुमच्या मनाला अस्वस्थता देऊ शकतो. त्यामुळे कामामध्येही तुमचे मन लागणार नाही. म्हणून ज्या गोष्टींमुळे आपल्याला चांगले वाटते तीच गोष्ट करुन आज इतरांकडे दुर्लक्ष करा. मुलं आज तुमच्या मनाप्रमाणे वागणार नाही. त्यामुळे तशी अपेक्षा आज धरु नका. हातात घेतलेले काम पूर्ण करण्यावर भर द्या.


कर्क - जंक फूड टाळा


जंक फूडच नव्हे तर बाहेरील विशेषत: उघड्यावरचे खाद्य पदार्थ खाणे शरीरासाठी चांगलं नसतं. तरीही काही वेळेला पर्याय नसतो. आज तुमच्यावर बाहेर खाण्याची वेळ आली तर किमान जंक फूड तरी खाऊ नका. त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. वैवाहिक जीवनामध्ये आज आनंदी आनंद असेल. जोडीदाराला आज तुम्ही पुरेसा वेळ देणार आहात. उत्पन्न व खर्च यांच्यात आज तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होता कामा नये. आज तुमच्या नवीन ओळखीही होऊ शकतात. त्यामुळे सकारात्मकता ठेवून आत्मवि·ाासपूर्वक त्यांना सामारे जा.


सिंह - सासुरवाडीकडून लाभ


आज तुम्हाला सासुरवाडीकडून लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही परिवारांमध्ये आनंदाचे वातावरण असेल. आज तुम्हाला अपचनाचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेऊन आपल्या आरोग्याचीही काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. आज विशेषत: व्यावसायिकांनी आपल्या नफ्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ओळखीच्या व्यक्तींबरोबर सामंजस्य वाढून संबंधांमध्ये सुधारणा होऊ शकते. थोडक्यात आजचा दिवस तुमच्यासाठी संमीश्र स्वरुपाचा असून सद्सद विवेकबुद्धी जागृत ठेवून तुम्ही त्याचा योग्य तो लाभ घेऊ शकता.


कन्या - वडीलांकडून मार्गदर्शन मिळेल


वडीलधा-या मंडळींनी आपल्यापेक्षा चार पावसाळे जास्त बघितलेले असतात. आपले क्षेत्र कुठलेही असले तरी जीवनातील त्यांचा अनुभव आपल्यापेक्षा मोठा असतो. म्हणून त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत. आज तुम्हाला वडीलांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळू शकतो. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा आपल्या कामामध्ये उपयोग करुन घ्या. आज तुम्हाला अन्नबाधा होऊ शकते. त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवून आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे.व्यवसायात गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून व्यावसायिकांनी आज विचारपूर्वकच निर्णय घेतला पाहिजे. भुतकाळामध्ये घडून गेलेली एखादी आनंददायी घटना आज तुम्हाला पुन्हा आनंद प्रदान करु शकते.


तुळ - आरोग्याची काळजी घ्या


आज विशेषत: रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आपल्या झेपेल तेच काम करणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला रक्तदाब वाढणार नाही किंवा कमीही होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. आज स्त्री पक्षाकडून आपल्याला सहयोग मिळू शकतो. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहिल. आज तुम्ही जोड व्यवसायचाही विचार करु शकता. मात्र तो करीत असतांना हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे चुकीचे आहे. मुख्य व्यवसायाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. एखाद्या जुन्या गोष्टींचा आज पुन्हा आनंद मिळू शकतो.


वृश्चिक - वास्तूवर खर्च कराल


आपण ज्या वास्तुत राहतो तिचा खूप मोठा परिणाम आपल्यावर होत असतो. आपल्या सोबत तीही जगत असते. आपल्या सर्व सुख-दु:खाची ती साक्षीदार असते. त्यामुळे आपर आनंदाने वास्तुवर खर्च करीत असतो. आज हा आनंदतुम्हाला मिळू शकतो. प्रॉपर्टीमधूनही आज तुम्हाला आनंद प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण राहू शकते. एखादे महत्त्वपूर्ण कार्य जर अपूर्ण असेल तर आज प्रयत्न वाढवायला हरकत नाही. आज ते पूर्ण होऊ शकतं. थोडक्यात आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असून त्याचा योग्य तो उपयोग करुन घ्या.


धनु - संतती यश मिळवेल


आपल्या मुलांनी एखाद्या गोष्टीत यश मिळवणं ही पालकांसाठी खूप आनंदाची, अभिमानाची, कौतुकाची बाब असते. भलेही मग ती छोटी गोष्ट असली तरीही! हा आनंद आज आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे आनंद साजरा करा आणि आपल्या पाल्याला योग्य ते प्रोत्साहनही द्यायला विसरु नका. आज तुमचे प्रवासाचेही योग आहेत. तेही जोडीदारासोबत. त्यामुळे आज आनंदी आनंद असेल. नोकरी व व्यवसायामध्येही आज तुम्हाला संधी मिळू शकतात. त्याचा योग्य तो लाभ घ्यायला चुकू नका. आयुष्याबद्दल विचार करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी आज तुम्ही एकांत शोधणार आहात. त्यातुन तुम्हाला नवे मार्ग सापडू शकतात.


मकर - व्यवसायात यश मिळेल


व्यावसायिकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुम्हाला मोठं यश प्राप्त होऊ शकतं. जे फक्त सध्यापुरतं नव्हे तर भविष्यकाळाच्या दृष्टीनेही उपयोगाचं ठरु शकतं. त्यामुळे त्याचा योग्य तो लाभ घेण्यामध्ये कमी पडू नका. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे अशी आज तुमची परिस्थिती राहू शकते. आज तुम्हाला अपेक्षेपेक्षा थोडं जास्त मिळू शकतं. संतती सामाजिक कार्यामध्ये सहभागी होईल. त्यामुळे घरात आनंदी आनंद असेल. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण प्राप्त होत नाही. त्यामुळे काही मिळवायचे असेल तर तुम्हाला सोसावे लागणारच आहे.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद