उत्तम आरोग्यासाठी आपण सतत निरोगी जीवनशैली अंमलात आणण्याचा प्रयत्न करत असतो. मुबलक पाणी आणि उत्तम आहार आपल्या आरोग्यासाठी किती आवश्यक आहे हे आपल्या सर्वांना माहित असतं. पण उत्तम आरोग्यासाठी आपली त्वचा आणि केसदेखील निरोगी असायला हवे हे अनेकांना माहित नसतं. सुंदर दिसण्यासाठी तुम्ही जी सौदर्य उत्पादने वापरता ती चांगल्या दर्जाची आणि तुम्हाला सूट करणारी असायला हवीत. कारण त्वचा आणि केसांसाठी वापरण्यात येणाऱ्या इंटरनल आणि एक्स्टर्नल अशा दोन्ही उत्पादनांचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.
तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेत असाल तर तुम्ही बऱ्याचदा ‘पॅराबेन’ हा शब्द नक्कीच ऐकला असेल
पॅराबेन मुख्यतः कॉस्टमेटीक्स आणि फार्मास्युटिकल्स उत्पादनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्रिझर्वेटिव्हजचा एक समूह असतो. थोडक्यात रासायनिक भाषेत सांगायचे झाल्यास या पॅरा-हायड्रोक्सीबेंझेंट किंवा पॅरा-हायड्रॉक्सीबेंझोइक अॅसिडच्या सिरीझ असतात. शॅम्पू, मॉश्चराईजर, शेवींग जेल, लुब्रीकंट, टॉपिकल फार्मास्युटिकल्स, मेकअप आणि टुथपेस्ट अशा अनेक उत्पादनांमध्ये पॅराबेनचा वापर करण्यात येतो. आजकाल काही अन्नघटकांच्या पदार्थांमध्ये देखील याचा वापर करण्यात येतो.
पॅराबेन (Paraben) चा तुमच्या शरीरावर होणारा दुष्परिणाम
जर आपल्या दैनंदिन जीवनात अनेक उत्पादनांमध्ये ‘पॅराबेन’चा इतक्या मोठ्या प्रमाणावर वापर होत असेल तर त्याबाबत अधिक जाणून घेणे फार गरजेचे आहे. काही संशोधनानूसार पॅराबेनचा तुमच्या शरीरातील एस्ट्रोजन हॉर्मोन्सवर विपरित परिणाम दिसून येतो. ज्यामुळे महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता असते. तुम्ही वापरत असलेल्या सौदर्य उत्पादनांमध्ये पॅराबेन आहे का हे तपासण्यासाठी त्या उत्पादनावरील माहिती नीट वाचा. बऱ्याचदा Butylparaben, Methylparaben आणि Propylparabe या घटकांमध्ये पॅराबेन असते. पण अनेकदा या घटकांना Alkyl para hydroxy benzoates असेही म्हटले जाते.
पॅराबेन (Paraben) चा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम
पॅराबेनचा जितका दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होतो तितकाच दुष्परिणाम पर्यावरणावरदेखील होतो. एका वैज्ञानिक संशोधनानूसार ‘पॅराबेन’ सर्वात प्रथम समूद्रातील सस्तन प्राण्यांमध्ये आढळुन आले. संशोधकांचा असा विश्वास आहे की हे पॅराबेन या समूद्री जीवांमध्ये समुद्रातील प्रदूषणातून मिसळले गेले असावे. पुरुषांमध्येदेखील पॅराबेनमुळे स्पर्मची संख्या कमी होण्याचा दुष्परिणाम दिसून येतो. पॅराबेन असलेली उत्पादने वापरल्यामुळे लहान मुलांमध्ये त्वचाविकार झालेले आढळुन आले आहेत. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला काही पॅराबेनचा आणि सल्फेट फ्री उत्पादने देत आहोत. ज्या माहितीचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.
त्वचेची उत्तम काळजी घेण्यासाठी नियमित त्वचा स्वच्छ करणे फार गरजेचे आहे. जसं आपण काहिही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुतो अगदी तशीच आपण नियमित आपल्या चेहऱ्याची देखील काळजी घेतली पाहिजे. आपण सतत घराबाहेरील धुळ आणि प्रदुषणाचा सामना करत असतो. चेहरा नियमित स्वच्छ केल्याने चेहऱ्यावरील धुण आणि जंतू निघून जातात. त्वचेची छिद्रे मोकळी होतात आणि आपण तजेलदार दिसू लागतो. केमिकलयुक्त उत्पादनांमुळेदेखील चेहरा स्वच्छ होतो मात्र त्यामुळे आपल्या त्वचेवरील महत्वाच्या नैसर्गिक तेलांचा थरदेखील स्वच्छ केला जातो.
POPxo Recommends: यासाठी POPxo तुम्हाला काही सर्वोत्तम उत्पादने सूचवत आहे.
सेटाफील जेंटल स्कीन क्लीन्जर हे सेन्सेटिव्ह त्वचेच्या लोकांना दररोज वापरण्यासाठी तयार करण्यात आलेले क्लिन्जर आहे. हे क्लिन्जर वैद्यकियदृष्ट्या योग्य असून खास डिझाईन करण्यात आलेले आहे. हे उत्पादन सोप फ्री असल्याने तुमच्या त्वचेला हानिकारक ठरत नाही. या उत्पादनामुळे तुमची त्वचा मऊ आणि तेजलदार दिसू लागते.तुमच्या लहान मुलांनादेखील तुम्ही हे उत्पादन वापरू शकता.कोणत्याही त्वचा प्रकारासाठी तुम्ही हे उत्पादन वापरू शकता. हे उत्पादन खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा.
किंमत - 255 रु.
कामाने ‘आजीच्या बटव्या’ मधील सल्लानूसार हे आयुर्वेदिक सौदर्य उत्पादन तुमच्यासाठी तयार केले आहे. हे उत्पादन ऑर्गनिक असून त्याचा तुमच्या त्वचेवर खूप चांगला परिणाम दिसू शकतो. यामध्ये बारा प्राचीन आयुर्वेद घटकांचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे तुमच्या फाईन लाईन्स कमी होतात, त्वचेचा पोत सुधारल्याने त्वचा अधिक सुंदर दिसू लागते. या उत्पादनामध्ये केसर, बदाम, व्हिटॅमिन ई आणि डी चा उत्तम वापर करण्यात आला आहे ज्यामुळे तुमच्या त्वचेचे पोषण होते. हे उत्पादन खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा.
किंमत - 1450 रु.
जर तुमची त्वचा तेलकट असेल अथवा तुमच्या त्वचेवर अॅक्ने असतील तर हिमालया नीम फेस वॉश हे उत्पादन तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. अनेक वर्षांपासून हिमालयाची उत्पादने ही आयुर्वेदिक उत्पादने असल्याने लोकप्रिय आहेत. या उत्पादनातील कडूलिंब या घटकामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि मऊ तर होतेच शिवाय यामुळे त्वचेचा दाहदेखील कमी होतो. हे उत्पादन खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा.
किंमत - 135 रु.
स्कीन स्नेल मॉश्चराईज मास्क शीट हे एक कोरियन स्कीन केअर उत्पादन असून त्यातील नैसर्गिक घटक तुमच्या त्वचेला चमकदार करतात. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी हे उत्पादन फारच उपयुक्त आहे. धुळ आणि प्रदुषणामुळे डिहायड्रेट झालेली तुमची त्वचा या उत्पादनामुळे मॉश्चराईज होते. स्कीन स्नेल मॉश्चराईज मास्क शीट खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा.
किंमत - 180 रु.
त्वचेची काळजी घेताना तुम्ही त्वचेला योग्य मॉश्चराईज करणे फार आवश्यक आहे. क्लीन्जरने त्वचेतील धुळ आणि प्रदुषण काढून टाकल्यामुळे त्वचा कोरडी होते. त्यामुळे अशा त्वचेला वेळीच मॉश्चराईज करणे गरजेचे आहे. नियमित त्वचा मॉश्चराईज केल्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात व तुम्ही अधिक तरुण दिसू लागता.
POPxo Recommends: यासाठी POPxo तुम्हाला काही उत्पादने सूचवत आहे.
तुम्ही त्वचेची काळजी घेता मात्र त्वचा टोन करण्यास विसरुन जाता. लक्षात ठेवा त्वचा नियमित टोन करणे तितकेच आवश्यक आहे. तुमची त्वचा क्लीन्जरने स्वच्छ करा आणि जेजू वोल्कॅनिक पोर टोनरने तुमची त्वचा टोन करा. ज्यामुळे तुमची त्वचा मोकळी होईल आणि फ्रेश दिसू लागेल. एका कॉटन पॅडवर हे टोनर घ्या आणि तुमच्या चेहऱ्यावर लावा. इनीसफ्री जेजू वोल्कॅनिक पोर टोनर तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता.
किंमत - 1440 रु.
हर्ब्स गोटूकोला इंडीयन गिनसेंग रॅजूवेटींग ब्युटी इलीक्सीर हे उत्पादनदेखील तुमच्या त्वचेसाठी फारच उत्तम आहे. कारण ते एक आयुर्वेदिक उत्पादन आहे. यामध्ये अनेक प्राचीन आयुर्वेदिक वनस्पतींचा समावेश करण्यात आला आहे. या उत्पादनात Rosehip, Wheat germ, Safflower आणि Moringa या बियांचं कोल्ड प्रेस ऑईल वापरण्यात येतं. ज्यामुळे तुमच्या त्वचेला व्हिटॅमिन ए, सी आणि ईचा पुरवठा होतो. तुमच्या त्वचेवरील फाईन लाईन्स कमी होतात आणि त्वचा चमकदार दिसू लागते. जेष्ठमध आणि नागकेशरमुळे त्वचा उजळ होते. नैसर्गिक चमक आणि तजेलदार दिसण्यासाठी हे उत्पादन तुम्ही नक्की ट्राय करु शकता. हर्ब्स गोटूकोला इंडीयन गिनसेंग रॅजूवेटींग ब्युटी इलीक्सीर खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा.
किंमत - 1625 रु.
जगभरात दी बॉडी शॉप हा एक प्रसिद्ध ब्रॅन्ड आहे.त्यांची टी ट्री ऑईलची रेंज ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे.चेहरा स्वच्छ करण्यासाठी क्लिन्जर, टोनर, फेशिअल वॉश, साबण नक्कीच चांगले असतात. पण या उत्पादनांच्या सततच्या वापरामुळे तुमच्या त्वचेतील महत्वाची नैसर्गिक तेलंदेखील कमी होतात. परिणामी त्वचा कोरडी होते. या टी ट्री ऑईलमुळे त्वचा स्वच्छ होते शिवाय तुमच्या त्वचेवरील मुरमंदेखील कमी होतात. त्यामुळे जर तुमच्या त्वचेवर पिंपल्स अथवा डाग असतील तर हे उत्पादन तुमच्यासाठी फारच उपयोगी ठरू शकते. हे उत्पादन खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा.
किंमत - 695 रु.
कोरफड तुमच्या त्वचेसाठी किती उपयुक्त आहे हे तुम्हाला माहित असेलच. लक्षात ठेवा कोरफड ही एक अद्भूत औषधी वनस्पती आहे. कोरफडमध्ये 95 टक्के पाणी असून त्यात अमिनो अॅसिड, व्हिटॅमिन ए,बी, सी आणि ईदेखील असतात. फोरेस्ट इसेंशिअल लाईट हायड्रेटींग फेशिअल जेल अॅलोव्हेरा ही यासाठी एक सर्वोत्तम ठरू शकते. हे उत्पादन जरी महाग असले तरी ते घेणं योग्यच ठरेल कारण हे जेल मल्टीपरपज आहे. तुम्ही तुमच्या कोरड्या त्वचेसाठी यात हळद, मध, दूध आणि थोडंस गुलाबजल मिसळुन चेहऱ्यावर लावू शकता. त्यातील पाण्याच्या घटकांमुळे तुमच्या त्वचेचे योग्य पोषण होते. या जेलमध्ये थोडी साखर आणि लिंबू रस मिसळुन तुम्ही या जेलचा स्क्रबसारखादेखील वापर करु शकता. या जेलमध्ये मध आणि वाटलेले अक्रोड मिसळुन लावल्यास तुमच्या पिंपल्सवरदेखील ते चांगले परिणाम करते. फोरेस्ट इसेंशिअल लाईट हायड्रेटींग फेशिअल जेल अॅलोव्हेरा खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा.
किंमत - 1425 रु.
आपण या आधीच कामा या आयुर्वेदिक ब्रॅन्ड आणि त्यातील नैसर्गिक घटकांचा वापर याविषयी जाणून घेतलं आहे. त्यामुळे ही आयुर्वेदिक डे क्रीम तुमच्या त्वचेला मॉश्चराईज करेल यात शंकाच नाही. यामध्ये नारळाचं दूध आणि तिळाच्या तेलाचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहिल. यातील Costus आणि वेलचीमुळे तुमची त्वचेचा पोत सुधारतो. तसंच यातील कोरफडीच्या अन्टीसेफ्टीक गुणधर्मामुळे अॅक्ने, फाईन लाईन्स आणि सुर्यप्रकाशापासून तुमचे संरक्षण होते. यातील ऑलिव्ह, रोज आणि जास्मिन या तेलांच्या मिश्रणामुळे तुमची त्वचा मॉश्चराईज होते. थोडक्यात या उत्पादनामुळे तुम्ही अधिक तजेलदार आणि सुंदर दिसू लागता. हे उत्पादन खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा.
किंमत - 1495 रु.
फॉरेस्ट इसेंशिअल लाईननींग अॅन्ड ब्राईटनींग तेजस्वी इम्लंशन केवळ तेलकट त्वचेसाठी उपयुक्त आहे. यामध्ये गाईचे शुद्ध तुप, बदाम तेल, नारळाचे शुद्ध तेल आणि कोकम बटर यापासून तयार करण्यात आले आहे. यामध्ये काही औषधी वनस्पतींची मुळं आणि फुलांचा अर्क वापरण्यात आला आहे. तेलकट त्वचा असेल तर तुम्हाला मॉश्चराईजर वापरणे कठीण होते. पण लक्षात ठेवा दररोज त्वचा मॉश्चराईज करणं गरजेचं आहे. फॉरेस्ट इसेंशिअल लाईननींग अॅन्ड ब्राईटनींग तेजस्वी इम्लंशन हे उत्पादन तुमच्या तेलकट आणि निस्तेज त्वचेला मॉश्चराईज करुन ताजेतवाने करते. हे उत्पादन खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा.
किंमत - 2275 रु.
त्वचा मॉश्चराईज करणे म्हणजे चेहऱ्यासह संपूर्ण शरीराची त्वचा मॉश्चराईज करणं होय. कारण थंडीतून आपले हात आणि पायाची त्वचा फारच कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. कारण चेहऱ्याप्रमाणे हात आणि पाय यांचादेखील सतत बाहेरील हवेशी संपर्क येत असतो. हे लोशन तुमच्या संपूर्ण त्वचेला मॉश्चराईज करण्यास फारच उपयुक्त ठरू शकतो. केटाफील मॉश्चराईजींग लोशन खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा.
किंमत - 375 रु.
आता आपण सौदर्य उत्पादनांमधील सल्फेट विषयी जाणून घेऊ या
तुम्ही जेव्हा एखादा शॅम्पू वापरता तेव्हा त्या शॅम्पूला जो जाडसरपणा येतो तो सल्फेटमुळे असतो. अशा शॅम्पूने तुमचे केस स्वच्छ होतात पण त्यासोबत त्याचे दुष्परिणामदेखील तुम्हाला भोगावे लागतात.
सौदर्य उत्पादनांमधील सल्फेटचा काय दुष्परिणाम होतात.
शॅम्पूमध्ये वापरण्यात येणाऱ्या सल्फेटमुळे तुमच्या केसांची त्वचा कोरडी होते, त्वचेला खाज येते आणि केस गळू लागतात. खरं तर अशा उत्पादनांंमुळे तुमचे केस स्वच्छ होतात पण त्यामुळे तुमच्या केसांच्या त्वचेतील उपयुक्त आणि नैसर्गिक तेलंदेखील निघून जातात ज्यामुळे केसांची त्वचा निस्तेज होते. संशोधनानूसार अशा उत्पादनांमधील सल्फेटमुळे तरुणांच्या डोळ्यांवर दुष्परिणाम होऊन अंधपणादेखील येऊ शकतो. यासाठीच तज्ञ लहान मुलांना सल्फेट फ्री शॅम्पूच वापरण्याचा सल्ला देतात. पण एखादे उत्पादन सल्फेट फ्री आहे म्हणजे त्या उत्पादनाचा भविष्यात दुष्परिणाम होणार नाही असे मुळीच नाही. कारण अशा देखील काही उत्पादन कंपन्या आहेत ज्यांच्या उत्पादनांमध्ये सल्फेट ऐवजी इतर केमिकल्स वापरण्यात येतात ज्यांचे अधिक भयंकर परिणाम असू शकतात. त्यामुळे सल्फेट फ्री उत्पादन खरेदी करताना त्यामध्ये केमिकल्सऐवजी नैसर्गिक फळं अथवा भाज्यांचा वापर केला आहे का हे अवश्य तपासा.
ज्यांचे केस अगदी ड्राय आणि रफ आहेत त्यांच्यासाठी हा एक उत्तम शॅम्पू आहे. यामध्ये एग व्हाईट आणि कोकोनट मिल्कचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे तुमच्या केसांना पोषण मिळते. केस मऊ होतात शिवाय डिहायड्रटदेखील होत नाहीत. या उत्पादनामुळे तुमच्या केसांचे उत्तम पोषण झाल्याने केस चमकदार दिसू लागतात. हा शॅम्पू खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा.
किंमत - 1145 रु.
जर तुम्हाला दररोज प्रदुषण आणि धुळीचा सामना करावा लागत असेल तर सहाजिकच तुमचे केस निस्तेज आणि कोरडे होऊ शकतात. हा ऑर्गेनिक शॅम्पू शुद्ध अॅपल सायडर व्हिनेगरपासून तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये बदाम, अर्गन ऑईलचा वापर करण्यात आला आहे. या शॅम्पूमुळे तुमची त्वचा स्वच्छ होते शिवाय त्यावरील डेडस्कीनदेखील निघून जाते. जर तुम्हाला कोंड्याची समस्या असेल तर हा शॅम्पू तुमच्यासाठी फारच उपयुक्त ठरेल. हा शॅम्पू खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा.
किंमत - 499 रु.
हेअरमॅक सल्फेट फ्री शॅम्पू कोणत्याही प्रकारच्या केसांसाठी उत्तम आहे. ज्यामुळे तुमचे केस मऊ आणि तलम होतातच शिवाय तुमच्या केसांच्या त्चचेच्या अनेक समस्या कमी होतात. जर तुम्हाला स्मूथ, शायनी आणि फ्रीज फ्री केस हवे असतील तर हा शॅम्पू नक्की ट्राय करा. या शॅम्पूमुळे तुमच्या केसांचे अतिनील सुर्यकिरण आणि केसांच्या ट्रिटमेंटसाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकल्सपासून देखील तुमचे संरक्षण होते. हा शॅम्पू खरेदी करण्यासाठी या ठिकाणी जरुर क्लीक करा.
किंमत - 730 रु.
आम्ही सूचवलली ही उत्पादने पॅराबेन आणि सल्फेट फ्री असल्याने तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त आहेत. उत्तम जीवनशैलीसाठी ही उत्पादने अवश्य ट्राय करा.
फोटोसौजन्य - Shutterstock
अधिक वाचा -