ADVERTISEMENT
home / मनोरंजन
मृणाल कुलकर्णीच्या ‘ती and ती’चे ट्रेलर प्रदर्शित; इंटरेस्टिंग लव्ह ट्रँगल

मृणाल कुलकर्णीच्या ‘ती and ती’चे ट्रेलर प्रदर्शित; इंटरेस्टिंग लव्ह ट्रँगल

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती and ती’ सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये ट्रेलरची उत्सुकता होती. मोशन पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता किती वाढवली हे सोशल मीडियावर मिळालेल्या प्रतिक्रियांवरुन दिसून आले आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. पुष्कर जोग, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ती and ती’ अर्बन रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे आणि या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये झाले आहे. ‘ती’ कोण? आणि मग ‘ती’ कोणाची आहे? अशाप्रकारे पडलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना मिळत आहेत. प्रत्येक मुलाच्या आयुष्यात अशी एक ‘ती’ असते जी त्याला कधीच मिळत नाही पण तिला तो कधीच विसरु शकत नाही. अशीच गोष्ट आहे अनयची (पुष्कर जोग) आणि त्याच्या आयुष्यातील दोन मुली म्हणजे सई आणि प्रियांका. प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या भूमिकेची हिंट मिळाल्यामुळे या प्रेमाच्या लव्ह ट्रँगलमध्ये त्यांची पुढचं पाऊल काय असेल हे जाणून घ्यायची उत्सुकता  देखील नक्की वाढणार. या ट्रेलरमधून एक सरप्राईज प्रेक्षकांना मिळालं आहे आणि ते सरप्राईज म्हणजे सिद्धार्थ चांदेकर. सिद्धार्थ या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारतोय. सिद्धार्थही गुलाबाजाम या चित्रपटानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 

वाचा – मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती & ती’ १ मार्चला होणार प्रदर्शित

मृणार पुन्हा एकदा दिग्दर्शनात

या चित्रपटाच्या निमित्ताने मृणाल कुलकर्णीचे दिग्दर्शन कौशल्य पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. मृणालने याआधीदेखील चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्याचं कसब तिच्याकडे आहे. बॅकग्राऊंड म्युझिक, गाणं या गोष्टीदेखील कुतूहल वाढवत आहेत. ही एक हलकी-फुलकी, रोमँटिक कॉमेडी कथा विराजस कुलकर्णी याने लिहिली आहे असून सध्याच्या पिढीला हा चित्रपट आपल्यातील एक वाटेल असं वाटत आहे. आनंद पंडीत यांच्या मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने गुझबम्प्स एंटरटेनमेंट आणि हायपरबीस मिडिया यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे यांच्या ‘ती & ती’ मधून एका आगळ्या-वेगळ्या आणि मनोरंजक कथेसोबत प्रेक्षकांची लंडनची सफारीदेखील प्रेक्षकांना घडेल. पुष्कर जोग, वैशाल शाह, मोहन नादर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर मोहित छाब्रा हे सहनिर्माते आहेत. भन्नाट लव्हस्टोरी असलेला ‘ती & ती’ चित्रपट येत्या १ मार्च २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

ADVERTISEMENT

TI   TI

वाचा – ‘ती & ती’ चं मोशन मोस्टर झालं रिलीज, वाढली आतुरता

प्रेमाचा गोंधळ

प्रेमाचा जेव्हा ट्रँगल बनतो तेव्हा सगळ्याच गोष्टीचे कन्फ्युजन वाढते. अशीच प्रेमात गोंधळ उडालेल्या तरुणाची कथा आणि भन्नाट लव्हस्टोरी असणारा ‘ती & ती’ चित्रपट १ मार्च २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. पुष्करने याआधीही मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र मराठी ‘बिग बॉस’नंतर पुष्करचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. यामध्ये त्याच्याबरोबर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरेदेखील दिसणार आहेत. ही लव्हस्टोरी नेहमीची नसून थोडी वेगळी असल्याचं सांगण्यात येत आहे. पुष्करच्या या प्रयत्नाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हेदेखील पाहावं लागेल. तर मृणाल कुलकर्णीने आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. मात्र आता दिग्दर्शनात मृणाल या चित्रपटातून काय कमाल दाखवणार आहे ते लवकरच कळेल.

ADVERTISEMENT

वाचा – ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी पुष्करचा खास ‘झिल-मिल’ व्हिडिओ

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

23 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT