चंद्रग्रहण - सुपर ब्लड वूल्फ मून

चंद्रग्रहण - सुपर ब्लड वूल्फ मून

नुकताच संक्रमण काळ संपला आहे आणि वेध लागले आहेत चंद्र ग्रहणाचे! 21 जानेवारीला चंद्रग्रहण आहे. हे या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आहे. या दिवशी पौर्णिमा असल्याने चंद्र पूर्ण गोलाकार आणि नेहमीपेक्षा मोठया आकाराचा दिसणार आहे. भारतीय वेळेनूसार हे चंद्रग्रहण सकाळी 10:11 वाजता सुरु होऊन 11:12 पर्यंत असेल. त्यामुळे पूर्ण एक तास चंद्रग्रहण असणार आहे. मात्र हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. 20 जानेवारीला रात्री 9 वाजल्यापासून ग्रहणाचे वेध लागतील. हे ग्रहण आफ्रिका, युरोप, लंडन आणि पॅरेस या देशांमध्ये दिसणार आहे.


चिंता करायचं कारण नसलं तरी चिंतन नक्की करा...


खगोलशास्त्रानुसार ग्रहण हे सावल्यांमुळे घडत असते. एक वस्तू दुसऱ्या वस्तूच्या आड येऊन तिला झाकते म्हणजे तेव्हा पहिल्या वस्तूने दुस-या वस्तूला ग्रहण लावले असे म्हणतात. खगोलप्रेमींसाठी ग्रहण हा अभ्यासाचा काळ असतो. या गोष्टींवर विज्ञान आजही अभ्यास करीत आहे. जो अभ्यास आपल्या संस्कृतीतल्या अमोघ अशा ज्योतिषशास्त्राने कित्येक हजार वर्षांपूर्वी करुन ठेवलेला आहे. हा अभ्यास इतका परिपूर्ण व ­इतका अचुक आहे की आपल्या घरातल्या दिनदर्शिकेमध्ये ग्रहण कधी आहे? कोणत्या दिवशी आहे? किती वाजल्या कधीपर्यंत ग्रहणकाळ असेल? ग्रहण आपल्या देशात दिसेल की नाही? शिवाय दुस­ऱ्या इतर कोणत्या देशांमध्ये ते दिसेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली असतात. जे आपण वाचून सहज समजून घेऊ शकतो. त्यासाठी कुठल्या तज्ज्ञाची आवश्यकता लागत नाही. आपलं ज्योतिषशास्त्र किती महान आणि अगाध आहे याचा हा एक पुरावा आहे. मात्र दुर्भाग्याची बाब ही आहे की तरीही आपल्याला ज्योतिषशास्त्राचे महत्त्व समजावून सांगावे लागते.


भौगोलिक स्थितीनुसार पृथ्वी, सूर्य आणि चंद्र हे जेव्हा एका सरळ रेषेत येतात तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्र ग्रहण दिसते. चंद्र ग्रहण हे नेहमी पौर्णिमेलाच लागते. यावेळेस पौष महिन्याची पौर्णिमा म्हणजेच दि. २१ जानेवारी २०१९ या दिवशी सकाळी ८ वाजुन ०७ मिनिटांपासून तर दुपारी १ वाजुन ०७ मिनिटांपर्यंत चंद्र ग्रहण असणार आहे. हे चंद्र ग्रहण पूर्ण ग्रहण आहे.


ज्योतिषशास्त्राच्या परिभाषेत या चंद्र ग्रहणाच्या वेळेस राहू आणि चंद्र एकत्र येणार आहेत. सर्वसाधारण भाषेत सांगायचे झाल्यास ग्रहण म्हणजे संकट मानले जाते. म्हणून ग्रहण काळात कुठलेच शुभकार्य केले जात नाही. त्यात चंद्र हा मनाचा व आईचा कारक असल्याने ग्रहणकाळात या संदर्भात फळे शुभ मिळत नाही. या काळात हानिकारक ऊर्जा निर्माण होत असते. या ऊर्जेचा प्रभाव आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर पडत असतो. म्हणून ग्रहणकाळामध्ये शक्यतोवर घराबाहेर न पडता पूजा-पाठ करण्यावर भर दिला पाहिजे.


mooneclipse 1


ग्रहणकाळात घ्यावयाची काळजी


हे चंद्र ग्रहण कर्क राशीत व पुष्य नक्षत्रात होत आहे. मनुष्यासह प्राणीमात्रांवरही या ग्रहणाचा प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून ग्रहण काळामध्ये अत्यंत सावधानी बाळगली पाहिजे. काही महत्त्वाचे काम नसेल तर घराबाहेर पडू नका. ग्रहण काळामध्ये अन्न सेवन करु नका. झोप तर अजिबात घेऊ नका. जेवण व झोप या दोन्ही गोष्टी ग्रहणकाळामध्ये निषिद्ध मानल्या गेल्या आहेत. शक्य झाल्यास देवाचे स्मरण, चिंतन, ध्यानधारणा करण्यावर भर द्या. ग्रहणकाळामध्ये सर्वात जास्त काळजी गर्भवती महिलांनी घ्यावयाची असते. मात्र हे चंद्र ग्रहण भारतात दिसणार नाही. तर दक्षिण अमेरिका, प्रशांत महासागर, आफ्रिका, युरोप या भागातून दिसणार आहे. त्यामुळे भारतीय लोकांनी विशेष अशी काळजी करण्याचे काही कारण नाही. विशेषत: गर्भवती महिलांनी ग्रहणाची जास्त काळजी करु नये. तरीही आपल्या संस्कृतीच्या मान्यतेनुसार ग्रहणकाळामध्ये करावयाचे विधी केले पाहिजेत. पाळावयाची पथ्ये पाळली पाहिजेत. ग्रहण काळामध्ये कुठल्याही नवीन कामाची सुरुवात अजिबात करु नये. मात्र ग्रहणकाळ संपल्यानंतर दानधर्म करण्याची आपली परंपरा आहे. त्यामुळे आपापल्या परिने दानधर्म करावा. ते सर्वात उपयुक्त मानले जाते.


राशीनुसार चंद्र ग्रहणाचे परिणाम


मेष राशी - ग्रहणकाळ चिंताजनक आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी किमान पथ्य पाळलीच पाहिजेत.


वृषभ राशी - आपल्या मनोकामना पूर्ण होतील.


मिथुन राशी- आर्थिक नुकसान होऊ शकते सावध राहा.


कर्क राशी - ग्रहण आपल्या राशीतून जात असल्याने सर्वात जास्त त्रासदायक ठरणार आहे स्वत:ची काळजी घ्या.


सिंह राशी - खर्चाचे प्रमाण वाढेल उत्पन्न व खर्च यांचा मिलाप साधण्याचा प्रयत्न करा.


कन्या राशी - आपल्या राशीसाठी ग्रहण लाभदायक ठरेल.


तूळ राशी- ग्रहण आपल्यासाठी फायदा करुन देणारे आहे.


वृश्चिक राशी- आपल्या स्वभावामध्ये अनिश्चितता वाढू शकते.


धनु राशी- शरीरात जीवनात आळस प्रवेश करु शकतो.


मकर राशी- आपलं आर्थिक नुकसान होऊ शकतं सावध राहा.


कुंभ राशी- आपल्या सुखात वाढ होणार आहे.


मीन राशी- आपल्या चिंता वाढणार आहेत त्यातुन बाहेर निघण्याचा प्रयत्न करा.


भाग्य हे ग्रहांच्या दिशा आणि दशा या दोन गोष्टींवरुन ठरत असतं. त्यामुळे या दोन्ही लक्षात घेऊन कार्यरत राहिल्यास होणा­ऱ्या लाभाचाअधिक चांगल्या पद्धतीने लाभ आपण घेऊ शकतो. तसेच वाईट गोष्टींची तीव्रता कमी करु शकतो. या ग्रहणाचेही आपल्यावर होणारे परिणाम समजून, उमजून घ्या म्हणजे जगणे सुकर होऊ शकते. लाभाची स्थिती असेल तर प्रयत्नांची पराकाष्टा करायला चुकू नका आणि चिंतेची बाब असेल चिंता न करता चिंतन करण्यावर भर द्या. त्यातून तुम्हाला नवे मार्ग गवसतील. शक्य झाल्यास ध्यानधारणा करायला विसरु नका.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद