ब्रेकअप झाल्यावर काही दिवसांचा काळ फारच कठीण असतो. तुम्हाला त्याच्या आठवणीतून बाहेर पडायचं असतं, पण डोक्यात मात्रसारखे त्याचेच विचार येत असतात. मग हा कठीण काळ कसा घालवायचा. ना काही करायची इच्छा ना कुठे बाहेर पडावसं वाटतं. पण एक गोष्ट तुम्ही नक्की करू शकता ती म्हणजे सोफ्यावर मस्त आडवं व्हायचं आणि तुमचा एखादा आवडता मूव्ही पाहायचा. सुरूवातीला हेही कठीण वाटेल पण यामुळे ना फक्त तुमचं लक्ष विचलीत होईल पण बरंही वाटेल. ते शाहरूख खानचं प्रसिद्ध वाक्य माहीत आहे का? ‘हमारी फिल्मों की तरह, हमारी जिंदगी के अंत में भी सब ठीक हो जाता है…’
मस्त पॉपकॉर्न घ्या, डोळ्यातील अश्रू पुसून टाका आणि उबदार दुलई ओढून छानपैकी ‘या’ मूव्हीज बघा. तुमच्या चेहऱ्यावर हास्य नक्कीच उमलेलं. आम्ही तुमच्यासाठी खास 45 हार्ट ब्रोकन फिल्म्सची लिस्ट बनवली आहे, ज्यामध्ये कॉमेडी, रोमान्स आणि अॅनिमेटेड मूव्हीज आहेत, पाहा आणि छान चिअरअप व्हा. यामध्ये बॉलीवूड आणि हॉलीवूडच्या अप्रतिम मूव्हीजचा समावेश आहे. या मूव्हीज बघितल्यावर तुम्हाला जाणीव होईल की तुम्ही एकट्या नाही आहात आणि ब्रेकअप झाला म्हणजे सगळं संपल असंही नाही.
दिग्दर्शक निकोलस स्टोलर याने हा धम्माल चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ज्याने याआधी नेबर्स फ्रॅचाईज (the Neighbours franchise) सारख्या कॉमेडीज दिल्या आहेत. या मूव्हीमध्ये आपल्या गर्लफ्रेंड साराह (Kristen Bell) कडून डम्प झाल्यानंतर पीटर (Jason Segel) तिला विसरण्यासाठी हवाई (Hawaii) ला जातो. पण तिकडे गेल्यावर त्याला कळतं की त्याची एक्ससुद्धा त्याच्याच हॉटेलमध्ये तिच्या नव्या बॉयफ्रेंडबरोबर उतरली आहे आणि त्यानंतर सुरू होते खरी धम्माल. Watch it here.
ब्रेकअप स्थितीबद्दल देखील वाचा
हा अभिनेत्री मँडी मूर (Mandy Moore) च्या चांगल्या मूव्हीजपैकी एक आहे. जिला तारुण्यात प्रेमात पडायचंय आणि ती पडतेही पण आयुष्याने तिच्यासाठी वेगळाच विचार केलेला असतो. प्रसिद्ध लेखक निकोलस स्पार्क्स यांच्या वॉक टू रिमेंबर या कादंबरीवर आधारित ही मूव्ही आहे. जर तुम्हाला मनसोक्त रडून मनमोकळं करायचं असेल तर ही मूव्ही तुमच्यासाठी आयडियल आहे. Watch it here.
जब वी मेट हा टीपिकल इम्तियाज अली मूव्ही आहे. ज्यामध्ये शाहीद आणि करीनाच्या अप्रतिम अभिनयाने सजला आहे. दोन अनोळखी लोकं जी ट्रेनमध्ये भेटतात. एकाचं नुकतंच ब्रेकअप झालेलं आहे तर दुसरी व्यक्ती एकदम मस्ती आणि मजेत राहणारी. दोघं मिळून धम्माल ट्रीप एन्जॉय करतात, जीवनातल्या संकटात एकमेकांना मदत करतात आणि अखेर एकमेकांच्या प्रेमातही पडतात. या बेबोने साकारलेली गीत तुम्हाला ब्रेकअपमधून बाहेर पडण्यासाठी उत्तम टीप्स देईल. Watch it here.
वाचा - बेस्ट मराठी कॉमेडियन्स (Best Marathi Comedian List In Marathi
लंडनमधल्या ख्रिसमस सेलिब्रेशनच्या महिन्यात घडणारी ही मल्टीस्टारर कथा निर्देशित केली आहे रिचर्ड कर्टीसने (Richard Curtis). एकाच वेळी या मूव्हीमध्ये आठ जोडप्यांची कथा दाखवण्यात आली आहे ज्यांची एकच समस्या आहे प्रेम. जी तुम्हाला शिकवेल की, प्रेमात कधीच हार मानू नका. Buy the DVD here.
चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग्ज्स
एका पित्याच्या आपल्या मुलावरील निस्वार्थी प्रेमाची ही कथा आहे. पिक्सर निर्मित हा मूव्ही तुमचा प्रेमावरील विश्वास नक्कीच दृढ करेल. कारण प्रेम हे सगळ्या गोष्टींवर विजय मिळवू शकतं. Watch it here.
ही आहे न्यूयॉर्कमध्ये घडलेली आधुनिक युगातली खरीखुरी सिंड्रेला स्टोरी. रोमँटीक-कॉमेडी असलेली ही मूव्ही दिग्दर्शित केली आहे वेन वँग (Wayne Wang) ने. या मूव्हीमध्ये जेनिफर लोपेझ मोलकरणीच्या भूमिकेत दाखवली असून तिला एका गैरसमजाने सोशलाईट समजलं जातं आणि त्यानंतर उडणारा गोंधळ. ही भूमिका तुम्हाला सांगते की, स्वःतवर विश्वास ठेवल्यास तुम्ही आयुष्यात नक्की पुढे जाऊ शकता. Watch it here.
बॉलीवूडच्या क्लासिक मूव्हीजपैकी एक असलेला हा चित्रपटा कधीही लागला तरी बघावासा वाटतोच. हा मूव्ही म्हणजे मैत्री, प्रेम, प्रेमभंग आणि सुखद शेवट यांचं उत्तम मिश्रण आहे. या मूव्हीमध्ये आमीर खान, सैफ अली खान, अक्षय खन्ना आणि प्रीती झिंटा हे प्रमुख भूमिकेत आहेत. हा मूव्ही पाहिल्यावर तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल आणि नेहमीप्रमाणे मैत्रिणींबरोबर रोड ट्रीपला जायची इच्छा ही पुन्हा होईल. Watch it here.
अजून एक बॉलीवूड क्लासिक मूव्ही. आयुष्यात तुम्हीही कितीही खचला असलात तरी हा चित्रपट तुम्हाला जाणीव करून देईल की, आयुष्य भरभरून जगलंच पाहिजे. झोया अख्तरने दिग्दर्शित केलेला एक सुंदर चित्रपट, ज्यामध्ये हृतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देओल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा मूव्ही बघितल्याने तुम्हाला नव्याने सुरूवात करण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल. नाव वाचून तुम्हाला मूव्हीबद्दल कल्पना आली असेलच. वारंवार पाहावा असा हा मूव्ही आहे. Watch it here.
जेव्हा तुम्हाला कोणत्याही पर्यायाशिवाय तुमच्या प्रेमापासून लांब जावं लागतं. हे जाणून घ्यायचं असल्यास हा ऑस्कर नॉमिनी मूव्ही नक्की बघा. हॉलिवूड क्लासिक असलेल्या या चित्रपटात ब्रॅडली कूपर आणि जेनिफर लॉरेन्स असून प्रमुख भूमिकेत आहे रॉबर्ट डी नेरो. Watch it here.
विश्वास ठेवा, रिझ वेदरस्पूनचा हा चित्रपट तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने जगण्याची प्रेरणा देईल. या मूव्हीचा सिक्वल ही मजेशीर आहे. यातील एल च्या शब्दात, ‘बस्स झालं, मी तुझ्यावर रडण्यात खूप वेळ घालवला.’ Watch it here.
या मूव्हीचं नाव घेताच आठवतं यातलं प्रिटी वुमन हे सुंदर गाणं. ज्युलिया रॉबर्टस् आणि रिचर्ड गिअर यांची सुंदर लव्हस्टोरी तुमचं मन नक्कीच जिंकेल. कधी कधी नेहमीचा रस्त्याऐवजी अनपेक्षित मार्ग निवडण्यातसुद्धा मजा असते. प्रत्येक मुलीला जगातील सर्व आनंद लुटण्याचा हक्क आहे. आयुष्यात पुरूष असो वा नसो. Watch it here.
या चित्रपटात ज्युलिया रॉबर्टसला तिचं प्रेम मिळत नाही. पण तरीही ती प्रयत्न थांबवत नाही. ती प्रेमासाठी लढते, ते गमावते आणि विसरून पुढे जाते. हा मूव्ही तुमच्या डोळ्यात पाणी आणेल आणि तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणासुद्धा देईल. 90 च्या दशकातील या मूव्हीमधलं प्रसिद्ध गाणं ‘से अ लिट्ल प्रेयर फॉर यू’ हे गाणं नक्की बघा. Watch it here.
एखादं रिलेशनशिप संपल्यावर तुम्ही अक्षरशः तुटता पण तरीही तुम्ही पूर्णपणे जगणं सोडून द्यावं असं नाही. रायन मर्फी दिग्दर्शित आणि ज्युलिया रॉबर्टसच्या अभिनयाने हा चित्रपट सजला आहे. प्रेरणा मिळवण्यासाठी आणि आयुष्य नव्याने पुन्हा एकदा जगण्यासाठी हा चित्रपट नक्की पाहा. तसंच स्वःताला पुन्हा एकदा शोधण्यासाठी एखादा टूरसुद्धा प्लॅन करा. Watch it here.
फोर वेडींग्स आणि फ्युनरल असे मूव्ही लिहीलेल्या रिचर्ड कर्टीसचा हा मास्टरपीस. ह्यू ग्रँटच्या विनोदी अभिनयाने तुमचा वाईट मूड नक्कीच बदलेल. तसंच हेही कळेल की एक गोष्ट संपल्यावर दुसरी नवीन गोष्ट सुरुवात करण्यासाठी आपली वाट पाहात असते. Watch it here.
एरीन ब्रोकविच ही खऱ्या घटनेवर आधारित एका वकील आणि पर्यावरणवादीची कथा आहे. जी सरकारमधील बड्या धेडांना नमवते. हा मूव्ही बघून तुम्हाला कळेल की, प्रत्येक परिस्थितीतून चांगल कसं शोधायचं. Watch it here.
जुनं ते सोनं. तिघी जणी (Diane Keaton, Bette Midler and Goldie Hawn) आपल्या पतींनी सोडल्यानंतर स्वतःच्या पायावर कश्या उभ्या राहतात. आयुष्यात पुन्हा एकदा खंबीरपणे उभं राहण्यासाठी तुम्हाला साथ हवी विश्वासाची आणि चांगल्या मैत्रिणींची. Watch it here.
हॅरी पॉटर आणि त्याचं जादूई जग तुम्हाला आयुष्यातील सर्व दुःख विसरायला भाग पाडेल आणि एकापाठोपाठ आठ भाग पाहिल्यास तर तुमचा मूड नक्की बदलेल. जे के रोलिंगच्या कादंबरीवर आधारित हॅरी पॉटर सीरीज तुम्हाला एका वेगळ्याच जगात नेईल आणि खऱ्या आयुष्यातील सर्व काळज्या तुम्ही थोड्या वेळासाठी तरी नक्कीच विसराल. Buy the DVD here.
जर तुम्ही एखाद्या सेक्स फ्लीक्सच्या शोधात असाल तर अमेरिकन पाय हा चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडेल. प्रत्येक मिनिटाला तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. ज्यामुळे तुमचा वाईट मूड नक्कीच चांगला होईल. Buy the DVD here.
एसआरकेने आधीच म्हंटलंय ना ‘प्यार एक बार नही होता है…’ खरं प्रेम फक्त एकदा नाहीतर दुसऱ्यांदा ही होऊ शकतं. दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या बेस्ट फिल्म्सपैकी एक असलेला हा चित्रपट. एसआरके, राणी मुखर्जी आणि काजोल ही तिकडी, गाणी, फेवरेट सीन्स आणि डायलॉग्ज्स पुन्हा पुन्हा पाहावा असा हा चित्रपट. Watch it here.
‘मनाला जे हवं असतं तेच ते करतं’ याची आठवण हा डान्स मूव्ही करून देतो. यशराजच्या या मूव्हीमध्ये धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेने, करिश्मा कपूर आणि रोमान्स किंग शाहरूख असल्यावर तुम्हाला अजून काय हवं. Watch it here.
जर तुम्ही हल्क उर्फ मार्क रफॅलोचे फॅन असाल तर हा चित्रपटा तुम्हाला नक्कीच आवडेल. ब्रेकअपनंतर ही किआरा नाईटली त्यातून बाहेर पडून पुन्हा नव्याने कशी सुरूवात करते, त्याची ही सुंदर कथा. Watch it here.
ब्रेकअपनंतर जर तुम्हाला खूप लो वाटत असेल आणि ‘मेरा लाईफ इतना खराब हो गया है’ या फेजमधून जात असाल तर तुम्ही हा चित्रपट नक्की पाहा. कारण देवाने नेहमीच आपल्यासाठी काहीतरी चांगलं योजलेलं असतं. क्वीन कंगनाचा या मूव्हीमधला अभिनय उत्तम आहे. ती तुम्हाला हसवते आणि त्याचवेळी नव्याने जगण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा ही देते. Watch it here.
ही कथा आहे एका अशा स्त्रीची जिचं आयुष्यंच बदलून जातं. जेव्हा तिचा नवरा त्यांचं लग्न एका तरूण मुलीसाठी मोडतो. त्यातून ती कशी बाहेर पडते आणि पुन्हा नव्याने कशी सुरूवात होते, हे खरंच प्रेरणादायी आहे. Buy The DVD here.
दोन मैत्रिणी एकमेंकाविरूद्ध उभ्या राहतात, जेव्हा त्यांना कळतं की, त्यांच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण एकच आहे. केट हडसन आणि अॅन हॅथवेचा हा मूव्ही नक्कीच पोटधरून हसवेल आणि तुमच्या बेस्टीबरोबर तुम्ही जास्तीत जास्त वेळ घालवला पाहीजे, हे पटवून देईल. Watch it here.
लव्ह आज कल ही स्टोरी एका कपलची जे प्रेमाचा विचार येतो तेव्हा आपण प्रॅक्टीकली वागायला हवं, असा विचार करतात. वेगळे होतात आणि नव्या संधीच्या शोधात बाहेर पडतात. पण ते प्रेमातून बाहेर पडलेत का? हे जाणून घेण्यासाठी पाहा जय (Saif Ali Khan) आणि मीरा (Deepika Padukone) ची ही लव्हस्टोरी. हा पण आहे इम्तियाज अलीचा मूव्ही आणि आयुष्य आणि रिलेशनशिपबद्दल अजून चांगलं कोण सांगू शकतं. इम्तियाजच्या मूव्हीज नेहमीच तुम्हाला विचार करायला भाग पाडतात. Watch it here.
सर्व क्वीन्स तर पाहिल्या आता आपल्या डोळ्यांना जरा हॉट आणि हँडसम पुरूष पाहून मनोरंजन करूया. मॅजिक माईक आणि याचं सिक्वल मॅजिक माईक एक्सएक्सएल या फिल गुड मूव्हीज तुम्हाला नक्कीच हसवतील. चॅनिंग टाटूम (Channing Tatum)च्या बॉडी बघून तुमच्या बॉयफ्रेंडचा तुम्हाला नक्कीच विसर पडेल.
तुम्हाला माहीत्येय तुम्हाला काय हवंय? थोडीशी मेग रायन (Meg Ryan). तुम्हाला काजोल आणि अजय देवगणचा ‘प्यार तो होना ही था ’ हा चित्रपट आठवतोय का? तो मूव्ही याच मूव्हीवरून घेतला होता. सोपी टीप : तुमच्या एक्स बॉयफ्रेंडच्या पाठीही जाऊ नका आणि कोणत्याही चोराच्याही प्रेमात पडू नका. Watch it here.
वरीलपैकी कोणताही मूव्ही तुम्हाला आवडला नसेल आणि तुमच्या ब्रेकअपशी जर तुम्हाला डील करायचं असेल तर 500 डेज ऑफ समर हा मूव्ही तुमच्यासाठी नक्कीच गाईडबुक आहे. हा चित्रपट अशा प्रियकराची कथा आहे जो प्रत्येकवेळी त्याच्या तुटलेल्या नात्याबद्दल आणि प्रेमिकेबद्दल विचार केल्यावर कोलमडतो. अशी प्रेमिका जिच्यावर त्याने मनापासून प्रेम केल पण तिला त्याच्याबद्दल खात्री नाही. तो यातून कसा बाहेर पडतो, हे जाणून घेण्यासाठी पाहा हा मूव्ही. Watch it here.
हा मूव्ही ‘व्हॉट हॅपन्स इन वेगास’ची कॉपी नाही, असं करण जोहरने म्हटलं होतं. करीना कपूर खान आणि इम्रान खान हे लास वेगासमध्ये मद्यधुंदीत एकमेकांशी लग्न करतात. आहे ना सार्धम्य? तरीही हा मूव्ही मजेशीर आहे आणि गाणीही चांगली आहेत. अगदीच काही नाहीतर आंटीजी या गाण्यावर ठेका तरी नक्कीच धरू शकता. Watch it here.
ब्रेकअप हाताळणं कठीण आहे पण त्याहूनही कठीण असतं, जेव्हा तुम्ही लिव्हइन रिलेशनशिपमध्ये असता आणि दोघांपैकी कोणालाही एका घरातून बाहेर पडायचं नसतं. हा पण मूव्ही एका बॉलीवूड मूव्हीची आठवण करून देतो ना. असो, हा चित्रपट विन्स वॉगन (Vince Vaughn) आणि जेनिफर अॅनिस्टन (Jennifer Aniston) च्या अभिनयासाठी नक्की पाहा. Watch it here.
हा चित्रपट तर ब्रेकअप झाल्यावर पाहण्यासाठी मस्ट आहे. ही मूव्ही पाहिल्यावर तुम्हाला तुमचे शाळेचे दिवस नक्कीच आठवतील. मैत्रिणींच्या सोबतीने केलेला कल्ला, दंगामस्ती आणि शाळेच्या आठवणी पुन्हा एकदा समोर येतील. मग तुमच्या मनातली सगळा रागही निघून जाईल. मस्तपैकी मीन गर्ल्स पाहा आणि ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या अॅटीट्यूडने जगा. Watch it here.
तुम्हाला त्याने फसवलं का? तो तुमच्याशी खोटं बोलंलाय का? तुम्ही डेट करत असतानाच त्याचा इंटरेस्ट संपला होता का? मग तर ही मूव्ही तुम्ही पाहिलीच पाहिजे. या मूव्हीमध्ये हिरो तीन मुलींची फसवणूक करतो. मग त्या त्याला धडा शिकवायचं ठरवतात आणि त्याला शिक्षा द्यायची म्हणून त्याच्या पार्श्वभागावर चावतात. तुम्हाला हवं असल्यास इंग्लिशऐवजी बॉलीवूड व्हर्जनही पाहू शकता, लव्ह का दी एंड ज्यामध्ये श्रद्धा कपूर आहे. Watch it here.
हा चित्रपट तुम्ही तुमच्या वीरेंबरोबर पाहिला असेलच. नसेल पाहिला तर ब्रेकअप झाल्यावर पाहण्यासाठी हा आयडियल मूव्ही आहे. करीना कपूर खान, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया या चार मैत्रिणींची धम्माल कथा आहे. ही मूव्ही बघितल्यावर तुम्हाला नक्कीच मोकळं आणि फ्रेश वाटेल. जमल्यास तुमच्या वीरेजबरोबरच हा चित्रपट पाहा. Watch it here.
ही कहाणी आहे, ऑराची. जी बॉयफ्रेंडकडून डम्प झाल्यावर जवळच्याच हॉटेलमध्ये नोकरी करायला सुरूवात करते आणि तिथल्या शेफ आणि स्थानिक इंटरनेट स्टारच्या प्रेमात पडते. या मूव्हीचा विषय खूपच जवळचा वाटतो. अशी कहाणी ज्यामध्ये एक स्त्री आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करते. Watch it here.
इम्तियाज अलीचा अजून एक अप्रतिम सिनेमा म्हणजे तमाशा. दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूरचा खऱ्या आयुष्यात ब्रेकअप झाल्यानंतरचा हा सिनेमा. हा चित्रपट या दोघांची केमिस्ट्री आणि सिनेमाचा विषय दोन्हींसाठी बघायलाच हवा. Watch it here.
ला ला लँड हा ऑस्कर नॉमिनी मुझ्यिकल सिनेमा म्हणजे अक्षरक्षः जादू आहे. ही कथा आहे, दोन प्रेमींची ज्यांच्या महत्त्वकांक्षेमुळे ते ऐकमेकांपासून दूर जातात. रायन गोसलिंग आणि एम्मा स्टोन्सचा यातील अभिनय जबरदस्त आहे.
बॉलीवूडमधील पहिला चिक फ्लीक म्हणून आयेशा नावाजला जातो. या मूव्हीची कथा एकदम हलकीफुलकी आणि म्युझिक ही छान आहे. टबभर आईसस्क्रीम घ्या आणि मस्त त्याचा आस्वाद घेत हा मूव्ही पाहा. Watch it here.
एक धम्माल ट्रीप आणि चार मित्रमैत्रिणी (Ranbir, Deepika, Kalki and Aditya Roy Kapoor). या ट्रीपनंतर त्यांचे आयुष्य त्यांना वेगवेगळ्या मार्गाने घेऊन जाते आणि अखेर पुन्हा मैत्रिणीच्या लग्नाच्या निमित्ताने त्यांची भेट होते. साधी सरळ गोष्ट पण इतक्या सुंदर रितीने सांगितली आहे की, हा मूव्ही पुन्हा पुन्हा पाहावा वाटतो. जी गोष्ट तुमच्या नशिबात असते ती तुम्हाला मिळतेच. बनी आणि नैना यांची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. पण चौघांमधील मैत्री ही सुंदररित्या दाखवण्यात आली आहे. Watch it here.
कॉकटेलमध्ये दीपिका पदुकोण, सैफ अली खान आणि डायना पेंटी या तिघांचा ही प्रेमभंग होतो पण अखेर त्यांना जीवनाचा मार्ग मिळतोच. यातली गाणी ही सुंदर आहेत. दीपिकाने या मूव्हीमध्ये उत्तम अभिनय केला आहे. Watch it here.
आलिया भट्टने या मूव्हीमध्ये सशक्त अभिनेत्री असल्याचं दाखवून दिलं आहे. हा मूव्हीचं लेखन उत्तम असून दिग्दर्शनही सुंदररित्या करण्यात आलं आहे. एसआरकेने आलियाला थेरपीस्ट म्हणून दिलेले यातले सल्ले नक्की ऐकाच. सुंदर गाणी, गोव्याचं सीनीक लोकेशन आणि आलिया-शाहरूखचा अभिनय यामुळे हा चित्रपट नक्की पाहा. Watch it here.
आयुष्यात कितीही टक्केटोणपे खाल्ले तरी आनंदाने जगणं कधीही सोडू नये. हा संदेश या मूव्हीमध्ये देण्यात आला आहे. ब्रेकअप म्हणजे जीवनाचा अंत नाही. रणबीर कपूर आणि प्रियांका चोप्रा जोडीचा हा मस्त सिनेमा असून यातली गाणी छान आहेत. Watch it here.
या मूव्हीमध्ये असा प्रश्न विचारण्यात आला आहे, ज्याचं बऱ्याच लोकांकडे उत्तर नसतं. एक महिला आणि पुरुष यांच्यात कधी फक्त मैत्री असू शकते का? ही मूव्ही आहे हॅरी आणि सॅलीबद्दल जे एकमेंकावर असलेलं मान्य करत नाहीत, कारण त्यांच्यात चांगली मैत्री असते. मेग रायनचा उत्तम अभिनय असलेला हा सिनेमा 80 च्या दशकातील क्लासिक सिनेमामध्ये गणला जातो.
प्रेम, रिलेशनशिप्स, ब्रेकअप्स आणि प्रेमभंग या समांतरपणे चालणाऱ्या कथा या सिनेमामध्ये आहेत. ब्रेकअपनंतर पाहण्यासाठी परफेक्ट सिनेमा आहे. Watch it here.
तुमच्या खरोखर प्रेम करणाऱ्यांच्या भावनांशी खेळू नका, बरोबर ना? असं नाही केलं तर त्यांचं भूत येऊन तुम्हाला घाबरवू शकतं आणि या सिनेमात तेच दाखवलं आहे. एक भित्रा मुलगा ज्याची एक्स गर्लफ्रेंड भूत होते आणि त्याला भेटायला येते. त्यानंतर त्यांचं प्रेमाबद्दलचं मत बदलतं. Watch it here.
नावावरून तुम्हाला कथेची कल्पना आली असेलच, एक म्युझिशियन आणि लिरीसिस्ट गाण्यावर काम करता करता एकमेकांच्या प्रेमात पडतात. ड्रयू बॅरिमोर आणि ह्यू ग्रांटची जोडी असलेला हा सिनेमा. तुम्हाला नक्की आवडेल. Watch it here.