29 जानेवारी 2019 चं राशीफळ

29 जानेवारी 2019 चं राशीफळ

मेष - निर्णय विचारपूर्वक घ्या


आज प्रयत्नाची दिशा बदलावीशी वाटेल. मात्र असे करायचे असल्यास विचारपूर्वक निर्णय घ्या. आपले प्रयत्न चुकीचे दिशेने आहेत का हे तपासून घ्या. कुणाच्याही व्यंगावर हसणे हे कधीही वाईटच. आज तुमचे शत्रू वरचढ होऊ शकतात. विफलता येऊ शकते. स्त्रियांनाही मानसिक तणाव जाणवू शकतो. म्हणून स्वत:ची काळजी घ्या.


कुंभ - अविस्मरणीय दिवस


आज तुम्हाला अविस्मरणीय क्षण प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे आजचा दिवसही तुमच्यासाठी अविस्मरणीय असाच राहिल. धार्मिक कार्यातून आज तुम्ही आनंद प्राप्त कराल. आजच्या काळात आनंद व मनशांती मिळविण्याचा तो सोपा मार्ग आहे. व्यवसायात दैदिप्यमान यश प्राप्त होऊ शकतं. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन अशी स्थिती निर्माण होऊ शकते. कुटुंबात धैर्याने निर्णय घ्याल.


मीन - बढती मिळेल


तुम्ही कामाप्रती समर्पित असाल तर आज तुम्हाला बढती मिळण्याचे योग आहेत. आज ईश्वराचे आशीर्वाद असल्याची भावना मनात दाटून येईल. त्यामुळे आज ईश्वरावरील तुमचा विश्वास अधिकच दृढ होईल. आज तुम्हाला प्रॉपर्टीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न करायला हरकत नाही. लहान भावंडांची काळजी घ्या. कदाचित तुमच्या मदतीची त्यांना आवश्यकता असेल.


वृषभ - कृतीपूर्वी विचार करा


पश्चाताप करत बसण्यापेक्षा कृतीपूर्वी विचार केलेलाच बरा. महत्त्वपूर्ण प्रश्नाचे निर्णय आज घेऊ. शक्य तेवढे टाळण्याचा प्रयत्न करा. कर्तृत्वाने आज तुम्ही शत्रूंचा पराभव कराल. वडीलांकडून अनमोल असे मार्गदर्शन आज तुम्हाला मिळू शकते. तुम्ही कितीही हुशार असलात तरी जीवनाचा त्यांचा अनुभव मोठा आहे. त्यामुळे ते उपयोगात आणा.


मिथुन - जीवन समजून घ्या


जीवनात सुखाचा गुणाकार व दु:खाचा भागाकार करायचा असतो. त्यासाठीच परिश्रम करायचे असतात. जगात सहजासहजी काहीच मिळत नाही. यश कठोर परिश्रमानंतरच मिळत असते. जितके परिश्रम जास्त तितका यशाचा आनंदही जास्त असतो. अनोळखी लोकांचा विरोध सहन करावा लागु शकतो. म्हणून विचलीत होऊ नका.  सासुरवाडीकडून लाभ होण्याची शक्यता आहे.


कर्क - सहन करावेच लागेल


टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. म्हणून काही मिळवायचे असेल तर सहन करावेच लागेल. तुमची बाजु ही सत्याचीच असली पाहिजे. आज तुम्हाला एखादा आकस्मिक आनंद प्राप्त होऊ शकतो. एखाद्याबद्दल आज तुमचा गैरसमजही होऊ शकतो. म्हणून दक्षता घ्या. वैवाहिक आयुष्याचे विविध रंग आज बघायला मिळतील. त्यामुळे घरात आनंद असेल.


सिंह - स्वत:लाच धोका देऊ नका


जीवनात कुठलाच धोका न पत्करणे हाच सर्वात मोठा धोका असतो. तोही स्वत:लाच आपण देत असतो म्हणून हिम्मत करा. असं केल्याने आज तुमच्या मानसन्मानात वाढ होऊ शकते. आज गुरुंचे आशिर्वाद मिळवा ते कधीही व्यर्थ जात नाही. तुमचे भावंडांशीही मतभेद होऊ शकतात. त्यामुळे कुठलाच वाद वाढवू नका. एका हाताने टाळी वाजत नाही, हे लक्षात घ्यावे.


कन्या - आज टिका नको


जो प्रशंसा करु शकत नाही त्याला टिका करण्याचा अधिकार नाही. आपणही त्यापैकी असाल तर आज दुस-यांवर टिका अजिबात नको. थोडेसही बेशिस्त आज राहू नका. नाही तर एक ना धड भराभर चिंध्या अशी तुमची गत होऊ शकते. विद्याथ्र्यांनी प्रगती करायची असेल, अभ्यासात मन रमवायचं असेल सोशल मीडिया व टीव्हीपासून लांब राहावे. वडिलांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांत राहा.


तूळ - आरोग्याला जपा


आज तुमची प्रकृती थोडी नरम राहिल. छोटी छोटी दुखणी डोके वर काढू शकतात. म्हणून आरोग्याला जपा. शक्य तेवढे मुद्देसुद बोला. उचलली जीभ लावली टाळ्याला असं करु नका. त्यात नुकसान तुमचेच होईल. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांसाठी आज दिवस उत्तम आहे. सासरच्यां मंडळींशी वाद होण्याची शक्यता आहे. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असं आज करु नका.


वृश्चिक - कामाला वेळ लागेल


एखाद्या कामाला उशीर होऊ शकतो म्हणून प्रयत्न करीत राहा. अतिआत्मविश्वास घातक असतो. त्याला आज आवर घाला. उथळ पाण्याला खळखळाट फार अशी आपली गत होण्यापासून स्वत:ला वाचवा. विद्यार्थी अभ्यास टाळण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे त्यांच्याकडे आज दुर्लक्ष केलेलेच बरे. वास्तूतून लाभाची शक्यता आहे. त्यामुळे घरात आनंददायी वातावरण राहिल.


धनु - चालायला लागा, मार्ग सापडेल


दिशेचा पत्ता नाही, कुठलाच मार्ग माहिती नाही म्हणून हतबल होऊन न बसता चालायला लागा, मार्ग सापडेल. सोबत भाग्य मागे मागे येईल. प्रयत्नांनीच परमेश्वर मिळतो यावर वि·ाास ठेवा. कलाकारांना आजचा दिवस यश देणारा आहे. विद्यार्थी संपूर्ण लक्ष अभ्यासात देतील. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. म्हणून सहन करण्याची तयारी ठेवा. घरातील शितयुद्ध दुर ठेवावे.


मकर - वैवाहिक आयुष्य सुखमयी


वैवाहिक आयुष्य आधिक सुरेख व सुखमीय करणारा आजसा दिवस असेल. आध्यात्मिक गोष्टींमधून आज आनंद मिळतो. त्यामुळे त्यात रममान व्हा. नोकरी व व्यवसायात आज मिळणा-या संधीचा उपयोग उपयोग करता यायला हवा. प्रगती होऊ शकते. जेष्ठ नागरीकांनी आज आपल्या प्रकृतीला जपायला हवे. त्यांना आज आजार तापाची शक्यता आहे.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद