विचार करा की तुम्ही उत्साहात एखाद्या आवडत्या व्यक्तीला भेटण्यासाठी रस्त्यावरून चालत आहात. आज मस्त मूडमध्येही आहात, कारण तुम्ही नव्या चपला घातल्या आहेत आणि तुमच्या आनंदावर विरजण पडेल असं काहीच नाहीये. आपल्या सगळ्यांच्या जीवनात असे सुंदर दिवस असतात. पण अचानक तुमच्या पायाला खाज येऊ लागते अगदी टाचेच्या कडेला. जसं जसं तुम्ही जास्त चालू लागता, तुम्हाला जास्तच खाज येऊ लागते. नंतर थोडं दूखूही लागतं आणि काही कळण्याआधीच तुमचा नव्या चपलांचा तुम्हाला राग येतो. मैत्रिणींनो, शू बाईट हा प्रकार कोणालाही चीड येईल असा आहे. आपण सगळ्याजणींनी कधी ना कधी शू बाईटमुळे वेदनादायी दिवस सहन केला आहे. पण शू बाईटमुळे तुमच्या चपला किंवा शूज घालणं टाळू नका. कारण शू बाईटपासून सुटका करून घेण्याचे अनेक मार्ग आहेत. जाणून घ्या शू बाईटबद्दलची सर्व माहिती.
शू बाईट म्हणजे पायाला वारंवार चप्पल घासली गेल्याने झालेला फोड किंवा जखम, ज्यामुळे तुम्हाला चालणं आणि चप्पल घालणं अवघड होतं. बऱ्याच वेळा हा प्रकार टाचेला, पायाच्या पाठच्या बाजूला किंवा एखाद्या बोटावर होतो. ज्यामुळे खाज येते आणि त्यामुळे खाज, पाणीदार फोड, पुळी किंवा सालं निघतं.
शू बाईट होण्याची दोन प्राथमिक कारणं आहेत ती म्हणजे :
काहीवेळा तुम्ही घेतलेल्या चपलांचं मटेरिअल किंवा क्वालिटी चांगली नसल्यामुळे या गोष्टी होतात. उदाहरणार्थ, अस्सल चामड्याच्या चपला किंवा निमुळत्या टोकाचे शूज, हाय हील्स किंवा आकर्षक दिसणाऱ्या पण चांगल्या नसलेल्या चपला घातल्यामुळे हा त्रास जाणवतो.
काहीवेळा पायाच्या आकारापेक्षा लहान आणि घट्ट चपला घातल्यामुळे शू बाईट होऊ शकतं. womenfitness.net या वेबसाईटनुसार, 90% महिला त्यांच्या पायाच्या आकारापेक्षा लहान चपला घालतात आणि 80% महिलांना चपलांमुळे त्रास होतो. परिणामी, पुरुषांपेक्षा अधिकवेळा महिलांना शू बाईटचा त्रास होऊन जखम किंवा पुळी असा त्रास जाणवतो.
काही वेळा पायाचा आकार वाढतं वय आणि चपलांमुळे बदलतो. तरीही काही लोकं त्यांच्या चपलांचे माप त्यानुसार बदलतं नाहीत, पण ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. यामुळेही तुम्हाला शू बाईटचा त्रास होऊ शकतो. 55 पेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये ही समस्या सामान्यपणे आढळते.
पायाच्या सौंदर्यासाठी पेडीक्युअरच्या ‘8’ सोप्या स्टेप्स
जर तुम्हाला दरवेळी पम्प्स किंवा बेलीज किंवा कोल्हापुरी चपला घातल्यामुळे शू बाईट होत असेल तर, या प्रकारचं फूटवेअर तुमच्या पायांसाठी योग्य नाही. जर तुमच्याकडे दोन स्नीकर्सच्या जोडी आहेत आणि त्यापैकी एकामुळे वारंवार शू बाईट होत असेल तर ती जोडी घालणं टाळा. काही ठराविक प्रकारचे शूजमुळे तुम्हाला प्रत्येकवेळी घातल्यास शूज बाईट होऊ शकतं.
कारण पाय हे नेहमीच ताणाखाली असतात आणि संपूर्ण शरीराचं वजन आपल्या पायांवर असतं, त्यामुळे जर वेळेवर काळजी न घेतल्यास छोटी जखम ही महागात पडू शकते. इतर अवयवांपेक्षा पायांना आराम मिळणे कठीणच असते. कारण तुम्ही एकाच ठिकाणी बसलात किंवा झोपून राहिलात तरच पायांना आराम मिळतो. कारण आजकाल आपलं लाईफस्टाईलचं तेवढं दगदगीचं आणि व्यस्त झालं आहे. त्यामुळे आरामाचा ऑप्शन क्वचितच मिळतं. म्हणूनच आत्ता छोटंसं शू बाईट टाळल्यास नंतर पश्चाताप करावा लागेल.
हे आहेत काही उपयुक्त घरगुती उपाय जे तुम्हाला शू बाईट झाल्यास उपयोगी पडतील.
टूथपेस्ट तर आपल्या घरात नेहमी असतेच. पेस्टमध्ये वापरलेले घटक मेंथॉल, हायड्रोजन पॅरोक्साईड आणि बेकिंग सोडा, कोणतीही जखम लवकरात लवकर बरं करण्याचं काम करतात. शू बाईट झालेल्या भागावर पेस्ट हलका थर लावा (पांढरी पेस्ट लावा, जेल पेस्ट नाही). कमीतकमी 30 मिनिटं किंवा रात्रभर लावून ठेवल्यास लगेच परिणाम जाणवेल. कोमट पाण्याने धूवून टाका.
जर तुमच्या पायाची त्वचा संवेदनशील (sensitive) असेल आणि वारंवार शू बाईट होत असल्यास तुमच्या बॅगमध्ये नेहमी पेट्रोलिअम जेली असायलाच हवी. पाय धूवून शू बाईट झालेल्या जागोवर भरपूर प्रमाणात व्हॅसलीन लावा. ते चांगलं जिरल्यावर चपला किंवा शूज घाला आणि तुम्हाला चालताना शू बाईटमुळे दुखणार नाही. तुम्ही हे रात्रभर लावून ठेऊ शकता आणि झोपेत तुमची शू बाईटची जखम बरी होईल.
Also Read: How To Use Body Lotion For Shoe Bite In Marathi
सर्वात सोपा घरगुती उपाय म्हणजे शू बाईट झालेल्या भागावर बर्फ लावणं. जेव्हा तुम्ही बाहेर असाल एखाद्या हॉटेल किंवा इतर ठिकाणी तेव्हा तुम्ही बर्फ मागू शकता आणि तात्काळ तुम्हाला बर्फ लावल्याने आराम मिळेल. कारण बर्फ लावल्याने जखम झालेली जागा सुन्न पडते आणि वेदना, जळजळ किंवा खाज कमी होते. तसंच यामुळे सूजही कमी होते.
मध हे त्वचेच्या कोणत्याही समस्येवरील रामबाण उपाय आहे. जर तुम्हाला शू बाईट झालं असेल तर त्या जागी थोडंसा मध लावा. तुम्हाला लगेच आराम मिळेल. पण पायाला मध लावून तसंच घराबाहेर पडू नका कारण त्यामुळे धूळीचे कण तुमच्या जखमेवर चिकटतील आणि त्रास वाढेल.
कोरफडसुद्धा हरतऱ्हेच्या त्वचा समस्यांवर गुणकारी आहे. कारण आहेत यातील जखम बरी करणारे, ज्वलनशामक आणि थंडावा देणारे घटक. तसंच हे कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शन रोखतं, थंडावा देतं आणि खाजही कमी करतं. त्यामुळे जखम झालेल्या भागावर तुम्ही ताजा कोरफडाचा रस किंवा कोरफड जेल लावू शकता. लावून झाल्यानंतर धूवू नका,तसंच राहू द्या. प्रदीर्घ काळासाठी कोरफड लावल्यास जखमेमुळे पडलेले काळेही डागही बरे होतील.
असं काही आहे ज्यामध्ये लिंबाचा उपयोग होत नाही? लिंबातील अॅसिडीक घटकांमुळे लिंबू नॅचरल अँटीसेप्टीक म्हणून काम करतं आणि खाजही कमी करतं. तसंच शू बाईटमुळे पायांवर पडलेले डागही कमी करतं. थोडासा लिंबाचा रस जखम झालेल्या जागेवर कापसाने लावा. तो सुकू द्या आणि थोड्यावेळाने कोमट पाण्याने धूवून टाका. जर तुम्ही हा उपाय दिवसातून दोनदा केल्यास तुम्हाला आठवड्याभरातच फरक जाणवेल.
खोबरेल तेल हा तर अगदी कधीही करता येईल असा घरगुती उपाय आहे, असं माझ्या आईचं मत आहे. जे अगदी योग्य आहे. खाज रोखण्यापासून ते कोरड्या त्वचेला पोषण म्हणून खोबरेल तेल हे सर्वावर गुणकारी आहे. कापसाच्या बोळ्यावर थोडंसं खोबरेल तेल घेऊन ते जखम झालेल्या ठिकाणी लावा म्हणजे लगेच आराम मिळेल. अजून एक नेहमीचा उपाय म्हणजे खोबरेल तेलात एक चमचा कापूर मिक्स करा आणि ते जखमेवर लावा.
बटाटा हे चांगल अँटीऑक्सीडंट आणि यामध्ये अँटीसेप्टीक व अँटीफ्लेमेटरी घटक होते. बटाटा हे शरीरातील जवळजवळ सगळ्या भागावर लावल्यास गुणकारी आहे. शू बाईटवरील घरगुती उपायांमधील हा उत्तम उपाय आहे. बटाट्याचे जाडसर काप कापा आणि ते जखम झालेल्या जागी लावा. याशिवाय तुम्ही बटाट्याचा रसही कापसाने लावू शकता. तसंच पेपरमिंट तेल आणि हळद पावडर यात मिक्स केल्यास जखम लवकर भरेल.
हळद आणि कडूनिंब हे दोन्ही अँटीमाईक्रोबीअल आणि अँटीइन्फ्लमेटरी घटक आहेत. तुम्हाला फक्त चार-पाच कडूनिंबाची पान आणि एक चमचा हळद पावडर पाण्यात मिक्स करून जाडसर पेस्ट बनवून घ्या. ही जाडसर पेस्ट जखम झालेल्या भागाला लावून 30 मिनिटं तसंच ठेवा. असं दिवसातून दोनदा करा आणि तुमचा पाय बरा होईल.
खोबरेल तेलानंतर ऑलिव्ह ऑईलमध्ये सगळ्यात जास्त मॉईश्चराईजिंग घटक आहेत. तुम्ही दोन प्रकारे ऑलिव्ह ऑईलचा वापर शू बाईटवर करू शकता. एक, ऑलिव्ह ऑईल आणि बदाम तेल मिक्स करून त्याने मसाज करू शकता. दुसरं, ऑलिव्ह ऑईल आणि मध समप्रमाणात घेऊन जाडसर पेस्ट बनवा. आता ही पेस्ट शू बाईटवर लावा आणि 30 मिनिटं ठेवा.
तांदळ्याच्या पीठ हे चांगल स्क्रब आहे. ज्याने तुमच्या जखमेचे डाग नाहीसे होतील. तसंच याच्या मदतीने गडद डाग आणि त्वचेवरील मृत त्वचा ही निघून जाईल आणि हे एक उत्तम वेदनाशामकसुद्धा आहे. तांदळाच्या पीठीपासून बनललेली पेस्ट जखमेच्या डागावर लावा आणि 15 मिनिटं ठेवा किंवा सुकेपर्यंत ठेऊन नंतर कोमट पाण्याने धूवून टाका.
शू बाईटवर अजून एक चांगला उपाय म्हणजे रबिंग अल्कोहोल. नाही हे नेहमीचं अल्कोहोल नसून हा वेगळा प्रकार आहे जो कॉस्मेटीक्समध्ये वापरला जातो. यातील अँटीसेप्टीक घटकांमुळे ते शूट बाईटवर गुणकारी ठरतं. हे लावल्याने तुम्हाला जळजळ आणि दुखण्यापासून आराम मिळेल आणि इन्फेक्शनही होणार नाही. दिवसातून 2-3 वेळा कापसाच्या बोळ्यावर घेऊन रबिंग अल्कोहोल लावा.
अॅस्पिरीन हे जसं डोकेदुखीवर गुणकारी आहे. तसंच ते शू बाईटवर ही उपयोगी आहे. अॅस्पिरीनने तुमची जखमेला आलेली सूज आणि जळजळ कमी होईल. पण यासाठी तुम्हाला ही गोळी खायची नसून ती पाण्यात विरघळवून नंतर जखमेच्या जागेवर लावायची आहे. सुकल्यानंतर कोमट पाण्याने धूवून टाका.
शू बाईने तुमच्या पायाला जास्त घाम येऊ शकतो. जर असं असेल तर त्या जागी पावडर लावा आणि ती जागा कोरडी ठेवा. टाल्कम पावडरने जखमेची जळजळ कमी होईल आणि खाजही थांबेल जी शू बाईटमुळे येते.
बटर हे एक चांगलं मॉईश्चराईजिंग एजंट आहे, तसंच यामुळे शू बाईटने येणारी खाज, जळजळ आणि वेदनाही कमी होतील. चमचाभर बटर पातळ करून घ्या आणि जखम झालेल्या ठिकाणी लावा. थोड्या वेळानंतर कोमट पाण्याने धूवून टाका. तुम्ही रात्रभर हे लावून ठेवल्यास उत्तमच. पण जर असं दिवसातून 3-4 वेळा लावल्यास लवकर परिणाम दिसेल.
अजून काही फूट क्रिम्स, स्क्रब्स आणि मास्क्स ज्यांचा वापर करून तुमचे पाय निरोगी आणि सुंदर राहतील. सुंदर पायासाठी घरच्याघरी तुम्ही जास्त पैसे खर्च न करता सलोनसारखं पेडीक्युअर करावं लागेल. ही आहेत काही उत्पादनं जी तुम्ही पायाच्या काळजीसाठी वीकेंडला वापरू शकता.
सुंदर पायांसाठी नक्की करा हे ‘6’ घरगुती उपाय|Homemade Hacks You Can Use To Pamper Your Feet
या आहेत 10 टीप्स ज्यामुळे तुम्ही शू बाईट टाळू शकता (Here are 10 tips that you can try to prevent shoe bites):
1. सर्वात आधी कधीही नवीन चपला किंवा शूज नक्की घालून पाहा. जर तुम्हाला एखाद्या ब्रँडचं पायाचं माप तुम्हाला नक्की माहीत नसल्यास ऑनलाईन फूटवेअर घेणं टाळा.
2. सगळ्यात सोपा उपाय म्हणजे बँड-एड लावणे. तुमच्या चपलांच्या कडांना बँड-एड लावा किंवा जखम झालेल्या जागेवर लावा. तसंच तुम्ही स्कीन फ्रेंडली पांढरी पट्टी ही शूज घालण्याआधी लावा, जर तुम्हाला शू बाईट होईल असं वाटलं.
3. जर तुमचे शूज नवीन किंवा योग्य मापाचे नसतील, ते जाड कापडाचे सॉक्स किंवा डबल सॉक्स घाला. ज्यामुळे तुमच्या त्वचेच्या आणि शूजमध्ये उशीसारखं होईल.
4. खाोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा कॅस्टर ऑईल तुमच्या शूजना लावून ठेवा आणि मगच घाला.
5. अजून एक सोपा उपाय म्हणजे झिपलॉक बॅगमध्ये पाणी भरा आणि शूजमध्ये ठेवून ते फ्रीजमध्ये ठेवा. जसंजशी पिशवी फुगेल तसा शूजचा आकार वाढेल आणि तुम्हाला ते घालणं सोपं जाईल.
6. तुम्ही शू बाईट थोड्याशा उष्णतेने ही टाळू शकता. तुमच्या शूजमध्ये सॉक्स भरा आणि मग सॉक्स उबदार होईपर्यंत शूजला ब्लो ड्राय करा.
7. मेणबत्ती किंवा क्रेयॉन मेण तुमच्या शूजच्या घट्ट किंवा कडक वाटणाऱ्या भागावर लावा. मेण गुळगुळीत आणि मॉईश्चरयुक्त असतं. मेण लावल्याने शूज आणि त्वचेतील घर्षण कमी होतं.
8. तुम्ही शू बाईट प्रोटेक्टर पॅडचा वापरही करू शकता. ते शू सोलसारखं दिसतं आणि तुम्ही ते शूजच्या आतमध्ये टाचेच्या भागात ठेवू शकता. प्रोटेक्टर पॅड्स हे साधारणतः पारदर्शक आणि उशीसारखे मऊ असतात. ज्यामुळे शू बाईट होत नाही. तुम्हाला चालतानाही आरामदायी वाटतं आणि दुखतही नाही. जास्त वेळ शूज घातल्याने होणारा त्रास ही यामुळे कमी होतो.
9. टो प्रोटेक्टर्स हा एक उत्तम शोध आहे. जर तुमच्या पायाच्या बोटांना सतत फोड येत असतील तर हे नक्की वापरा. टो प्रोटेक्टर्स हे यु शेपमध्ये असतात आणि त्याला मऊपणा असतो. कोणत्याही प्रकारच्या शूजवर तुम्ही टो प्रोटेक्टर्स घालू शकता.
10.शेवटचं फक्त चांगले दिसतात म्हणून कोणत्याही चपला किंवा शूज घेऊ नका. फक्त फॅशन करण्यासाठी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
You Might Like This: