11 जानेवारी 2018 चं राशीफळ

11 जानेवारी 2018 चं राशीफळ

मेष - प्रॉपर्टीतून लाभ मिळेल


सध्याच्या काळामध्ये प्रॉपर्टी एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला कधीही लाभ देऊ शकते. आज तुम्हाला प्रॉपर्टीतून लाभ मिळू शकतो. एखादा अडलेला व्यवहार मार्गी लागण्याची शक्यता आहे. कुटुंबात आज धैयाने निर्णय घ्याल. त्या निर्णयाचे स्वागतही केले जाईल. एखाद्याविषयी मत बनविण्याआधी थोडा विचार करा किंवा मतच बनवू नका. आज मित्रांकडून आनंद प्राप्त होऊ शकतो. त्यांच्यासोबत तुम्ही वेळ घालवाल.


कुंभ - वास्तूतून लाभ


वास्तू ही गोष्टच मूळात लाभ, सुख, आनंद आदी सर्व देणारी असते. फक्त आपल्याला ते योग्य पद्धतीने स्विकारता यायला हवी. आपण ज्या वास्तूत राहतो त्या वास्तूचा आपल्या जीवनावर खूप प्रभाव असतो. त्यामुळे ती लहान असो वा मोठी, सुविधा संपन्न असो वा असुविधाकारक तिचे पावित्र्य जपले गेले पाहिजे. हे आपल्याला पटवून देणाा आजचा दिवस आहे. कारण आज वास्तूतून आपल्याला लाभ मिळू शकतो. स्त्री पक्षाकडूनही सहकार्य मिळण्याचे योग आहेत. त्यामुळे घरात आनंदी आनंद असेल. व्यापार, व्यवसायासाठीही आजचा दिवस सुखद आहे. मात्र आरोग्याची काळजी आज घ्यायला हवी. विशेषत: जंक फूडपासून लांब राहायला हवे.


मीन - कल्पकतेला वाव मिळेल


आपण जर भविष्याविषयी, आपल्या व्यवसायाविषयी, एखाद्या नवीन उपक्रमाविषयी काही कल्पना तयार केल्या असतील तर आज आपल्या कल्पकतेला व सर्जनशीलतेला वाव मिळवून देणारा दिवस आहे. या कार्यामध्ये आज तुम्ही प्रगती करणार आहात. त्यामुळे विशेषत: कलाकारांना आजचा दिवस लाभदायक आहे. एखाद्या कामाला मात्र आज जास्त वेळ लागू शकतो. व्यावसायिकांनी आज नफ्याकडे लक्ष द्यायला हवे. नाहीतर नुकसान किंवा मोठ्या नफ्याला आज मुकावं लागू शकतं. मुलं आज तुमच्या मनाप्रमाणे वागणार नाहीत. म्हणून आज त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलंच बरं राहिल.


वृषभ - व्यापार, व्यवसाय सुखद


व्यापारी, व्यवसायिकांना सदैव जागरुक राहावे लागते. कारण छोटीशी चुक मोठं नुकसान करु शकते किंवा मोठ्या नफ्याला मुकावं लागू शकतं. आज मात्र व्यापार, व्यवसायासाठी सुखद दिवस आहे. आज शक्यतोवर काळजी करण्यासारखं काही घडणार नाही. बेफिकीर राहू नका. कारण आज काम सहजासहजी होणार नाही. अनंत अडचणी येणार आहेत. खर्च करीत असताना उत्पन्न व खर्चात नियंत्रण ठेवा. आवाक्याबाहेरील खर्च करु नका. विद्यार्थी आज संपूर्ण लक्ष अभ्यासात देणार आहेत.


मिथुन - मानसिक शांती लाभेल


ज्या कार्यातून मानसिक शांती लाभत असेल ते कार्य वारंवार करण्यास हरकत नसावी. कारण मनाने संतुष्ट असणारी व्यक्ती जीवनाच्या सर्व आघाड्यांवर पुढे असते. आज तुम्ही मानसिक शांतीचा अनुभव कराल. विशेषत: घरातमध्ये सुखशांतीचे वातावरण राहणार आहे. एखादे महत्त्वपूर्ण कार्य अपूर्ण राहिले असेल तर आज त्यासाठी प्रयत्न वाढविण्यास हरकत नाही. कठोर परिश्रमानंतरच आज तुम्हाला यश मिळणार आहे. तसेच आज जोडीदाराचा तुमच्यावर प्रभाव राहिल. जोडीदाराच्या मर्जीप्रमाणे आज तुम्ही वागणार आहात. त्यामुळे घरात आनंदी आनंद असेल.


कर्क -  जेष्ठ नागरीकांनी काळजी घ्यावी


जेष्ठ नागरीकांना वयोमानानूसार शाररीक त्रास होत असतो. आज विशेषत: जेष्ठांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. स्त्रियांसाठीही आजचा दिवस चिंतेचा असणार आहे. आज त्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागणार आहे. आज त्यांनी कुठेच धाडस करायला नको. ज्या कामामध्ये आनंद मिळत असेल त्यात आज मन रमविण्याचा प्रयत्न करा. अधिकारी वर्गाच्या हातात जर एखादे काम अडकलेले असेल तर ते आज पूर्ण होऊ शकते. संततीकडून आज सुर्वाता कानी पडू शकतात.


सिंह - मानसन्मात वाढ होईल


प्रामाणिकपणे प्रयत्न करणा­ऱ्या व्यक्तीला एक दिवस अपेक्षित यश नक्कीच मिळत असतं. फक्त यशच मिळत नाही तर त्याच्या मानसन्मानामध्येही वाढ होत असते. आपण प्रामाणिक प्रयत्न करीत असाल तर आज आपल्या मानसन्मानात वाढ होणार आहे. त्यामुळे आज आनंदी आनंद असेल. प्रयत्नांचे चीज झाल्याची भावना मनामध्ये येईल. महत्त्वाचे म्हणजे आज तुमचे शत्रु पराभुत होणार आहेत. आनंद द्विगुणीत होऊ शकतो. अमर्याद सहनशीलता आज तुम्ही दाखविणार असून तेवढाच उत्साहसुद्धा तुमच्यात राहिल.


कन्या - आरोग्याकडे लक्ष द्या


तन, मन स्वस्थ तर जीवन मस्त हे आपल्याला शिकवणारा आजचा दिवस आहे. आज तुम्ही आपल्या आरोग्याकडेही थोडं लक्ष दिलं पाहिजे. सोबतच एखाद्या गोष्टीने त्रस्त होऊन आयुष्याबद्दल सखोल विचार करण्यासाठी आज तुम्हाला एकांताची गरज पडेल. शरीर व मनासाठीही चिंतन करणं आवश्यक आहे. याशिवाय आज वाहनही सावकाश चालवा. कुठे तातडीने पोहचायचे असल्यास थोडं वेळेच्या आधी निघा. तसेच आज कमी बोला. शक्यतोवर मुद्देसुद बोलण्यावर भर द्या. तेच तुमच्या हिताचे राहिल.


तूळ - आरोग्य उत्तम राहिल


उत्तम आरोग्य म्हणजे काय? फक्त शरीर स्वस्थ्य राहून चालत नाही तर त्यासाबेतच मनही स्वस्थ असावं लागतं. किंवा फक्त मनही स्वस्थ असून चालत नाही त्याच्या जोडीला शरीरही सुदृढ असावं लागतं. दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक अशा आहेत. हे दोन्ही जेव्हा चांगले तेव्हा आरोग्य चांगलं असं म्हणता येतं. आज याचा अनुभव तुम्हाला येऊ शकतो. आज मनानेही तुम्ही प्रसन्न राहाल. जोडीदाराशी मनमुटाव होईल. संततीकडून आज सुवार्ता कानी येतील. कारण आज त्यांना यशदायी दिवस आहे. आज तुमचे प्रवासाचेही योग आहेत. त्यातूनही तुम्हाला संधी मिळणार आहे. फक्त तिला ओळखता आली पाहिजे.


वृश्चिक - विचार कर­ण्याचा दिवस


हे जीवन आहे इथे प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधी कधी आपण एका दिवसात खूप सारी कामे आपण करतो तर कधी कधी एकाच कामाला पूर्ण दिवसही लागतो तर कधी कोणतेच काम पूर्ण होत नाही. तसा आजचा तुमचा दिवस हा विचार कर­ण्याचा दिवस आहे. आज तुम्ही विचार करण्यावर भर देणार आहात. सोबतच तुमच्यावर ईश्वराची कृपादृष्टी आहे, अशी भावना आज मनामध्ये दाटून येणार आहे. त्यामुळे आत्मिक शांती लाभेल. तुम्हाला करत असलेल्या प्रयत्नांची आज दिशा बदलावीशी वाटेल. मात्र हे करीत असताना आपले प्रयत्न खरंच चुकीच्या दिशेने आहेत का? याची खात्री करुन घ्या. एखाद्या जोड व्यवसायाचाही आज तुम्ही विचार करणार आहात. जोडीदाराचे सहकार्य आज तुम्हाला लाभणार आहे. मात्र त्यासोबतच खर्चही होणार आहे.


धनु - सहकार्यासोबतच खर्चही


संसारामध्ये कित्येकदा आनंद हा खर्चाला कारणीभूत होत असतो. अशावेळी कोणीच खर्चामध्ये जराही मागेपुढे बघत नाही. आज तुम्हाला याचा अनुभव येईल. आज आपल्याला जोडीदाराडून सहकार्य मिळणार आहे. आज जोडीदाराच्या मनाप्रमाणे तुम्ही वागणार आहात. परिणाम जोडीदाराच्या इच्छेनूसार तुम्ही खर्चही आनंदाने करणार आहात. व्यावसायिकांनी आज नफ्याकडे विशेष लक्ष ठेवणे गरजेचे आहे. थोडंस दुर्लक्ष तुम्हाला नुकसान किंवा मोठ्या नफ्यापासून वंचित ठेवू शकतं. आज आपला एखाद्या बद्दल गैरसमजही होऊ शकतो. त्यामुळे एखाद्या बद्दल मत बनविताना आज थोडा विचार करा किंवा मतच बनवू नका. एखाद्या प्रसंगाने मनस्वास्थ्यही बिघडू शकतं.


मकर - अचानक आनंद मिळेल


जीवनात फक्त दुखःच अचानक येतं असं नाही तर कधी कधी आनंदही अचानक मिळू शकतो. याचा अनुभव आपल्याला करुन देणारा आजचा दिवस आहे. आकस्मित येणारा आनंद मनाला प्रसन्नता व संपूर्ण दिवस उत्तम बनवून जाईल. मात्र त्या आनंदात जास्त राहू नका. कारण आज शत्रू वरचढ होऊ शकतात त्यामुळे सावध राहा. आज तुमचा प्रवासाचे योग आहेत. मात्र प्रवासात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज प्रवास करू नका. नाईलाजाने करावा लागला तर सतर्क राहा. आज सहनशील व उत्साह दोन्ही एकाच वेळी तुमच्यात असेल.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद