28 जानेवारी 2019 चं राशीफळ

28 जानेवारी 2019 चं राशीफळ

मेष - संकटातून बाहेर पडाल


आयुष्य म्हटलं की चढ-उतार येणारच. त्यामुळे संकट आल्यावर त्याला घाबरुन न जाता त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. आज तुमच्यासाठी एखाद्या संकटातून बाहेर पडण्याचा दिवस आहे. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न करायला विसरु नका. देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय तुम्हाला येऊ शकतो. आपल्याला संधीवाताचा त्रास असेल तर आज तो वाढू शकतो. लहान फायद्यासाठी मोठं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. ऐकावे जनाचे, करावे मनाचे! व्यावसायिकांनी आज आपल्या नफ्याकडे लक्ष ठेवावे.


कुंभ - मनसोक्त आनंद घ्या


दिवस खूप चांगला आहे. आज मनसोक्त जगा. सोबतच लवचिकता वाढवा. म्हणजे कुठल्या गोष्टीचा त्रास होणार नाही. सरकारी कर्मचारी मात्र आज गोंधळात पडू शकतात. आपल्या हातून कुठली चुक होणार नाही, याची त्यांनी काळजी घ्यायला हवी. आज तुम्ही वास्तुवर खर्च करणार आहात, त्यामुळे घरातही आनंदी आनंद असेल.


मीन - टिकेकडे दुर्लक्ष करा


टिका व तक्रारी सुरुच असतात. त्यामुळे त्यांचा त्रासही करुन घेता कामा नये किंवा त्यातवेळ घालवता कामा नये. पदरी पडले अन् पवित्र झाले. यानुसार जे मिळत आहे त्याचा आनंदाने स्विकार करा. एखाद्या घटनेमुळे मनस्वास्थ्य बिघडेल. मात्र संयम ठेवला तर शत्रुला नामोहरम करु शकाल. स्त्री पक्षाकडून सहयोग प्राप्त होऊन घरात आनंदी आनंद राहिल.


वृषभ - आर्थिक टंचाई जाणवेल


आज आपल्याला आर्थिक टंचाई जाणवणार आहे. पांघरुन बघुन हातपाय पसयाचे असतात ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. नाही तर दात आहेत तर चने नाहीत आणि चने आहेत तर दात नाही अशी गत होऊ शकते. आपल्याला जर सांधेदुखीचा त्रास असेल तर तो आज वाढू शकतो. भुतकाळामध्ये घडून गेलेली एखादी आनंददायी घटना आज पुन्हा आनंद देऊ शकते. व्यावसायिकांनी आज आपल्या नफ्याकडे लक्ष ठेवले पाहिजे.


मिथुन - जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न


जीवन जगत असतांना यशस्वी माणूस म्हणून जगत असतांना जबाबदा-या स्विकाराव्याच लागतात. हे आपल्याला शिकविणारा आजचा दिवस असेल. म्हणून जबाबदारी टाळू नका. आज ओळखीच्या लोकांबरोबर सामंजस्य वाढू शकते. त्यामुळे संबंधातही सुधारणा होऊ शकते. आज आपल्याला खर्चाकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होता कामा नये. अंथरुन पाहूनच पाय पसरायला हवेत.


कर्क - मुर्खपणाची फळे आज वाट्याला येऊ शकतात


कितीही हुशार मनुष्य असला तरी कधी कधी मुर्खपणाच्या गोष्टी प्रत्येकाडून होतच असतात. त्यातही काही वेळेस ती गोष्ट जेव्हा घडते तेव्हा तिचे परिणाम जाणवत नाहीत तर नंतर जाणवतात. आधी केलेल्या मुर्खपणाची फळे आज वाट्याला येऊ शकतात. त्यामुळे आलीया भोगासी असावे सादर. आपल्या परिवारामध्ये जर संपत्तीचा वाद सुरु असेल तर आज तो मिटू शकतो. आज आपल्या नवीन ओळखीही होऊ शकतात. व्यापार व्यवसायासाठी आजचा दिवस सुखद असेल.


सिंह - कागदपत्रे सांभाळा


महत्त्वाची कागदपत्रे ही रोज लागत नसतात. तरीही काम पडेल त्यावेळी शोधाशोध करण्यापेक्षा ते सांभाळून ठेवा. ते गहाळ होण्याचीही शक्यता आहे, त्यामुळे त्यांची काळजी घ्या. एखादे काम अपूर्ण असेल तर चिकाटी कायम ठेवा. अपूर्ण असलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आज यश मिळू शकतं. आज जोडीदाराबद्दल गैरसमज होऊ शकतात. म्हणून घरात शक्यतोवर शांत राहण्याचा प्रयत्न करा. घरोघरी मातीच्या चुली यानुसार काही गोष्टी सुरुच असतात हे लक्षात ठेवा.


कन्या - आशीर्वाद मिळवावेत


आशीर्वाद कधीही व्यर्थ जास्त नाहीत. होऊ शकतं मार्गदर्शनातून तुम्हाला नवीन मार्गही सापडू शकतात. म्हणून आज तुम्ही आशीर्वाद मिळविण्यावर भर द्या. वरकरणी कनवाळू व आतुन कठोर अशा आतल्या काठीच्या लोकांपासून सावध राहा. ते आपलं नुकसान करु शकतात किंवा आपल्यासाठी समस्या निर्माण करु शकतात. एखाद्या कामला जास्त वेळ लागू शकतो. म्हणून प्रयत्न करीत राहा. जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज घरात शांत राहिलेलेच बरे.


तूळ - भरभराटीवर लक्ष द्या


वैवाहिक जीवन जगत असतांना आपल्या फायद्याकडे, भरभराटीकडे लक्ष द्यायलाच हवं. मात्र थेंबा थेंबाने तळं साचतं हे लक्षात घ्यायला हवं. आज चिंता नको चिंतन करा. त्यातून मार्ग सापडू शकतात. आपल्या कल्पकतेला आज वाव मिळेल. सर्जनशील कार्यात प्रगती होऊ शकते. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. त्याकरीता आपल्याला सोसावहेच लागेल. प्रेयसीशी संपर्क होण्याची शक्यता.


वृश्चिक - सत्याचा स्विकार करा


अनिश्चित जगात निश्चितता शोधु नका. सत्याचा स्विकार करुन कर्म करीत राहा. कुठल्याच गोष्टीवर जास्त विचार करु नका. ते घातक ठरु शकतात. भित्या पोटी ब्रम्हराक्षस! म्हणून मनातून भिती नष्ट करा. त्यामुळे मानसिक सुख शांतीचे वातावरण आज तुम्ही निर्माण करु शकाल. जोडीदाराचे सहकार्य आज तुम्हाला मिळेल. मात्र जोडीदाराच्या म्हणण्याप्रमाणे खर्चही करावा लागेल.


धनु - शब्दांवर नियंत्रण ठेवा


कुणाविषयी तडका-फडकी शेरेबाजी करणे वाईटच. आज तर तुम्ही हे अजिबात करु नका. आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. मित्रांकडून आनंद प्राप्त होऊ शकतो. त्यांच्याकडून मदत मिळेल किंवा एखाद्या गाष्टीचे नियोजन केले जाईल. अनिश्चित जगात निश्चितता शोधु नका. सत्याचा स्विकार करा. आज तुमच्यावर जोडीदाराचा प्रभाव राहणार असून त्याच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही वागणार आहात.


मकर - कुठलाच हव्यास नको


सर्वकाही आपल्यालाच मिळेल हा अट्टहास सोडून सैतानालाही त्याचा वाटा द्यावा लागतो हे लक्षात घेतले पाहिजे. कुणाविषयी वैरभावना मनात असेल तर तिचा आज त्याग करा. आज तुमच्यासाठी ते फायद्याचे राहिल. पाण्यात राहून माशाशी वैर करु नये. सरकारी कर्मचारी गोंधळात पडतील. त्यामुळे सावध राहा. आज तुमचा वास्तुवर खर्च होणार असून तो चुकणार नाही.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद