Best Drinking Games In Marathi - आपल्या बीए खेळण्यासाठी सेक्सी ड्रिंक गेम्स | POPxo

आपल्या बॉयफ्रेंडसह नक्की खेळा ‘हे’ सेक्सी ड्रिंक गेम्स (Drinking Games In Marathi)

आपल्या बॉयफ्रेंडसह नक्की खेळा ‘हे’ सेक्सी ड्रिंक गेम्स (Drinking Games In Marathi)

प्रत्येक मुलीच्या आयुष्यात बॉयफ्रेंड हा महत्त्वाचा भाग असतो. आपल्या बॉयफ्रेंडबरोबरच पूर्ण आयुष्य आपल्याला घालवायचं आहे हे स्वप्नं प्रत्येक मुलगी पाहत असते. पण बॉयफ्रेंडबरोबर नातं नक्की कसं निभावायचं असतं याचा अंदाज मुली लावत असतात. तुम्हाला पुढचं पाऊल टाकायचं आहे का? पण त्यासाठी नक्की काय करायचं हे माहीत नसेल आणि तुम्हाला जर भीती वाटत असेल तर आमच्याकडे त्यासाठी काही युक्ती आहेत. तुमच्या बॉयफ्रेंड आणि तुमच्यातील संकोच जर तुम्हाला कमी करायचा असेल तर आम्ही तुम्हाला असे 10 असे सेक्सी ड्रिंकिंग गेम्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्यातील संकोच नक्कीच कमी होईल आणि शिवाय तुम्ही नक्की त्याच्याबद्दल काय विचार करता हेदेखील त्याला कळू शकेल. अशा गेम्समुळे तुमच्यातील संकोच दूर होऊन तुमचं नातं अधिक मजबूत व्हायला मदत होईल. आपल्या बॉयफ्रेंडबरोबर नक्की खेळा हे सेक्सी ड्रिंक गेम्स. 


वाचा - #HeSays: पुरूषांच्या Sex बाबत असतात ह्या '7' Fantasies!


10 आपल्या बीए खेळण्यासाठी सेक्सी मद्यपान खेळ (Best Drinking Games)


मूव्ही ड्रिंकिंग गेम (Adult Movie Drinking Game)


हा खेळ अतिशय सोपा आहे. यासाठी तुम्हाला कोणताही एक मूव्ही अर्थात चित्रपट निवडायचा आहे. जो तुमच्या दोघांच्याही आवडीचा असेल आणि नवा असेल. या चित्रपटादरम्यान तुम्हाला काय होईल याचा जर अंदाज असेल तर त्याची एक यादी बनवून घ्या आणि जेव्हा चित्रपट बघताना असं घडेल तेव्हा तुम्ही एकमेकांबरोबर जे ड्रिंक पित असाल त्याचा एक शॉट प्यायचा.  हा खेळ अधिक गंमतीशीर बनवण्यासाठी तुम्हाला हवं तर तुम्ही थोडा नॉटी चित्रपटही पाहू शकता जेणेकरून ड्रिंक करतानाच तुम्ही एकमेकांचे होण्यासाठी तयार राहू शकता. तुम्ही एकमेकांच्या अधिक जवळ येऊ शकता.


1-sexy-drinking-games


रशियन रॉले (Russian Roulette)


काही शॉट ग्लास एकत्र करून घ्या आणि एक ग्लास सोडून बाकी सर्व ग्लासमध्ये पाणी भरून घ्या. त्या रिकाम्या ग्लासामध्ये तुम्ही तुमच्या आवडतं ड्रिंक भरून घ्या. त्यानंतर कोणत्या ग्लासामध्ये आपलं आवडतं ड्रिंक भरलं आहे हे कळेपर्यंत ते शॉट्स पित राहा. ज्यामध्ये तुमचं आवडतं ड्रिंक सापडेल, तेव्हा त्याचा एक शॉट मारा आणि त्यानंतर एक डेअर परफॉर्म करा. खेळ अधिक रोमांचक करण्यासाठी तुमच्या आवडत्या ड्रिंक्सच्या ग्लासची संख्या वाढवत राहा.


स्पिन द बॉटल (Spin the Bottle)


तुम्हाला स्पिन द बॉटल वाचून आश्चर्य वाटलं ना? की नात्यामध्ये हा खेळ कसा काय खेळू शकतो? तर आम्ही तुम्हाला सांगतो की, नक्की काय करायचं आहे. सर्कलमध्ये लोकांच्या ऐवजी सेक्सी फूडचे पर्याय ठेवावेत. उदाहरणार्थ व्हिप्ड क्रीम, जेल शॉट्स अथवा चॉकलेट्स..तुम्हाला जे आवडेल ते. आता तुम्ही दोघांनी बसून खेळायला सुरुवात करा. बॉटल स्पिन करा. जेव्हा बॉटल तुमच्या पार्टनरच्या दिशेने असेल तेव्हा त्याला किस करा. जेव्हा बॉटल एखाद्या पदार्थासमोर स्पिन होईल तेव्हा तो पदार्थ घेऊन तुम्हाला ज्या तऱ्हेने आवडेल त्या पद्धतीने आपल्या पार्टनरबरोबर तुम्ही खाऊ शकता. यामध्ये कोणी हरण्याचा किंवा जिंकण्याचा प्रश्न नाही. दोघांनाही एकमेकांबरोबर चांगला वेळ घालवत एकमेकांना समजून घेता येतं आणि शिवाय तुम्हाला हवं त्या पद्धतीने सेक्सची मजाही घेता येते.


3-sexy-drinking-games


स्नेक्स अँड लॅडर्स (Snakes and Ladders)


लहानपणी स्नेक्स अँड लॅडर्स अर्थात सापशिडी हा खेळ सर्वांनाच आवडत असतो. पण या खेळाला आपण ड्रिंकिंग गेमही बनवू शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, कसा काय आपण याला ड्रिंकिंग गेम बनवू शकतो. तर जेव्हा तुमच्या पार्टनरची शिडी चढण्याची वेळ येईल तेव्हा त्याला एक शॉट प्यावा लागेल आणि जेव्हा साप येईल तेव्हा त्याला पुन्हा पहिल्यापासून खेळाची सुरुवात करावी लागले. हे करत असताना तुम्हाला दोघांनाही आपल्या ड्रेसचा एक एक पिस स्ट्रीप करावा लागेल. आहे ना एकदम सोपा आणि तितकाच हॉट गेम? हा गेम खेळताना दोघांनाही नक्कीच मजा येईल आणि दोघेही एकमेकांच्या अधिक जवळ येऊ शकतील.


वाचा - 9 मुलींनी शेअर केलं त्यांचं एक खास सिक्रेट… तो क्षण जेव्हा त्यांच्या पार्टनरने त्यांच्या स्तनांना...


डेअर बीअर पॉन्ग (Dare Beer Pong)


तुम्ही सगळ्यांनी क्लासिक बीअर पॉन्ग या खेळाबद्दल ऐकलं असेल किंवा तुमच्यापैकी काही लोकांनी हा खेळ खेळलादेखील असेल. इथे बीअर पॉन्गऐवजी एक ट्विस्ट असेल. बीअर भरून ग्लासेस टेबलच्या दोन्ही टोकांवर त्रिकोणी आकारात ठेवण्यात येतात. प्रत्येक ग्लासमध्ये बीअरची मात्रा वाढायला हवी. आता तुमच्या पार्टनरला त्या ग्लासच्या दिशेने पिंग पॉन्ग बॉल फेकायचा आहे आणि ज्या ग्लासमध्ये हा बॉल पडेल अथवा टच करेल, त्या ग्लासातील बीअर प्यायची आहे. हाच प्रकार तुमचा पार्टनरही तुमच्याबरोबर करणार आहे. ट्विस्ट असा आहे की, प्रत्येक ग्लासाखाली एक डेअर लिहून ठेवायचं आहे. तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला केवळ बीअरच प्यायची नाही तर ग्लासखाली लिहून ठेवण्यात आलेलं डेअर अर्थात आव्हानदेखील पूर्ण करायचं आहे. तुम्ही दोघंही बीअर पित नसाल तर तुम्हाला जे ड्रिंक आवडत असेल त्याचा उपयोग करूनदेखील हा खेळ तुम्ही खेळू शकता. यामध्ये तुम्ही एकमेकांना आव्हान देत अधिकाधिक जवळ येऊ शकता. मात्र हे आव्हान सेक्सी आव्हान असायला हवं जेणेकरून तुम्ही दोघं एकमेकांच्या जवळ येण्यासाठी प्रवृत्त व्हाल. त्यामुळेच तुम्हाला या खेळाची अधिक मजा घेता येईल.


5-sexy-drinking-games


टू ट्रूथ्स, वन लाय


तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला या खेळात एकमेकांना तीन गोष्टी सांगायच्या आहेत. यामध्ये दोन गोष्टी खऱ्या हव्यात आणि एक गोष्ट खोटी. जर तुमच्या पार्टनरने कोणती गोष्ट खोटी आहे हे ओळखलं तर तुम्हाला ड्रिंकचा शॉट प्यायचा आहे. जर पार्टनरने नाही ओळखलं तर ड्रिंकचा शॉट त्याला प्यावा लागेल. अशा तऱ्हेने या खेळामध्ये तुम्ही जर अगदी सुरुवातीच्या स्टेजला असाल तर एकमेकांबद्दल बरीच माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला एकमेकांबद्दल किती माहिती आहे हेदेखील तुम्हाला कळतं आणि तुम्ही नव्याने एकमेकांबद्दल जाणून घेऊ शकता.


फ्लिप, सिप, स्ट्रिप (Flip, Sip or Strip)


तुम्हाला एखादं नाणं घेऊन ते फ्लिप करायचं आहे. फ्लिप केल्यानंतर हेड येणार की टेल याचा अंदाज तुमच्या पार्टनरने लावायचा आहे. त्याने जर योग्य उत्तर दिलं तर त्याला काहीच करावं लागणार नाही. पण जर चुकीचा अंदाज लावला तर, त्याला ड्रिंकचा एक शॉट प्यावा लागेल. जर त्याने दोन वेळा चुकीचा अंदाज सांगितला तर त्याला त्याच्या ड्रेसचा एक पीस स्ट्रीप करावा लागेल. त्यानंतर तुमची वेळ. तुम्हालाही हेच करावं लागेल. हा अतिशय सेक्सी आणि मस्तीचा खेळ आहे. हा खेळ तुम्ही कितीही वेळा खेळून एकमेकांच्या जवळ येऊ शकता. शिवाय खेळता खेळता तुम्हाला मस्ती करत सेक्स करण्याचाही अनुभव घेता येतो.


7-sexy-drinking-games


नेव्हर हॅव आय एव्हर (Never Have I Ever)


या खेळाची सुरुवात तुमच्यापैकी कोणीही करू शकतं. तुमच्या दोघांपैकी याआधी कधीही एकमेकांना काही वाईल्ड गोष्ट सांगितली नाहीये अशी गोष्ट तुम्ही सांगू शकता. उदाहरणार्थ - तुम्ही मुलगी असाल किंवा मुलगा असाल तर मुलीशीच किंवा मुलाशीच सेक्स कधीच केला नाही. हे वाक्य असल्यास, तुमच्या पार्टनरने तसं केल्यास, त्याला ड्रिंकचा एक शॉट प्यावा लागेल. असंच काहीतरी एकामागोमाग एक वाईल्ड गोष्ट एकमेकांना सांगत हा खेळ खेळायचा आहे. पण तुम्ही जर कम्फर्टेबल नसाल आणि तुमच्या डोक्यात या गोष्टी राहणार असतील आणि त्याचा परिणाम नंतर तुमच्या नात्यावर होणार असेल तर असे गेम्स खेळणं टाळा.


वाचा - Male Orgasm बद्दल तुम्हाला 'ह्या' 10 गोष्टी माहीत नसतील?


स्ट्रिपटीज डाईस (Striptease Dice)


9-sexy-drinking-games
स्ट्रिपटीज डाईस हा खेळ खेळायचा असेल तर त्यासाठी योग्य रीत समजून घ्या. हा खेळ अतिशय सोपा आहे. एक डाईस घेऊन तो पुन्हा टाका. समान क्रमांक आला तर तुम्हाला ड्रिंक करायचं आहे आणि जर विषम क्रमांक आला तरत तुम्हाला तुमच्या ड्रेसचा एक पीस स्ट्रीप करायचा आहे. यामध्ये कोणीही जिंकत नाही किंवा हरत नाही. पण हा गेम खेळत असताना तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडच्या अथवा गर्लफ्रेंडच्या अधिक जवळ येऊ शकता.


बॉडी शॉट्स (Hot Body Shots)


डाईसची एक जोडी घ्या आणि प्रत्येक क्रमांकाजवळ सहा शरीराचे भाग आणि शॉट घेण्याचे सहा पर्याय लिहा. उदाहरणार्थ - लिकिंग इट ऑफ, सिपिंग अथवा सकिंग (चोखणे). डाईस फिरवून तुम्हाला कळेल की, तुमच्या पार्टनरच्या कोणत्या शरीराच्या भागाचं तुम्हाला कोणत्या भागावर आणि कशा तऱ्हेने शॉट घ्यायचा आहे. अर्थात तुम्हाला देण्यात आलेल्या पर्यायानुसार, तुम्ही तुमच्या पार्टनरच्या अधिक जवळ जाऊ शकता. यामध्ये ड्रिंक नसेल तरीही चालू शकेल. तुम्ही नुसत्या पर्यायानुसारही हा खेळ खेळू शकता.


फोटो सौजन्य - Giphy