ADVERTISEMENT
home / अॅक्सेसरीज
स्टिक ऑन ब्रा वापरताय, तर  तुम्हाला हे माहीत हवं (Stick-On Bra In Marathi)

स्टिक ऑन ब्रा वापरताय, तर तुम्हाला हे माहीत हवं (Stick-On Bra In Marathi)

एखाद्या लग्नसमारंभात किंवा इव्हिनिंग पार्टीजला बॅकलेस ड्रेस अगदी शोभून दिसतात. त्यापेक्षाही हे ड्रेस भाव खाऊन जातात ते ‘स्टिक ऑन ब्रा’मुळे…  या आधी पारदर्शक प्लास्टिक बेल्ट असलेल्या ब्रा वापरल्या जायच्या पण त्या बॅकलेस ड्रेसला पूर्ण न्याय देऊ शकायच्या नाहीच शिवाय त्यामुळे अंगावर लाल चट्टे उठायचे. आता हा नवीन प्रकार महिलांना असे हटके कपडे घालायचे स्वातंत्र्य देत आहे.  तुम्ही ब्रा चा नवीन प्रकार वापरत असाल किंवा आता तुम्ही ही ब्रा विकत घेणार असाल तर स्टिक ऑन ब्रासंदर्भात काही गोष्टी तुम्हाला माहीत हव्यात.

N Gal nude

स्टिक ऑन ब्रा निवडताना (Choosing the right Stick-On Bra)

अचूक ब्रा साईज कोणती?असा प्रश्न अनेकांना पडतो.  अनेकदा महिलांना ब्रा ची अचूक साईज कळत नाही त्यामुळे कितीही महागडी ब्रा घेतली तरी त्यांना त्या नीट होत नाही, अशीच त्यांची कायम तक्रार असते. जर तुम्ही वापरत असलेल्या रेग्युलर ब्रा तुमच्या स्तनांचा आकार योग्य ठेवत असतील. ब्राचे पट्टे तुमच्या त्वचेवर रुतत नसतील. तर ती साईज साधारणत: योग्य आणि अचूक आहे, असे म्हणायला हवे. स्टिक ऑन ब्रा मुळातच फक्त स्तनांना चिकटून असते. त्यामुळे अचूक आकार घेणे आवश्यक आहे. तुम्ही आणलेली स्टिक ऑन ब्रा तुमच्या संपूर्ण स्तनांना कव्हर करत असेल  आणि स्तनांना योग्य आकार देत असेल तर ती ब्रा साईज अगदी योग्य आहे. रंगाचा विचार करायचा झाला तर यामध्ये आता अनेक रंग येऊ लागले आहेत. पण स्किन कलर अथवा बेज रंग हा यातील उत्तम पर्याय आहे. तो तुम्ही कशावरही घालू शकता.

Quttos Black Solid Non-Wired Lightly Padded Stick-On Bra

ADVERTISEMENT

प्लस साईज ब्रा हवी आहे? (How Viable Are Sticky Bras For Large Breasted Women?)

आता ही ब्रा केवळ बारीक किंवा ठराविक स्तनांच्या आकारासाठी मुळीच नाही. प्लस साईज ब्रा देखील यात आहेत. मोठ्या स्तनांना देखील ही ब्रा तितकीच चांगली बसते. त्यामुळे घाबरुन जाण्याचे काहीच कारण नाही. फक्त ही ब्रा कशी घालायची ? हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

Hunkemoller Stick-On Bra

अशी घाला स्टिक ऑन ब्रा (Troubleshooting Sticky Bra Sticky Situations)

तुम्ही आणलेली स्टिक ऑन ब्रा घालणे इतर ब्रा च्या तुलनेत वेगळे आहे. स्टिक ऑन ब्रा ग्लूवर अवलंबून असल्यामुळे ही घालण्याआधी शरीरावर कोणतेही बॉडी लोशन, क्रिम लावू नका. कारण त्यावर ग्लू चिकटणार नाही.  शिवाय आंघोळीच्या ओल्या अंगावर स्टिक ऑन ब्रा चिकटवू नका. कारण ती तात्पुरती चिकटून राहील आणि ऐन कार्यक्रमात तुमची फजिती होईल. हे टाळण्यासाठी स्तनांचा भाग कोरडा करुन त्यावर स्टिक ऑन ब्रा चिकटवा. तसेच एक स्तन हाताने धरून त्याला पहिल्यांदा पहिला भाग चिकटवा आणि मग दुसऱ्या भागावरही तसेच करा. म्हणजे ती ब्रा व्यवस्थित तुमच्या स्तनांना चिकटून राहील. 

कोणताही त्रास नाही (Is It Safe To Wear Stick-On Bra)

संपूर्ण स्तन व्यापून टाकणारी ब्रा आरोग्याला घातक नाही का ? असा प्रश्न तुम्हाला असेल तर निश्चिंत राहा. कारण यामुळे तुमच्या स्तनांना कोणताही धोका नाही.उलट स्तनांना उभारी आणण्यासाठी यामध्ये वायर किंवा अन्य काहीच नसल्यामुळे तुमची स्तने योग्य राहतात. स्तनांना आवश्यक ती उभारी मिळते. शिवाय स्तनाग्रांना (TITS) ग्लू लागत नाही. तो भाग मोकळा राहतो त्यामुळे याचा कोणताही धोका स्तनांच्या आरोग्याला होत नाही. पण सतत ही ब्रा वापरणे योग्य नाही.  

ADVERTISEMENT

N-Gal Pink Lightly Padded Stick-On Push-Up Bra

अशी घ्या स्टिक ऑन ब्रा घालताना घ्यायची काळजी (Bra Care Tips)

स्टिक ऑन ब्रा तुमच्या स्तनांचा भाग व्यापते. ब्रा चिकटून ठेवण्यासाठी कप्सच्या कडांना ग्लू लावलेला असतो. ब्रा घालून झाल्यानंतर ती धुताना विशेष काळजी घ्यावी लागते. हा म्हणजे ही ब्रा धुता येते.  अगदी नाजूक हाताने कप्सना पाणी आणि अंगाचा साबण लावून ही ब्रा धुवावी लागते. त्याच्या ग्लूजवळील भागावर तुम्हाला काहीच करायचे नाही. त्यावर मळ साचला असे तुम्हाला वाटत असेल तर नाजून हाताने मळ चोळून काढा. कारण स्टिक ऑनवर लावलेला ग्लू मळ पटकन काढून टाकतो. पण ते करताना ग्लू ब्रा पासून वेगळा होणार नाही याती काळजी घ्या. उन्हात ब्रा वाळत घालणे टाळा. ब्रा वाळल्यानंतर ग्लू असलेल्या ठिकाणी पुन्हा प्लास्टिक लावून ठेऊन द्या.

PrettyCat Beige Solid Non-Wired Lightly Padded Stick-On Bra

स्टिक ऑन ब्रा वापरण्याचे तोटे (Disadvantages of Using Stick-On Bras)

स्टिक ऑन ब्रा चे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहे. आता तोटे ऐकल्यानंतर घाबरुन जाऊ नका. अनेकदा अशा ब्रा स्वस्त मिळतात म्हणून आपण कुठूनही त्यांची खरेदी करतो. पण तसे करुन नका. अशा हलक्या प्रतींच्या ब्रामुळे तुम्हाला अॅलर्जी होण्याची शक्यता अघिक असते. त्यामुळे उत्तम प्रतीच्या स्टिक ऑन ब्रा खरेदी करा. ज्या ब्रा च्या कप्समध्ये चांगल्या कापडाचा वापर असेल अशा ब्राची निवड करा. अशा ब्रा मध्ये सिलिकॉन वापरण्यात येते. पण त्यासोबत कॉटनचा वापर असेल तर अशा ब्रा तुमच्या त्वचेला आणि स्तनांना चांगल्या असतात.

ADVERTISEMENT

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम 

04 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT