डाकूंच्या जीवनावर आधारित ‘सोनचिडिया’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ‘थरारक ट्रेलर’ प्रदर्शित झाला आहे. दरोडेखोरांची दहशत आणि गावकऱ्यांचा संघर्ष या ट्रेलरमध्ये दिसत आहे. सोनचिडियामध्ये सुशांत सिंग राजपूत, भुमी पेडणेकर, आशुतोष राणा, मनोज वाजपेयी महत्त्वाच्या भूमिकेतून दिसणार आहे. ट्रेलरमधील ‘शिवराळ डायलॉग’ सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. सोनचिडीया चित्रपट दिग्दर्शक अभिषेक चौबे यांनी दिग्दर्शित केला असून या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला करत आहेत. आठ फेब्रुवारीला सोनचिडिया प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत ‘लखना’ या दरोडेखोराची भूमिका साकारत असून मनोज वाजपेयी या डाकूंच्या लीडरच्या भूमिकेत असणार आहे. ट्रेलरमधील भूमी पेडणेकरचा अॅक्शन अवतारदेखील नक्कीच उत्सुकता वाढवणारा आहे.
चंबलमध्ये आजही दरोडेखोरांविषयी ‘दहशत’ कायम
चंबलमधील डाकूंच्या कहाण्या चित्रपटातून अनेक काळापासून आपण पाहिल्या आहेत. अनेक चित्रपटांमधून खतरनाक डाकू आणि त्यांचा संघर्ष दाखविण्यात आला आहे. डाकू ‘गब्बर सिंग’चे डायलॉग तर आजही अनेकांना तोंडपाठ आहेत. खरंतर बुंदेलखंडमधील ‘चंबल’च्या जंगलात आजही अनेक डाकूंचे अस्तित्व आहे. एखादा कुख्यात डाकू मारला गेला की त्याची जागा दुसरा एखादा नवीन डाकू घेतो. कधी कधी तर अनेक जण नाहक दरोडेखोरीच्या जाळ्यात अडकले जातात. काहींच्या पोलिसांसोबत चकमकी होतात तर काही काहीजण आत्मसमर्पण करतात. त्यामुळे भारतात काही ठिकाणी आजही दरोडेखोर आणि त्यांची दहशत कायम आहे.
अनेक चित्रपटामधून दरोडेखोरांचा ‘संघर्ष’ मांडण्याचा प्रयत्न
दरोडेखोरांची भूमिका ही जरी नकारात्मक छटा दर्शवणारी असली तरी चित्रपटामधून अशा भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच पंसती देतात.अशा चित्रपटांधील ‘संवाद आणि वास्तवदर्शी चकमकी’ पाहणं अनेकांना आवडतं.आतापर्यंत अनेक चित्रपटातून दरोडेखोरांची दहशत दाखविण्यात आली आहे. यापूर्वी ‘बॅंडीट क्वीन’ या चित्रपटातून भल्या भल्यांचा थरकाप उडवण्याऱ्या डाकू फुलनदेवीचे आत्मचरित्र दाखविण्यात होतं. शेखर कपूर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केल होतं तर सीमा विश्वास यांनी या चित्रपटात फुलनदेवीची भूमिका साकारली होती.’चायनागेट’ चित्रपटातूनदेखील खतरनाक दरोडेखोर आणि त्यांची थरारक दशहत आपण अनुभवली आहे.दरोडेखोरीचे वास्तव दाखवण्याऱ्या ‘शोले’ या चित्रपटाचे तर अनेकांनी अक्षरशः पारायणच केले आहे. आता सोनचिडिया चित्रपटातून नेमका कोणता संघर्ष प्रेक्षकांसमोर येत आहे हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम