26 जानेवारी 2019 चं राशीफळ

26 जानेवारी 2019 चं राशीफळ

मेष - विद्यार्थ्यांना यश मिळेल


आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगला दिवस आहे. विशेष करुन स्पर्धा परिक्षांचा अभ्यास जे विद्यार्थी करीत असतील त्यांनी आजच्या दिवसाचा पुरेपुर लाभ घ्यायला चुकू नका. जेष्ठ नागरीकांनी आज आपल्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. वयोमानानुसार आज त्यांना आजार होण्याची शक्यता आहे. प्रियकरांसाठी आजचा दिवस आनंददायी राहू शकतो. कारण आज प्रेयशीसी संपर्क होण्याची शक्यता आहे. आज आपल्याला अनोळखी लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागू शकतो. ज्यामुळे लक्ष विचलित होऊ शकतं. म्हणून सावध राहा.


कुंभ - पश्चातापला अर्थ नाही


अब पछताये क्या होत जब चिडिया चुन गई खेत या म्हणीनुसार जे घडून गेलंय त्यावर पश्चाताप करण्यात कुठलाच शहाणपणा नाही. तर आता पुढे काय केलं पाहिजे यावर विचार करायला हवा. घरात आज मानसिक सुखशांतीचे वातावरण असेल. त्यामुळे मनाला थोडा आनंद प्राप्त होईल. आपल्या राशीला चंद्र आठवा असल्याकारणाने आपल्याला आरोग्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. छोटी दुखणेही त्रासदायक ठरु शकतात. एखाद्याविषयी मनामध्ये वैरभावना असेल तर ती दूर करुन टाका. जळात राहून माशांशी वैर नकोच.


मीन - कर्मात बदल करा


सातत्याने प्रयत्न करुन यश मिळत नसेल तर कर्मात बदल करायला हवा. म्हणजे आपल्या प्रयत्नांची दिशा बदलायला हवी. मात्र हे करीत असतांना आपले प्रयत्न खरंच चुकीचे आहेत का? हे आधी लक्षात घेतले पाहिजे. अमर्याद सहनशीलता व उत्साह या दोन्ही गोष्टींनी तुम्ही आज परिपूर्ण असाल. मात्र उत्साहाच्या भरामध्ये आपली शिस्त बिघडता काम नये. बेशिस्तीमुळे आज तुमचे नुकसानही होऊ शकते. एक ना धड भराभरा चिंध्या अशी गत होणार नाही याची काळजी घ्या. शब्दांवरही आज आपण नियंत्रण ठेवायला पाहिजे. तडका फडकी कुणावर शेरेबाजी करु नका. त्यात तुमचेच नुकसान होईल.


वृषभ - घरातील वाद मिटवा


कित्येक वेळा घरात वाद सुरु आहेत ते आपल्याला माहितीच नसतं. कारण आपण कामामध्ये व्यस्त असल्यामुळे घरात पुरेसं लक्ष राहत नाही. शिवाय आपल्यासमोर सर्व सुरळीत सुरु असल्यामुळे शितयुद्ध लक्षात येत नाही. ते वाढीस लागतं तेव्हा समजतं. तेव्हा आश्चर्य, संताप, राग आदी सर्व गोष्टी होत असतात. आपल्या घरात जर असं शितयुद्ध सुरु असेल तर ते वेळीच मिटवा. नाही तर वाद विकोपाला जातील. घरोघरी मातीच्या चुली असतात. त्यामुळे जोडीदाराशी आज आपला होणारा मनमुटाव जास्त मनाला लावून घेऊ नका. विद्यार्थी सोशल मीडिया व टीव्ही पासून लांब राहावे. त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. आजचा आपला दिवस कार्यातील व्यस्ततेचा राहणार आहे.


मिथुन - वास्तूतून लाभ


आज तुम्हाला वास्तूतून लाभ मिळू शकतो. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न करायला व आनंदाचा पुरेपुर लाभ घ्यायला हरकत नाही. व्यवसाय, व्यापारासाठी आजचा दिवस सुखद आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी आज मिळणा-या संधी ओळखायला हव्यात. गुरुंचे आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला मनशांती मिळू शकते. कदाचित त्यामुळे नवीन मार्गही सापडू शकतात. आशीर्वाद घेतल्याचे अनेक फायदे असतात. त्यामुळे तो घ्यायला चुकू नका. कुठल्यातरीकारणामुळे आज आत्मविश्वासात तुम्हाला कमी जाणवेल. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका. तेच तुमच्या हिताचे राहिल.


कर्क - गुरुंचे आशीर्वाद मिळवा


जीवनामध्ये प्रत्येक माणसाला गुरुची, त्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असतेच. कारण या जगात स्वयंपूर्ण असं कोणीच नाही. आपलेही जे गुरु असतील त्याचे ­आशीर्वाद घ्यायला आज चुकू नका. ते तुमच्या फायद्याचे राहिल. मनशांतीचा अनुभव त्यातून तुम्हाला मिळून प्रगतीचे नवे मार्ग सापडू शकतात. आज वाहन सावकाश चालवा. कुठे तातडीने पोहचायचे असल्यास वेळेच्या आधी निघा. ई·ाराची आपल्यावर कृपादृष्टी आहे ही भावना आज मनात दाटून येईल. त्यामुळे ईश्वरावरील विश्वास अधिकच दृढ होईल. आज आपल्या मानसन्मानातही वाढ होऊ शकते.


सिंह - शत्रू पराभुत होतील


जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात समर्थकांसह विरोधकही असतात. विरोधक म्हणजे शत्रू हे तेव्हाच पराभुत होऊ शकतात जेव्हा आपण एखादं यश प्राप्त करीत असतो. अर्थात ही फक्त आपल्या मनाची धारणा असते. मात्र त्यामुळे मनस्वी आनंद होत असतो. हा आनंद आज तुम्ही प्राप्त करु शकता. कारण आज तुम्हाला यश मिळणार आहे. आज तुमचे प्रवासाचेही योग आहेत. मात्र आज प्रवास शक्यतोवर टाळण्याचा प्रयत्न करा. कारण त्यात तुमचे नुकसान होऊ शकतं. आज एखाद्या धार्मिक कार्यामध्येही तुम्ही सहभागी होऊ शकता. त्यातुन तुम्हाला मनशांतीचा अनुभव मिळू शकतो. एखादा आकस्मिक आनंद प्राप्त झाल्याने घरातही आज आनंदी आनंदच राहिल.


 कन्या - विरोधक वरचढ होतील


निंदकाचे घर असावे शेजारी या म्हणीनुसार आपल्या विचारांचे विरोधक हे जीवनात असायलाच हवे. कारण आपण काय केलं पाहिजे? कसं वागलं पाहिजे? हे त्यांच्याकडूनच चांगलं शिकता येतं. आज तुमचे विरोधक वरचढ होतील. मात्र त्याचा त्रास करुन घेण्यापेक्षा याचा अर्थ तुमचं काहीतरी चुकत आहे ही सत्यता लक्षात घेऊन चुक सुधरविण्याचा प्रयत्न करा. आज तुमचे प्रवासाचेही योग आहे. त्या प्रवासातुन तुम्हाला संधीही प्राप्त होऊ शकतात. त्यामुळे आनंदाचे वातावरण राहिल. आज आध्यात्मिक आनंदही मिळविण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. कारण मनशांती मिळविण्याचा आजच्या काळातील तो खूप चांगला मार्ग आहे. यश हवे असेल तर कठोर परिश्रम हे करावेच लागतील.


तूळ - विचार करुन निर्णय घ्या


कुठलाही निर्णय हा विचारपूर्वकच घेतला गेला पाहिजे. मात्र कधी कधी भावनेच्या भरात किंवा घाईघाईने आपण निर्णय घेत असतो आणि त्यातील बहुतेक निर्णय आपले चुकत असतात. याची प्रचिती आज तुम्हाला मिळू नये म्हणूनविशेषत: सरकारी कर्मचा-यांनी आज कोणताही निर्णय विचारपूर्वकच घेतला पाहिजे. आज तुम्ही आपल्या कर्तृत्वाने विरोधकांवर विजय प्राप्त करणार आहात. त्यामुळे आनंदाचे वातावरण असेल. आपल्या राशीला चंद्र बारावा असल्याकारणाने खर्चाचे प्रमाण वाढू शकते. ज्याला तुम्ही थांबवू शकत नाहीत. मात्र कमी करु शकता. आज कोणत्याही महत्त्वपूर्ण प्रश्नांवर निर्णय घेऊ नका. त्याला टाळण्याचा प्रयत्न करा.


वृश्चिक - तोल मोल के बोल


बाहेरच्यासह आज घरामध्येही आपण सांभाळूनच बोललं पाहिजे. आपण कितीही स्पष्टवक्ते असले तरी आपल्या बोलण्याने कुणी दुखावला गेला तर संवादाचे रुपांतर वादामध्ये होऊ शकतं. आपल्याला हे शिकविणारा आजचा दिवस आहे. त्यामुळे आज आपण आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवायचे आहे. सरकारी कर्मचारी आज गोंधळात पडू शकतात. त्यामुळे आपल्याकडून चुकूनही कुठले चुकीचे काम होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. कलाकारांसाठी आजचा दिवस यश देणारा आहे. परिश्रम करुनही यश मिळत नसल्याने आज प्रयत्नांची दिशा बदलाविशी वाटेल. मात्र तसे करीत असतांना आपले प्रयत्न खरंच चुकीचे आहेत का? हे काळजीपूर्वक बघितले पाहिजे.


धनु - योग्यता उंची गाठेल


आपल्याला जे मिळालेलं आहे ते आपल्या योग्यतेपेक्षा कमीच आहे, असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. कारण विशेषत: जे असमाधानी लोक असतात त्यांना तर हे सारखं वाटतं असतं. ब-याच अंशी ते खरंही असू शकतं. आपण त्यापैकी जर एक असाल तर आज आपल्यासाठी आनंददायी दिवस आहे. कारण आज आपली योग्यता योग्य उंची गाठणार आहे. लेखकांसाठीही आजचा दिवस लाभदायी आहे. त्यांना आपल्या लेखन कार्यात यश मिळू शकतं. अतिआत्मविश्वास हा घातक असतो. त्यामुळे त्याला आज आवर घायला हवा. एखाद्या घटनेमुळे आज मनस्वाथ्यही बिघडू शकतं. त्यामुळे काळजी घ्या.


मकर - अगोदर श्रम, नंतर भाग्य


सातत्यपूर्ण परिश्रमांच्या जोडीला भाग्याची साथ असेल तरच यश प्राप्त होत असतं. भाग्याची साथ असेल तर कमी श्रमांमध्येही आपल्याला यश प्राप्त होऊ शकतं. मात्र कधी कधी भाग्य आपली परिक्षा घेत असतं. ते आपल्याला आधी श्रम करायला लावतं नंतरच साथ देतं. आपल्या सोबत आज असंच घडणार आहे. त्यामुळे परिश्रम करण्यामध्ये कसुर करु नका. आज मित्रांकडून तुम्हाला आनंद प्राप्त होऊ शकतो. त्यांच्यासोबत तुम्ही एखाद्या गोष्टीचे नियोजन करु शकता. आज आपल्या शब्दांवर तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागणार आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला असं आज करु नका. आपल्या बोलण्याने कुणी विनाकारण दुखावला जाणार नाही याची दक्षता घ्या. थोडी लवचिकता वाढवा.


 लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद